पहाट

पंचम's picture
पंचम in जे न देखे रवी...
27 Jul 2008 - 4:19 pm

जेव्हा लिहतो मी,
तेव्हा लेखणीत उरतो मी,
होऊन थेंब शाईचा,
कागदावरी पसरतो मी......

जेव्हा पाहतो मी,
तेव्हा स्वप्न सांधतो मी,
होऊन ईंन्द्र्धनुश्याचे रंग,
दाही दिशात सांडतो मी.......

जेव्हा बोलतो मी,
शब्द चोरतो मी,
कधी हास्यांचे तर
कधी आसवांचे दान फेकतो मी.......

जेव्हा गातो मी,
सप्तसुर होतो मी,
होऊन भरलेले आभाळ
जमिनीवर बरसतो मी.......

जेव्हा नाव सांगतो मी,
जरासा घाबरतो मी,
बिनचेह-याच्या या गर्दीत
स्वताची ओळख लपवतो मी.......

पंचम

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jul 2008 - 4:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जेव्हा लिहतो मी,
तेव्हा लेखणीत उरतो मी,
होऊन थेंब शाईचा,
कागदावरी पसरतो मी......

व्यक्त होऊनही उरलेपणाची भावना मस्तच आहे. सर्वच कडवी आवडली.
येऊ दे अजून अशाच सुंदर कविता.

धनंजय's picture

27 Jul 2008 - 5:34 pm | धनंजय

वरील कडवे खासच.

खालील कडवे आवडले - पण दोन कडवी असायला हवी होते असे वाटते :

जेव्हा गातो मी,
सप्तसुर होतो मी,
होऊन मेघ मल्हार
मैफिलीत दंगतो मी. ... किंवा असे काहीतरी...

जेव्हा ---- मी
---- होतो मी
होऊन भरलेले आभाळ
जमिनीवर बरसतो मी.......

पंचम's picture

28 Jul 2008 - 2:35 pm | पंचम

दुभंगलेल्या गीतांना
जेव्हा नवे सुर मिळतात
तेव्हा पुन्हा नव्याने
अर्ध्या कवितांना शब्द मिळतात...

माझ्या कवितेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनस्वी आभार!!!!!!!!!!!!

मयुरयेलपले's picture

27 Jul 2008 - 5:14 pm | मयुरयेलपले

काय पंचम (निशा), मला माहित आहे तु कोण आहेस.... कवितेचे शब्दच सांगतात तु किती सुंदर कविता लिहिलि आहेस.. मी तुला काय प्रतिक्रिया देणार.. कविता वाचल्यावर सुन्न झालो बघ... लई मोठा झालायस लेका... भावि लेखनासाठि शुभेच्छा...

आपला मयुर

विसोबा खेचर's picture

27 Jul 2008 - 5:17 pm | विसोबा खेचर

जेव्हा गातो मी,
सप्तसुर होतो मी,
होऊन भरलेले आभाळ
जमिनीवर बरसतो मी.......

सुंदर कविता, जियो....!

मनीषा's picture

28 Jul 2008 - 9:05 am | मनीषा

कविता आवडली

पंचम's picture

28 Jul 2008 - 3:52 pm | पंचम

दुभंगलेल्या गीतांना
जेव्हा नवे सुर मिळतात
तेव्हा पुन्हा नव्याने
अर्ध्या कवितांना शब्द मिळतात...

माझ्या कवितेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनस्वी आभार!!!!!!!!!!!!

चतुरंग's picture

29 Jul 2008 - 2:28 am | चतुरंग

चतुरंग

प्राजु's picture

29 Jul 2008 - 8:40 am | प्राजु

सुंदर रचना... कविता आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/