तुझ्या गळा, माझ्या गळा,
सीबीआय चौकशीच्या माळा.
दाद मागायची कोणाला ?
चला रे आता कोर्टात चला.
तुज "पोटा", मज "मोक्का".
आणखी "टाडा" कोणाला?
लाज वाटते का तुम्हाला ?
मला कुणाची, देशाला.
तुझ्या गळा, माझ्या गळा.
सीबीआय चौकशीच्या माळा.
तुज झटका, मज फटका.
आणखी अटका कोणाला ?
सांगू कुठल्या नेत्याला.
सांग तिकडच्या "भाई"ला.
तुझ्या गळा, माझ्या गळा.
सीबीआय चौकशीच्या माळा.
आसू आसू डोळ्यात आसू.
वरवर खोटे हसू हसू.
मंत्रीपदी आता नको बसू.
सरकार आमचे तसू तसू.
तुझ्या गळा, माझ्या गळा.
सीबीआय चौकशीच्या माळा.
कशी कशी आज अशी.
चंगळ आली अंगाशी.
आता गट्टी फू तुमच्याशी.
तर मग "युती" कोणाशी ?
-- अभिजीत दाते
मूळ गीत - तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा
प्रतिक्रिया
29 Jul 2008 - 4:31 pm | निसर्ग
चांगल विडंबन केल आहे...
या गाण्यावर आम्हीपण विडंबन करायचो..
तुझ्या गळा, माझ्या गळा,
पहीला कुणाचा दाबायचा ?
;;)
" DON'T AIM THE TARGET...
....JUST ACHIVE IT "
29 Jul 2008 - 8:48 pm | प्रियाली
माझा गळा तुझा गळा
दाबून करूया घोटाळा
असं विडंबन आम्ही करत असू. ;)
30 Jul 2008 - 4:02 pm | पारिजातक
पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!