अनामिक भटकंती ६ - कार्ला लेणी.
अनामिक भटकंती ५ - किल्ले पुरंदर : http://www.misalpav.com/node/20592
अनामिक भटकंती ४ - केरळ : http://www.misalpav.com/node/20316
अनामिक भटकंती ३ - रतनगड: http://www.misalpav.com/node/19239
अनामिक भटकंती २ - सांदण दरी: http://www.misalpav.com/node/18728
अनामिक भटकंती १ - राजा रायगड: http://www.misalpav.com/node/18323
राजगड च्या वारीlला जाणे हे खुप वर्षांपासुन असलेले स्वप्न प्रत्यक्षात येण्याचा योग जवळ आला होता.
राजांचा गड आणि गडांचा राजा.. राजगड.
शिवरायांच्या वास्तव्याने पवित्र झालेला राजगड.
राजारामा महराजांच्या जन्माचा साक्षिदार आणि
सईबाईंच्या मृत्यत कासाविस झालेला राजगड.
तानाजी मालुसरेंची अंतयात्रा अनुभवलेला राजगड..
आणि आज , शिवछत्रपती जयंतीदिनी १९ फेब्रुवारी ला राजगडावर जात आहोत, ह्या कल्पणेनेच मनात उत्तुंग आनंदाची लहर पसरली होती... सकाळी लवकर आवरुन ही मात्र मित्र हृषिकेश मुळे पुण्यातच १० वाजले. आणि बाईकने नसरापुरमार्गे गुंजवणे गावात पोहचण्यास १२ वाजुन गेले होते.
जिप्सींच्या शिवसंवर्धन गृपमध्ये जाण्यासाठी फोन हातात घेतला आणि गडावर रेंज नसल्याने आम्ही चालु लागलो.
सूर्य बरोबर शिरावरती घेवुन राजगड तळपत होता.. आणी या उन्हात ही सोनेरी वाटा शिवछत्रपतींच्या जन्मदिनी जनु सोनेरी क्षणांची आठवण सांगत होत्या..
जिकडे बघावे तिकडे सोनेरी पिवळे धमक वातावरण ..
अलिंगन देण्यास सदैव तत्पर : राजगड
रस्ता:
सोनेरी वाट
पालखी खाली न्हेताना :
चोरदरवाजा
तोरणा किल्ल्याचे दर्शन
पद्मावती तळे
पदमावती माची.
चोरदरवाजातुन वरती आल्यावर पद्मवाती माचीवर पद्मवती तलावाचे दर्शन झाले.. पद्मावती मंदिरामध्ये जिप्सींची गाठ घेतली.. त्यांच्या या अमुल्य कार्यात यावेळेस खुप कमी हातभार लागल्याची खंत आहेच. पण पहिल्यांदाच राजगडाचे स्वप्न पुर्ण होत असताना, कसलेच भान राहिले नाही. पद्मावती देवीच्या मंदिरात बॅग टाकुन आम्ही लागलीच सुवेळा ( पुर्वेकडील राजगडाची माची) कडे वळालो..
सदर आणि राजेंचा पुतळा
सुवेळा माची
सुवेळा माची :
बालेकिल्ला :
नगारखाना
थोडे पुढे गेल्यास, एक तटबंदी दिसते, थोडे आत चालत गेल्यावर, तेथे खाली एक दरवाजा आहे असे बाटते.. खाली उतरताना तिव्र उतार आहे.. आणि मग तसेच खाली गेल्यावर कळते तेथे तिन दरवाजे आहेत एकामागुन एक.
तोच गुंजवणे दरवाजा (दर्वाजातुन बाहेर गेल्यावर डायरेक्ट दरी आहे.)
मी ( मागे सुवेळा माची):
बालेकिल्ला:
माची
सुवेळा माचीचा आतील पहिला टप्पा:
चिलखती बुरुज
नेढः
हस्तीप्रस्तरः
शेवटचे टोक
सूर्यास्त
परत येण्यास रात्र झाली होती, सदरेवर निवांत बसलो, अमावसेमुळे चंद्र आकाशात नव्हता.. मिट काळोखात आणि चांदण्याच्या कल्लोळात राजगडाचा इतिहास आठवत होता...
राजांच्या अविस्मरणिय क्षणांचा इतिहास प्रत्येक्ष पाहिलेल्या या जागेवरती आज आपण आहोत, याने मन भरुन आले होते.. हिंदवी स्वराज्याचे तोरण १६४६ ला तोरणा जिंकून महाराजांनी त्यावर उभारले. आणि अर्धवट बांधलेल्या मुरमदेवाचा डोंगर (राजगड) १६४७ ला स्वराज्यात आला. स्वराज्याच्या तोरणाला साजेशे स्वराज्याचे द्वार मिळाले होते.
बाजुला चाललेले चांदण्यांसंबंधीचे बोलणे मनावर आदळत नव्हतेच.. कारण मनात तरंग उमटत होते, राजगडाचे ..स्वराच्याच्या सुर्योदयाच्या चित्राचे.
असंख्य मावळ्यांना शिवरायांनी याच गडावर घडविले.
सेनापती वीर बाजी पासलकर, सुभेदार तानाजी मालुसुरे ( वाडा : सुवेळा माची) , सूर्याजी मालुसुरे, हैबतराव शिळीमकर, येसाजी कंक ( ज्यांनी हत्तीशी झुंज देताना, तलवारीच्या एका वारामध्ये हत्तीची सोंड धडावेगळी केली ते. वाडा: संजीवनी माची), गोदाजी जगताप, बाबाजी पायगुडे, बाबाजी धुमाळ, सरदार झुंझारराव मरळ, मोराजी घुले, हिरोजी फर्जेद, सरपाले, खोपडे, निगडे, भरम, दिघे, तानाजी पोकळे, हिरोजी तनपुरे , रामजी दगडे, भिकाजी दांगट, रामजी करंजावणे, मल्हारी खिरीड, शेडगे, चोरघे, मुजूंबले, बाबाजी कोंडे, शेंडकर, नाग नायक गायकवाड, भोसले, पवार, दसवडकर, दामगुडे, शेडगे, दरडीके, कदम, ढमढेरे, भुरुक, वेगरे, कोकाटे, पवार, डोंबे, शिंदे आदी मावळ्यांचा महामेळा या गडांच्या अंगाखांद्यावर राबत होता. ( नोट : मावळ्यांची लिस्ट राट्रभक्तीचे शौर्यपिठ या पुस्तकातुन साभार)
बहामनी राज्याची पाच शकले होऊन निर्माण झालेल्या अहमदनगरच्या निजामशाहीने :अहमद बहिरीने , १४९० मध्ये हा डोंगर ताब्यात घेवून मंदिराचा व मुर्तीचा विध्वंस करुन आपला अधिकारी नेमला.
१६४८ साली, शिवरायांनी डोंगराच्या माच्या बांधुन, बुरुज उभारुन, कडे तासुन आणि तटबंदी ने नटवुन राजबिंडा ' राजगड' उभा केला.
सकाळी ५ लाच उठुन आवरुन बसलो..
सर्योदयाचे खुप सारे फोटो घेण्याचा मानस होता, पण मित्रांमुळे उशीर झाला.
आज माझ्या आणि ह्रषिकेश बरोबर, आमच्या बारामतीचे २ मित्र अॅड झाले होते.
सुर्योदयः
महाराणी सईबाईंची समाधी
बालेकिल्ला
महादरवाजा :
आज महाशिवरात्री होती : शंकराचे पहिले दर्शनः
चंद्रतळे ( खुप गोड पाणी आहे येथील)
राजवाड्याचे अवशेष
सदर
दिसणारी संजीवनी माची
संजीवनी माची
बालेकिल्ल्याचे एक कडा:
राजमार्ग असलेला, पाल दरवाजा :
संजीवनी च्या वाटेवरुन :
माचीच्या पायथ्यापासुन येणारी वाट या दरवाजापाशी येते:
चिलखती बुरुज आणि दिसणारा बालेकिल्ला
संजीवनी माची:
दोन तटबंदी मध्ये असलेला खंदक
अळू दरवाजा .. येथुनच तोरणाकडे जाता येते.
गुंजवणे गावातील शंकराचे मंदिर
- शब्दमेघ... एक मुक्त..स्वैर..स्वच्छंदी जीवन.
प्रतिक्रिया
28 Feb 2012 - 7:16 am | ५० फक्त
मस्त सफर घडवलीस रे , एक सांग गडावर फॅमिलीसहित मुक्काम करण्याची सोय आहे का ? म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने, बाकी सुखसोयी काही नकोत.
सुर्यास्ताचा फोटो जाम भारी आलाय.
अजुन एक, वर टाकलेल्या सनावळी संपादित कर जरा.
28 Feb 2012 - 12:19 pm | मालोजीराव
पन्नासराव, अहो अगदी बेफिकीर होऊन राजगडावर या कुटुंबासह....
पद्मावती देवी च्या मंदिरात १०० लोक सहज मावतात...मंदिराला दरवाजे सुद्धा आहेत ! नाहीतर मंदिराजवळच कचेरी आहे तिथेही विनंती केल्यास राहू देतात...
रोज बरीच ये जा असते...शनिवार रविवार तर जास्तच....पाकीट,कॅमेरा इ. मौल्यवान वस्तू जवळ बाळगा आणि बाकी सामान मंदिरात सोडून दिवस भर गड फिरून या !
-(राजगडचा वारकरी) मालोजीराव
28 Feb 2012 - 8:40 am | अन्या दातार
सुंदर फोटो. छान मजा केलेली दिसतेय.
फक्त मराठीवर कृपा करा जरा. कालच एक कविता लिहून आजच्या लेखाचे शीर्षक इंग्रजीत देण्याचे कारण कळले नाही!
28 Feb 2012 - 9:03 am | श्री गावसेना प्रमुख
सुंदर फोटो,छान माहीती
28 Feb 2012 - 9:29 am | प्रचेतस
सर्वच फोटो छान आणि वर्णन एकदम सुरेख.
अजोड राजगडाच्या संजीवनी माचीच्या चिलखतात फिरण्याचा आनंद अवर्णनीय. चिलखततातून जागोजागी भुयारी पायर्या खणून परत बाहेरच्या बाजूला असणारे बांधले गेले आहेत.
बाकी ५० आणि अन्याशी सहमत. सनावळ्या जाम चुकल्या आहेत, शिवाय इंग्रजी शीर्षक खटकलेच.
पाल आणि आलु दरवाजांची नावे अनुक्रमे पाली आणि अळू दरवाजा अशी हवीत.
28 Feb 2012 - 10:03 am | चिंतामणी
पण सोंडेवरून आल्यावर चोरदरवाजात प्रवेश करतो तीथला (जीथे सळयांना धरून चढावे लागते) आणि बालेकिल्यावर चढताना दगडाच्या खोबणीचा फोटो असता तर अजून छान वाटले असते.
28 Feb 2012 - 10:14 am | सर्वसाक्षी
भ्रमंतीचे वर्णन आणि चित्रे दोन्ही मस्त.
28 Feb 2012 - 10:18 am | sneharani
मस्त फोटो!!
28 Feb 2012 - 11:23 am | उदय के'सागर
राजगड... खरंच एक सुदंर सफर आणि अनुभव.
आम्हि रात्री गड चढलो होतो... वाटेत सुप, चहा बनवत आणि बरोबर असलेलं खायचं सामान फस्तं करत करत हा गड सर केला होता... खुपच अविस्मरणिय अनुभव !!!
धन्स गणेशा!!!
28 Feb 2012 - 11:47 am | कवितानागेश
छान वर्णन.
आणि फोटो पण मस्त अहेत. पण लेखकाला स्वतःला दिसणार नाहीत!! ;)
28 Feb 2012 - 1:39 pm | वपाडाव
माउ... तु पण खेचायला तयार का?
निसर्गसुंदर सुवेळा अन संजीवनी माचीवर गेले की परत यावेसे वाटत नाही...
फोटोवरील तारखांनी लै घोळ केलाय गणेशा... हपिसातुन दिसत नसल्यास घरी जाउन बघ...
28 Feb 2012 - 1:55 pm | गणेशा
मला पिकासा वरुन दिलेले सर्व फोटो दिसतात हो .
फोटोत तारखा मुद्दाम घेतल्या आहेत.
संपुर्ण भटकंती मधील काही फोटोंचे अलबम करणार आहे. त्यावेळेस ह्या वेळा खुप काही बोलणार आहेत.
आयुष्याच्या कुठल्याही वळणावर ते फोटो आपल्या आयुष्याच्या ही एका वेगळ्या काळात घेवुन जातील.
@ धनुअमिता :
अहो मी ३ दा अपडेट केल्या हो तारखा. तरी बदल दिसत नाहियेत काय ?
माफी वगैरे असे शब्द का?
आणि वाचकाने बंदुकीच्या गोळी सारखे असावे.. माफी हा शब्द त्यावर नसावा.
28 Feb 2012 - 1:33 pm | धनुअमिता
हिंदवी स्वराज्याचे तोरण १९४६ ला तोरणा जिंकून महाराजांनी त्यावर उभारले. आणि अर्धवट बांधलेल्या मुरमदेवाचा डोंगर (राजगड) १९४७ ला स्वराज्यात आला. स्वराज्याच्या तोरणाला साजेशे स्वराज्याचे द्वार मिळाले होते.
गणेशराव १९४६ व १९४७ नाही हो १६४६ व १६४७ असेल.जरा परत विचार करा या गोष्टीवर.
आणि माझे जर चुकले असेल तर माफ कर.
28 Feb 2012 - 6:54 pm | अभिजीत राजवाडे
गणेशा,
राजगडाचे पुन्हा एकदा दर्शन घडविल्याबद्द्ल आभार!!!
फक्त एक दुरुस्ती किंवा माहिती :)
"तोच गुंजवणे दरवाजा (दर्वाजातुन बाहेर गेल्यावर डायरेक्ट दरी आहे.)" - इथे जरी दरी असली तरी खाली जायला एक अवघड वाट आहे. या दरवाजातुन गड चढणे तुलनेने सोपे आहे पण उतरणे भयाण आहे.
पुन्हा एकदा आभार.
पावसातील राजगडाचे फोटो पाहायचे असल्यास येथे पाहावे.
http://ideafest.blogspot.com/2009/09/rajgad-trek.html
29 Feb 2012 - 12:13 am | चिंतामणी
(Rajgad Rockpatch View 1& 2) आणि (Going back from Chor Darwaja 1 & 2)
हे फोटो भन्नाट.
29 Feb 2012 - 7:47 am | अभिजीत राजवाडे
चिंतामणीराव,
कौतुकाबद्द्ल हार्दिक आभार.
28 Feb 2012 - 9:11 pm | हंस
सुंदर प्रचि आणि तितकेच ओघवते वर्णन!