असे शब्द होते
तसे शब्द होते
जसा अर्थ घ्यावा
तसे शब्द होते
कुणा ना कळावे
खरे काय होते
असे मुक्त वेडे
तुझे शब्द होते
श्रवून जाहले ते
लिहून घेतले ते
जपून ठेवले ते
खुळे शब्द होते
जगी जाणकार
कुणी ही असू दे
कविता म्हणाया
खुजे शब्द होते
प्रतिभेस माझे
साष्टांग नमन
समजलेच नाही
कसे शब्द होते
अनुवाद व्हावा
जरा इंग्रजीत
मराठीत बहुदा
न हे शब्द होते
ऐकता वाचता
जाहलो "आडवा"
तरीही उरावर
उभे शब्द होते..!!
(एक जुनीच कविता)
....रसप....
०३ जानेवारी २००९
http://www.ranjeetparadkar.com/2009/01/blog-post_03.html
प्रतिक्रिया
29 Mar 2012 - 6:50 pm | अत्रुप्त आत्मा
व्वा...व्वा...व्वा...! शब्द-प्रेम अवडलं हो रसपराव ;-)
29 Mar 2012 - 8:32 pm | प्रचेतस
झकास हो रसपराव.
शब्दप्रभू आहात तुम्ही.
29 Mar 2012 - 7:02 pm | पैसा
पण शेवटच्या दोन कडवी सोडून कविता आवडली. तिथे जरा रसभंग झाला.
29 Mar 2012 - 7:21 pm | रसप
एकंदरीतच अजूनही काही ठिकाणी भंग आहेत. तशी जुनी कविता आहे. थोडेसे बदल करून भुजंगप्रयातात आणता आली असती.. पण कंटाळा केला!
धन्यवाद!
29 Mar 2012 - 7:07 pm | अमितसांगली
खूपच छान......
29 Mar 2012 - 7:16 pm | जेनी...
तुझे तेच होते
माझे तेच होते
कधी जुने जुने
कधी नवे शब्द होते !!
माझ्यासाठी तुझे
तुझ्यासाठी माझे
अर्थ तेच नेहेमिचे
बदलुन शब्द होते !!
वसंतात न्हाले
श्रावनसरि प्याले
उरि समाधान नाहि
उने शब्द होते !!
निखारा मनीचा
दाह नजरेत यावा
असे बळ एकमेव
त्या शब्दात होते !!
बहरतो शब्द
फुलतोही शब्द
शब्दाचेच वेड
त्या शब्दास होते !!
29 Mar 2012 - 7:22 pm | रसप
अरे वाह! एकटाकी का ?
मस्तच!!
29 Mar 2012 - 9:01 pm | चौकटराजा
शब्द ची महति व कधी कधी त्यातील व्यर्थता दोन्ही समर्पक पणे .
आमचे एक जुने मित्र त्यांची १९७२ साली केलेली कविता - जेवढी आठवते तेवढी-
शब्द कथा
शब्द व्यथा
शब्द घन रास्त ते
शब्द फुले मनि झुले
रेशमी वस्त्र ते
शब्द तारे
शब्द वारे
भासते जादूगिरी
शब्दांच्या टोचणीचे
जखम होतसे उरी
कवि - सहदेव मखामले तळेगाव दाभाडे
एक शब्दाची कविता - रमण रणदिवे यांची ही आहे. पण आता पूणेपणे आठवत नाही. ते ती गाउन छान दाखवतात.
29 Mar 2012 - 9:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता आवडली.
-दिलीप बिरुटे