सोडत धूर-चाचणी इंजिन झुक झुक करते ... (हझल)
सोडत धूर-चाचणी इंजिन झुक झुक करते
सोसली नसे त्यांची छाती फुक फुक करते
करून दाखविले, पण बघण्या कोणी नव्हते
बाण सोडण्या दोरी आता चुक चुक करते
घड्याळातले काटे आता थकले बहुधा
म्हणून यांना त्यांना आता शुक शुक करते
हातावरच्या रेषा आधी समजुन घ्या रे...
नंतर म्हणू नका की, नशीब टुक टुक करते
कमळावर दवबिंदू जमती चमकुन घेण्या
देठ अजुनही चिखलामध्ये लुकलुक करते
हत्ती इतकी माया त्याची कुठे वाढली ?
निळा रंग माखून उगाचच पुक पुक करते
कुणाशी नसे बांधिलकी पण सतत बोलतो
खार जशी की पळत सारखी कुक कुक करते
प्रतिक्रिया
10 Feb 2012 - 5:57 pm | पक पक पक
घड्याळातले काटे आता थकले बहुधा
म्हणून यांना त्यांना आता शुक शुक करते :)
हातावरच्या रेषा आधी समजुन घ्या रे...
नंतर म्हणू नका की, नशीब टुक टुक करते ;)
कमळावर दवबिंदू जमती चमकुन घेण्या
देठ अजुनही चिखलामध्ये लुकलुक करते :)
छान ! मस्त !महापालिका निवडणुकांचा ज्वर चढलेला दिसतो आहे..?
10 Feb 2012 - 6:13 pm | मेघवेडा
हा हा.. आवडली! मत-माऊलीच्या जत्रेत खपेल जोरात! :)
10 Feb 2012 - 6:19 pm | गणेशा
आवडेश ...
10 Feb 2012 - 6:25 pm | अमोल केळकर
मस्त :)
अमोल केळकर
10 Feb 2012 - 8:40 pm | अन्या दातार
मस्त.