आता मगजात, मध्ये यावे - कोणे परि नी किती ओकावे
चिडौनी सर्वांसी घालावे, मेंटलात हे ||१||
.
हे बाळांची सुरसुरी नासो, तया सुन्नमनस्कता वाढो,
जालात परस्परे घडो, मैत्र मुला-मुलींचे ||२||
.
बुद्धीकुंभ साठले, आओ, जग वाचते लिहा हो,
जो जे कुंथील ते भरभरुन येवो, धागियांत ||३||
.
अरे हे तर सकळ चांडाळी, इगोनिष्ठांची वळवळे अळी,
अनिवार ओरडे पांगळी, खेटरें खाता ||४||
.
केले मसंस्थलाचे बारव, घेऊनी मराठीचे नाव,
ओकीती जे बडबड केवळ, आयुष्यांची ||५||
.
मेंढरे जी गर्दन घालून, एडके जे शिंगहीन,
हे बारमाही सदा धरोन, स्व-चर्चा हेतू ||६||
.
स्त्रीमुक्ती विदुषी येवो, वाट्टेल तैसे नाचो
नवर्यांचे पार्श्वी घालो, लत्ता रोजी||७||
.
किंबहुना सर्व स्थली, राखावी शक्य तीती गल्ली,
जाई तो कालसुखांती, लॉगिने होतां ||८||
.
आणि ग्रंथउचकटावे, भुक्कड विषयी ल्याहावे
दुष्टां खरेदी कर्मे नित्ये, धाडावें जी ॥९॥
.
येथ कवणे काय करावें, हा होतोच कालापव्ययै,
येणे कित्येक चांगदेवो, भ्रमिष्ट झाले ||१०||
.
-- जंत जानलेवो
प्रतिक्रिया
16 Mar 2012 - 12:04 am | अत्रुप्त आत्मा
---^---
16 Mar 2012 - 12:26 am | गोंधळी
मस्त.
16 Mar 2012 - 8:05 am | ५० फक्त
जमलंय,
16 Mar 2012 - 8:20 am | प्रचेतस
भारी झालंय.
16 Mar 2012 - 8:24 am | जोशी 'ले'
:-) सही मे दही
16 Mar 2012 - 8:27 am | पक पक पक
लै भारि जमलय अधुनिक 'माउली' ;)
16 Mar 2012 - 2:15 pm | बॅटमॅन
लै लै लै भारी!!!
16 Mar 2012 - 2:30 pm | मन१
ह्यातूनच एक सही सुचली आम्हाला आजच.
16 Mar 2012 - 7:03 pm | पैसा
आंतरजालावरची मेंटलांची मांदियाळी अचूक टिपणारे तुम्ही कोण तरी द्रष्टे दिसताय! चिंटू या नावामागे कोण महारथी आहे माहिती नाही, पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतायत!
या तुमच्या इच्छेला आमेन म्हणण्यापलीकडे काही ऑप्शन नाही. सगळे चिमटे, बोचकारे, लत्ता प्रहार व्यवस्थित अभ्यास करून आलेत हे दिसतंच आहे!
रचना उत्तम पण
यासाठी तुम्हाला 'फटके' द्यावेत असं मला एक स्त्रीमुक्तीवादी असल्यामुळे वाटतं आहे!
16 Mar 2012 - 7:30 pm | चौकटराजा
अरे हे तर सकळ चांडाळी, इगोनिष्ठांची वळवळे अळी,
अनिवार ओरडे पांगळी, खेटरें खाता ||४||
ही ओळ आवडली पण इगोवाल्याना थेट चांडाळ म्हणायचे ? मग पृथ्वीचे नाव चांडाळी ठेवावे लागेल.
( च्यायला चौकट राजा पचकलाच की ! )
16 Mar 2012 - 9:22 pm | यकु
जालिय घाणेश्वरांचा प्रयत्न जबरदस्त आहे.
मिपाचं आणि इथल्या 'सदस्यविषयांचं वाचन' लोक किती अभ्यासपूर्वक करतात हे पाहून ड्वाले, अखेर पाणावलेच !
18 Mar 2012 - 9:16 am | सूड
भन्नाट लिहीलंत राव !! आता एखादी 'जालार्थदीपिका' येऊ द्या.
18 Mar 2012 - 9:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, चिंटूसेठ लैच भारी. अजून येऊ दे. :)
-दिलीप बिरुटे
27 Aug 2012 - 9:26 pm | मन१
भारिच.
27 Aug 2012 - 9:36 pm | पैसा
सुडची सही बघून कालच आठवण झाली होती.
26 Apr 2017 - 9:23 pm | सतिश गावडे
काय लिहीलं आहे राव
>>इगोनिष्ठांची वळवळे अळी
हे भविष्यकथन होतं की नुकतेच याची सुरुवात झाली होती ? ;)