तर मंडळी हा पक्षी आपल्या ( पक्षी:- माझ्या) लयं म्हणजी लयं डोक्यात जातो बघा ! का ? कसं हाय बघा, ते रस्त्यावरच्या मोकाट कुत्तरड्यां नंतर माझ्या साखर झोपेचे पार खोबरं करण्याचा मोलाचा वाटा ही मंडळी उचलत्यात !
च्यामायला ! नाय तांबड फुटल आकाशा मंदी तर् ह्यांच हुं हुं हुं हे असल इचित्र ओरडनं चालु व्हतं बघा ! बाकीचे पक्षी कसं गोड गात्यात... पर ह्यो काय इचित्रच आवाज काढतो ! पार डोक्याची ( हे हे हे समजलचं असलं तुम्हासनी ! ;)करुन टाकतो.
कुत्र्यांन नंतर माणसांच्या वातावरणाशी जुळवुन घेणारी ही जमात...ज्या पशु पक्षांना जमले नाही त्यांची संख्या कमी झाली,म्हणजी चिमनी,कावले... पर ह्याची प्रजा अमाप वाढली !
शनी देवाचे वाहन कबुतर त्याला दाणे टाकले की शनिमहाराज प्रसन्न व्हतील अशी काही व्यापारी मंडलींची समजुत असते,म्हणुन पुण्य कमवण्यासाठी ही मंडळी रस्त्यावर दाणे टाकतात...आणि ही कबुतरं टपा टपा येउन त्ये टिपत्यात.
खाण्याचे वांदे नाय अन् कुठल्याश्या अडगळीत, अडोश्याच्या जागेत ही कबुतर अंडी टाकुन मोकळी होत्यात... ;)
तर... जाउं द्या व्हो...आपण आपली टेप थांबवतो,तुमी जरा फोटुंवर नजर टाका. :) ( छोटीशी इनंती त्यांच्या माने प्रमाणे स्वत:ची मान वाकवुन पाहता येते ते पहा... तेव्हढाच तुमच्या मानेस व्यायाम होईल !)
पांढरी कबुतरी... ;) एका पायवर तयार !
मला वाटलं टेक ऑफ करणार की काय...
पण तसं काय बी झालं नाय... टेक ऑफ कॅन्सल.
काही क्षण प्रेमाचे :---
काय व्हो काय बघताय ? ;)
*फोटो फक्त कंप्रेस केले आहेत.सॉफ्टवेअर वापरुन इतर कुठलाही बदल केलेला नाही.
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....
प्रतिक्रिया
4 Mar 2012 - 8:06 pm | अन्नू
कुबुतराचे फोट्टु जाम आवडले बरं का! छान टिपून घेतलंत कॅमेरात त्यांना. :)
आणि शेवटचे प्रेमाचे क्षण दाखविणारे कपल्सचे फोट्टु तर सगळ्यात जास्त आवडले. लै लै भारी!
4 Mar 2012 - 8:47 pm | शैलेन्द्र
मस्त... एकेकाळी छान वाटणारा हा पक्षी आता अती झाल्याने त्रास्दायक झालाय..
4 Mar 2012 - 10:22 pm | गणपा
पाचवा फटू शॉल्लेट आवडला. :)
4 Mar 2012 - 10:53 pm | अत्रुप्त आत्मा
बाणा अचुक लक्ष्य-वेध केलायस हो....! ;-)
बाकी एकदा प्रेमिकांचे चाळे म्हटल्यावर त्यात विशेष असा काही फरक नस्तो.हे शेवटल्या काही इलु इलु फटूंनी दाखवुन दिलं हो अगदी!
4 Mar 2012 - 10:54 pm | निवेदिता-ताई
सुंदर सगळे फ़ोटो.....:)
4 Mar 2012 - 11:22 pm | किचेन
सुंदर फोटो.
पण ह्या असल्या सारख्या सारख्या घसा खाकर्नार्या पक्शाचे फोटो काढवेत अस का वाटल तुम्हाला?
त्यांचं ते मिलन फोटोत सुंदर दिसतयं, पन ति पुढिल संकटची चाहुल आहे.
4 Mar 2012 - 11:44 pm | अत्रुप्त आत्मा
@त्यांचं ते मिलन फोटोत सुंदर दिसतयं, पन ति पुढिल संकटची चाहुल आहे. >>> बाप रे..! खरच असं होतं की काय..?
भविष्यवेत्या किच्चुतैचा इजय असो... ;-)
5 Mar 2012 - 1:48 pm | वपाडाव
आत्म्या, अरे त्यांच असं म्हणणं असेल की ही कबुतरं निरागसता जपत नसावीत... म्हणुन ते संकट ठरत असेल ना इतरांना...
बाकी, मदना... ५वा फटु लै आवडला बरं...
:: धागा उघडून ह्यासाठी नाही बघितला काही... मला वाटलं उराचं कबुतर का काय तेच्यावर लेख पाडलाय का काय? ::
5 Mar 2012 - 8:16 am | ५० फक्त
मस्त रे मस्त फोटो आहेत एकदम, या फोटोंवरुन तु अजिबात हौशी फोटोग्राफर वाटत नाहीस.
5 Mar 2012 - 9:17 am | प्रचेतस
मस्त रे बाणा.
झकास फोटो.
5 Mar 2012 - 9:24 am | जेनी...
वॉव सहिच वाटतायत एक्दम..
दिलखुलास फोटोझ..!!
5 Mar 2012 - 10:09 am | मराठमोळा
फोटु मस्तच बाणराव,
एक निरीक्षणः याला "पारवा" म्हणतात. हा पक्षी झाडावर न राहता बिल्डींग, रस्ता, ओसाड जागा असा कुठेही राहतो.
कबूतरे अशी बिल्डींगवर वगैरे आढळत नाहीत.
अवांतरः पारवा काही लोक खातातही त्याने दमा बरा होतो असंही ऐकलं होतं.
अतिअवांतरः पारवा नावाची एक कविताही आठवली.
............ पारवा तो,
खिन्न नीरस एकांत गीत गातो.
असे काहीतरी. कवी आठवत नाही.
5 Mar 2012 - 10:57 am | पियुशा
+ १ टू मराठमोळा
मै भी यैच बोलने आयी थी ,इसको " कबुतर " नै " पारवा" बोलते है :)
बाकी फोटु क्लास आये रे मामु :)
5 Mar 2012 - 4:19 pm | रम्या
अरेच्या मी कबूतर नि पारवा एकच समजत होतो! काय फरक असतो दोन पक्षांमध्ये? कबूतर नि पारव्याला इंग्लीश नावं काय आहेत? नाव मिळाल्यास जालावर शोध घेता येईल.
5 Mar 2012 - 4:30 pm | रम्या
शोध घेतला..याला म्हणतात Feral pigeons (Columba livia), also called city doves, city pigeons, or street pigeons, विकि कडून साभार.
9 Mar 2012 - 8:10 am | मराठमोळा
"पारवा" कविता सापडली..
आंतरजालावरुन साभार.
भिंत खचली कलथून खांब गेला
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला
तिच्या कौलारी बसुनी पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो
सूर्य मध्यान्ही उभा राहे
घार मंडळ त्याभवती घालताहे
पक्षी पानांच्या शांत सावल्यांत
सुखे साखरझोपेत पेंगतात.
तुला नाही परि हौस उडायाची
गोड हिरव्या झुबक्यात दडायाची
उष्ण झळ्या बाहेर तापतात
गीतनिद्रा तव आंत अखंडित
चित्त किंवा तव कोवळ्या विखारे
दुखतेखुपते का सांग सांग बा रे
तुला काही जगतात नको मान
गोड गावे मग भान हे कुठून
झोप सौख्यानंदात मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायाची
दुःखनिद्रे निद्रिस्त बुध्दराज
करूणगीते घुमवीत जगी आज.
दुःखनिद्रा ती आज तुला लागे
तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे
फिरे माझ्या जगतात उष्ण वारे
तुला त्याचे भानही नसे बा रे.
कवी – बालकवी
5 Mar 2012 - 12:41 pm | जयवी
क्या बात है...... सही आलेत फोटो !!
ते प्रेमाचे वगैरे तर जबरी !!
डोक्यात जाणार्या पक्षाचे इतके प्रेमाने फोटो काढणारा तुझ्यासारखा तूच :)
5 Mar 2012 - 2:16 pm | सुहास झेले
मस्त रे फोटो बाणा..... :) :)
5 Mar 2012 - 2:50 pm | स्मिता.
काय हो मबा, फोटो काढायला दुसरे कोणते पक्षी मिळालेच नाहीत का? हा पक्षी माझ्या डोक्यात जातो अगदी. एक तर त्याचा तो भेसूर आवाज त्यात ती भीतीदायक फडफड! आणखी खिडकीत, बाक्लनीत घाण करून ठेवतात ते वेगळंच.
खरं तर फोटो चांगले आहेत पण त्या पक्षाचे एवढे क्लोज-अप फोटो बघून मला भीतीच वाटली :(
5 Mar 2012 - 3:16 pm | अन्या दातार
इतर कुठल्या "सुंदर पक्ष्याचे" फोटो काढले असते तर मिपावर टाकायला मबा जिवंत राहिला नसता ;)
5 Mar 2012 - 4:14 pm | रम्या
प्रचंड घाण करणारा नि शेफारलेला पक्षी. च्यायला सगळ्या पापी लोकांनी पुण्य मिळवण्याच्या नादात या पक्षाचे फाजील लाड केले आहेत. कितीही हाकलून काढा अजिबात जात नाही. उकिरड्यावर फिरणारे कुत्रे आणि हा पक्षी काही फरक नाही.
8 Mar 2012 - 12:18 pm | तिमा
गुगलून पहा. कबुतराची विष्ठा अॅसिडिक असते. ती सतत पडत राहिल्याने बिल्डिंग्/भिंत कमकुवत होते.
5 Mar 2012 - 4:15 pm | यकु
नेमक्या कोणत्या पक्ष्याला शिव्याशाप देतंय पब्लिक
काही दिसत नाहीये..
5 Mar 2012 - 4:24 pm | प्रचेतस
गणेशा झाला काय?
5 Mar 2012 - 4:25 pm | यकु
व्हय जी!
(डोळ्यावर काळी पट्टी बांधलेला ) यशवंत
5 Mar 2012 - 6:28 pm | गणपा
दादरच्या कबुतरखान्यात तर हीच 'कबुतरं' दिसायची.
पण वर ममोने 'पारवे की कबुतरं' (डव्ह की पीजन) असा किडा डॉक्यात घातला, म्हणुन जरा जालावर शोध घेतला तेव्हा खालीली साईट मिळाली. ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी लाभ घ्यावा.
दुवा
5 Mar 2012 - 9:47 pm | रेवती
कबुतरांच्या आवाजाने व घाणीने तशी ती आवडत नाहीत.
कबुतर जा जा म्हणावसं वाटतं.
पण फोटू चांगले आलेत.
5 Mar 2012 - 9:47 pm | रेवती
कबुतरांच्या आवाजाने व घाणीने तशी ती आवडत नाहीत.
कबुतर जा जा म्हणावसं वाटतं.
पण फोटू चांगले आलेत.
5 Mar 2012 - 10:01 pm | पैसा
पण यानी माझ्या रिकाम्या घराच्या खिडक्यांचे संडास करून ठेवलेत. रत्नागिरीला गेलं की पहिल्यांदा ते भंगीकाम करावं लागतं, तेव्हा कुठे श्वास घ्यायला मिळतो. शक्य झालं तर या सगळ्या कबुतरं पारवे जे कोण असतील त्यांना घाबरवून पळवून लावायला मला भयंकर आनंद होईल. यापेक्षा हिंस्त्र विचार मनात आले तरी मनेका गांधींच्या भीतीने बोलू शकत नाही.
5 Mar 2012 - 10:12 pm | रेवती
मनेकाबाईंमुळे नव्हे तर मैने प्यार किया मुळे यांची चलती आहे गं.
मी वर म्हटल्याप्रमाणे कबुतर जा जा हे गाणे जोरात लावून ठेवले की पळून जातात म्हणे.;)
7 Mar 2012 - 3:27 pm | अन्नू
कबुतरच गाणं लावल्यावर जातीलही ते हो; पण=>
"पहले प्यार की पहली चिठ्ठी साजन को दे आ!"
असं म्हटल्यावर पुन्हा फिरुन नाही का येणार?
7 Mar 2012 - 3:16 pm | इरसाल
या वेळेस घरी जाताना लवंगी फटाके घेवून जा म्हणजे पळवायचे काम जास्त सोपे होइल
6 Mar 2012 - 5:05 am | पाषाणभेद
छान आहेत फोटो.
6 Mar 2012 - 10:52 am | चिगो
इतक्या घाण आणि "घीन" (हिंदीतला) आणणार्या पक्षाचे छान फोटोज टिपलेत, मबा..
बाकी, शहरांत जरी ह्यांनी पार उच्छाद मांडला असला तरी गावाकडे शेतांत ह्यांचे काही सुंदर भाईबंद आढळतात..
7 Mar 2012 - 10:59 am | स्वातीविशु
फोटो मस्तच आहेत.५, ९, १५ वा फोटो क्लासच.
पशु-पक्षी आपल्याला जाम आवडतात, पण हे पारवे हुं हुं हुंहुंहुं असे त्रासदायक ओरड्तात ते फार विचित्र आणि नकोसे वाटते.
7 Mar 2012 - 11:11 am | विश्वास कल्याणकर
माझ्या एका पुणेकर मित्रानी कबुतराचा पोपट कसा करायचा याची युक्ती सांगीतली ती अशी:-
तुमच्या जवळच कबुतर असल्याने तुम्हाला सोपे जाईल
तळहातावर तांदुळ किंवा तत्सम धान्याचे दाणे घेउन हात॑ पुढे करावा. कबुतर बराच वेळ वाकडी तिकडी मान करुन बघेल व नंतर उडत तुमच्या हातावर येण्यासाठी येईल. लगेच हातातील दाण्याची फक्की मारा. कबुतरचा पोपट होईल. आहे की नाही गम्मत.
8 Mar 2012 - 11:25 am | मदनबाण
सर्व प्रतिसाद देणार्यांना आणि वाचक मंडळींना थांकु बरं का ! :)
8 Mar 2012 - 11:36 am | परिकथेतील राजकुमार
मॉदनबॉणा मस्त आलेत रे सगळे फटू.
बाकी वरती ममोशी सहमत आहे. हा पारवा आहे.
आणि हो, आम्ही उत्कंठेने ज्या फटूची वाट बघतो आहोत, ते फटू कधी टाकतो आहेस ? ;)
8 Mar 2012 - 11:38 am | मदनबाण
हो, आम्ही उत्कंठेने ज्या फटूची वाट बघतो आहोत, ते फटू कधी टाकतो आहेस ?
खी.खी.खी... ;)
तसे क्लीक्स कधी होतील कोणास ठावुक ! ;)