भाटवडेकरांनी केलेले काकाजी कुठे भेटतील?

यकु's picture
यकु in काथ्याकूट
1 Apr 2012 - 8:53 pm
गाभा: 

पुलंवर बेतलेल्या 'नक्षत्रांचे देणे' चे काही भाग नुकतेच युट्यूबवर पाहिले. त्यात तुझे आहे तुजपाशी मधील 'काकाजींची' भूमिका सर्वप्रथम ज्यांनी जीवंत केली, ते दाजी भाटवडेकर पाच सहा सेकंद दिसले. काकाजीच्या भूमिकेतील ती त्यांची शब्दफेक, हावभाव आणि मंत्रमुग्ध करणारा आवेश हे सगळं आणि विकिपिडीयावरील दाजी भाटवडेकरांबद्दलची व्यक्तीगत माहिती वाचून तर तुझे आहे तुजपाशी मधील काकाजींची भूमिका ही दाजी भाटवडेकरांसाठीच लिहिली होती काय असा प्रश्न पडावा; कारण हा माणूस मूळचाच राजेशाही होता.
तुझे आहे तुझपाशीच्या उपलब्ध चित्रफितीतील रवि पटवर्धन यांचा काकाजी भाटवडेकरांच्या काकाजीसमोर थोडं काहीतरी कमी असल्यासारखा वाटतो. मला तर रवि पटवर्धनांचा हा काकाजी पाहून उगीच राग आला होता. नुसत्या ऐकायला लंब्याचवड्या, आयुष्याचं सार सामावलेल्या गगनभेदी गप्पा मारणारा हा रवि पटवर्धनांचा काकाजी अभिनयाच्या बाबतीत मात्र पार फाटका वाटला. मग अशा उफराट्या काकाजीवर चीड येणार नाही तर काय होईल.

काकाजींची भूमिका लार्जर दॅन दि लाईफ वठवणार्‍या दाजी भाटवडेकरांचा जालावर मात्र एक धड फोटोसुद्धा उपलब्ध नाही - त्यांनी केलेले काकाजी उपलब्ध असणे दूरची गोष्‍ट! तर भाटवडेकर काकाजी असलेल्या 'तुझे आहे तुजपाशी' कुठे मिळू शकते? हे कृपया जाणकारांनी सांगावे. जालावर काही नाही हे पक्कं, शंभरेक वेब पेजेस पालथी घातलीत.

पं. वसंतराव देशपांडे आणि दाजी भाटवडेकरांच्या भूमिका असलेले 'कट्यार काळजात घुसली' हेही असेच एक नाटक. ते ही कुठे उपलब्ध असेल तर कृपया सांगावे.

दाजी भाटवडेकरांच्या काकाजींची झलक 9.14 मिनिटांपासून पुढे:

या निमित्ताने मिपाकरांना आवडलेल्या अशाच कितीतरी लार्जर दॅन दी लाईफ, पण नंतरच्या नटांमुळे बारगळलेल्या भूमिकांची आठवण झाल्यास हा काथ्‍याकूट सत्कारणी लागेल.

प्रतिक्रिया

आशु जोग's picture

1 Apr 2012 - 10:13 pm | आशु जोग

यकू

जेव्हा भेटतील तेव्हा नक्की म्हणाल

'तुझे आहे तूजपाशी'

तुज आहे तुजपाशी आणि कट्यार नेटवर शोधले. पण मिळाले नाही... पटवर्धनांचे काकाजी पाहिलेले आहेत.. कट्यारची सी डी आहे. त्यात चंद्रकांत लिमये आहेत. ही नाटकं बघायला मिळाली/ मिळतात हेच नशीब! शिवाय जुने नाटक पाहिलेले नाही.. त्यामुळे तुलनेचा प्रश्न आला नाही.

चंदु लिमये यांचे सी डीवरील कट्यार मी पाहिले आहे
अजिबात रंगत नाही.

कुठलेही गाणे, राग ते पुरता गात नाहीत. त्यामुळे ते गाण्यापेक्षा गुणगुणणे जास्त वाटते.

त्यापेक्षा चारुदत्त यांचे 'कट्यार' फारच रंगतदार वाटते.
--

कानडाऊ योगेशु's picture

1 Apr 2012 - 10:25 pm | कानडाऊ योगेशु

या निमित्ताने मिपाकरांना आवडलेल्या अशाच कितीतरी लार्जर दॅन दी लाईफ, पण नंतरच्या नटांमुळे बारगळलेल्या भूमिकांची आठवण झाल्यास हा काथ्‍याकूट सत्कारणी लागेल.

,मी नाटकवेडा नाही पण वृत्तपत्रात वाचलेल्या परिक्षणांवरुन एक कळुन चुकले कि भक्ती बर्वेंनी वठवलेली "फुलराणी" त्या ताकदीने इतर कुणालाच साकारता आली नाही.(मी वाचलेल्या परिक्षणात सुकन्या कुलकर्णीने ती भूमिका केली होती.)
"नटसम्राट" बाबत हेच म्हणता येईल."लागुं"च्या तोडीचा "नटसम्राट" इतर कुणालाच करता आला नाही.
"अश्रुंची झाली फुले" मधला काशीनाथ घाणेकरांनी केलेला "लाल्या" व्यक्तिरेखेला रमेश भाटवडेकरांनी नंतर न्याय दिला.
ह्यानिमित्ताने बॉलिवुडमध्ये होत असलेल्या रिमेक्सचीही आठवण झाली.

रमेश भाटवडेकर नाही, रमेश भाटकर

मन१'s picture

2 Apr 2012 - 11:45 am | मन१

नटसम्राट लागूंनी सादर केला तो काहिशी "म्हातार्‍अयची,वृद्धाची दु:खद कथा" म्हणून.
त्यानंतर त्याच तोडिचा सादर केला दिग्गज अभिनेते यशवंत दत्त ह्यांनी(सरकारनामा मधील सार्वकालिक ग्रेट मुख्य्ममंत्री रंगवनारे तेच हे.)
"त्यांनी एका कलावंताची शोकांतिका" म्हणून हे सादर केले.
दाजी भाटवडेकरांनीही स्वतःचा वेगळा क्लास नटसम्राट मधूनच दाखवून दिला.
ज्याचे त्याचे स्वतःचे असे ह्या सर्वच कलावंतांचे नाटकाबद्दल इंटरप्रिटॅशन होते. आपापल्या मार्गाने सर्वांचेच सरस होते.

विकास's picture

2 Apr 2012 - 8:06 pm | विकास

"लागुं"च्या तोडीचा "नटसम्राट" इतर कुणालाच करता आला नाही.

मला वाटते, नटसम्राट सर्वप्रथम दत्ता भटांनी सादर केले होते. ते देखील समर्थ अभिनयाचे उदाहरण होते.

एक कळुन चुकले कि भक्ती बर्वेंनी वठवलेली "फुलराणी" त्या ताकदीने इतर कुणालाच साकारता आली नाही.

खरे आहे, पण त्याहूनही अधिक खरे आहे, ते प्राध्यापकाच्या भूमिकेतील सतीश दुभाषी यांचा अभिनय. भक्ती बर्वे -सतीश दुभाषी यांचे नाटक त्यावेळी लहान असून देखील बघितले आणि अजूनही ते लक्षात आहे. नंतरच्या काळत त्या नाटकाच्या वेडापायी प्रिया तेंडूलकर आणि (मला वाटते) संजय मोने यांचे नाटक पाहीले. आवडले, दोघेही त्यांच्या परीने उत्कृष्ठ अभिनय करायचे, पण आजही ते नाटक लक्षात नाही. मध्यंतरी युट्यूबवर अमृता सुभाषने सादर केलेली फुलराणी पाहीली - अधीच्यांशी तुलना न करता... आवडली. पण त्यात नको तशी गाणी घालून त्या नाटकाची मजा घालवल्याचे लक्षात आले.

९९ साली मला भक्ती बर्वेंचा, "पुल, फुलराणी आणि मी" कार्यक्रम आयोजीत करण्याचे भाग्य लाभले होते. त्यावेळीस त्यांचा आलेला अत्यंत मैत्रिपूर्ण वैयक्तीक अनुभव कायम लक्षात राहील आणि त्यामुळे त्यांच्या नंतरच्या आकस्मीक निधनाने खूप कोणी जवळचे गेल्यासारखे वाटले. त्यावेळेस त्यांनी फुलराणीतील, "तुला शिकवीन चांगलाच धडा" हे सादर केले होते. "तुझं वस्कन अंगावर येणं..." असे म्हणत असताना त्यांच्या डोळ्यातील भावनांवरून त्या क्षणालाही, इतक्या वर्षांनी देखील त्या ते सतीश दुभाषींनी वठवलेल्या प्राध्यापकालाच म्हणत होत्या असे जाणवले... व्हिडीओ टेपिंगला बंदी असल्याने ते आता मनातल्यामनातच टेप होऊन राहीले आहे... असो.

आशु जोग's picture

2 Apr 2012 - 8:10 pm | आशु जोग

>> "लागुं"च्या तोडीचा "नटसम्राट" इतर कुणालाच करता आला नाही.

दत्ता भट यांचा 'नटसम्राट' सर्वोत्तम होता असे रसिक, जाणकार व स्वतः डॉ लागू यांचे मत होते.
(डॉ लागू यांचा 'नटसम्राट' ही अप्रतिमच आहे यात वाद नाही)

बहुगुणी's picture

2 Apr 2012 - 9:36 pm | बहुगुणी

दत्ता भट आणि डॉ. लागूंव्यतिरिक्त सतिश दुभाषी आणि यशवंत दत्त यांनीही केलेलं मी पाहिलंय. याशिवाय राजा गोसावी, चंद्रकांत गोखले, मधुसूदन कोल्हटकर, प्रभाकर पणशीकर, बाळ धुरी या जुन्या-जाणत्यांनी तसंच अलिकडे गिरीष देशपांडे आणि उपेन्द्र दाते या कलाकारांनी ही भुमिका केली आहे असं आठवतं. ('नटसम्राट' नामक चित्रपटही महेश मांजरेकर करणार आहेत आणि त्यात नाना पाटेकर ही भूमिका करतील असं वाचल्याचं आठवतं.)

चिंतामणी's picture

2 Apr 2012 - 10:24 pm | चिंतामणी

हे एक श्रीराम लागू आणि शांता जोग अभीनीत नाटक फारच उत्तम होते.

डॉ.लागू नटसम्राट आणि हिमालयाची सावली ही दोन्ही नाटके एकाच काळात करीत असत. त्या भूमीकांत ते इतके बुडुन जायचे की त्याचा त्यांच्या प्रकृतीवर परीणाम झाला असे म्हणतात. त्या ताणामुळेच त्यांनी त्यात काम करणे सोडुन दिले.

यकु's picture

1 Apr 2012 - 10:32 pm | यकु

मी नाटकवेडा नाही पण वृत्तपत्रात वाचलेल्या परिक्षणांवरुन एक कळुन चुकले कि भक्ती बर्वेंनी वठवलेली "फुलराणी" त्या ताकदीने इतर कुणालाच साकारता आली नाही.(मी वाचलेल्या परिक्षणात सुकन्या कुलकर्णीने ती भूमिका केली होती.)

+१ सहमत.
काल अमृता सुभाषची फुलराणी पाहिली. आधीच संवादांत भाषेच्या लकबी आणि शब्दांचा जादुई वापर आणि त्याला अनुसरुन भुलभुलैय्या टैप अभिनय..
मूळ फुलराणी कसं असेल ते असो, पण यात मात्र कितीही नाही म्हटलं तरी पार भलती चबढब झालीय - कर्रकश्य आरडाओरडा वगैरे पारच वाट लागली.. ;-)

रमताराम's picture

2 Apr 2012 - 12:50 pm | रमताराम

सहमत यक्कुशेठ.

अर्थात फुलराणी'बद्दल आमचं मत जगावेगळं आहे. खुद्द भक्तीबर्वेंची फुलराणी मूळ फुलराणीपेक्षा (आधी नाटक 'वाचून' पाहिले असेल त्यांना 'कदाचित' पटेल हे मत.) फारच 'लाऊड' होती. अमृताने तीच खरी समजून आपल्या परीने सादर करण्याचा प्रयत्न केला असे दिसते. पुलंची मूळ फुलराणी भक्तीबैंनादेखील सापडली नाही असे आमचे मत झाले आहे. ('रराचे डोके ठिकाणावर आहे काय?'...)

कवितानागेश's picture

2 Apr 2012 - 1:12 pm | कवितानागेश

खुद्द भक्तीबर्वेंची फुलराणी मूळ फुलराणीपेक्षा फारच 'लाऊड' होती.
>
सहमत. :)

दादा कोंडके's picture

1 Apr 2012 - 10:56 pm | दादा कोंडके

मी सयाजी शिंदे आणि आणि सुकन्या कुलकर्णीचं सखाराम बाईंडर पाहिलंय. अक्षरशः वेड लागलं होतं नाटक बघून. नाना पाटेकरांचं सखाराम बाईंडर कुणी पाहिलं आहे का? या दोघांशिवाय दुसर्‍या कुणी ही भुमिका वठवली असेल तर स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय असं म्हणायला हवं! :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 Apr 2012 - 11:02 pm | विश्वनाथ मेहेंदळे

नाना पाटेकरांचं सखाराम बाईंडर कुणी पाहिलं आहे का?

नाना पाटेकरांनी केले होते बाईंडर ?? त्याची गाजलेली नाटके म्हणजे महासागर आणि पुरुष.

या दोघांशिवाय दुसर्‍या कुणी ही भुमिका वठवली असेल तर स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय असं म्हणायला हवं!

शब्द गिळा राजे, शब्द गिळा.... वरीजीनल सखाराम निळू भाऊ आहेत.

छोटा डॉन's picture

1 Apr 2012 - 11:13 pm | छोटा डॉन

हेच म्हणतो.
नानाने बाईंडर केले आहे का ?
तरीही सयाजीचा सखाराम अंगावर अक्षरशः काटा आणतो.

बाकी ह्यानिमित्ताने 'ती फुलराणी' ह्या नाटकामधली अविनाश नारकरची प्राध्यापकाची भुमिकाही फक्कड आहे असे आवर्जुन नमुद करावे वाटते.
ह्याशिवाय 'घाशीराम कोतवाल'मधले मोहन'नाना' आगाशे ह्यांचीही भुमिका अजरामर आहे असे सांगतो.

- छोटा डॉन

तिमा's picture

2 Apr 2012 - 11:31 am | तिमा

नानाने 'पाहिजे जातीचे या नाटकात अप्रतिम भूमिका केली होती. तेंडुलकरांचं ते ओरिजिनल संचातलं नाटक मी बघितले होते छबिलदासमधे!! विहंग नायक, सुषमा तेंडुलकर आणि 'अरविंद देशपांडे असे दिग्गज होते.

पु.ल. लिखीत आम्ही लटीके ना बोलू हे एक. त्या माधव वाटवे, बाळ कर्वे इत्यादी दिग्गजसुद्धा होते.

असेच अजून खूप छान काम केलेले नाटक म्हणजे हमीदाबाईची कोठी.

तीनही नाटकात अप्रतीम काम केले होते.

दादा कोंडके's picture

1 Apr 2012 - 11:08 pm | दादा कोंडके

नाना पाटेकरांनी कधी केले होते बाईंडर ?? त्याची गाजलेली नाटके म्हणजे महासागर आणि पुरुष.

माझा पण विश्वास बसला नाही. पण ओळखीतल्या एका नाटकवेड्यानं सांगितलय की नानांनी पण हे केलय म्हणून.

शब्द गिळा राजे. शब्द गिळा.... वरीजीनल सखाराम निळू भाऊ आहेत.

अर्र, चूक झाली. एक डाव माफी द्या! :) या अवलियाला विसरलोच होतो!
वर्जीनल नाटक मिळवून पघायलाच पाहिजे आता.

यकु साहेब, खरच मस्त धागा टाकला आहेत तुम्हि.

माझ्या वडिलानी दाजी भाटवडेकरांचा काकाजी पाहीला आहे. ते आजही सांगतात कि त्यांची अदाकारी अफाट होती म्हणुन.

मलाहि ते नाटक बघायच आहे.

असच अजुन काही नाटक, रायगडाला जेव्हा जाग येते व घाशिराम कोतवाल

चिंतामणी's picture

2 Apr 2012 - 3:23 pm | चिंतामणी

मी ज्यावेळी पाहिले त्यावेळी काकाजींची भूमीका अर्थातच दाजी भाटवडेकर करीत असत आणि श्यामच्या भुमीकेत काशीनाथ घाणेकर होते. (बाकी भुमीका कोण कोण करीत आठवत नाहीत.) . फार मस्त प्रयोग व्हायचा. (परवडत नसताना) दोन वेळा बघीतले होते हे नाटक.

कवितानागेश's picture

2 Apr 2012 - 11:42 am | कवितानागेश

पूर्वी पायरसी नसल्याने फार नुकसान झालंय आपलं! :(
या सगळ्यांचे कुणीतरी भल्या माणसानी शूटिंग करुन ठेवायला हवे होते.....

बाकी ह्यानिमित्ताने 'ती फुलराणी' ह्या नाटकामधली अविनाश नारकरची प्राध्यापकाची भुमिकाही फक्कड आहे असे आवर्जुन नमुद करावे वाटते.

ओरिजनल भूमिका केली होती सतीश दुभाषींनी.
भक्ती बर्वे, सतीश दुभाषी आणि अरविंद देशपांडे अशी टीम होती.
सतीश दुभाषी म्हणजे रंगमंचावरील राजा. प्रोफेसरच्या मस्तीखोर भूमिकेला न्याय दिला तो त्यांनीच.

मन१'s picture

2 Apr 2012 - 11:49 am | मन१

भाटावडेकरांचे पाहिलेले नाहित. रवी पटवर्धनांबद्दल १००% सहमत आहे.
विक्रम गोखले हे नाव एरव्ही गंभीर्,आढ्यताखोर अशा भूमिकांसाठी प्रसिद्ध असलं तरी अक्षरशः काकाजीच वाटतील अशी त्यांची भूमिका(अगदि त्याच वेशभूषेसह) एका मराठी चित्रपटात पाहिलेली आहे. नाव आता आठवत नाही. तेही नक्कीच खूपच उत्तम प्रकारे भूमिका वठवतील ह्याची खात्री आहे. अर्थात हे सध्या बहुतेकांना मान्य होणे कठिण आहे.

मुक्त विहारि's picture

2 Apr 2012 - 11:59 am | मुक्त विहारि

पु. ल. देशपान्डे आनि आशालता व सुधिर मोघे , रमाकान्त देशपान्डे...खरेच हा सन्चच तुफान होता....

नविन कलाकारान्नी केलेला प्रयोग पण बघितला पण जुनाच सरस वाटला...

(यु ट्युब वर हे जुने नाटक उपलब्ध आहे)..

रमताराम's picture

2 Apr 2012 - 12:53 pm | रमताराम

या जुन्या प्रयोगाची शिडी/डीवीडी फाऊंटनने काढली आहे आता. सध्या बाजारात मिळते.

ता.क.: कडवेकरमामींची ती अजरामर भूमिका सुनीताबाई करत असत नि मोठ्या ठसक्यात करत असत. आशालताबाईंची कडवेकरमामी त्या मानाने फारस फिकट आहे/होती असे आमचे एक ज्येष्ठ मित्र सांगतात.

चिंतामणी's picture

2 Apr 2012 - 3:29 pm | चिंतामणी

पु. ल. देशपान्डे, आशालता वाबगावकर व श्रीकाम्त मोघे , रमाकान्त देशपान्डे यांचे बरोबर निलम प्रभु, सुनीला प्रधान इत्यादी अनेक कलाकार होते.

...खरेच हा सन्चच तुफान होता....

ही बघा रवीवारची सकाळ.

विकास's picture

3 Apr 2012 - 7:08 pm | विकास

तसेच येथे वरिजिनल वार्‍यावरची वरात बघता येईल!

सुधीर मोघे नव्हेत... श्रीकांत मोघे.

मुक्त विहारि's picture

2 Apr 2012 - 12:07 pm | मुक्त विहारि

चुकलो...

सहज's picture

2 Apr 2012 - 12:39 pm | सहज

काकाजी कुठे सापडतील म्हणजे दाजी भाटवडेकर होय!

कारण हिंदी चित्रपटात अस्सल काकाजी = कर्नल नगेंद्रनाथ जुलीयस विल्फ्रेड सिंग - छोटीसी बात

मिपावर एकच अस्सल काकाजी - बिल्ला क्रमांक ४०१

रमताराम's picture

2 Apr 2012 - 12:44 pm | रमताराम

मस्त मझा होता यार.
आम्ही पण जंग जंग पछाडले आहे यासाठी. तुम्हाला गावले तर आम्हालाही सांगा.

लाल्या म्हणजे डॉ. काशिनाथ घाणेकर आणि शंभू महादेव म्हणजे चित्तरंजन

लखोबा लोखंडे म्हणजे प्रभाकर पणशीकर

प्रो. बारटक्के म्हणजे मधुकर तोरडमल

'पुरुष' अनेक संचात पाहिले पण भक्ति बर्वे आणि नाना पाटेकर वेगळेच

तीच गोष्ट 'नटसम्राट' ची. डॉ. लागु ते डॉ लागु.

इथे ओशाळला मधला औरंगजेब म्हणजे पणशीकर आणि संभाजीराजे म्हणजे डॉ. काशिनाथ घाणेकर.

अरुण सरनाईक गेले आणि 'गाठ आहे माझ्याशी' संपले. मामासाहेब आणि अरुण सरनाईक यांच्या भूमिका तोडीस तोड होत्या.

बाळ धुरी आणि पणशीकर यांचे 'थँक्यु मि, ग्लॅड' असेच लक्षात राहिलेले नाटक

अखेरचा सवाल म्हणजे भक्ती बर्वे

आणि वस्त्रहरण म्हणजे मच्छिंद्र कांबळी

विजुभाऊ's picture

2 Apr 2012 - 2:01 pm | विजुभाऊ

रवि पटवर्धनांचा काकाजी अभिनयाच्या बाबतीत मात्र पार फाटका वाटला.
काकाजीच्या पात्राचे गम्मत आहे ते भाषेच्या लहेजात. रवी पटवर्धनाना इंदोरी भाषा वापरताच आलेली नाहिय्ये त्यामुळे त्या भुकिकेचा बट्ट्याबोळ वाजवलेला आहे.
फुलराणी चा रोल अमृताने फारच सुम्दर साकारला आहे. सुदैवाने या रोलची तुलना भक्तीबर्वेंच्या फुलराणीशी होणार होती त्यापेक्षा वेगळी छटा दाखवत अमृताने फुलराणी साकारलीये.
त्या फुलराणी मधला प्रध्यापक मात्र फारच उर्मट आणि आढ्यात्यखोर वाटला.

पुरुषमधे भक्ती बर्वे होत्या ?

माझ्या मते पहिल्या संचात नाना पाटेकर, रिमा लागू, चंद्रकांत गोखले आणि उषा नाडकर्णी हे होते..

प्रास's picture

2 Apr 2012 - 7:28 pm | प्रास

.

चौकटराजा's picture

2 Apr 2012 - 4:07 pm | चौकटराजा

पं. वसंतराव देशपांडे आणि दाजी भाटवडेकरांच्या भूमिका असलेले 'कट्यार काळजात घुसली' हेही असेच एक नाटक. ते ही कुठे उपलब्ध असेल तर कृपया सांगावे.
दाजीनी 'कट्यार' मधे भुमिका केली होती ? आपल्याला तरी ही बातमी नवी आहे. केली असेल तर ती कुणाची.? कारण त्यात ज्या महत्चाच्या भूमिका आहेत त्या गायकी आहेत. बाकी भूमिका तरूण पात्रांच्या आहेत. त्या दाजी करणॅ शक्य नाही.

" कट्यार" मधे वसंतरावांबरोबर पंडित भार्गवराम आचरेकर हे होते...
दाजी भाटवडेकर नक्की नव्हते.

मन१'s picture

2 Apr 2012 - 4:21 pm | मन१

जितेंद्र अभिषेकी होते हो.
हवे तर पणशीकराअंना विचारा, त्यानाटकाचे प्रोड्युसर म्हनून.

रमताराम's picture

2 Apr 2012 - 4:38 pm | रमताराम

अभिषेकीबुवांचे संगीत आहे फक्त. त्यांनी नाटकात काम नाही केले कधी. भार्गवराम आचरेकर होते पंडितजींच्या भूमिकेत.

मन१'s picture

2 Apr 2012 - 7:29 pm | मन१

हे आधे नाही का सांगायं?
दुरुस्ती व त्रुटी मान्य करित आहे.(करण्याशिवाय इलाजही काय आहे म्हणा)

वाईट वाटून घेऊ नको मनोबा.. संगीत दिग्दर्शन काही प्रमाणात आणि जितेंद्र अभिषेकींचा किमान आवाज तरी होता त्या नाटकात ;-)

रमताराम's picture

2 Apr 2012 - 10:12 pm | रमताराम

लोक एवढे दणादण प्रतिसाद ठोकतात, म्हातारपणी त्या वेगाने उत्तर देणे जमत नाय हो.
अवांतरः पणशीकरांवरून आठवले. छोटा सदाशिव बहुधा रघुनंदन पणशीकर होते. पण खात्री नाही. (आमचे कट्यारचे पुस्तक कोण्या मित्रवर्याने ढापल्याने खात्री करून घेता येत नाहीये.)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

2 Apr 2012 - 4:34 pm | विश्वनाथ मेहेंदळे

एकूणच कुणी कुठल्या नाटकात काम केले होते यावरून प्रचंड गोंधळ आहे असे लक्षात आले आहे.
मराठी नाटकांचा इतिहास नीट लिहून काढून तो जालावर टाकणे आत्यंतिक गरजेचे आहे इतके खात्रीने सांगू शकतो.

मी-सौरभ's picture

2 Apr 2012 - 7:14 pm | मी-सौरभ

चौ. राजांना विचारा?

शुभस्य शीघ्रम्!!

चौकटराजा's picture

3 Apr 2012 - 5:29 am | चौकटराजा

नाटकाचा इतिहास वैगैरे हा प्रांत समर्थपणे सांभाळणारे विभा देशपांडे यानी एका प्रकल्पांतर्गत अनुदान मिळवून एक प्रबंध लिहिला आहे असे ऐकतो.
बाकी मिपावर " वल्ली" हे ऐतिहासिक काम करू शकतील. व बाकीचे मित्र वल्ल्या ले भारी ... जबरी... खप्ल्यालो आहे...आणि चुकून या गंभीर
संशीधनात " हसून ह पू वा " असाहे प्रतिसाद देतील. ( डोळा बारीक केलेली सायली चुकलो - स्मायली ) .

विश्वनाथ मेहेंदळे's picture

3 Apr 2012 - 2:42 pm | विश्वनाथ मेहेंदळे

व बाकीचे मित्र वल्ल्या ले भारी ... जबरी... खप्ल्यालो आहे...आणि चुकून या गंभीर संशीधनात " हसून ह पू वा " असाहे प्रतिसाद देतील. ( डोळा बारीक केलेली सायली चुकलो - स्मायली ) .

इथे मात्र माझी खरेच हहपुवा !!!

>> नटसम्राट सर्वप्रथम दत्ता भटांनी सादर केले होते. ते देखील समर्थ अभिनयाचे उदाहरण होते

नटसम्राट प्रथम लागूंनीच सादर केले
त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर दत्ता भट आले

प्राध्यापक's picture

2 Apr 2012 - 8:31 pm | प्राध्यापक

तुझे आहे तुजपाशि, मधिल दाजी भाटवडेकर तर अतीशय मस्तच होते,त्या नतर मला वाटते ती भुमिका प्रा.मधुकर तोडरमल
हेच करु शकतील.

त्या नतर मला वाटते ती भुमिका प्रा.मधुकर तोडरमल हेच करु शकतील.

+१
एकदम करारी नट.
पण आता ते नाटकांतुन निवृत्त. ते सध्या समग्र अगाथा ख्रिस्ती मराठीत आणत आहेत. लै भारी भाषांतरं.

तो मी नव्हेच

म्हणजे प्रभाकर पणशीकरच

अविनाशकुलकर्णी's picture

3 Apr 2012 - 12:29 am | अविनाशकुलकर्णी

नगरला हे ना्टक मधुकर तोरडमल यांनी केले होते..
त्यांचा काकाजी पण खुप गाजला होता

सुहास..'s picture

3 Apr 2012 - 2:37 am | सुहास..

ऑल द बेस्ट ??

बाकी आम्हाला मुक्ता ने केलेली दोन चार नाटके आठवलीच ;)

बाकी नाटकांची नाव निघावीत आणि संजय मोनेंच , प्रशांत दामले च नाव येवु नये असे सहसा होत नाही, कोणे एके काळी, नाटक म्हणजे संजय मोने अस समज असायचा माझा .

दाजींचा विषय आहे म्हणून लिहावसं वाटलं... त्यांना (माझ्या) लहाणपासून पाहिलय.. गिरगावतल्या भाटवडेकरवाडीत राहात, ब्राह्मण सभेत तुफान नाटकं केली त्यांनी त्यावेळी.. संस्कृतचा गाढा अभ्यास, त्यांच्या जिभेवर सरस्वती होती म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यांनी संस्कृत नाटके सुद्धा बसवली आणि स्वतः तर पेलवलीच पण तरूण पिढीकडुन करुन घेतली. आता संस्कृत नाटके होणे नाही (प्रेक्षक्वर्गही नाही आणि कलाकारही). स्वामी समर्थांचे ते निस्सिम भक्त होते, त्यांच्यावरील चित्रपटात स्वामीची भुमिका जगलेत दाजी. गिरगावातल्या मठात नित्यनेमाने दर्शनाला येताना दाजी दिसत. दाजी गेल्याचं ऐकलं तेव्हा त्यांच्याविषयी कुणीतरी लिहावं असं वाटलं (अत्रेंनी सूरर्यास्त लिहिलं तसं) पण त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा म्हणावा तसा आढावा कुणी घेतलाच नाही.. असो, दाजींचा काकाजी मिळाला (अग्दी ऑडिओ असला तरी) नक्की आवडेल भेटायला..

त्यांना लहानपणापासून जवळून पाहिलेल्या कुणाची तरी ही प्रतिक्रिया आल्याने धागा सार्थकी लागला असे वाटते आहे.
संस्कृत नाटकाच्या प्रयोगादरम्यान रंगमंचावर येऊन पंडीत नेहरुंकडून दाद, चर्नी रोडवरच्या त्यांच्या राजवाडा सदृश बंगल्याबद्दलचे उल्लेख, त्यांच्या वाघासारख्‍या ‍अभिनयाचा भरभरुन उल्लेख करणारे लेख हे सगळं आणि तरी जालावर त्यांचा भूमिकेत रंगले असतानाचा एक फोटोही नाही, किंवा ते गेले तेव्हा वर्तमानपत्रांतही फारसा गवगवा नाही तेव्हा आपण दाजी भाटवडेकर नावाच्या संस्कृत, इंग्लिश नाटकांच्या फक्त एका व्यासंगी नटाबद्दल वाचत नसून एका खरोखरीच्या राजयोग्याबद्दल वाचत आहोत असं वाटलं.

http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Living-Legends/articleshow/...

daji bhatawadekar has always walked the marathi stage like a lion. his amazing command over english and sanskrit and his old world qualities make him a treasure among actors, writes sanjay pendse on the eve of the octogenarian's felicitation in the city there are actors, there are stars, there are thespians and then there is daji bhatawadekar, the grand old man of marathi theatre, correction, marathi and sanskrit theatre. daji continues to defy classification at 81. you'd even think twice before calling him old, because he was recently seen at a public function in mumbai holding a sizeable crowd spellbound for an hour and a half with an impromptu speech on his association with legendary humorist-playwright p l deshpande. the speech, like the roles he played on stage, was a complete performance. few actors or public speakers today would be able to match his control over language, body language, voice, diction and timing. add to that his telegraphic memory from which he quotes extensively, but judiciously, from the works of writers like shakespeare, bhavabhuti, kalidasa and milton.and with this speech, a whole new generation of audience was introduced to the great presence of the man. daji bhatawadekar grew up in one of the most prominent families in bombay. his grandfather, sir bhalchandra bhatawadekar, a medical practitioner, was, along with sir pherozeshah mehta and sir dinshaw waccha one of the founding fathers of mumbai city. he grew up in as classical an atmosphere they come. the imposing living room of the historic bhatawadekar mansion, set in the heart of mumbai's hustle and bustle, seems like a postcard from another era. every little piece of furniture and artefact has a history to it. the painting of his ancestors look down upon you benignly. sir bhalchandra's portrait is incidentally, by raja ravi verma. a progeny of such an illustrious family, daji also had to live up to its tradition of sanskrit learning. every day, every child in the family had to recite from memory a new verse from sanskrit, or else miss breakfast. this was to stand daji in good stead when he did yeoman service to classical sanskrit theatre in the face of dying patronage. it also enabled him to write his phd thesis, mostly from memory, between the age of 71 and 74. his phd guide who was, incidentally, his theatre student, quite sportingly compiled the bibliography for daji!after completing his masters in sanskrit as a young man, daji was bitten by the theatre bug much to the chagrin of his family who was looking forward to him becoming a practising sanskrit scholar. daji, however, took up a regular office job, while pursuing amateur theatre. under the aegis of mumbai's literary association, sahitya sangh, daji came to be recognised as an actor to watch out for in sanskrit, marathi and even english. he's had president rajendra prasad and pandit jawaharlal nehru come up on stage and pat him on the back for sustaining the ancient language. when nehru came on stage, daji was wearing a period costume replete with brass jewellery. when daji tried to keep his distance and protect the pm from the brasswear, nehru asked him not to bother. "i may be pm, but you are kalidasa's emperor dushyant right now," nehru said. having staged macbeth in marathi (durga khote played lady macbeth) under the baton of noted english director herbert marshall, daji also went on to act in a ka abbas play under marshall.but daji's ticket to popularity came when pl deshpande cast him as kakaji in his only original play tuzha ahe tuzhpashi in 1956. both daji and kakaji acquired larger-than-life, icon-like status, which continues till today. with his presence, his voice and scholarship, he came to be as revered as say, sir lawrence olivier or sir alec guiness on the stage. surely sir bhalchandra bhatwadekar must be smiling on him from wherever he is.

http://www.mid-day.com/mumbaikar/2004/jun/86054.htm

आधी ते संस्कृत नाटकातुन कामे करीत. नंतर मराठी रंगभूमीकडे वळले.

माझ्या वडीलांनी भाउबंदकी नाटकाचे संस्कृत रूपांतर केले होते. त्यामधे त्यांनी राघोबादादांची भूमीका केली होती. त्यांचे त्या भूमीकेतील रूप चाळीस वर्षानंतरसुद्धा डोळ्यासमोर आहे.

(संस्कृत) अभीज्ञान शाकुंतलच्या एका प्रयोगाला तेंव्हाचे उपराष्ट्रपती राधाकृणन उपस्थीत होते. ते दाजी भाटडेकरांचे कौतुक करतानाचा हा फोटो आंजावर उपलब्ध आहे.

चिंतामणी काका, आधी साष्‍टांग दंडवत स्वीकारावा!

चिंतामणी's picture

3 Apr 2012 - 3:12 pm | चिंतामणी

:)

अविनाशकुलकर्णी's picture

3 Apr 2012 - 1:44 pm | अविनाशकुलकर्णी

महाराष्ट्र मंडळ मधे प्रयोग झाला होता गारंबीचा बापुचा..काशीनाथ घाणेकर व उषा किरण होत्या राधेच्या भुमीकेत...

हवा अंधारा कवडसा म्हणुन नातक गाजले होते..सतिष दुभाषी..मोघे व आशा पोतदार..
नाटक अंगावर येते.
छिन्न असेच नाटक होते..स्मिता पाटील..सदाशिव अमरापुरकर..आशालता ..भन्नाट नाटक...
वोह भि क्या दिन थे...

'तुझे आहे तुजपाशी' मधला दाजींच्या अभिनयाचा हा तुकडा सापडला:

सुरूवातीपासून २:१५ मिनिटांपर्यंत -

याच नाट्यप्रसंगातले रवि पटवर्धनांचे काकाजी २:१६:०० पासून पुढे इथे पहायला मिळतील.