दमलेल्या ( पृथ्वी ) बाबाची कहाणी

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जे न देखे रवी...
20 Feb 2012 - 12:39 pm

मुंबापुरी नगरात वर्दी दिली भारी
आदर्शचा राजा गेला नांदेडच्या वारी
मुंबईतल्या पालिकेवर मारु बघ खेळी
तिजोरीच्या चावीसाठी झुलतोमी उरी !!

ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना ....

मंत्रालयात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके युत्या - आघाड्या करून
तास तास जातो पास टेंडर करुन
एक एक मंत्री जातो फाईली ठेऊन
अशा वेळी काय सांगू काय काय वाटे
यमुनेचे पाणी सर्व चहुकडे दाटे !!

ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना ....

( गद्य)
गल्ली बोळात लुकलुकणारा माझाच तो ' हात '
आणि पहिल्यांदाच जेंव्हा केला ' इंजीनाने' घात
' बाई' म्हणाली होती जा मुंबईला बदली बाबा
रांगत रांगत जेंव्हा घेतला होता ' घड्याळाने' ताबा
टिक-टिक करत घडाळ्याने टाकल पाऊल पुढलं
गजरच एकत राहिलो फक्त, उठायचंच राहिलं

( पद्य )
आज गेलो आहे आता पुरा अडकून
दचकून जगा होतो ' धनुष्य' पाहून
असा कसा कृपा 'शंकर 'उमेदवार देतो
नातेवाइक म्हणतो आणि तिकिट मागतो
मंत्रिपद गेले आता माझ्या 'हातातून'
उरे काय मला आता मुंबईमधून
जरी होते ओठी मा़झ्या ' बाणासाठी ' हसे
नजरेत मला आता भगवाच दिसे
तुझ्या मुंबईतून 'सेना ' हरवेल का गं
कधीतरी ' हात ' तुला आठवेल का गं
'नवी दिल्ली' जाण्यासाठी उभा रांगे मध्ये
माझ्यासाठी येईल का ' सत्ता ' मुंबईमध्ये

( मुंबईकर एका सुरात )

ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना ....

अमोल केळकर
२०/०२/०२

हास्यविडंबन

प्रतिक्रिया

सुत्रधार's picture

20 Feb 2012 - 1:30 pm | सुत्रधार

फारच छान

जोशी 'ले''s picture

20 Feb 2012 - 1:33 pm | जोशी 'ले'

झकास...

पिंगू's picture

20 Feb 2012 - 2:04 pm | पिंगू

हाहाहा...

- पिंगू

टिवटिव's picture

20 Feb 2012 - 2:10 pm | टिवटिव

झकास...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

20 Feb 2012 - 3:28 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त मस्त मस्त!! मजा आला.

उदय के'सागर's picture

20 Feb 2012 - 3:41 pm | उदय के'सागर

लई भारी.... येक नंबर!!!!

पैसा's picture

20 Feb 2012 - 8:44 pm | पैसा

लै भारी!

अत्रुप्त आत्मा's picture

20 Feb 2012 - 9:19 pm | अत्रुप्त आत्मा

----^----

अगदी खत्तरनाक उतरलय विडंबन....मार्मिक अतिशय मार्मिक आहे हे...
एक विनंती---लवकरात लवकर आय.बी.एन...लोकमतला पाठवुन द्या...धम्माल तर उडेलच..पण हे सर्व लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे... :-)

चौकटराजा's picture

20 Feb 2012 - 9:36 pm | चौकटराजा

महाराष्ट्रात बाबा ची नेमणूक वरून होते. मग कधी तो मुलीच्या मेडिकल प्रवेशा साठी , कधी चित्र निर्मात्याबरोवर फोटो आला म्हणून, कधी
जावयाला काहीतरी जागा दिली म्हणून तर कधी सैनिकांची जागा लाटली म्हणून हा वरचा बाबा घरी जातो. खालाचा बाबा हिंदीत ३४ ट्क्के म्हणून घरी जातो.मग पुन्हा पदावर येतो, वरच्या बाबातील एक बाबा पुन्हा केंद्रात मंत्री होतो.

कधी बाबा लोक नेमणारा एक मोठ्ठा बाबा म्हणतो लोकशाही पेक्शा ठोकशाही बरी !

सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी असे पाहिले मी न कोठेतरी .......

कपिलमुनी's picture

21 Feb 2012 - 7:28 am | कपिलमुनी

ह ह पु वा

एकदम झकास ..
मस्त आहे सगळे विडंबन .. आवडेश

( गद्य)
गल्ली बोळात लुकलुकणारा माझाच तो ' हात '
आणि पहिल्यांदाच जेंव्हा केला ' इंजीनाने' घात
' बाई' म्हणाली होती जा मुंबईला बदली बाबा
रांगत रांगत जेंव्हा घेतला होता ' घड्याळाने' ताबा
टिक-टिक करत घडाळ्याने टाकल पाऊल पुढलं
गजरच एकत राहिलो फक्त, उठायचंच राहिलं

एकदम भारी .. सत्य

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Feb 2012 - 9:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत. :)

-दिलीप बिरुटे

जेनी...'s picture

21 Feb 2012 - 9:10 pm | जेनी...

झकास...

झकास...:)

वपाडाव's picture

21 Feb 2012 - 9:32 pm | वपाडाव

एक शंका आहे...

अमोल केळकर
२०/०२/०२

हे सर्व तर मागच्या २-४ वर्षात झालंय तुम्हाला ८-१० वर्ष आधी कसेकाय माहित झाले??
आपण युयुत्सुंचे भविष्याचे क्लास लावले होते का?? ५००/- वाले...

अमोल केळकर's picture

22 Feb 2012 - 9:09 am | अमोल केळकर

धन्यवाद साहेब.
२०/२/०२ ची चूक लक्षात आली होती मात्र संपादन कसे करावे हे समजले नाही . असो

बाकी भविष्या बद्दल बोलायचे झाल्यास ' आमी बी युयुत्सु काकांच्याच लाइनीतले आहोत ' :)

अमोल केळकर