यु मी और 'हम'............

राधा's picture
राधा in जनातलं, मनातलं
29 Jul 2008 - 9:06 pm

सर्व वाचक मंडळीना नमस्कार. 'व्यक्ती आणि व्यक्ती'(२ भाग) व 'वाघ्या' या लिखाणानंतर आता थोडा काही वेगळ लिहिण्याचा प्रयत्न करते आहे. आधीच्या प्रतिक्रिया वाचुनच हे लिखण करते आहे , म्हणुनच पुन्हा एकदा आपल्या प्रतिक्रियांची साथ हवी आहे.
इतक्यातच काजोल आणि अजय देवगण यांचा ' यु मी और हम' पिक्चर बघीतला. तो कसा बनला आहे किंवा अभिनयाबद्दल मला नाही लिहायच हा पण त्याची 'कथा' मात्र मनात घर करुन गेली. 'alzimer'हा रोग झालेल्या एका स्त्री ला तिचा नवरा नव्हे ' जीवनसाथी' कसा आधार देतो ते यात दाखवले आहे. ज्या रोगामुळे एक स्त्री स्वताच सुध्दा अस्तीत्व विसरते, तिच्या या विसरण्या मुळे त्यांच्या मुलाचा सुध्दा जीव धोक्यात येतो, रोजच्या गोष्टी सुध्दा तीला आठवत नाहीत, अशा स्त्री ला तिचा नवरा केवळ तिच्या वरच्या प्रेमापोटी आजन्म सांभाळतो. सगळ्या च्या मनात येत असेल की पिक्चर आहे 'त्यांना दाखवायला काय जात हे सगळ?????' खर आहे ते. पण अस नवरा-बायकोत असणार प्रेम ' फिल्मी' नाही ह, मी बघीतल आहे.
मी वर्धेच्या रुग्णालयात होते. रोज दुपारी आम्ही डॉक्टर सोबत वेगवेगळ्या वॉर्ड ला पेशंट बघायला जायचो. एकदा शल्यचिकित्सा विभागात एक नविन पेशंट पाहिला. सधारण २४-२५ वर्षाची ती स्त्री होती. तिच्या डोक्याची शस्त्रक्रिया झाली होती. तिचे केस पेपर मी बघीतले तेव्हा समजला की ती काही महिन्या पुर्वीच बाळंतीण झाली होती. या बाळंतपणातच तिला हा आजार झाला. म्हणुन तिचा ऑपरेशन कराव लागल. आणि तीची परिस्थीती आता अशी होती की हात- पायाच्या हालचाली तर नव्हत्याच तिला सभोवताली काय चालु आहे हे पण कळत नव्हत. तिच्या जवळ एक बाई बसली होती मी तिच्या जवळ गेले अन विचारपुस केली. ती तिची आई होती . तिच्या कडुन इतकच कळल की तिचा बाळंतपण माहेरी झाला . मुलगा झाला म्हणुन सासरचे खुश होते पण जस त्याना या आजाराबद्दल समजला कोणी बघायला पण नाही आल. तिचा नवरा कुठेतरी दुर नोकरीला आहे. वगैरे. मला पुढच्या वॉर्ड मधे जायच असल्याने मी जास्त नाही थांबले .पण मनात सारखा त्या बाईचाच विचार होता.
३-४ दिवस मला पुन्हा तिथे जायला वेळ नाही मिळाला पण सारखा त्या बाईला बघुन यावस वाटत होता. तिच्या बद्दल डॉक्टरशी डिस्कस केला तेव्हा समजला की ती पुर्णपणे बरी होणे शक्याच नव्हते पण ती स्वताचे काम स्वता करु शकेल याचे पण ४०% च चान्सेस होते. ऐकुन काटाच आला अंगावर.

कस होइल तिचा. नुकतीच तर ती बाळंतीण झाली होती. वयही फार नाही. कशी जगेल ही? तिचे सासरचे तर तिला नाहीच स्विकारणार, आई वडिल तरी कसे सांभाळ करतील.............?'' असे एक ना अनेक विचार मनात आले. शेवटी विचार आला तिच्या नवर्‍याचा.

पहिले चीड आली की बायको एवढी आजारी आहे अन हा आला पण नाही? कसा आहे तो? जिच्यासोबत सात जन्म काढायचे वचन दिले तिला पहिल्याच जन्मात सोडेल तो? पण तो तरी काय करणार , त्यालाही मुलाचा विचार करायला हवा ना? खुप श्रीमंत नाही तो, इला लागणारा खर्च तओ तरी कसा करेल..........?
असे कितीतरी प्रश्ण समोर उभे राहीले. उत्तर तिच्या जवळ गेल्या शिवाय नव्हत सापड्णार. मी सकाळी लवकरच ती बाई होती त्या वॉर्ड मधे गेले. बघतो तर तिचे नातेवाईक सामानाची बांधाबांध करत होते. प्रथम मी घबरलेच. जवळ्च्या नर्स ला विचारल तिला काही झाला तर नाही ना? तर ती म्हणाली ,

''नाही हो. तिचा नवरा म्हण्तोय इथे नाही ठेवायचा. म्हणुन त्याना सुट्टी दिली सरांनी(डॉक्टर्नी). बरोबर आहे हाडामासाच्या पुतळ्यावर कोण पैसे खर्च करणार....... जाउ द्या तुमचीच वाट बघत होते .त्याना घरी करायचे व्यायाम सांगा अन मोकळ करा.............''

मला खुप राग आला त्या माणसाचा. मी रागातच त्या बाईच्या बेडपाशी गेले. त्या माणसाला २ गोष्टी ऐकवायच्याच होत्या. पण तिच्या बेड जवळ गेल्यावर मी स्तब्धच उभे राहिले. तिच्या नवर्‍याने वॉर्डबॉय च्या मदतीने तिला खुर्चीत बसवले होते. व्यवस्थीत उश्या लाउन तिची मान सरळ केली होती. तिची नजर '' शुन्यात'' होती पण हा तिच्याशी गप्पा मारत होता.

'' प्रतिभा आता आपल्याला घरी जायचे आहे हा. तुझा बाळ तुझी वाट बघतोय ना म्हणुन. इथल्यापेक्षा मी घरीच तुझी काळजी घेइन.'..............'

आजुबाजुच्यांना विसरुन तो तिच्याशी मस्त गप्पा मारत होता. मी गेल्या वर तो उठुन उभा राहीला. मी माझी ओळख करुन दिली आणि मी का आले ते पण सांगीतले. तो खुश झाला. म्हणाला, '' मला शिकवा सगळ मी करुन घेइन तिच्या कडुन.'' त्याने सगळे व्यायाम लक्षपुर्वक शिकुन घेतेले.
''तिची काळजी कशी घेउ? काय तिच्या साठी चांगला काय वाईट? सगळ सगळ त्याने व्यवस्थित विचारुन घेतला. आणि मुख्या म्हणजे आम्ही बोलत असतांना तो तिला पण समजाउन सांगत होता. मला खरच आश्चर्या वाटल. मी काय त्याला शिकवणार . तोच मला खुप काही शिकवत होता. मला प्रश्ण होता तो की त्याच्या मउलाच काय.? तो म्हणाला '' मी एका ठिकाणी धंदा करतो. घरचाच आहे म्हणा ना. मला इचा हॉस्पीटलचा खर्चा व वेगळ्या नर्स चा खर्च नाही हो परवडणार, तेव्हा मी इला तिथेच माझ्याजवळ ठेवणार. आणि आमच्या मुलाला माझे अन इचे आई- बाबा बघतील''

मी बघतच राहीले. आपलया बायकोची जबाबदारी कोणी घेणार नाही त्याला माहीत होते. पण त्याच त्याला तिळ्मात्रही दुख नव्हता. लवकरच त्यांचे पेपर्स त्याना देण्यात आले. प्रेमाने त्याने सग्ळ्यांचा निरोप घेतला. निघतांना तो म्हणाला ,'' प्रतिभा या सगळ्याना आपण तु बरी झाली ना की भेटायला येउ ह..........''
आणि ते लोक ऍम्बुलन्स कडे निघाले. सगळा वॉर्ड त्याच्या कडे बघत होता.........................

मी हसत -हसत बाहेर पडले. 'यु ' आणि 'मी ' कसे ''हम'' होतात प्रत्यक्ष डोळ्यांनी बघीतले...................

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

स्नेहश्री's picture

29 Jul 2008 - 9:20 pm | स्नेहश्री

म्हणजे अशी पण माणस अजुन जगात आहेत हे वाचुन खरच बर वाटल.
कारण आज काल हे फार दुर्मिळ होत चालल आहे.
नवर्याला खरच HATS OFF....

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

चंबा मुतनाळ's picture

29 Jul 2008 - 9:27 pm | चंबा मुतनाळ

फारच छान लिहिले आहेत आपले अनुभव राधाताई तुम्ही.
मी काहि 'यु मी और हम' हा चित्रपट पाहिला नाहिये, पण त्या नवर्याचे अभिनंदन.

यशोधरा's picture

29 Jul 2008 - 10:08 pm | यशोधरा

छान अनुभव अहे राधा तुझा... अशी सकारात्मक नाती पहायला किती छान वाटतं, नाही?

भडकमकर मास्तर's picture

30 Jul 2008 - 8:17 am | भडकमकर मास्तर

अशी सकारात्मक नाती पहायला किती छान वाटतं, नाही?

हेच म्हणतो.... सगळीकडे इतकं वाईट घडत असतं , असं काही वाचलं की छान वाटतं... :)
लेखनही चांगले झाले आहे...

ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सहज's picture

30 Jul 2008 - 8:55 am | सहज

सगळीकडे इतकं वाईट घडत असतं , असं काही वाचलं की छान वाटतं
लेखनही चांगले झाले आहे...

हेच म्हणतो.

मनिष's picture

30 Jul 2008 - 1:24 pm | मनिष

असेच म्हणतो...राधा, तुझा छोटेखानी अनु्भव/लेख खूप आवडला.
अवांतर : यू, मी और हम फार बकवास आहे!

- मनिष

सखाराम_गटणे™'s picture

29 Jul 2008 - 10:52 pm | सखाराम_गटणे™

चांगले लिहीले आहे.

असाच नवरा सगळ्यांना भेटो.

सखाराम गटणे

संदीप चित्रे's picture

29 Jul 2008 - 11:48 pm | संदीप चित्रे

राधा ... मी आणि माझ्या बायकोने नुकताच 'यू, मी और हम' पाहिला. खरंच खूप वेगळ्या कथेला हात घालायचं धाडस केलंय अजय - काजोलने.
तुमचा अनुभव सांगीतल्याबद्दल धन्यवाद.
डॉक्टर, वकील, शिक्षक इ. पेशांतील लोकांचे अनुभव खास असतात कारण ते हाडामांसाच्या माणसांशी निगडीत असतात.
(आमच्यासारखं कंप्युटरशी बोलत बसावं लागत नाही !!)
--------------------------
www.atakmatak.blogspot.com

शितल's picture

30 Jul 2008 - 3:59 am | शितल

राधा छान अनुभव मांडला आहेस.
नवरा बायकोत प्रेम असेल तर कोणताही कठीण प्रसंगाला धीराने तोंड देता येते.
प्रेम असलेल्या व्यक्ती साठी किती ही केले तरी कमीच वाटते.

मदनबाण's picture

30 Jul 2008 - 4:01 am | मदनबाण

सहमत..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

आनंदयात्री's picture

30 Jul 2008 - 12:42 pm | आनंदयात्री

सुंदर अनुभवकथन राधे .. !!

वेदश्री's picture

30 Jul 2008 - 1:16 pm | वेदश्री

राधा,

तुझा अनुभव खूपच आवडला. माझ्या छोट्याशा आयुष्यात अनुभवलेल्या निरनिराळ्या जीवघेण्या अपघातांमध्ये देवासारख्या भेटलेल्या डॉक्टरांचे मला स्वतःला आलेले अनुभव झर्रकन् डोळ्यासमोर तरळून गेले.. आणि त्या प्रत्येकवेळी अत्यंत धीराने घेऊन माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे आईबाबाही. तुझा हा अनुभव वाचताना असे वाटले की जणू काही मी 'नाते जन्माचे' हे डॉक्टरांचे असेच हृदयस्पर्शी अनुभव सांगणारे पुस्तक पुन्हा एकदा वाचायला घेतलेय आणि त्यातला आधी वाचायचा राहून गेलेला एक अनुभव वाचतेय.

तसा मला सिनेमांचा शौक नसल्यातच जमा आहे पण तरीही सिनेमांमधलेच दाखले सांगायचे तर 'यू मी और हम'हून जास्त छान असलेला काहिसा त्याच धरतीवर आधारीत 'गोजिरी' हा मराठी चित्रपट ( जो यूमीहमच्या खूप आधी प्रदर्शित झालेला आहे ) मला नंतर कळला. निव्वळ अप्रतिम आहे. दाक्षिणात्य अभिनेते जास्त आवडणार्‍या मला 'चेलुवी' चित्रपटातला नायक अतीव आवडला होता तोही यासाठीच.शिवाय 'गुरू'मध्ये अभिषेक-ऐशपेक्षा मला आवडून गेले ते त्यातील माधवनचे व्यक्तीचित्र तेही यासाठीच !

शेवटी नाते मग ते कुठलेही असो, त्यातल्या विश्वासयुक्त प्रेमाची वीण जोवर घट्ट असत नाही तोवर त्या नात्याला खरा अर्थ प्राप्त होत नसतो, हेच खरे.

विजुभाऊ's picture

30 Jul 2008 - 1:20 pm | विजुभाऊ

काय प्रतिक्रिया देउ.
सगळे बलात्कार खून घरगुती छळ हाणामार्‍या यांच्या बातम्या देणारे न्यूज चॅनेल्स या असल्या सकारात्मक बाबी का आणत नाहीत लोकांसमोर.
जगात काय केवळ वाईटच गोष्टी घडतात असे याना का वाटते

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

वेदश्री's picture

30 Jul 2008 - 1:30 pm | वेदश्री

>सगळे बलात्कार खून घरगुती छळ हाणामार्‍या यांच्या बातम्या देणारे न्यूज चॅनेल्स या असल्या सकारात्मक बाबी का आणत
>नाहीत लोकांसमोर.

याबद्दल मला एका दोस्ताचा आलेला एसेमेस अगदीच बोलका आहे म्हणून इथे देतेय...

A seed while growing makes no sound. A tree when falls makes huge noise. Destruction makes noise.. Creation is always quiet !

प्राजु's picture

30 Jul 2008 - 7:11 pm | प्राजु

A seed while growing makes no sound. A tree when falls makes huge noise. Destruction makes noise.. Creation is always quiet !

सुंदर. किती अर्थ आहे या मेसेज मध्ये!
राधा तुझे अनुभव कथन आवडलेच हे वेगळे सांगायला नको.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jul 2008 - 1:46 pm | बिपिन कार्यकर्ते

खरंच, असेही लोक असतात जगात. राधा, छान लिहिलं आहे तुम्ही.

विजुभाऊंशी १००% टक्के सहमत. आजच एक बातमी बघितली सकाळी, ओरिसा मधे एका माणसाने काहिही मोबदला न घेता त्याचा एक डोळा एका गरजू म्हातार्‍या व्यक्तिला दान केला. पण अश्या बातम्या कमी येतात आणि लगेच गायब होतात. नाहितरी बातमी ची व्याख्या केलीच आहे, 'माणसाला कुत्रा चावला तर ती बातमी होत नाही. पण माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी असते.' आजकालचे पत्रकार (बहुतांश) त्यांच्या धंद्याला जागताहेत, त्यांना तरी काय दोष द्यायचा.

बिपिन.

मनिष's picture

30 Jul 2008 - 1:49 pm | मनिष

आजच एक बातमी बघितली सकाळी, ओरिसा मधे एका माणसाने काहिही मोबदला न घेता त्याचा एक डोळा एका गरजू म्हातार्‍या व्यक्तिला दान केला.

माझ्या माहितीप्रमाणे जिवंत व्यक्ती डोळे दान करू शकत नाही आणि नेत्रदान हे नेहमी विनामोबदलाच केले जाते. (फॉर्म भरला आहे मी!)

पारिजातक's picture

30 Jul 2008 - 4:24 pm | पारिजातक

असाच एक इंग्रजी चित्रपट आहे Fifty First Date त्यावरून हा चित्रपट चोराला आहे. ते इथे महत्वाच नाही पण जो अनुभव तुम्ही सांगितल तो खरच Unique आहे!!!! असे लोक फारच कमी सापडतात हल्ली. आभारी आहोत तुमचे आम्ही आमच्या पर्यंत हे पोहचवल्या बद्दल !!!!
पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!

झकासराव's picture

30 Jul 2008 - 8:27 pm | झकासराव

असाच एक इंग्रजी चित्रपट आहे Fifty First Date त्यावरून हा चित्रपट चोराला आहे. ते इथे महत्वाच नाही पण जो अनुभव तुम्ही सांगितल तो खरच Unique आहे!!!! असे लोक फारच कमी सापडतात हल्ली. आभारी आहोत तुमचे आम्ही आमच्या पर्यंत हे पोहचवल्या बद्दल >>>

अगदि हेच म्हणतो. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

पारिजातक's picture

31 Jul 2008 - 9:39 am | पारिजातक

वा झकासराव तुम्ही पण चोरता की हो !!!! बॉलीवुड मधे जा तुम्हाला भरपूर स्कोपे आहे!! :)

पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!

झकासराव's picture

31 Jul 2008 - 10:00 am | झकासराव

झकासराव तुम्ही पण चोरता की हो>>>>>>.
ह्याला आळशीपणा म्हणतात. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

विसोबा खेचर's picture

31 Jul 2008 - 8:48 am | विसोबा खेचर

मी हसत -हसत बाहेर पडले. 'यु ' आणि 'मी ' कसे ''हम'' होतात प्रत्यक्ष डोळ्यांनी बघीतले...................

वा!

राधे, सुंदर लिहिलं आहेस! अजूनही असंच उत्तमोत्तम लेखन येऊ दे प्लीज...

तात्या.