राजकारणी अन आपण.......... बरोबर ना ??

अमितसांगली's picture
अमितसांगली in जे न देखे रवी...
28 Feb 2012 - 8:21 pm

भ्रष्टाचाराचे रोज नवे प्रकरण ....देशद्रोह्यांचे लांगुलचालन |
जातीच राजकारण करण ....झोळी स्वताची भरण |
देशाचे लचके तोडण ....चालू आहे ताठ मानेन |
हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी |

जवान उपाशी-कसाब तुपाशी ....खेळीतात सैनिकांच्या जीवाशी |
नक्षलवाद्याना धरलय हाताशी ....वैर याचं भारतामातेशी |
घुसलेत अनेक बांगलादेशी....कारवाई न करण्याच ठरवलय मनाशी |
हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी |

स्त्री असुरक्षित....बालके कुपोषित |
गर्भहत्या तेजीत.....तरुण बेरोजगारीच्या खाईत |
शेतकऱ्यांना कापत.....स्वारी चालली देश लुटत |
हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी |

महिन्यातून एकदा तिहाराची वारी.....समजतात स्वताला जनतेचे कैवारी |
अन्याय, भ्रष्टाचाराचे पुजारी.....देश विकण्याच्या मार्गावरी |
सत्तेच्या पूर्ण आहारी.....द्यायला हवे यांना फासावरी |
हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी |

अमित सतीश उंडे, सांगली

करुणकविताविडंबन

प्रतिक्रिया

गणामास्तर's picture

28 Feb 2012 - 8:37 pm | गणामास्तर

कॉलिंग वल्ली..
कॉलिंग वल्ली..

प्रचेतस's picture

28 Feb 2012 - 10:27 pm | प्रचेतस

धाग्याचे रोज नवे कारण.. मिपा बोर्डावर आगमन |
लेखांचे अनेक प्रकरण..धागे भराभर पाडण |
बँडविड्थचे लचके तोडण..चालू आहे ताठ मानेन |
हे सर्वच मजला कळी..पण अळी मिळी गुपचिळी |

रसिक वाचक जणू उपाशी.. देई त्यांना धागे अधाशी |
अशुद्दलेखनाला धरलय हाताशी...वैर याचं शुद्धलेखनाशी |
घुसवलेत अनेक धागे जोराशी..परी थांबवणे ना धरले मनाशी |
हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी |

मिपाकर वार्‍यावर...संपादक कुंठित |
जिलब्या तेजीत..मिपा झाले रूग्णाईत |
वाचकांना कंपवत..हलवाई चालले धागे पाडत |
हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी |

दिवसातून अनेकदा धागे काढी..समजतात स्वत:ला रसिकांचे कैवारी |
राजकारण,व्यसनांचे विचारी..धागे पाडून घेई उभारी |
मिपाकरांच्या पूर्ण उरावरी...घ्यायला हवी रजा जरी |
हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी ||

मोदक's picture

29 Feb 2012 - 12:18 am | मोदक

ज ब रा विडंबन :-D

बघुया काही फरक पडतो का...

आबा's picture

29 Feb 2012 - 12:47 am | आबा

:)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Feb 2012 - 8:21 am | अत्रुप्त आत्मा


मेलो...मेलो...वल्ली ब्बेक्कार फुटलोय वाचताना

@हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी ||>>>

बाकी काहिही असो...पण मिपावर सध्या आपटीधागे विरुद्ध विडंबनकार वल्ली= जोरदार म्याच असं समिकरण रुजलेलं आहे.

अमितसांगली's picture

29 Feb 2012 - 8:54 am | अमितसांगली

दुसऱ्याच्या लिखाणावर धागे काढण्यापेक्षा प्रतिक्रिया नाही दिली तरी चालेल. विडंबन करणे कधीही सोपे असते त्यासाठी जास्त तारे तोडावे लागत नाहीत.

ओपन फोरम आहे.
ज्या तन्मयतेने तुम्ही धागा टाकला आहे त्याच तन्मयतेने आम्ही प्रतिसाद दिला आहे. शिवाय आम्हाला तारे तोडण्याची हौस नसल्याने सोपेच प्रकार जास्त आवडतात.

अमितसांगली's picture

29 Feb 2012 - 10:34 am | अमितसांगली

ओपन फोरम आहे ना..

मी काय लिहावे नि किती लिहावे यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज नाही. तुम्हाला जे आवडेल तसेच लिहावे असेही काही नाही. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही तर ती वाईटच आहे, असा समाज किमान मी तरी करून घेणार नाही.

अरे, परवानगीचा काय संबंध आला इथे?
मी तुम्हाला लिहू नका असे बोललोय का कुठे? मला आवडेल तेच लिहा असेही मी कुठेही म्हटले नाही.
तुम्हाला आवडणारेच प्रतिसाद यावेत अशी तुमची अपेक्षा आहे का? प्रतिसाद वाईट असल्यास ते उडवण्यास संपादक समर्थ आहेतच.

तेव्हा तुम्हीही लिहित राहा, आम्हीही लिहित राहूच.

वाढदिवसाच्या शुभेच्छा.

अमितसांगली's picture

29 Feb 2012 - 11:43 am | अमितसांगली

लिहू नका हाच एक धागा पकडून तुम्ही लिखान केले आहे. प्रतिसाद चांगलाच हवा अशी अपेक्षा मी कधीच केली नाही. दुसऱ्यावर हसणे सोप असत पण त्रुटी दाखविण अवघड.

शुभेच्छांसाठी धन्यवाद.

प्रचेतस's picture

29 Feb 2012 - 11:49 am | प्रचेतस

लिहू नका असे मी कुठे म्हणालोय? उलट लिहित रहा असेच म्हणतोय.
आमचे एक मित्र म्हणतात की एकदा धागा टाकल्यानंतर गंगार्पणमस्तु म्हणायचे.
मी तर साधं सोपं एक विडंबन टाकलय(फारसे तारे न तोडता). तुम्ही कशाला मनाला लावून घेताय उगाच.

पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Feb 2012 - 12:26 pm | अत्रुप्त आत्मा

@पण त्रुटी दाखविण अवघड.>>> छे...! तुमच्या या कवितेत त्रुटी दाखवणे अत्यंत सोप्पे आहे...

पिठ कसदार नसल्याने जिलबी जोमदार पडलेली नाही...
उदा-सामाजिकतेचा नुसता विषय आलाय,आणी तोही नुसता यमकं धरुन इन्सर्ट केलेला आहे...स्वतःची अभिव्यक्ती त्यात कुठेही नाही. सामाजिक विषयावर काहिही लिहिताना नुसती मांडणी करुन चालत नाही,त्यातुन आपलं स्वतःच गंभीर चिंतन बाहेर पडलं पाहिजे.वाचकांसमोर प्रश्न नीट निर्माण करता आला पाहिजे.तुमची अख्खी कविता म्हणजे फक्त यमक बांधणी झालेली आहे.आपण नविन लिहित असाल तर आपल्या भावुक बाल्यावस्थेला हे साजेसंच आहे,पण त्याचे कोणी विडंबन केले तर त्यावर उखडण्याचा हक्क असला,तरी चिडण्यामागे कारण काहिच असू शकत नाही...विडंबनावर उखडतो,तो कवी नव्हेच...

१)प्रकरण<< >> लांगुलचालन
करण << >> भरण
तोडण<< >> मानेन
कळी<< >> गुपचिळी

२)तुपाशी << >> जीवाशी
हाताशी << >> भारतामातेशी
बांगलादेशी << >> मनाशी
कळी<< >> गुपचिळी

३)असुरक्षित << >> कुपोषित
तेजीत << >> खाईत
कापत << >> लुटत
कळी<< >> गुपचिळी

४)वारी << >> कैवारी
पुजारी << >> मार्गावरी
आहारी << >> फासावरी
कळी<< >> गुपचिळी

यात ''काव्य'' म्हणावे असे काय आहे..? या यमक सेतूच्या टोकांमधे तुंम्ही ठराविक मापाच्या पट्ट्या ठोकुन बसवल्या आहेत... म्हणुन याचं वल्लींनी विडंबन केलय,आणी त्या विडंबनातही मी जे काही म्हणतोय त्याबद्दलचा व्यापक आशय सामावलेला आहे... तो तुंम्हाला समजला तर तुमचा राग खरच जाइल :-)

अवांतर-येथील एक नवमिपा सदस्य च.चा.यांचे आपण अगदी जुळे भाऊ शोभाल अश्या दर्जाची आपली (सध्याची) काव्यप्रतिभा आहे...त्यांनाही ही यमक जुळी काव्य करण्याचा नाद आहे... या त्यांच्या काही लिंक्स---
http://www.misalpav.com/node/20317
http://www.misalpav.com/node/19658
http://www.misalpav.com/node/19732
http://www.misalpav.com/node/19908
http://www.misalpav.com/node/19535
http://www.misalpav.com/node/19545
http://www.misalpav.com/node/19709

अमितसांगली's picture

29 Feb 2012 - 1:33 pm | अमितसांगली

प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद..

यमक जुळविण्यासाठी कसरत केली आहे, हे मान्य.

पण राजकारणी लोक आज जे काही करत आहे ते मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. भ्रष्टाचार, घुसखोरी, शेतकऱ्यांची लुट, बेरोजगारी, स्त्री सुरक्षा, गर्भहत्या आणि एकूणच सामान्य जनतेला देशोधडीला लावण्याचे त्यांचे उद्योग हे मी मांडलय. तरीही हि फक्त यमक बांधणीच आहे का?

भावनिक होऊन मी काही मनात राग धरला नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Feb 2012 - 2:58 pm | अत्रुप्त आत्मा

@यमक जुळविण्यासाठी कसरत केली आहे, हे मान्य.>>> आपल्याला मान्य झालं,ही एक जमेची बाजू आहे,अता त्याचा स्विकार करा,म्हणजे जमा हिशोबात लागेल..

@तरीही हि फक्त यमक बांधणीच आहे का? >>> होय.यमक बांधणीच आहे... सामाजिक काव्य आशयगर्भ हवं,हा नुसताच गर्भाशय आहे.. ;-)

@भावनिक होऊन मी काही मनात राग धरला नाही.>>> उत्तम... :-)

चिगो's picture

1 Mar 2012 - 4:22 pm | चिगो

वल्लीचं विडंबण खंग्री आहेच, त्याला टाळ्या.. पण
>>सामाजिक काव्य आशयगर्भ हवं,हा नुसताच गर्भाशय आहे..
ह्याने मी पुरता वारलोय. अतृप्ता, सॉलिड यार..

अन्या दातार's picture

29 Feb 2012 - 10:49 am | अन्या दातार

तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही तर ती वाईटच आहे, असा समाज किमान मी तरी करून घेणार नाही.

हे जितक्या सहजतेनं लिहिताय तितके सहजशक्य नाहीये हेच तुम्ही प्रतिसादातून दिसतंय.

बाकी चालूद्यात.

मी-सौरभ's picture

29 Feb 2012 - 1:11 pm | मी-सौरभ

विडंबन करणे कधीही सोपे असते त्यासाठी जास्त तारे तोडावे लागत नाहीत.

कळावे ...

चांगल्या विडंबनाचे सोपे काम आपण कधीतरी करुन दाखवावे.
मगच ते सोपे आहे हे आम्हा साध्या सरळ लोकांना कळू शकेल ना?

अत्रुप्त आत्मा's picture

29 Feb 2012 - 3:04 pm | अत्रुप्त आत्मा

@चांगल्या विडंबनाचे सोपे काम आपण कधीतरी करुन दाखवावे.
मगच ते सोपे आहे हे आम्हा साध्या सरळ लोकांना कळू शकेल ना?>>> ++++++++११११११११११११११

सुहास झेले's picture

1 Mar 2012 - 4:30 pm | सुहास झेले

हा हा हा ... वल्लीशेठ, एकदम जबरदस्त विडंबन. :) :)

गणपा's picture

1 Mar 2012 - 4:58 pm | गणपा

नशीब वल्लीने विडंबनाचा दुसरा धागा काढला नाही, नैतर मुद्दला पेक्षा व्याजच भारी पडलं असत. ;)

मोदक's picture

29 Feb 2012 - 12:19 am | मोदक

किती ते टेन्शन घ्याल..?

गणामास्तर's picture

29 Feb 2012 - 9:47 am | गणामास्तर

त्यांचे एकंदरीत लिखाण पाहता पाणी वाहते करण्याची गरज आहे असे वाटते.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Feb 2012 - 11:23 am | अत्रुप्त आत्मा

@पाणी वाहते करण्याची गरज आहे असे वाटते.>>> अमच्या मते अजुन खरं पाणी पडायलाच लागलं नाहीये... ;-)

प्यारे१'s picture

29 Feb 2012 - 12:41 pm | प्यारे१

अरे त्याचं कसंय ना पोरांनो, आपलं लफडं सॉरी- आपलं प्रेम असतं -तर ते नवीन नवीन असलं की नै आपल्या लव्हर कडं कुणी बघितलं ना तरी लय तरास होतो... मग त्यावर कुणी काही बोलणं तर लांबच.

भावनाओंको समझो यार...!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Feb 2012 - 12:54 pm | अत्रुप्त आत्मा

@भावनाओंको समझो यार...!>>> आमेन ;-)

शिफ्ट +एम दाबुन अनुस्वार देता येतो, अर्थात शेवटचं अक्षर ए टाईप करुन पुर्ण करायच्या आधी.

हे सर्वच मजला कळी, - यातला कळी हे क्रियापद म्हणुन योग्य वाटत नाही, कळे, कळाले असे होउ शकते ,पण कळी फार विचित्र वाटतंय.

गर्भहत्या तेजीत.....तरुण बेरोजगारीच्या खाईत | - गर्भहत्या तेजीत, इथं फक्त भावना व्यक्त केल्यात की कसे, कारण मिडिया किंवा इतर माध्यमातुन देखील आपल्या देशात सर्रास गर्भहत्या होतात असा विदा मिळत नाही कुठे. तुम्हाला स्त्री भ्रूणहत्या असं अपेक्षित असेल तर तो अर्थ इथं येत नाही.

बाकी असंतोषित जनतेचं मनोगत मांडण्याचा छान प्रयत्न आहे, पण खरंच मला सांगा तुम्हाला असंच वाटतं का मनापासुन, काय आहे, माझं तरी मन वगैरे जे असतं ना ते सुन्न झालंय किंवा नाहीसं झालंय. सध्या वाट पाहतोय ती वार्षिक पगारवाढीची अन घरांच्या किमती कमी होण्याची, बाकी जोपर्यंत माझ्या गळ्याला नख लागत नाही तोवर सुखानं किंवा सुखात जगायचं ठरवलंय मी. तुम्ही पण करा प्रयत्न जमेल हळु हळु.

माझं तरी मन वगैरे जे असतं ना ते सुन्न झालंय किंवा नाहीसं झालंय. सध्या वाट पाहतोय ती वार्षिक पगारवाढीची अन घरांच्या किमती कमी होण्याची, बाकी जोपर्यंत माझ्या गळ्याला नख लागत नाही तोवर सुखानं किंवा सुखात जगायचं ठरवलंय मी. तुम्ही पण करा प्रयत्न जमेल हळु हळु.

अगदी अगदी.

जौद्या हो पन्नासराव. त्यांना हल्ली हल्लीच कविता आणि लेख होऊ लागलेले दिसत आहेत. ज्यांना खरंच कळकळ असते ते अश्या कविता पाडत बसत नाहीत.

कळी का तुम्हाला? ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 Feb 2012 - 5:15 pm | विश्वनाथ मेहेंदळे

ज्यांना खरंच कळकळ असते ते अश्या कविता पाडत बसत नाहीत.

हा साक्षात्कार कुठे झाला म्हणायचा तुम्हाला ?

कविता करणाऱ्याची कळकळ खरी नसते असे तुमच्या विधानातून प्रतीत होते आहे. आणि वरून हे अत्यंत सरसकट विधान आहे म्हणून विचारतो आहे.

धन्या's picture

29 Feb 2012 - 5:33 pm | धन्या

आम्ही कविता "पाडणार्‍यांबद्दल" म्हटलं आहे, कविता करणार्‍यांबद्दल नाही.

धन्या's picture

29 Feb 2012 - 5:35 pm | धन्या

दुहेरी प्रतिसाद.

तुम्ही लिहा हो.. हटू नका प्रतिक्रियांमुळे.

मिपाकर हलकट आहेत.. तुम्ही लिहीत रहा.. तुम्हीही व्हाल.

मीही सुरुवातीला रतीब लावला होता. नंतर हळूहळू लक्षात आल्यावर कमी केली वारंवारिता.

नंतर मजा येईल खूप, इथे सगळेच मित्र होतील तेव्हा.

चांगलं लिहिताय..

"चला लिखाणाची वेळ झाली.. हातपाय धुवून लिहायला बसूया.. ", किंवा "दिसामांजी काही तरी ते लिहावें" असं तत्व न ठेवता, "आयला हे लिहिलं तर काय धमाल येईल" अशी जोरदार इच्छा उसळली तरच आणि तेव्हाच लिहा.. मग सगळं लाईनीवर येईल. मग दोन लेखांत एक वर्षाचं अंतर असो, किंवा एक तासाचं.. बहुतेकांना ते आवडेलच.

मी-सौरभ's picture

29 Feb 2012 - 3:30 pm | मी-सौरभ

काका,

हाच प्रतिसाद आता अजून २-३ धाग्यांवर चोप्य पस्ते करुन टाका.

सूड's picture

29 Feb 2012 - 4:33 pm | सूड

"चला लिखाणाची वेळ झाली.. हातपाय धुवून लिहायला बसूया.. ", किंवा "दिसामांजी काही तरी ते लिहावें"

तुमचं हे मत पुर्णपणे मान्य. पण ज्यांना कविता होते(पक्षी: येते) त्यांनी ती कशी बरं थांबवावी ?? अशावेळी मिळेल त्या कागदावर ती करुन (पक्षी: उतरवून) मोकळं होणं सोयीचं नाही का. कवीच्या प्रतिभेच्या मटकीला आलेला कवितेचा मोड त्याच्या मनाच्या मातीतून वर येणं हे एका सृजनाचं प्रतीक आहे हे या सामान्य माणसांना कसं बरं कळावं. असो.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Feb 2012 - 4:53 pm | अत्रुप्त आत्मा

@कवीच्या प्रतिभेच्या मटकीला आलेला कवितेचा मोड त्याच्या मनाच्या मातीतून वर येणं हे एका सृजनाचं प्रतीक आहे हे या सामान्य माणसांना कसं बरं कळावं. असो.> मेलो मेलो सुडुक,काय मारलीये कचकून धडुक..!देवा मला उचल

>>> कवीच्या प्रतिभेच्या मटकीला आलेला कवितेचा मोड त्याच्या मनाच्या मातीतून वर येणं हे एका सृजनाचं प्रतीक आहे

जोरदार आक्षेप..!!!

एकतर हे वाक्य दवणेंच्या कोणत्यातरी पुस्तकातून ढापले आहे असे वाटते आहे. (विदा मागू नये - मिळणार नाही)

आणि कवीच्या मनात माती आहे .. कवीचे मन म्हणजे माती वगैरे प्रकार वाचून एक मिपाकर असल्याची शरम वाटली.

खाल्ली ना माती मग बुडुन मरा आता ह्यात...

युवा पिढी ही किती अनाडी... करीते पाण्याची नासाडी |
घरबसल्या येते पाणी ... किंमत नाही कळणार कधीकाळी |
बिचारा कवी गोंधळलेला... प्रतिसादांनी त्रासलेला |
हे सर्वच मजला कळी ....पण नाही अळी मिळी गुपचिळी |

सोत्रि's picture

1 Mar 2012 - 12:25 am | सोत्रि

मिपाकर हलकट आहेत..

मनापासून सहमती

- (हलकट) सोकाजी

व्यक्त व्हायला सगळ्यांनाचा आवडत ओ गविकाका !! अर्थात, ज्याने-त्याने आप-आपली सीमा ओळखुन व्यक्त व्हावे असे वाटते, उगा मनी वाटेल ते काही ही ( काहीच्या काही नव्हे !) टकांवे आणि वर ते रेटुन न्यायचे हे चांगले नव्हे.

वरील चर्चेने आम्हाला " मी " ची रेटुन जाहीरात करणार्‍या एका 'नातलगा' ची आठवण झाली ;)

म्हणून तर

"चला लिखाणाची वेळ झाली.. हातपाय धुवून लिहायला बसूया.. ", किंवा "दिसामांजी काही तरी ते लिहावें" असं तत्व न ठेवता, "आयला हे लिहिलं तर काय धमाल येईल" अशी जोरदार इच्छा उसळली तरच आणि तेव्हाच लिहा.. मग सगळं लाईनीवर येईल. मग दोन लेखांत एक वर्षाचं अंतर असो, किंवा एक तासाचं.. बहुतेकांना ते आवडेलच.

हे सांगितलं... गविकाकांचा सल्ला सदर सुरु करता येत नसल्याने असे जागोजागी सल्ले देत बसावं लागतंय. काय करणार. ;)

वरील चर्चेने आम्हाला " मी " ची रेटुन जाहीरात करणार्‍या एका 'नातलगा' ची आठवण झाली

तू गणनायक नातलग बद्दल काही बोलत आहेस का? ;)

ajay wankhede's picture

29 Feb 2012 - 10:59 pm | ajay wankhede

मित्रांनो ,
मी आपल्या सार्र्यांचे कपडे सांभाळू का?
सध्या माझ्याकडे भरपुर वेळ आहे.popaay the s<br />
ailer

............................................................................................................................

अत्रुप्त आत्मा's picture

29 Feb 2012 - 11:51 pm | अत्रुप्त आत्मा

@मित्रांनो ,
मी आपल्या सार्र्यांचे कपडे सांभाळू का?>>> नको,आपलेही काढा,आणी आमच्यात या...! :-p

नको,आपलेही काढा,आणी आमच्यात या...!

भटजीबूवा, "बघताय काय? सामिल व्हा. " असं म्हणायचंय काय तुम्हाला? :P

अत्रुप्त आत्मा's picture

1 Mar 2012 - 9:03 am | अत्रुप्त आत्मा

@"बघताय काय? सामिल व्हा. " असं म्हणायचंय काय तुम्हाला?>>> मग काय पारावर बसुन मजा पाहू द्यावी म्हणताय की काय...? इथे काल पासुन केवढं गंभीर चिंतन चाललंय ;-) ,आंम्ही गंभीर विषयात टवाळी अजाबात खपवुन घेणार नाय... :-p

नको,आपलेही काढा,आणी आमच्यात या...!

Facebook smileys"> आलोच कि ,
पण मी माझे ...नाही
मि पा वर भलतच नको.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Mar 2012 - 8:16 am | अत्रुप्त आत्मा

@!पण मी माझे ...नाही>>> चालेल...तुंम्ही नुसते या...आंम्ही तुमचे काढू :-p

अन्नू's picture

1 Mar 2012 - 10:06 am | अन्नू

अबबाबो.. हा धागा कसा काय सुटला वाचायचा?

नको,आपलेही काढा,आणी आमच्यात या...!

Smiley मेलो.. रे मेलोsss

धन्या's picture

29 Feb 2012 - 11:17 pm | धन्या

हे सर्वच मजला कळी

या शब्दसमुहाचा अर्थ काय आहे हे कवी किंवा इतर कुणी समजावून सांगेल काय?

मला वाटतं की कवीला 'सर्वच मजला कळे' असं म्हणायचं आहे. पण यमकासाठी थोडं स्वातंत्र्य घेतलंय.

(कळीचा नारद) सूड.

पण यमकासाठी थोडं स्वातंत्र्य घेतलंय.

यमकासाठी थोडं स्वातंत्र्य ???

धन्य तो कवी !!!

र ला र आणि ट ला ट जोडणारे
रटरट कवी तसे खुप पाहिले होते
चुकीच्या शब्दाने यमक जुळवणारे
हे कवी शिरोमणी कुठे राहीले होते

मीनाक्षी देवरुखकर's picture

1 Mar 2012 - 10:24 am | मीनाक्षी देवरुखकर

:)

नको आपलेही काढा..आणि आमच्यात या.

...