ॐ मणी पद्मे हुं

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
1 Feb 2012 - 12:13 am

ॐ मणी पद्मे हुं - हा अतिशय मधुर असा तिबेटीयन मंत्र असून, हा अवलोकीतेश्वर या करुणामूर्ती बुद्धाचा मंत्र आहे. तिबेट, जपान, कोरीया, व्हिएतनाम,थायलंड आदि विविध देशातील बुद्धधर्मीय लोक या मंत्राचे उच्चारण करतात. वर म्हटल्याप्रमाणे, अवलोकीतेश्वर ही करुणेची देवता असून निर्वाणपद त्यागून ही देवता हालकष्टात पिचत असलेल्या प्राणीमात्रांचा उद्धार करण्यासाठी झटते अशी कथा/प्रवाद रूढ आहे.

ॐ मणी पद्मे हुं हे संस्कृत रूप झाले तर याच मंत्राचे तिबेटी रूप ॐ मणी पेमे हुं असे आहे. अर्थात मंत्राच्या उच्चारणापेक्षा त्यामागील भाव हा महत्त्वाचा.
______________
याबाबात एक कथा वाचनात आली ती पुढीलप्रमाणे - एका साधूने खूप मंत्रसाधना करून नावलौकीक कमावला आणि बरेच शिष्यदेखील गोळा केले. एकदा त्याच्या कानावर आले की नदीपलीकडे एक प्रसिद्ध वयोवृद्ध सन्याशी आले आहेत. तेव्हा साधू त्या सन्याशास भेटायला गेला. साधूने त्या सन्याशाला विचारले की कोणती मंत्रसाधना आपण केली तेव्हा तो वृद्ध सन्याशी म्हणाला की अमुक अमुक मंत्र मी क्वचित म्हणतो. यावर साधू चमकून म्हाणाला - "अरेरे तू इतकी वर्षे चूकीचे उच्चारण करीत आहेस. मी सांगतो तसा मंत्र म्हण. आणि उर्वरीत आयुष्य तरी कारणी लाव." इतके बोलून साधू होडीत बसून नदीच्या पार जाऊ लागला. थोडा पुढे गेल्यावर मागून हाक आली पाहतो तो काय वृद्ध सन्यासी पाण्यावर चालत येऊन साधूस विचारत होता "मला परत सांगाल काय तो मंत्र?" यावर अतिशय खजील होऊन तो साधू म्हणाला "मला माफ करा आपल्याला मंत्राची गरज नाही" पण तरीही सन्याशाने मंत्र परत ऐकला आणि परत पाण्यावर चालत तो माघारी फिरला.
_________________

ॐ मणी पद्मे/पेमे हुं या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे - कमळामधील मणी (रत्न). या षडाक्षरी मंत्राचे प्रत्येक अक्षर हे विश्वातील एकेका प्रतलाशी (Realm) निगडीत आहे असे मानले जाते.

ॐ ----> सत्चित आनंद ----> देव लोक
म ----> मत्सर/हाव ----> असुर लोक
णी ----> वासना/इच्छा ----> मानव लोक
पे ----> मूढता/किल्मिष ----> वन्यजीव/प्राणी लोक
मे ----> दारीद्र्य/असुरक्षितता ----> पिशच्च लोक
हुं ----> हिंसा/द्वेष ----> नरक लोक

या मंत्राच्या अनेक मधुर फीती यु-ट्युब वर आहेत.पैकी एक पुढे देत आहे फीत जितकी श्रवणीय आहे तितकीच दर्शनीय आहे. अत्यंत सुरेख चित्रकारी असलेला गौतम बुद्धांचा संपूर्ण जीवनपट (मुख्य घटना) या फीतीमध्ये दाखविल्या आहेत. मी सहसा झोपण्यापूर्वी ही फीत ऐकते. कारण अतिशय मंद सांद्र असे संगीत. आशा करते आपल्याला आवडेल.

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Feb 2012 - 12:17 am | मिसळलेला काव्यप्रेमी

छान माहीती!

कौशी's picture

1 Feb 2012 - 3:46 am | कौशी

आवडला..

मदनबाण's picture

1 Feb 2012 - 6:22 am | मदनबाण

वा... छान माहिती ! मी आधी हा मंत्र ऐकला होता,पण व्हीडीयो वेगळा होता. :)
पण या मंत्रा बद्धल ही माहिती वाचली नव्हती,तुमच्यामुळे या बद्धल कळले. :)
असाच लोटस सुत्र हा व्हिडीयो इथे देत आहे... पण आधी मी ऐकलेला ॐ मणी पद्मे हुं इथे देतो.

लोटस सुत्र :-

आणि आपल्या वैदिक मंत्रां पैकी हा:---

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2012 - 8:25 am | अत्रुप्त आत्मा

इडिओ अवडण्यात आल्येला हाय...!

मूकवाचक's picture

1 Feb 2012 - 8:59 am | मूकवाचक

निर्वाणपद त्यागून ही देवता हालकष्टात पिचत असलेल्या प्राणीमात्रांचा उद्धार करण्यासाठी झटते - अन्धश्रद्धा
वृद्ध सन्यासी पाण्यावर चालत येऊन साधूस विचारत होता - भाकडकथा
असुर लोक वगैरे - भोळसट कविकल्पना

हे प्रकार बौद्ध धर्मात कसे खपवून घेतले जातात असा प्रश्न पडला. असो.

अमोल केळकर's picture

1 Feb 2012 - 9:35 am | अमोल केळकर

सुंदर धागा :)

अमोल केळकर

सागर's picture

1 Feb 2012 - 11:20 am | सागर

आवडली.
फक्त मंत्र ऐकून माहिती होता. आज त्यामागची भूमिका व कथाही कळाली.

माहितीबद्दल मनापासून धन्यवाद :)

शुचि's picture

1 Feb 2012 - 8:20 pm | शुचि

सर्वांचे धन्यवाद.