खिडकीपाशी तुझ्या किती घुटमळला पाउस..!
छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस..!
मला न सुचले बोलायाला तेव्हा हसला.
तुझ्यापुढे अन स्वतः किती अडखळला पाउस..!
कधी उगाचच रुसला, क्षितीजामागे दडला.
मल्हाराने तुझ्या पुन्हा विरघळला पाउस..!
अवचित ओल्याचिंब स्मृतींची वीज तळपली.
रक्तासोबत धमन्यांतुन सळसळला पाउस..!
कधी सरीतून निघता जखमांवरची खपली.
स्वतःच त्या जखमांसाठी तळमळला पाउस..!
तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला.
कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..!
-- अभिजीत दाते
प्रतिक्रिया
24 Jul 2008 - 10:40 am | प्रितम
तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला.
कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस
खुप सुन्दर
प्रितम ज्ञा. पाटिल
24 Jul 2008 - 1:02 pm | अनिल हटेला
कधी सरीतून निघता जखमांवरची खपली.
स्वतःच त्या जखमांसाठी तळमळला पाउस..!
एकदम जबरा !!
येउ देत अजुन कवितेचा पाउस !!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
24 Jul 2008 - 1:21 pm | इनोबा म्हणे
कविता लय आवडली आपल्याला...
तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला.
कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..!
हे तर खासच..!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
24 Jul 2008 - 3:21 pm | बेसनलाडू
चुरगळलेला आणि पहिला घुटमळलेला पाऊस लै लै आवडला. कल्पना चांगल्या आहेत; पण त्यांच्या जोडीला जमिनीची मशागत व्हायला हवी चांगली म्हणजे मगच दणदणीत बरसेल पाऊस.
(ओलाचिंब)बेसनलाडू
24 Jul 2008 - 4:12 pm | सुचेल तसं
फारच सुंदर कविता.
http://sucheltas.blogspot.com
24 Jul 2008 - 4:27 pm | निल
"छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस.."
हे तर एकदम मस्त!!!!!!!!
24 Jul 2008 - 4:34 pm | आनंदयात्री
मौसम सुहाना है यारो .. ऐसी कविताए आनेकोच मंगती है !
24 Jul 2008 - 6:07 pm | विसोबा खेचर
खिडकीपाशी तुझ्या किती घुटमळला पाउस..!
छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस..!
वा!
अतिशय सुंदर काव्य!
तात्या.
24 Jul 2008 - 6:54 pm | प्राजु
खूप छान आहे कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Jul 2008 - 7:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खिडकीपाशी तुझ्या किती घुटमळला पाउस..!
छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस..!
मस्त !!!
तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला.
कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..!
ओहो, क्या बात है !!! अभिजीत दाते आवडला पाऊस आपल्या कवितेतला, और भी आने दो !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
24 Jul 2008 - 7:17 pm | चतुरंग
सुंदर कविता अभिजीत!
तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला.
कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..!
हे एकदमच छान!
चतुरंग
25 Jul 2008 - 12:18 am | मनीषा
पाउस आवडला...
कधी सरीतून निघता जखमांवरची खपली.
स्वतःच त्या जखमांसाठी तळमळला पाउस..! सुंदर
25 Jul 2008 - 10:27 am | मदनबाण
अभिजीतराव फारच सुंदर कविता,,फार आवडली..
(ये रे ये रे पावसा तुला देतो..)
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
8 Aug 2008 - 1:37 pm | राघव१
सुंदर लिहिलेत :)
खिडकीपाशी तुझ्या किती घुटमळला पाउस..!
छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस..!
अवचित ओल्याचिंब स्मृतींची वीज तळपली.
रक्तासोबत धमन्यांतुन सळसळला पाउस..!
तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला.
कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..!
हे विशेष आवडलेत. शुभेच्छा!
-राघव.