अनामिक भटकंती ४: केरळ - A.मुन्नार

गणेशा's picture
गणेशा in भटकंती
29 Dec 2011 - 3:06 am

अनामिक भटकंती ३ - रतनगड: http://www.misalpav.com/node/19239
अनामिक भटकंती २ - सांदण दरी: http://www.misalpav.com/node/18728
अनामिक भटकंती १ - राजा रायगड: http://www.misalpav.com/node/18323

केरळ बद्द्ल अधिक काही लिहिण्याची गरज खरेच नसेन असे मला वाटते. मला पहिल्यापासुन केरळाचे आकर्षण होते आणि तेथील हिरवाई, समुद्र, बॅकवॉटर याचे चित्र मनात कोरले गेले होते.. जेंव्हा कोठे पहिल्यांदा फक्त फिरण्यासाठी महाराष्ट्रा बाहेर जावु तेंव्हा पहिला प्रेफरन्स केरळच असे मनोमन ठरले होते...
बाकी आता फक्त निवडक फोटो येथे देत आहे, वर्णन काही देत नाही ,
फक्त त्या आधी एक आणखिन नमुद करावेसे वाटते के तेथील सर्व लोक खुप छान आहेत, खुप आपलेशे करणारे आहेत, शिवाय मासे तर विचारुच नका ७ दिवसात १४ प्रकारचे वेगवेगळे मासे खाल्ले आहेत मी.. आणि केरळा थाळी लाजवाब.

A. मुन्नार:

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

29 Dec 2011 - 3:21 am | पाषाणभेद

बॅकवॉटरचे फोटो तर मस्त आहेत.

बॅक वॉटर फोटोसाठी थोडे अजुन थांबावे लागेल .. पूवार आणि अ‍ॅल्लेप्पी च्या फोटोत ते जास्त छान आहेत.

ते बॅकवॉटर नसून मुन्नार लेक असावा असे वाटते..

मुन्नार समुद्रापासून फारफार दूर आणि फार म्हणजे फारच उंच असल्याने तिथे समुद्राला मिळणार्‍या नद्यांचे बॅकवॉटर / खाड्या /चॅनेल्स असणे किंवा तिथून ते दिसणे शक्य नाही.

अन्या दातार's picture

29 Dec 2011 - 8:47 am | अन्या दातार

एवढी दोनच (खरोखरची ;) ) फुले होती की फक्त या दोन फुलांचे फोटो टाकले आहेस?? अजुन फोटो येऊदेत, विथ कविता (काव्य)

किसन शिंदे's picture

29 Dec 2011 - 9:29 am | किसन शिंदे

भारी रे गण्या. दुसरा फोटो तर खुपच आवडल्या गेला आहे.

वाह क्या बात है.. मुन्नारमधलं चहाचे संग्रहालय आणि फॅक्टरी पाहिलीस की नाही? मला तिथली ती फिल्म आणि माहोल खूप खूप आवडला होता..

गणेशा's picture

29 Dec 2011 - 12:46 pm | गणेशा

धन्यवाद !

@ गवि:
फिल्म आणि संग्रहालय पाहिले.. फिल्म मस्त.. संग्राहलय जास्त आवडले नाही, पण दोन मस्त पैकी ग्रीन टी आणण्यात आले आहेत.
बाकी तो मुट्टुपेट्टी डॅम आहे...
'मुन्नार' या शब्दाचा मराठीत अर्थ 'त्रीवेणी' , तेथे ३ नद्या आहेत..
आयुष्यात एकदा तरी जावेच जावे असे हे ठिकाण आहे.

किस्ना तसे बरेच फोटो आहेत, पर डे कमीत कमी २५० फोटो आहेत :)

अन्या ३५०० फुले होती ब्लॉसम गार्डन मध्ये..
शिवाय स्पाईन गार्डन मध्ये सर्व प्रकारच्या मसाल्याची झाडे पाहिली (काही पाणे खाल्ली पण) ..

सर्व फोटो मात्र येथे दिलेले नाहीत .टोटल १५०० फोतो आहेत [:)]

प्यारे१'s picture

29 Dec 2011 - 3:06 pm | प्यारे१

>>>किस्ना तसे बरेच फोटो आहेत, पर डे कमीत कमी २५० फोटो आहेत

>>>सर्व फोटो मात्र येथे दिलेले नाहीत .टोटल १५०० फोतो आहेत [:)]

गणेशा 'नेमका कशाला' गेलेलास रे केरळला? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Dec 2011 - 3:28 pm | अत्रुप्त आत्मा

@-गणेशा 'नेमका कशाला' गेलेलास रे केरळला? :-D प्यार्‍या पापी मन आहे तुझं, अचुक पापी घेतलीस साल्या... ;-)

काही फोटोंना जास्त वेळ लागतो, काही सटासट काढून होतात. पण सरासरी काढली तर एका फोटोला किमान तीस सेकंद जात असतील असं मानायला हरकत नाही. इथे दिलेल्या फोटोंची क्वालिटी पाहून कदाचित मिनिटभरही लागले असेल असं म्हणता येईल.. पण सध्या ३० सेकंद धरु.

फोटो एकट्या गणेशाने काढले असतील तर १५०० X ३० = ४५,००० सेकंद ,म्हणजेच १२ तास ३० मिनिटे..

अर्थात सहासात दिवसांच्या मधुचंद्रातला जागेपणीचा एक पूर्ण दिवस गणेशाने फक्त फोटो काढण्यात (क्लिक करण्यात) घालवला..

.......

!!!!

प्यारे१'s picture

29 Dec 2011 - 3:46 pm | प्यारे१

अरेरे......!!! :(

;) ;) ;)

दुसर्‍या एका संस्थळावर मिपावरील एका महिला सदस्य आयडीने काढलेल्या धाग्यावर 'नचिकेत गद्रे' नामक आयडीने ;) अत्यंत 'मौलिक मार्गदर्शन' केलेले होते.
ते वाचले असतेस गण्या तर 'वाचला' असतास. ;)
बाकी पाचगणीमध्ये मित्राच्या मेडिकल शॉपमध्ये उभं राहिल्यावर बर्‍याच गोष्टींचं मौलिक ज्ञान नी अनेकानेक गोष्टी बघायला मिळायच्या. :)

बाबा २५० फोटोतुन कसे तरी १२ बिचारे एकटे फोटो काढले आहेत..
तेच येथे दिलेत.. त्यामुळे किलकिलाट एकदमच वाया गेला नाय..

प्रास's picture

29 Dec 2011 - 7:39 pm | प्रास

त्यामुळे किलकिलाट एकदमच वाया गेला नाय..

किलकिलाट की क्लिकक्लिकाट? ;-)

निश's picture

29 Dec 2011 - 12:48 pm | निश

मस्त
अजुन येऊ देत.....

गणेशा,

परिसर मस्तंय रे, फोटो पण झकास!

बाकी 'निवडक' फोटो टाकलेस म्हणून धन्यवाद! ;-)

पुभाप्र

पियुशा's picture

29 Dec 2011 - 2:55 pm | पियुशा

सहिच्च !
मस्त :)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Dec 2011 - 3:37 pm | अत्रुप्त आत्मा

हाय रे हाय..लाजवाब हो गनेसभाऊ,,त्या फुलांच्या फोटोंना तर तोड नाही,आणी गर्द धुक्यातला फोटो पाहुन तर रोजा मधल्या ''ये हसीं वादियाँ ये खुला आसमाँ'' ची (आणी त्यातल्या रोमान्सची विशेष करुन ;-) ) अठवण झाली... सगले फोटु कुठे चिकटवुन ठेवले आहेस? आंम्हाला बाघयचेत ते...

सोत्रि's picture

29 Dec 2011 - 6:39 pm | सोत्रि

जबरा आलेत फोटो, खासकरून दाट धुक्यातला झाडांचा फोटो पाहून तर एकदम खल्लास!

- (भटक्या) सोकाजीराव त्रिलोकेकर

पैसा's picture

29 Dec 2011 - 6:58 pm | पैसा

जेवढे दिलेस तेवढे फोटो मस्तच आले आहेत! पण तुमची गाडी गोव्यात येता येता केरळला कशी पोचली? मी काही तुला गविंसारखी गणितं विचारली नसती! ;)

अन्या दातार's picture

29 Dec 2011 - 9:17 pm | अन्या दातार

गाडीने गोवा, कर्नाटक क्रॉस केल्याचे बहुतेक लक्षातच आले नसेल. अन मग "ठिक आहे, पोचलोच आहोत केरळात तर केरळ बघू म्हणे..........." असा सुखसंवाद झाला असेल ;) (...च्या ठिकाणी असलेला अपेक्षित संवाद मुद्दामच दिलेला नाही याची नोंद घ्यावी)

नेहमी आनंदी's picture

29 Dec 2011 - 10:16 pm | नेहमी आनंदी

खूप सुंदर फोटो आहेत