जी.एम.आर.टी. ला सहल काढायचा बेत ठरतो आहे.
जायंट मीटरवेव्ह रेडीओ टेलिस्कोप : http://www.misalpav.com/node/2738
जी.एम.आर.टी. ला अभ्याससहल: http://www.misalpav.com/node/2738#comment-38198
मी आत्ताच माझ्या एका बॉसशी बोलले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, आपण जर आपला एक ग्रुप घेऊन गेलो तर चालेल. आपल्याला फक्त वाहतूक आणि जेवण यांची व्यवस्था करावी लागेल. तेव्हा पुण्या-मुंबईच्या मिपाकरांना जर रस असेल तर आपण काहीतरी प्लॅन करू शकतो.
माहितीजालावर लिहिलं आहे की फक्त शुक्रवारीच तिथे जाता येईल. पण आपल्या मिपाच्या जनतेला जर इतर शनिवार-रविवार चालणार असतील तर आपण तसा प्लॅन करू शकतो.
कोणकोण येणार आहे त्यानी कळवावे म्हणजे वाहने वगैरे प्लॅन करता येईल.
या धाग्यावर कळवा.
प्रतिक्रिया
29 Jul 2008 - 2:22 pm | सखाराम_गटणे™
मी येयीन
पण शनी-रवी वारी.
सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.
29 Jul 2008 - 2:25 pm | भडकमकर मास्तर
मी आहे...
पुढल्या महिन्यातला एखादा रविवार चालेल..______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
29 Jul 2008 - 4:58 pm | sachin bhosale
MI YEIN
29 Jul 2008 - 4:59 pm | ध्रुव
मी येणार. शनी किंवा रवि...
--
ध्रुव
29 Jul 2008 - 5:04 pm | टारझन
जावा जावा ! आमचा लांबून टाटा .. पण दुर्बिणी तोडू नका ... त्या बिचार्या संहिता तैंची नोकरी जाईल. आणि मला पण बघायला जायचंय ...
मजा करा लेकहो .... नारायणगाव ला कुठे तरी लै भारी वडापाव मिळतो ... चापा मस्त पैकी
कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
29 Jul 2008 - 5:04 pm | ब्रिटिश टिंग्या
येणार्.....दिवाळीनंतर काढणार असाल तर :)
29 Jul 2008 - 5:19 pm | अमितकुमार
नारायण गावाला ......... उत्तम मिसळ मिळते. नासिक पूणे हाय्-वे लगत हॉटेल आहे. नाव आठवत नाहि पण त्या हॉटेलात रविन्द्र महाजनि, सूधिर दळवि यांचे फोटो लावलेत मीसळ खातांना.....
29 Jul 2008 - 5:25 pm | अमोल केळकर
यायची इच्छा आहे.
१६ ऑगस्ट ला जमेल का ते पहावे. लागुन सुट्ट्या आहेत.
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
29 Jul 2008 - 5:29 pm | विसोबा खेचर
मिपाच्या अभ्यास-सहलीला आमच्या अनेकोत्तम शुभेच्छा! लेको मजा करा सगळे! :)
29 Jul 2008 - 6:21 pm | श्रीयुत संतोष जोशी
नमस्कार,
यायची इच्छा तर आहे पण तारीख समजल्यावरच ठरवता येईल.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
29 Jul 2008 - 9:03 pm | वरद
विजूभाउ फक्त एक आठवडा आधी सांगा....
“to be sure of hitting the target, shoot first and whatever you hit call it the target.”
29 Jul 2008 - 10:39 pm | पद्माकर टिल्लु
padmaakar
मी पण सहलीस येण्यास तयार आहे.
पद्माकर टिल्लु
30 Jul 2008 - 6:49 am | गणा मास्तर
नारायण गावाला ......... उत्तम मिसळ मिळते. नासिक पूणे हाय्-वे लगत हॉटेल आहे. नाव आठवत नाहि पण त्या हॉटेलात रविन्द्र महाजनि, सूधिर दळवि यांचे फोटो लावलेत मीसळ खातांना.....
एकदा नक्की खा
30 Jul 2008 - 11:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला असं वाटतंय की तिथे बाहेर फिरायचं असल्याने आपण पावसाळ्यानंतर जाणं उत्तम!
दुसरी गोष्ट मला इथली कागदी घोडी नाचवायला थोडा वेळ लागेल. त्यामुळे येत्या रविवारी नको. आणि रविवारपर्यंत माझा घसा सुटला नाही तर माझी मोठ्ठी पंचाईत होईल.
आपण पावसानंतर गेलेलं बरं, म्हणजे बाहेर फिरताना आणि हादडतानाही फार विचार नाही करावा लागणार.
(घसा बसलेली, सर्दट) अदिती.
अवांतरः कुबड्या तोपर्यंत परत ये!
तात्या तुम्ही ठाणे/मुंबईचे लोकही येऊ शकता.
अदिती.
30 Jul 2008 - 2:58 pm | मन
यायची इच्छा आहे.
१५ ऑगस्ट्ला जमेल का ? शुक्रवार येतोय जोडुन वीकांताला.
आपलाच,
मनोबा
30 Jul 2008 - 3:22 pm | भडकमकर मास्तर
पावसानंतर बरं राहील म्हणता?...
चालेल...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/