मेमरी कार्ड वापरता ? .......हे माहित आहे का?

कोल्हापुरवाले's picture
कोल्हापुरवाले in जनातलं, मनातलं
15 Feb 2012 - 5:44 pm

आपल्या पैकी असे बरेच लोक आहेत जे मेमोरी कार्ड वापरतात. आज काल बर्याच प्रमाणात ओंनलाइन शॉपिंग केलं जात. बऱ्याच वेब साईट्स वर कमी किमती मध्ये अशी उत्पादने विकली जातात. जेव्हा आपण कार्ड विकत घेत असतो तेव्हा फक्त "किमंत" हा निकष लावला जातो. पण बर्याच लोकांना हे कदाचित माहित नसाव कि जे कार्ड आपण वापरतो त्याचे बरेच प्रकार असतात. मेमरी कार्ड चे वेगवेगळे क्लास असतात

तुम्हाला असा जाणवलं आहे का तुम्ही घेतलेलं नाव कोर कार्ड खूप स्लो आहे.? फोटो काढला तरी सेव व्हायला खूप वेळ लागतो?

या सगळ्याला १ गोष्ट जबाबदार असते ती म्हणजे मेमोरी कार्ड चा क्लास. आता म्हणाल त्याचा आणखी कसला क्लास ?

तर तुमचे मेमोरी कार्ड बाहेर कडून जरा नीट पहा. त्यवर काहीतरी लिहिलेले दिसेल. (फोटो टाकण्याचा प्रयत्न केलं पण सफल झाला नाही. कृपया गुगल वर पाहावे )

प्रत्येक मेमरी कार्ड चा क्लास असतो. हा क्लास ठरवतो कि तुमच्या कार्ड च स्पीड. जेवडा मोठा क्लास तेवढा तुमच्या कार्ड च स्पीड जास्त.

मेमरी कार्ड चे क्लास , क्लास २ , क्लास ४, क्लास ६,क्लास १० असे आहेत.

बहूतांश स्वस्त मिळणारी मेमरी कार्ड हि क्लास २ ची असतात. त्यमुळे ती स्वस्त देखील मिळतात.

तुम्ही तुमच्या गरजे नुसार कोणते कार्ड घ्याचे हे ठरवू शकता. जर तुम्ही साधा मोबाइल वापरत असाल तर क्लास २ पुरेसे आहे.पण जर तुम्ही HD व्हिडीवो शूट करत असाल तर क्लास १० कार्ड तुम्हाला चांगला अनुभव देईल.

आता तुम्हा वाटल क्लास ओळखायचा कसा?

वर पहा फोटो मध्ये ४ हा अंक "C" मध्ये लिहिला आहे , ते म्हणजे त्या कार्ड चा क्लास.

आता कदाचित तुम्हाला कळाल असेल कि काही मेमोरी कार्ड स्वस्त आणि काही मेमरी कार्ड महाग का असतात.

तंत्रविज्ञानमाहिती

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

15 Feb 2012 - 5:47 pm | किसन शिंदे

हि नवीनच माहिती कळाली.

तिमा's picture

15 Feb 2012 - 7:15 pm | तिमा

'मेमोरी कार्ड' वाचल्यावर कुमारांची 'निम्मोरिका' ही चैती भूप मधली चीज आठवली.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Feb 2012 - 5:49 pm | परिकथेतील राजकुमार

फटू नाय काढता आला तर आंतरजलावरुन घ्यायचा.

कोल्हापुरवाले's picture

15 Feb 2012 - 5:51 pm | कोल्हापुरवाले

आभार

परिकथेतील राजकुमार's picture

15 Feb 2012 - 5:55 pm | परिकथेतील राजकुमार

आभार ठेवा तुमच्याकडेच.

त्या पेक्षा 'रांड्या' म्हणून शिवी घातली असती तर अजून बरे वाटले असते. ;)

मस्त हो कोल्लापूरकर!
अशी आणखी माहिती येऊ द्या प्लीज.

माहीतीसाठी धन्यवाद .

कोल्हापुरवाले's picture

15 Feb 2012 - 6:16 pm | कोल्हापुरवाले

व्हया

गवि's picture

15 Feb 2012 - 6:16 pm | गवि

अतिशय उपयुक्त माहिती..

गॅजेट्समधे अडाणी असलेल्या मजसारख्यांना अतिशय फायदा होईल अशा माहितीचा..

मला अजून एक शंका आहे. एसडी, सोनी ड्युओ, मिनी / मायक्रो एसडी अशा वेगवेगळ्या कार्डांमधे नेमका फरक काय.

प्रश्न अजून नीट विचारायचा प्रयत्न करतो..

या कार्डांच्या आकारात वगैरे उघड फरक दिसतोच, पण त्याचे अ‍ॅडॉप्टर (स्लीव्हज्) येतात. त्यात ते कार्ड घातलं की वेगळ्या आकाराच्या रीडरमधेही रीड होतं.

माझा प्रश्न असा की या कार्डसमधे फक्त आणि फक्त आकाराचा फरक असतो की मुळातच सगळंच वेगळं तंत्रज्ञान असतं.

माझ्याकडे असलेलं मायक्रो एसडी किंवा मेमरी ड्युओ यापैकी काहीही योग्य स्लीव मिळाल्यास एकमेकांच्या जागी (इंटरचेंजिएबल) वापरता येतं का?

दुसरी शंका..

कार्डचा मेमरी साईझ मोठा (उदा. ३२ जीबी) आहे पण एखादे उपकरण तो "रेकग्नाईझ" करत नाही, ही काय भानगड असते?

म्हणजे एखाद्या फोनमधे ४ जीबी कार्ड रेकग्नाईझ होतं पण ३२ जीबी नाही, याचा अर्थ ३२ जीबी कार्ड कुचकामी ठरेल की त्यातले फक्त चार जीबी वापरता येतील?

जर उत्तर हो असेल तर पुढचा प्रश्न:

अशा केसमधे जर हा एक्स्टर्नल डिव्हाईसच आहे तर त्यातले चारच जीबी का "रेकग्नाईझ" होतील? आणि नेमके कोणते चार जीबी? मुळात भरलेल्या ३२ जीबी कार्डातला नेमका कोणता ४ जीबी डेटा वाचता येईल?

असो.. फार प्रश्न झाले.. क्षमस्व..

गविशेठ काही प्रश्नांसाठी उत्तर आहे.

>> म्हणजे एखाद्या फोनमधे ४ जीबी कार्ड रेकग्नाईझ होतं पण ३२ जीबी नाही, याचा अर्थ ३२ जीबी कार्ड कुचकामी ठरेल की त्यातले फक्त चार जीबी वापरता येतील?

याचा अर्थ की तो फोन फक्त ४ जीबी कार्ड सपोर्ट करु शकेल आणि ही हार्डवेअरची मर्यादा आहे.

>> अशा केसमधे जर हा एक्स्टर्नल डिव्हाईसच आहे तर त्यातले चारच जीबी का "रेकग्नाईझ" होतील? आणि नेमके कोणते चार जीबी? मुळात भरलेल्या ३२ जीबी कार्डातला नेमका कोणता ४ जीबी डेटा वाचता येईल?

हा प्रयत्न करुन पाहिला नाही. एकतर कदाचित ३२ जीबी कार्ड डिटेक्ट होणार नाही आणि त्यामुळे पुढचा सोपस्कार पार पडणार नाही.

- पिंगू

कोल्हापुरवाले's picture

15 Feb 2012 - 8:09 pm | कोल्हापुरवाले

>>या कार्डांच्या आकारात वगैरे उघड फरक दिसतोच, पण त्याचे अ‍ॅडॉप्टर (स्लीव्हज्) येतात. त्यात ते कार्ड घातलं की वेगळ्या आकाराच्या रीडरमधेही रीड होतं.
---टेक्नोलोजी सारखीच आहे. साईझ कालानुरूप बदलली आहे. तास बोलाल तर डाटा लिहिण्याच तंत्रज्ञान वेगळ आहे. म्हनुन कॉम्पुटर सगळे समजतो म्हणून अडप्तर/ स्लीव्ह चालतात

>>म्हणजे एखाद्या फोनमधे ४ जीबी कार्ड रेकग्नाईझ होतं पण ३२ जीबी नाही, याचा अर्थ ३२ जीबी कार्ड कुचकामी ठरेल की त्यातले फक्त चार जीबी वापरता येतील

---टेक्निकली बोलायचं तर कार्ड रीड करण्यासठी डाटा लाईन ची गरज असते. ४ GB कार्ड रेकॅग्नायीझ करणारा मोबाईल कडे तेवढ्याच डाटा लाईन असतात पण जेव्हा 32GB कार्ड टाकेन तेव्हा डाटा रीड / राईट करणेसाठी पुरेश्या लाईन नसतात. याउलट जर मोबाईल 32GB सपोर्ट करत असेल तर 32GB पेक्षा कमी साईझ चे कार्ड रेकॉग्निझ करेल

दादा कोंडके's picture

15 Feb 2012 - 9:20 pm | दादा कोंडके

४ GB कार्ड रेकॅग्नायीझ करणारा मोबाईल कडे तेवढ्याच डाटा लाईन असतात पण जेव्हा 32GB कार्ड टाकेन तेव्हा डाटा रीड / राईट करणेसाठी पुरेश्या लाईन नसतात

मला वाटतं अ‍ॅड्रेस लाईन्स कमी पडतील. पण हे झालं प्यारेलाल इंटरफेसमध्ये. सिरीयल इंटरफेस असेल आणि प्रॉटोकॉल स्टॅक अपवर्ड कंपॅटीबल असेल तर एलएसबीज किंवा एमएसबीज सोडून द्यायच्या हाकानाका.

बाकी माहिती उत्तम.

जोशी 'ले''s picture

15 Feb 2012 - 11:20 pm | जोशी 'ले'

प्यारेलाल : )

मला वाटतं अ‍ॅड्रेस लाईन्स कमी पडतील. पण हे झालं प्यारेलाल इंटरफेसमध्ये. सिरीयल इंटरफेस असेल आणि प्रॉटोकॉल स्टॅक अपवर्ड कंपॅटीबल असेल तर एलएसबीज किंवा एमएसबीज सोडून द्यायच्या हाकानाका.

वा दादा... फार सोपं करुन सांगितलंत... :(

दादा कोंडके's picture

16 Feb 2012 - 12:11 am | दादा कोंडके

युएस्बी स्टीक ऐवजी तेव्हड्याच आकाराचं एसडी कार्ड आणि युएसबी मल्टी कार्ड रिडर घेणं चांगलं. किंमत साधारण तेव्हडीच पडते आणि फायदा हा की ,
१. कार्ड आणि युएसबी स्टीक म्हणून वापरू शकतो.
२.दुसर्‍या कार्डसाठी देखील वापरता येतं.

हायला हे माहितच नव्हत.
छान माहिती. और भी आंदो.

निवेदिता-ताई's picture

15 Feb 2012 - 7:39 pm | निवेदिता-ताई

अतिशय उपयुक्त माहिती....:)

वपाडाव's picture

15 Feb 2012 - 8:13 pm | वपाडाव

अन गविंचे प्रश्नही झकास...

मेमरी कार्ड वापरतात तर हे ही लक्शात असु द्या..'
आज काल मोबाइल फोन खुप लवकर 'जुने' होतात व नवीन 'पीस' साठि जुना 'कावळा' विकला जातो व त्या बरोबर जुने मेमरी कार्ड सुद्धा दिले जाते...पण..आपण आपला महत्वाचा पर्सनल डाटा कधिकाळी या मेमरी कार्डात सेव्ह केला होता हे लक्शात असु द्या ,... मेमरि कार्ड किंवा कोणत्याहि हार्ड ड्राइव्ह मधिल डेटा कधिच कायमचा डिलिट होत नाहि अगदि कितिहि वेळा फॅारमॅट केला तरी, कार्ड रिकव्हरि सॅाफ्टवेअर वापरुन तो डेटा आपण कधीहि रिकव्हर करु शकतो
अगदि अंगा पेक्शा भोंगा मोठा प्रमाणे चुकुन डिलिट केलेला फोटो रिकव्हर करण्या साठि मी 512 mb च्या कार्डा तुन 7gb डेटा रिकव्हर केला आहे... :)

मनराव's picture

16 Feb 2012 - 10:22 am | मनराव

>>मी 512 mb च्या कार्डा तुन 7gb डेटा रिकव्हर केला आहे...<<
भलतेच जोशी"ले" दिसता तुम्ही...... ;)

मेमरि कार्ड किंवा पेन / हार्ड ड्राइव् मधुन डेटा पुर्ण पणे कधीच डिलीट होत नाही तो लेयर बाय लेयर ओव्हरराईट होत असतो...जर माझं कार्ड अजुन जुनं असतं तर 10gb पन निघालं असतं ( रिकव्हरि तुमच्या computer च्या लोकल हार्डडीस्क वर होते) आशा आहे तुम्हाला समजले असेल.-.... :) ...पुढिल काहि प्रश्न असतिल तर ते गुगल काकांना विचारा
मी चारेक वर्षांपुर्वि easy card recovery for images हे software वापरलेय , तसेच माझ्या external hardisk मधुन जो डाटा माझ्या मित्रा ने रिकव्हर करुन दिला त्याला दोन दिवस लागले एवढा डाटा मिळाला व त्यातुन नको नको ते रिकव्हर झाले ;) जर कोनाला त्या software चे नाव हवे असेल तर ते मी उद्या शोधुन देइन.

जोशी &#039;ले&#039;'s picture

16 Feb 2012 - 2:26 pm | जोशी 'ले'

>>>>> भलतेच जोशी"ले" दिसता तुम्ही......
तुम्हिपण ना जाम मन'कवडे'राव ;)

अमृत's picture

16 Feb 2012 - 8:59 am | अमृत

तुम्ही जर या विषयावर एक लेख मालिका काढू शकलात तर फार बरं होईल.... पुलेशु

अमृत

प्रसाद प्रसाद's picture

16 Feb 2012 - 5:57 pm | प्रसाद प्रसाद

गाववाले धन्यवाद. चांगली माहिती कळाली.

Pearl's picture

16 Feb 2012 - 7:34 pm | Pearl

मेमरी कार्डाबद्दल हे माहिती नव्हते.
नवीन माहिती. धन्स.

मदनबाण's picture

16 Feb 2012 - 7:46 pm | मदनबाण

सुंदर माहिती आणि जोशी'ले' प्रतिसाद ! :)
सध्या ३ प्रकारची मेमरी कार्ड उपलब्ध आहेत, ती म्हणजे:- SD,SDHC आणि SDXC
या ३ प्रकारात काय फरक आहे ते जाणुन घेण्यासाठी इथे टिचकी मारा:---
http://www.lockergnome.com/mattryan/2011/04/09/sd-vs-sdhc-vs-sdxc/#

प्रभाकर पेठकर's picture

19 Feb 2012 - 12:20 pm | प्रभाकर पेठकर

नविन सर्वांगीण, धोकादायक, धक्कादायक माहीती.
मैत्रिणींना 'भेट' म्हणून दिलेल्या काही जुन्या कार्डांवर काय-काय डेटा(?) होता ह्या विचारांत पडलो आहे.
एका मैत्रिणीकडून आलेले कार्ड मात्र 'तपासून' पाहिले पाहिजे.

लोकहो,

एक मायक्रो एसडी कार्ड विकत घेतलं. ते करपट (म्हणजे करप्ट) निघालं. पैसे परत मिळाले. शिवाय कार्डसुद्धा माझ्याकडेच राहिलं. मूळ क्षमता १२८ जीबी होती. त्यापैकी फक्त काही जीबी सुस्थितीत आहेत. आख्खं कार्ड खराब झालेलं नाहीये. तर प्रश्न असा की, असं अर्धवट खराब झालेलं कार्ड कमी क्षमतेवर वापरता येतं का? येत असल्यास नीरक्षीर चाचणी करून त्याची यथोचित क्षमता दाखवणारी काही आज्ञावली/प्रोग्राम उपलब्ध आहे का?

आ.न.,
-गा.पै.