घालीत साद फुलवित रात
स्वप्नात सखी ती येते
लाजून जरा हासून जरा
देहात मिसळुनी जाते
ती स्वप्नपरी ती
ती धुंद कळी ती
ती रातराणी ती माझी
ती मुग्ध बासरी
मंद हासरी
प्रिया सखी फुलराणी
श्वासात गंध ओठात चंद्र
मग रात धुंद ही होते
प्रणयास रंग रेशमी संग
मग कळी फुलुनि येते
ती स्वप्नपरी ती ---
जागती रात धुंदीत गात
कसली पहाट मग होते
जुळवीत सूर नादात चूर
स्वप्नात रोज ती येते
ती स्वप्नपरी ती ---
प्रतिक्रिया
29 May 2008 - 7:54 pm | चेतन
घालीत साद फुलवित रात
स्वप्नात सखी ती येते
लाजून जरा हासून जरा
देहात मिसळुनी जाते
हे मस्तचं
स्वप्नपरी ती, धुंद कळी ती
ती माझी रातराणी
ती मुग्ध बासरी,मंद हासरी
प्रिया सखी फुलराणी
हे कसे वाटते (उगिच आपली लुडबुड)
30 May 2008 - 7:01 am | फटू
घालीत साद फुलवित रात
स्वप्नात सखी ती येते
लाजून जरा हासून जरा
देहात मिसळुनी जाते
मस्त आहे... चालू द्या...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
30 May 2008 - 12:31 pm | प्राजु
अतिशय तरल काव्य..
ती स्वप्नपरी ती
ती धुंद कळी ती
ती रातराणी ती माझी
ती मुग्ध बासरी
मंद हासरी
प्रिया सखी फुलराणी
श्वासात गंध ओठात चंद्र
मग रात धुंद ही होते
प्रणयास रंग रेशमी संग
मग कळी फुलुनि येते
ती स्वप्नपरी ती ---
या ओळी तर अत्युच्च.... अभिनंदन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 May 2008 - 12:49 pm | मदनबाण
मित्रा झकास की रे............
(अशाच डिंन्चॅक परीच्या शोधात)
मदनबाण.....
30 May 2008 - 7:03 pm | अजिंक्य
मस्त कविता!
आधी वाटलं होतं की, मुक्त छंदातली असल्यामुळे फारशी रुचणार नाही.
पण - वाचून तर बघूया - अशा उद्देशाने वाचायला घेतली, आणि जाणवलं की हे काही वेगळंच रसायन आहे.
जुळवीत सूर नादात चूर
स्वप्नात रोज ती येते
ती स्वप्नपरी ती ---
सुरेख!!
30 Jul 2008 - 4:00 pm | राजाराम
फारच छान
30 Jul 2008 - 4:04 pm | विसोबा खेचर
चांगली आहे कविता....!