Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by यकु on Sun, 04/01/2012 - 20:53
पुलंवर बेतलेल्या 'नक्षत्रांचे देणे' चे काही भाग नुकतेच युट्यूबवर पाहिले. त्यात तुझे आहे तुजपाशी मधील 'काकाजींची' भूमिका सर्वप्रथम ज्यांनी जीवंत केली, ते दाजी भाटवडेकर पाच सहा सेकंद दिसले. काकाजीच्या भूमिकेतील ती त्यांची शब्दफेक, हावभाव आणि मंत्रमुग्ध करणारा आवेश हे सगळं आणि विकिपिडीयावरील दाजी भाटवडेकरांबद्दलची व्यक्तीगत माहिती वाचून तर तुझे आहे तुजपाशी मधील काकाजींची भूमिका ही दाजी भाटवडेकरांसाठीच लिहिली होती काय असा प्रश्न पडावा; कारण हा माणूस मूळचाच राजेशाही होता. तुझे आहे तुझपाशीच्या उपलब्ध चित्रफितीतील रवि पटवर्धन यांचा काकाजी भाटवडेकरांच्या काकाजीसमोर थोडं काहीतरी कमी असल्यासारखा वाटतो. मला तर रवि पटवर्धनांचा हा काकाजी पाहून उगीच राग आला होता. नुसत्या ऐकायला लंब्याचवड्या, आयुष्याचं सार सामावलेल्या गगनभेदी गप्पा मारणारा हा रवि पटवर्धनांचा काकाजी अभिनयाच्या बाबतीत मात्र पार फाटका वाटला. मग अशा उफराट्या काकाजीवर चीड येणार नाही तर काय होईल. काकाजींची भूमिका लार्जर दॅन दि लाईफ वठवणार्‍या दाजी भाटवडेकरांचा जालावर मात्र एक धड फोटोसुद्धा उपलब्ध नाही - त्यांनी केलेले काकाजी उपलब्ध असणे दूरची गोष्‍ट! तर भाटवडेकर काकाजी असलेल्या 'तुझे आहे तुजपाशी' कुठे मिळू शकते? हे कृपया जाणकारांनी सांगावे. जालावर काही नाही हे पक्कं, शंभरेक वेब पेजेस पालथी घातलीत. पं. वसंतराव देशपांडे आणि दाजी भाटवडेकरांच्या भूमिका असलेले 'कट्यार काळजात घुसली' हेही असेच एक नाटक. ते ही कुठे उपलब्ध असेल तर कृपया सांगावे. दाजी भाटवडेकरांच्या काकाजींची झलक 9.14 मिनिटांपासून पुढे: या निमित्ताने मिपाकरांना आवडलेल्या अशाच कितीतरी लार्जर दॅन दी लाईफ, पण नंतरच्या नटांमुळे बारगळलेल्या भूमिकांची आठवण झाल्यास हा काथ्‍याकूट सत्कारणी लागेल.
  • Log in or register to post comments
  • 19901 views

प्रतिक्रिया

Submitted by आशु जोग on Sun, 04/01/2012 - 22:13

Permalink

यकू जेव्हा भेटतील तेव्हा

यकू जेव्हा भेटतील तेव्हा नक्की म्हणाल 'तुझे आहे तूजपाशी'
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Sun, 04/01/2012 - 22:46

Permalink

तुज आहे तुजपाशी आणि कट्यार

तुज आहे तुजपाशी आणि कट्यार नेटवर शोधले. पण मिळाले नाही... पटवर्धनांचे काकाजी पाहिलेले आहेत.. कट्यारची सी डी आहे. त्यात चंद्रकांत लिमये आहेत. ही नाटकं बघायला मिळाली/ मिळतात हेच नशीब! शिवाय जुने नाटक पाहिलेले नाही.. त्यामुळे तुलनेचा प्रश्न आला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Mon, 04/02/2012 - 20:05

In reply to तुज आहे तुजपाशी आणि कट्यार by JAGOMOHANPYARE

Permalink

चंदु लिमये यांचे सी डीवरील

चंदु लिमये यांचे सी डीवरील कट्यार मी पाहिले आहे अजिबात रंगत नाही. कुठलेही गाणे, राग ते पुरता गात नाहीत. त्यामुळे ते गाण्यापेक्षा गुणगुणणे जास्त वाटते. त्यापेक्षा चारुदत्त यांचे 'कट्यार' फारच रंगतदार वाटते. --
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Sun, 04/01/2012 - 22:25

Permalink

या निमित्ताने मिपाकरांना

या निमित्ताने मिपाकरांना आवडलेल्या अशाच कितीतरी लार्जर दॅन दी लाईफ, पण नंतरच्या नटांमुळे बारगळलेल्या भूमिकांची आठवण झाल्यास हा काथ्‍याकूट सत्कारणी लागेल.
,मी नाटकवेडा नाही पण वृत्तपत्रात वाचलेल्या परिक्षणांवरुन एक कळुन चुकले कि भक्ती बर्वेंनी वठवलेली "फुलराणी" त्या ताकदीने इतर कुणालाच साकारता आली नाही.(मी वाचलेल्या परिक्षणात सुकन्या कुलकर्णीने ती भूमिका केली होती.) "नटसम्राट" बाबत हेच म्हणता येईल."लागुं"च्या तोडीचा "नटसम्राट" इतर कुणालाच करता आला नाही. "अश्रुंची झाली फुले" मधला काशीनाथ घाणेकरांनी केलेला "लाल्या" व्यक्तिरेखेला रमेश भाटवडेकरांनी नंतर न्याय दिला. ह्यानिमित्ताने बॉलिवुडमध्ये होत असलेल्या रिमेक्सचीही आठवण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Sun, 04/01/2012 - 22:48

In reply to या निमित्ताने मिपाकरांना by कानडाऊ योगेशु

Permalink

रमेश भाटवडेकर नाही, रमेश

रमेश भाटवडेकर नाही, रमेश भाटकर
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Mon, 04/02/2012 - 11:45

In reply to या निमित्ताने मिपाकरांना by कानडाऊ योगेशु

Permalink

-१

नटसम्राट लागूंनी सादर केला तो काहिशी "म्हातार्‍अयची,वृद्धाची दु:खद कथा" म्हणून. त्यानंतर त्याच तोडिचा सादर केला दिग्गज अभिनेते यशवंत दत्त ह्यांनी(सरकारनामा मधील सार्वकालिक ग्रेट मुख्य्ममंत्री रंगवनारे तेच हे.) "त्यांनी एका कलावंताची शोकांतिका" म्हणून हे सादर केले. दाजी भाटवडेकरांनीही स्वतःचा वेगळा क्लास नटसम्राट मधूनच दाखवून दिला. ज्याचे त्याचे स्वतःचे असे ह्या सर्वच कलावंतांचे नाटकाबद्दल इंटरप्रिटॅशन होते. आपापल्या मार्गाने सर्वांचेच सरस होते.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Mon, 04/02/2012 - 20:06

In reply to या निमित्ताने मिपाकरांना by कानडाऊ योगेशु

Permalink

नटसम्राट - ती फुलराणी

"लागुं"च्या तोडीचा "नटसम्राट" इतर कुणालाच करता आला नाही. मला वाटते, नटसम्राट सर्वप्रथम दत्ता भटांनी सादर केले होते. ते देखील समर्थ अभिनयाचे उदाहरण होते. एक कळुन चुकले कि भक्ती बर्वेंनी वठवलेली "फुलराणी" त्या ताकदीने इतर कुणालाच साकारता आली नाही. खरे आहे, पण त्याहूनही अधिक खरे आहे, ते प्राध्यापकाच्या भूमिकेतील सतीश दुभाषी यांचा अभिनय. भक्ती बर्वे -सतीश दुभाषी यांचे नाटक त्यावेळी लहान असून देखील बघितले आणि अजूनही ते लक्षात आहे. नंतरच्या काळत त्या नाटकाच्या वेडापायी प्रिया तेंडूलकर आणि (मला वाटते) संजय मोने यांचे नाटक पाहीले. आवडले, दोघेही त्यांच्या परीने उत्कृष्ठ अभिनय करायचे, पण आजही ते नाटक लक्षात नाही. मध्यंतरी युट्यूबवर अमृता सुभाषने सादर केलेली फुलराणी पाहीली - अधीच्यांशी तुलना न करता... आवडली. पण त्यात नको तशी गाणी घालून त्या नाटकाची मजा घालवल्याचे लक्षात आले. ९९ साली मला भक्ती बर्वेंचा, "पुल, फुलराणी आणि मी" कार्यक्रम आयोजीत करण्याचे भाग्य लाभले होते. त्यावेळीस त्यांचा आलेला अत्यंत मैत्रिपूर्ण वैयक्तीक अनुभव कायम लक्षात राहील आणि त्यामुळे त्यांच्या नंतरच्या आकस्मीक निधनाने खूप कोणी जवळचे गेल्यासारखे वाटले. त्यावेळेस त्यांनी फुलराणीतील, "तुला शिकवीन चांगलाच धडा" हे सादर केले होते. "तुझं वस्कन अंगावर येणं..." असे म्हणत असताना त्यांच्या डोळ्यातील भावनांवरून त्या क्षणालाही, इतक्या वर्षांनी देखील त्या ते सतीश दुभाषींनी वठवलेल्या प्राध्यापकालाच म्हणत होत्या असे जाणवले... व्हिडीओ टेपिंगला बंदी असल्याने ते आता मनातल्यामनातच टेप होऊन राहीले आहे... असो.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Mon, 04/02/2012 - 20:10

In reply to या निमित्ताने मिपाकरांना by कानडाऊ योगेशु

Permalink

>> "लागुं"च्या तोडीचा

>> "लागुं"च्या तोडीचा "नटसम्राट" इतर कुणालाच करता आला नाही. दत्ता भट यांचा 'नटसम्राट' सर्वोत्तम होता असे रसिक, जाणकार व स्वतः डॉ लागू यांचे मत होते. (डॉ लागू यांचा 'नटसम्राट' ही अप्रतिमच आहे यात वाद नाही)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Mon, 04/02/2012 - 21:36

In reply to >> "लागुं"च्या तोडीचा by आशु जोग

Permalink

नटसम्राट

दत्ता भट आणि डॉ. लागूंव्यतिरिक्त सतिश दुभाषी आणि यशवंत दत्त यांनीही केलेलं मी पाहिलंय. याशिवाय राजा गोसावी, चंद्रकांत गोखले, मधुसूदन कोल्हटकर, प्रभाकर पणशीकर, बाळ धुरी या जुन्या-जाणत्यांनी तसंच अलिकडे गिरीष देशपांडे आणि उपेन्द्र दाते या कलाकारांनी ही भुमिका केली आहे असं आठवतं. ('नटसम्राट' नामक चित्रपटही महेश मांजरेकर करणार आहेत आणि त्यात नाना पाटेकर ही भूमिका करतील असं वाचल्याचं आठवतं.)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Mon, 04/02/2012 - 22:24

In reply to >> "लागुं"च्या तोडीचा by आशु जोग

Permalink

हिमालयाची सावली

हे एक श्रीराम लागू आणि शांता जोग अभीनीत नाटक फारच उत्तम होते. डॉ.लागू नटसम्राट आणि हिमालयाची सावली ही दोन्ही नाटके एकाच काळात करीत असत. त्या भूमीकांत ते इतके बुडुन जायचे की त्याचा त्यांच्या प्रकृतीवर परीणाम झाला असे म्हणतात. त्या ताणामुळेच त्यांनी त्यात काम करणे सोडुन दिले.
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Sun, 04/01/2012 - 22:32

Permalink

मी नाटकवेडा नाही पण

मी नाटकवेडा नाही पण वृत्तपत्रात वाचलेल्या परिक्षणांवरुन एक कळुन चुकले कि भक्ती बर्वेंनी वठवलेली "फुलराणी" त्या ताकदीने इतर कुणालाच साकारता आली नाही.(मी वाचलेल्या परिक्षणात सुकन्या कुलकर्णीने ती भूमिका केली होती.)
+१ सहमत. काल अमृता सुभाषची फुलराणी पाहिली. आधीच संवादांत भाषेच्या लकबी आणि शब्दांचा जादुई वापर आणि त्याला अनुसरुन भुलभुलैय्या टैप अभिनय.. मूळ फुलराणी कसं असेल ते असो, पण यात मात्र कितीही नाही म्हटलं तरी पार भलती चबढब झालीय - कर्रकश्य आरडाओरडा वगैरे पारच वाट लागली.. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Mon, 04/02/2012 - 12:50

In reply to मी नाटकवेडा नाही पण by यकु

Permalink

+१

सहमत यक्कुशेठ. अर्थात फुलराणी'बद्दल आमचं मत जगावेगळं आहे. खुद्द भक्तीबर्वेंची फुलराणी मूळ फुलराणीपेक्षा (आधी नाटक 'वाचून' पाहिले असेल त्यांना 'कदाचित' पटेल हे मत.) फारच 'लाऊड' होती. अमृताने तीच खरी समजून आपल्या परीने सादर करण्याचा प्रयत्न केला असे दिसते. पुलंची मूळ फुलराणी भक्तीबैंनादेखील सापडली नाही असे आमचे मत झाले आहे. ('रराचे डोके ठिकाणावर आहे काय?'...)
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Mon, 04/02/2012 - 13:12

In reply to +१ by रमताराम

Permalink

खुद्द भक्तीबर्वेंची फुलराणी

खुद्द भक्तीबर्वेंची फुलराणी मूळ फुलराणीपेक्षा फारच 'लाऊड' होती. > सहमत. :)
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Sun, 04/01/2012 - 22:56

Permalink

छान चर्चाविषय...

मी सयाजी शिंदे आणि आणि सुकन्या कुलकर्णीचं सखाराम बाईंडर पाहिलंय. अक्षरशः वेड लागलं होतं नाटक बघून. नाना पाटेकरांचं सखाराम बाईंडर कुणी पाहिलं आहे का? या दोघांशिवाय दुसर्‍या कुणी ही भुमिका वठवली असेल तर स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय असं म्हणायला हवं! :)
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Sun, 04/01/2012 - 23:02

In reply to छान चर्चाविषय... by दादा कोंडके

Permalink

नाना पाटेकरांचं सखाराम बाईंडर

नाना पाटेकरांचं सखाराम बाईंडर कुणी पाहिलं आहे का?
नाना पाटेकरांनी केले होते बाईंडर ?? त्याची गाजलेली नाटके म्हणजे महासागर आणि पुरुष.
या दोघांशिवाय दुसर्‍या कुणी ही भुमिका वठवली असेल तर स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय असं म्हणायला हवं!
शब्द गिळा राजे, शब्द गिळा.... वरीजीनल सखाराम निळू भाऊ आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Sun, 04/01/2012 - 23:13

In reply to नाना पाटेकरांचं सखाराम बाईंडर by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

+१

हेच म्हणतो. नानाने बाईंडर केले आहे का ? तरीही सयाजीचा सखाराम अंगावर अक्षरशः काटा आणतो. बाकी ह्यानिमित्ताने 'ती फुलराणी' ह्या नाटकामधली अविनाश नारकरची प्राध्यापकाची भुमिकाही फक्कड आहे असे आवर्जुन नमुद करावे वाटते. ह्याशिवाय 'घाशीराम कोतवाल'मधले मोहन'नाना' आगाशे ह्यांचीही भुमिका अजरामर आहे असे सांगतो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Mon, 04/02/2012 - 11:31

In reply to छान चर्चाविषय... by दादा कोंडके

Permalink

नाना

नानाने 'पाहिजे जातीचे या नाटकात अप्रतिम भूमिका केली होती. तेंडुलकरांचं ते ओरिजिनल संचातलं नाटक मी बघितले होते छबिलदासमधे!! विहंग नायक, सुषमा तेंडुलकर आणि 'अरविंद देशपांडे असे दिग्गज होते.
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Mon, 04/02/2012 - 11:42

In reply to नाना by तिमा

Permalink

नानानी केलेली अजून दोन छान नाटके पाहिली आहेत.

पु.ल. लिखीत आम्ही लटीके ना बोलू हे एक. त्या माधव वाटवे, बाळ कर्वे इत्यादी दिग्गजसुद्धा होते. असेच अजून खूप छान काम केलेले नाटक म्हणजे हमीदाबाईची कोठी. तीनही नाटकात अप्रतीम काम केले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Sun, 04/01/2012 - 23:08

Permalink

नाना पाटेकरांनी कधी केले होते

नाना पाटेकरांनी कधी केले होते बाईंडर ?? त्याची गाजलेली नाटके म्हणजे महासागर आणि पुरुष.
माझा पण विश्वास बसला नाही. पण ओळखीतल्या एका नाटकवेड्यानं सांगितलय की नानांनी पण हे केलय म्हणून.
शब्द गिळा राजे. शब्द गिळा.... वरीजीनल सखाराम निळू भाऊ आहेत.
अर्र, चूक झाली. एक डाव माफी द्या! :) या अवलियाला विसरलोच होतो! वर्जीनल नाटक मिळवून पघायलाच पाहिजे आता.
  • Log in or register to post comments

Submitted by निश on Mon, 04/02/2012 - 11:40

Permalink

यकु साहेब, खरच मस्त धागा टाकला आहेत तुम्हि

यकु साहेब, खरच मस्त धागा टाकला आहेत तुम्हि. माझ्या वडिलानी दाजी भाटवडेकरांचा काकाजी पाहीला आहे. ते आजही सांगतात कि त्यांची अदाकारी अफाट होती म्हणुन. मलाहि ते नाटक बघायच आहे. असच अजुन काही नाटक, रायगडाला जेव्हा जाग येते व घाशिराम कोतवाल
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Mon, 04/02/2012 - 15:23

In reply to यकु साहेब, खरच मस्त धागा टाकला आहेत तुम्हि by निश

Permalink

खरे आहे.

मी ज्यावेळी पाहिले त्यावेळी काकाजींची भूमीका अर्थातच दाजी भाटवडेकर करीत असत आणि श्यामच्या भुमीकेत काशीनाथ घाणेकर होते. (बाकी भुमीका कोण कोण करीत आठवत नाहीत.) . फार मस्त प्रयोग व्हायचा. (परवडत नसताना) दोन वेळा बघीतले होते हे नाटक.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Mon, 04/02/2012 - 11:42

Permalink

पूर्वी पायरसी नसल्याने फार

पूर्वी पायरसी नसल्याने फार नुकसान झालंय आपलं! :( या सगळ्यांचे कुणीतरी भल्या माणसानी शूटिंग करुन ठेवायला हवे होते.....
  • Log in or register to post comments

Submitted by एम.जी. on Mon, 04/02/2012 - 11:44

Permalink

बाकी ह्यानिमित्ताने 'ती

बाकी ह्यानिमित्ताने 'ती फुलराणी' ह्या नाटकामधली अविनाश नारकरची प्राध्यापकाची भुमिकाही फक्कड आहे असे आवर्जुन नमुद करावे वाटते. ओरिजनल भूमिका केली होती सतीश दुभाषींनी. भक्ती बर्वे, सतीश दुभाषी आणि अरविंद देशपांडे अशी टीम होती. सतीश दुभाषी म्हणजे रंगमंचावरील राजा. प्रोफेसरच्या मस्तीखोर भूमिकेला न्याय दिला तो त्यांनीच.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Mon, 04/02/2012 - 11:49

Permalink

काकाजी...

भाटावडेकरांचे पाहिलेले नाहित. रवी पटवर्धनांबद्दल १००% सहमत आहे. विक्रम गोखले हे नाव एरव्ही गंभीर्,आढ्यताखोर अशा भूमिकांसाठी प्रसिद्ध असलं तरी अक्षरशः काकाजीच वाटतील अशी त्यांची भूमिका(अगदि त्याच वेशभूषेसह) एका मराठी चित्रपटात पाहिलेली आहे. नाव आता आठवत नाही. तेही नक्कीच खूपच उत्तम प्रकारे भूमिका वठवतील ह्याची खात्री आहे. अर्थात हे सध्या बहुतेकांना मान्य होणे कठिण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 04/02/2012 - 11:59

Permalink

वार्‍यावरची वरात...

पु. ल. देशपान्डे आनि आशालता व सुधिर मोघे , रमाकान्त देशपान्डे...खरेच हा सन्चच तुफान होता.... नविन कलाकारान्नी केलेला प्रयोग पण बघितला पण जुनाच सरस वाटला... (यु ट्युब वर हे जुने नाटक उपलब्ध आहे)..
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Mon, 04/02/2012 - 12:53

In reply to वार्‍यावरची वरात... by मुक्त विहारि

Permalink

शिडी

या जुन्या प्रयोगाची शिडी/डीवीडी फाऊंटनने काढली आहे आता. सध्या बाजारात मिळते. ता.क.: कडवेकरमामींची ती अजरामर भूमिका सुनीताबाई करत असत नि मोठ्या ठसक्यात करत असत. आशालताबाईंची कडवेकरमामी त्या मानाने फारस फिकट आहे/होती असे आमचे एक ज्येष्ठ मित्र सांगतात.
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Mon, 04/02/2012 - 15:29

In reply to वार्‍यावरची वरात... by मुक्त विहारि

Permalink

मुक्त विहारि

पु. ल. देशपान्डे, आशालता वाबगावकर व श्रीकाम्त मोघे , रमाकान्त देशपान्डे यांचे बरोबर निलम प्रभु, सुनीला प्रधान इत्यादी अनेक कलाकार होते. ...खरेच हा सन्चच तुफान होता.... ही बघा रवीवारची सकाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 04/03/2012 - 19:08

In reply to मुक्त विहारि by चिंतामणी

Permalink

तसेच

तसेच येथे वरिजिनल वार्‍यावरची वरात बघता येईल!
  • Log in or register to post comments

Submitted by एम.जी. on Mon, 04/02/2012 - 12:03

Permalink

सुधीर मोघे नव्हेत... श्रीकांत

सुधीर मोघे नव्हेत... श्रीकांत मोघे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 04/02/2012 - 12:07

In reply to सुधीर मोघे नव्हेत... श्रीकांत by एम.जी.

Permalink

धन्यवाद...

चुकलो...
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 04/02/2012 - 12:39

Permalink

ओह!

काकाजी कुठे सापडतील म्हणजे दाजी भाटवडेकर होय! कारण हिंदी चित्रपटात अस्सल काकाजी = कर्नल नगेंद्रनाथ जुलीयस विल्फ्रेड सिंग - छोटीसी बात व मिपावर एकच अस्सल काकाजी - बिल्ला क्रमांक ४०१
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Mon, 04/02/2012 - 12:44

Permalink

काय आठवण काढली आहे भैया

मस्त मझा होता यार. आम्ही पण जंग जंग पछाडले आहे यासाठी. तुम्हाला गावले तर आम्हालाही सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Mon, 04/02/2012 - 13:50

Permalink

अश्रूंची झाली फुले, तो मी नव्हेच. तरुण तुर्क......

लाल्या म्हणजे डॉ. काशिनाथ घाणेकर आणि शंभू महादेव म्हणजे चित्तरंजन लखोबा लोखंडे म्हणजे प्रभाकर पणशीकर प्रो. बारटक्के म्हणजे मधुकर तोरडमल 'पुरुष' अनेक संचात पाहिले पण भक्ति बर्वे आणि नाना पाटेकर वेगळेच तीच गोष्ट 'नटसम्राट' ची. डॉ. लागु ते डॉ लागु. इथे ओशाळला मधला औरंगजेब म्हणजे पणशीकर आणि संभाजीराजे म्हणजे डॉ. काशिनाथ घाणेकर. अरुण सरनाईक गेले आणि 'गाठ आहे माझ्याशी' संपले. मामासाहेब आणि अरुण सरनाईक यांच्या भूमिका तोडीस तोड होत्या. बाळ धुरी आणि पणशीकर यांचे 'थँक्यु मि, ग्लॅड' असेच लक्षात राहिलेले नाटक अखेरचा सवाल म्हणजे भक्ती बर्वे आणि वस्त्रहरण म्हणजे मच्छिंद्र कांबळी
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 04/02/2012 - 14:01

Permalink

रवि पटवर्धनांचा काकाजी

रवि पटवर्धनांचा काकाजी अभिनयाच्या बाबतीत मात्र पार फाटका वाटला. काकाजीच्या पात्राचे गम्मत आहे ते भाषेच्या लहेजात. रवी पटवर्धनाना इंदोरी भाषा वापरताच आलेली नाहिय्ये त्यामुळे त्या भुकिकेचा बट्ट्याबोळ वाजवलेला आहे. फुलराणी चा रोल अमृताने फारच सुम्दर साकारला आहे. सुदैवाने या रोलची तुलना भक्तीबर्वेंच्या फुलराणीशी होणार होती त्यापेक्षा वेगळी छटा दाखवत अमृताने फुलराणी साकारलीये. त्या फुलराणी मधला प्रध्यापक मात्र फारच उर्मट आणि आढ्यात्यखोर वाटला.
  • Log in or register to post comments

Submitted by एम.जी. on Mon, 04/02/2012 - 15:59

Permalink

पुरुषमधे भक्ती बर्वे होत्या

पुरुषमधे भक्ती बर्वे होत्या ? माझ्या मते पहिल्या संचात नाना पाटेकर, रिमा लागू, चंद्रकांत गोखले आणि उषा नाडकर्णी हे होते..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रास on Mon, 04/02/2012 - 19:28

In reply to पुरुषमधे भक्ती बर्वे होत्या by एम.जी.

Permalink

एक्झॅक्टली....

.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Mon, 04/02/2012 - 16:07

Permalink

दाजी नि कट्यार

पं. वसंतराव देशपांडे आणि दाजी भाटवडेकरांच्या भूमिका असलेले 'कट्यार काळजात घुसली' हेही असेच एक नाटक. ते ही कुठे उपलब्ध असेल तर कृपया सांगावे. दाजीनी 'कट्यार' मधे भुमिका केली होती ? आपल्याला तरी ही बातमी नवी आहे. केली असेल तर ती कुणाची.? कारण त्यात ज्या महत्चाच्या भूमिका आहेत त्या गायकी आहेत. बाकी भूमिका तरूण पात्रांच्या आहेत. त्या दाजी करणॅ शक्य नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by एम.जी. on Mon, 04/02/2012 - 16:15

Permalink

" कट्यार" मधे वसंतरावांबरोबर

" कट्यार" मधे वसंतरावांबरोबर पंडित भार्गवराम आचरेकर हे होते... दाजी भाटवडेकर नक्की नव्हते.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Mon, 04/02/2012 - 16:21

In reply to " कट्यार" मधे वसंतरावांबरोबर by एम.जी.

Permalink

जितेंद्र

जितेंद्र अभिषेकी होते हो. हवे तर पणशीकराअंना विचारा, त्यानाटकाचे प्रोड्युसर म्हनून.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Mon, 04/02/2012 - 16:38

In reply to जितेंद्र by मन१

Permalink

ओ दादा

अभिषेकीबुवांचे संगीत आहे फक्त. त्यांनी नाटकात काम नाही केले कधी. भार्गवराम आचरेकर होते पंडितजींच्या भूमिकेत.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Mon, 04/02/2012 - 19:29

In reply to ओ दादा by रमताराम

Permalink

हे

हे आधे नाही का सांगायं? दुरुस्ती व त्रुटी मान्य करित आहे.(करण्याशिवाय इलाजही काय आहे म्हणा)
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Mon, 04/02/2012 - 19:51

In reply to हे by मन१

Permalink

वाईट वाटून घेऊ नको मनोबा..

वाईट वाटून घेऊ नको मनोबा.. संगीत दिग्दर्शन काही प्रमाणात आणि जितेंद्र अभिषेकींचा किमान आवाज तरी होता त्या नाटकात ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Mon, 04/02/2012 - 22:12

In reply to हे by मन१

Permalink

सॉरी शक्तिमान

लोक एवढे दणादण प्रतिसाद ठोकतात, म्हातारपणी त्या वेगाने उत्तर देणे जमत नाय हो. अवांतरः पणशीकरांवरून आठवले. छोटा सदाशिव बहुधा रघुनंदन पणशीकर होते. पण खात्री नाही. (आमचे कट्यारचे पुस्तक कोण्या मित्रवर्याने ढापल्याने खात्री करून घेता येत नाहीये.)
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Mon, 04/02/2012 - 16:34

Permalink

एकूणच कुणी कुठल्या नाटकात काम

एकूणच कुणी कुठल्या नाटकात काम केले होते यावरून प्रचंड गोंधळ आहे असे लक्षात आले आहे. मराठी नाटकांचा इतिहास नीट लिहून काढून तो जालावर टाकणे आत्यंतिक गरजेचे आहे इतके खात्रीने सांगू शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Mon, 04/02/2012 - 19:14

In reply to एकूणच कुणी कुठल्या नाटकात काम by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

मग

चौ. राजांना विचारा? शुभस्य शीघ्रम्!!
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Tue, 04/03/2012 - 05:29

In reply to मग by मी-सौरभ

Permalink

वि भा देशपांडे

नाटकाचा इतिहास वैगैरे हा प्रांत समर्थपणे सांभाळणारे विभा देशपांडे यानी एका प्रकल्पांतर्गत अनुदान मिळवून एक प्रबंध लिहिला आहे असे ऐकतो. बाकी मिपावर " वल्ली" हे ऐतिहासिक काम करू शकतील. व बाकीचे मित्र वल्ल्या ले भारी ... जबरी... खप्ल्यालो आहे...आणि चुकून या गंभीर संशीधनात " हसून ह पू वा " असाहे प्रतिसाद देतील. ( डोळा बारीक केलेली सायली चुकलो - स्मायली ) .
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Tue, 04/03/2012 - 14:42

In reply to वि भा देशपांडे by चौकटराजा

Permalink

व बाकीचे मित्र वल्ल्या ले

व बाकीचे मित्र वल्ल्या ले भारी ... जबरी... खप्ल्यालो आहे...आणि चुकून या गंभीर संशीधनात " हसून ह पू वा " असाहे प्रतिसाद देतील. ( डोळा बारीक केलेली सायली चुकलो - स्मायली ) .
इथे मात्र माझी खरेच हहपुवा !!!
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Mon, 04/02/2012 - 20:11

Permalink

>> नटसम्राट सर्वप्रथम दत्ता

>> नटसम्राट सर्वप्रथम दत्ता भटांनी सादर केले होते. ते देखील समर्थ अभिनयाचे उदाहरण होते नटसम्राट प्रथम लागूंनीच सादर केले त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर दत्ता भट आले
  • Log in or register to post comments

Submitted by प्राध्यापक on Mon, 04/02/2012 - 20:31

Permalink

तुझे आहे तुजपाशि, मधिल दाजी

तुझे आहे तुजपाशि, मधिल दाजी भाटवडेकर तर अतीशय मस्तच होते,त्या नतर मला वाटते ती भुमिका प्रा.मधुकर तोडरमल हेच करु शकतील.
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Mon, 04/02/2012 - 20:35

In reply to तुझे आहे तुजपाशि, मधिल दाजी by प्राध्यापक

Permalink

त्या नतर मला वाटते ती भुमिका

त्या नतर मला वाटते ती भुमिका प्रा.मधुकर तोडरमल हेच करु शकतील.
+१ एकदम करारी नट. पण आता ते नाटकांतुन निवृत्त. ते सध्या समग्र अगाथा ख्रिस्ती मराठीत आणत आहेत. लै भारी भाषांतरं.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com