Architectural Animation हा प्रकार आता Design क्षेत्रात चांगलाच रुळला आहे, आता तर तो त्याचा एक अविभाज्य घटकच झाला आहे.
3D visualisation हे एक करिअर होऊ शकत यावर माझा स्वताचाही आधी विश्वास नव्हता, किंबहुना मला त्याविषयी काही माहिती देखील नव्हती. Animation म्हटल कि डोळ्यासमोर कार्टूनच उभी राहायची, किंवा 3D गेम . पण त्यापुढेही हे क्षेत्र किती अफाट आहे , हे हळू हळू आता कळायला लागलंय.
पूर्वी एखाद्याला बिल्डींग, स्टोर, किंवा interior करायचं असेल, तर त्याला संपूर्णपणे interior designer किंवा Architect च्या भरोसे रहाव लागायचं. तो त्याला प्लान, एलीवेशन, इथून तिथून ढापलेले रेफरंसेस इत्यादी दाखवून समाधान करण्याचा प्रयत्न करी. पण माझी बिल्डींग, स्टोर, घर, हे झाल्यानंतर कस दिसेल हे त्या बिचार्याला शेवटपर्यंत कळत नसे.
नंतर हळू हळू visualisation प्रकार वाढायला लागला. जे. जे ची वेग्रे मुल हाताने चित्र काढून बिल्डींग्स कशा दिसतील हे दाखवण्याचा प्रयत्न करू लागली. पण हे काम खूपच किचकट आणि वेळखाऊ होत. बर त्यात काही बदल करायचे म्हटले तर ते लगेच शक्य नसायचं, पुन्हा पहिल्यापासून चित्र काढा. फारच खर्चिक काम होत.
पण जेव्हा या कामासाठी सोफ्टवेर ची मदत घेतली जाऊ लागली, तेंव्हा काम करण्याची पद्धतच बदलली, clients न आपल प्रोडक्ट कस दिसेल ते कळायला लागलं, त्यात हवे ते बदल लेवेन्थ अवर ला सुद्धा करता यायला लागले, कितीही ऑप्शन बनवा.. डोक्याला ताप नाही. सर्वात शेवटी जो ऑप्शन फायनल होईल, तो approve झाल्यावरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात. झाली कि नाही पैशाची आणि वेळेची बचत !!!!
आता नक्की यात होत काय ते खाली सविस्तर सांगतो
--------------------------------------------------------------------------------------------
बरेच दिवस एकाच टाईप च काम करून कंटाळा आलेला,
माझ्या एका designer मित्राने , मला एके दिवशी एक international ब्रांड(Gossip - Shoe brand ) साठी काम करशील का म्हणून विचारल. ऑफिस च भन्नाट प्रेशर होत, पण काहीतरी वेगळ करायला मिळेल, म्हणून होकार दिला. आम्ही अजून एक दोन जणांची टीम बनवली. सर्वात आधी concept , त्याशिवाय गाडी पुढे हलत नाही.
काहीतरी international लेवेल च काम करायचं डोक्यात होत, साधी बुटांची दुकान लाखोने असतात, आपण काय वेगळ देऊ शकू. काही सुचत नव्हत
१० वाजता हापिसातून घरी अल कि जेवून ..२ २ वाजेपर्यंत जागून स्केचेस बनवायला लागलो . नेत वर शोधाशोधी केली ,२ ३ वह्या भरल्या .. पण काही मजा येत नव्हती . शेवटी एक भन्नाट विचार मित्राच्या डोक्यात आला
आणि खालील काही स्केचेस फायनल झाली.
हा साईट चा प्लान
१.
२.
३.
४.
५.
६.
लगेच 3d वर काम सुरु केल , त्यातही वेळ जात होता...
चायला कितीही ऑप्शन केले तरी client ला अजिबात आवडत नव्हत, काय करू कळेनास झालेलं, शिवाय ऑफिस च्या कामामुळे जास्त वेळही देता येत नव्हता.
पण हळू हळू काम जमायला लागलं. ३D सुरु होताच.. साईट वर हि काम सुरु झाल.
७.
८.
९.
मध्ये मध्ये चेंजेस येतंच होते, काम सोडून द्यावास वाटत होत. मित्र कुत्र्यासारखा मागे लागलेला .... त्याला म्हणालो "साले तू मेरा दोस्त हे या दुश्मन.. त्याच्यावर ढिम्म परिणाम झाला नाही.. त्याला अपेक्षित output येई पर्यंत तो 3D करून घेतंच होता . अतिशय हतबल झालेलो.. भिक नको पण कुत्र आवर तशी गत ...
पण प्रयत्न सोडले नाहीत .
हे मी केलेले 3DViews
१०.
११.
१२.
१३.
१४.
१५.
३ ते ४ महिन्यानंतर १० दिवसांपूर्वी कुर्ल्याच्या फिनिक्स मॉल मध्ये हे स्टोर उघडल . बघायला गेलो आणि डोळ्याच पारणच फिटल, मित्राला मिठी मारायचीच बाकी होती... भयानक कष्ट उपसून त्याने client ला दिलेला शब्द पाळला होता... हुबेहूब 3D मध्ये दाखवल्यासारख त्याने खरच स्टोर बनवलेलं होत . अक्ख्या मॉल मध्ये हेच एक स्टोर वेगळ दिसत होत .. हे खालचे साईट चे फोटू (मोबिल ने काढलेत , इतके खास दिसणार नाहीत कदाचित )
१६.
१७.
१८.
१९.
२०.
२१.
सर्वांनी आमच विशेष अभिनंदन केल .. पण स्टोर उघडेपर्यंत झालेली हालत आम्हालाच माहित होती....
काल त्याचा फोन आलेला, म्हणत होता साले लोचा हुआ हे
स्टोर इतना ढासू बना हे कि.. लोग अभी अंदर आनेसे भी डर रहे हे .. ..
client कि हवा टाईट हो गयी हे :D
२२.
प्रतिक्रिया
30 Jan 2012 - 9:23 am | प्रचेतस
भारी रे स्पावडू.
कमालीचं काम केलंस.
30 Jan 2012 - 9:34 am | सूड
वाह वाह !!
30 Jan 2012 - 10:32 am | प्रचेतस
सूड, शब्दांची इतकी कंजूषी करू नये. तुमच्या धाग्यावर आम्ही भरभरून प्रतिसाद देतोय आणि तुम्ही फक्त वाह वाह.
30 Jan 2012 - 12:15 pm | सूड
सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखून ठेवली होती, आता तुम्ही बूच मारलंत
30 Jan 2012 - 12:17 pm | मी-सौरभ
पुण्याचं पाणी इतक्या लवकर लागलं का तुला????
30 Jan 2012 - 1:30 pm | विश्वनाथ मेहेंदळे
ते गोरेगाव चे पाणी आहे रे बाबा, पुण्याचे नाही. त्याला गोरेगावचे पाणी लागले आहे.
लवकरच तो सदस्य नाम बदलून सुड्या किंवा सूडस्नेही असे काहीतरी ठेवेल बहुतेक.... ;-)
30 Jan 2012 - 5:56 pm | सूड
असं नको बोलू , स्नेहींचे स्नेही धावत येतात मग !!
31 Jan 2012 - 2:31 pm | मी-सौरभ
मुंबईत मुंबईकर होण हा ऐच्छीक मामला आहे...
पण पुण्यात आल्यावर पुणेकर होणे गरजेचे आहे ;)
30 Jan 2012 - 9:48 am | गवि
जादूगार आहेस मित्रा.. अद्भुत आहे हे सगळं..
30 Jan 2012 - 10:02 am | कुंदन
जरा आमच्या पर्याला पण पुस्तकाच्या दुकानाचे पण छानसे डिझाईन की काय ते करुन दे की.
30 Jan 2012 - 10:16 am | स्पा
मोबिल वरून type केल्याने बर्याच मिष्टेक आहेत
30 Jan 2012 - 1:06 pm | मृगनयनी
भारी रे स्पावड्या.... सुपर्ब!!!!!... :)
30 Jan 2012 - 10:19 am | छोटा डॉन
भयानक भारी रे स्पावड्या.
सला तुझ्या स्किल्सला सलाम !!!
- छोटा डॉन
30 Jan 2012 - 10:20 am | प्रास
स्पाशेठ,
अगदी भन्नाट काम केलंत ब्वॉ! डिझाईन आणि त्याचं एक्झिक्युशन दोन्ही पार कहर आहे.
आणि तुमच्या मित्रानेही तुमची कल्पना तंतोतंत प्रत्यक्षात आणली आहे.
अभिनंदन!
मोबाईलने काढलेले असूनही फोटो छान आहेत.
30 Jan 2012 - 10:42 am | मनिष
+१
सहमत. मस्त काम केलय दोघांनीही!
30 Jan 2012 - 10:58 am | जयंत कुलकर्णी
फारच छान व आव्हान स्विकारून ते पार पाडलत त्याचे विशेष कौतूक आणि अर्थातच एवढी सुंदर जागा जन्माला घातल्याबद्दल आभार आणि अभिनंदन ! हे जे काम केले आहेस त्याचा वापर करून अजून काही क्लायंटस मिळवता येतील अशी खात्री आहे. ते जरूर करावे व स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. ( जर नसल्यास)
30 Jan 2012 - 1:38 pm | विश्वनाथ मेहेंदळे
संपूर्ण प्रतिसादाला +१००
शेवटच्या वाक्याला +१०००००
31 Jan 2012 - 7:05 pm | धमाल मुलगा
सोळा आणे महत्वाची गोष्ट बोललात जयंतराव.
स्पावड्या , लेका, रडत असतोस जेव्हा पहावं तेव्हा, बघ आता पुन्हा एकदा...स्वतःकडं काय कला आहे, आणि त्याची काय किंमत आहे. तू भिड मर्दा, क्लायंट सालं आपणहोन चालत येईल दाराशी!
5 Feb 2012 - 10:44 pm | उदय
सुंदर काम केले आहे. अभिनंदन.
सहमत. आणि त्यासाठी शुभेच्छा.
30 Jan 2012 - 12:07 pm | सुहास झेले
सही रे... कसलं भन्नाट डिझाईन बनवलंय यार, सिंपली सुपर्ब !!! :)
30 Jan 2012 - 12:11 pm | जयवी
अप्रतिम !! एकदम जबरी झालंय काम ...... अभिनंदन :)
30 Jan 2012 - 12:19 pm | मी-सौरभ
फाडू काम चाल्लयं मित्रा...
मित्राच खरयं एवढं दुकान बघून आत घुसणारा बिचकणारचं :)
पु.का.शु.
30 Jan 2012 - 12:21 pm | कवितानागेश
छान झालीयेत डिझाईन्स आणि जाहिरात देखिल ! ;)
30 Jan 2012 - 12:21 pm | विसुनाना
यापुढेही आपल्या यशाची कमान सतत चढती राहो आणि आम्हाला त्रिमिती चित्रे ते प्रत्यक्ष फोटो हे रूपांतरण वारंवार पहायला मिळो ही सदिच्छा.
तुमच्या मित्राचेही कौतुक आहे.
30 Jan 2012 - 12:25 pm | ५० फक्त
जबरदस्त रे स्पावड्या, अतिशय अभिनंदन, पक्का कलाकार आहेस. पुन्हा एकदा अभिनंदन,
30 Jan 2012 - 12:34 pm | पिलीयन रायडर
क्लास... आवडलं आपल्याला...!!!
30 Jan 2012 - 12:40 pm | शिल्पा ब
जबरदस्त.
30 Jan 2012 - 12:46 pm | यकु
_____/\_____
स्पावड्या, च्यायला काय हायक्लास डिझाइन केलंस रे..
खरंच ते लक्झरियस दुकान पाहून आत शिरताना दोनदा विचार करावा वाटेल.
हे डिझाइन पाहुन तुझ्याकडे नक्कीच क्लाएंटची रांग लागणार..
बधाई.
30 Jan 2012 - 12:56 pm | प्रीत-मोहर
__/\__
30 Jan 2012 - 12:57 pm | गणपा
तुझ्या कामाची इत्यंभुत माहिती करुन दिलीस रे.
आवडलं.
माझ्या पहिल्या वहिल्या जॉबची आठवण झाली. :)
थोड्या फार अंतराने असच काहिसं करायचो पण कांपुटरची मदत न घेता. :)
लगे रहो.
30 Jan 2012 - 1:23 pm | sneharani
मस्त रे! क्लास झालय काम!!
:)
30 Jan 2012 - 1:41 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
भन्नाट डिसाईन आणि एक्सिकुशन!!
आप पुरषही नही, महापुरुष हो!! ;)
:D :D :D
30 Jan 2012 - 1:57 pm | हंस
अभिनंदन स्पाभौ!
30 Jan 2012 - 1:58 pm | विजुभाऊ
की भीषोण शुंदोर्...दारूण शुंदोर्.. खूब भालो
30 Jan 2012 - 2:05 pm | विशाखा राऊत
मस्तच बनवले आहे स्टोअर..
जबरदस्त काम .. सलाम
30 Jan 2012 - 2:39 pm | पियुशा
धाग्याच शिर्षक वाचुन स्पावड्या काय गॉसिप्प करतोय आणिक असे वाट्ले होते ;)
पण धागा पाहुन खरोखर ड्वाले पाणावले गेले आहेत ;)
सुपर्ब रे स्पावडु जाहिरात छान झालिये ;)
30 Jan 2012 - 2:56 pm | मोहनराव
मलाही धाग्याचे नाव वाचुन काहीतरी टिपी धागा आहे की काय असा वाटला होता.
तुमचे कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरंच कलाकार आहात!! स्वताचा व्यवसाय चालु करा नक्की यश मिळेल.
30 Jan 2012 - 5:50 pm | मेघवेडा
स्पावड्या, आपल्याला हे लै आवड्या! गुड वन.. :)
30 Jan 2012 - 6:48 pm | Maharani
भन्नाट!!!!
30 Jan 2012 - 6:58 pm | स्मिता.
मस्तच डिझाईन्स रे स्पा! बघूनच आवडतील असे... चेपुवरचेही डिझाईन्स छान आहेत.
30 Jan 2012 - 7:10 pm | वपाडाव
ते महागुरु कायतरी म्हणतात ना, "यु हॅव नेलड इट !!" तसलं काहीसं केलंस रे....
$$$ अं गा र - क र - दी - रे - तु ने - तो $$$
30 Jan 2012 - 7:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.
-दिलीप बिरुटे
30 Jan 2012 - 7:26 pm | नावातकायआहे
अप्रतिम ! एकदम कातिल झालंय काम ...... अभिनंदन!!
30 Jan 2012 - 7:34 pm | पैसा
तुझ्या डोक्यावर साक्षात प्रतिभेने हात ठेवलाय. जबरदस्त! याची कल्पना करणं हेच फार ग्रेट! आणि ती कल्पना प्रत्यक्षात आणणारा तुझा मित्रही ग्रेट!
30 Jan 2012 - 7:42 pm | मनराव
मस्त रे......... असेच डिझाईन काढत रहा.......... आणि क्लायंटला घाबरवत रहा.........
30 Jan 2012 - 8:25 pm | शुचि
खरोखर आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे काम. अतिशय सुंदर.
30 Jan 2012 - 8:40 pm | मराठे
आय.टी. मधे असतं तसं इन्सेप्शन पासून इम्प्लीमेंटेशन पर्यंत प्रोजेक्ट बघायला मिळालं. मस्तच!
30 Jan 2012 - 9:34 pm | बिपिन कार्यकर्ते
प्रणाम!
30 Jan 2012 - 9:49 pm | अन्नू
अप्रतिम ___/\____ :)
30 Jan 2012 - 10:03 pm | रेवती
सुंदर झालय सगळं काम.
तुझं अभिनंदन.
31 Jan 2012 - 12:57 am | मोदक
__/\__
31 Jan 2012 - 2:48 am | कौशी
सुंदर काम ..
अभिनंदन!!!
31 Jan 2012 - 3:15 am | प्राजु
मस्त मस्त मस्त!!
31 Jan 2012 - 6:37 am | इन्दुसुता
अभिनंदन आणि पुढील डिझाइन्स साठी अनेक शुभेच्छा.
31 Jan 2012 - 7:56 am | तुषार काळभोर
बोटांत मज्जा आहे हो तुमच्या!!
झक्कास!!
31 Jan 2012 - 12:47 pm | प्यारे१
भन्नाट रे स्पावड्या.
31 Jan 2012 - 1:19 pm | अत्रुप्त आत्मा
॥श्री॥.अपटे प्रसन्न...॥
अट्टल कलाकार,,,अट्टल मेहेनत,,,अट्टल कलाकृती
त्यामुळे फक्त.....
सलाम सलाम आणी सलामच
31 Jan 2012 - 1:57 pm | सुहास..
च्या मारी , धरुन फट्ट्याक !!
31 Jan 2012 - 2:28 pm | सविता००१
डिझाइन्स आणि भन्नाट काम. छानच.
31 Jan 2012 - 5:21 pm | चिगो
आयच्यान, येकदम खतरा काम केलंयस मित्रा.. साष्टांग दंडवत..
येवढं भारी दुकान पाहील्यावर माझी तरी आत शिरायला तंतरणार ब्वॉ.. :p
31 Jan 2012 - 5:29 pm | आनंद
जबरदस्त!
Gossip वाल्यान एखादा जोडा फ्रि मंदी दिला का नाही?
31 Jan 2012 - 6:40 pm | पंतश्री
हे दुकान तर लैच भारि झाले आहे. design तर फारच छान आहे. पण एक सांगावेसे वाटते.
मी animation मध्ये काम करतो पण तुमचे 3d चे काम इतके भारी आहे कि मलाच तुम्ही काही tips द्या असे सांगावेसे वाटते आहे. आम्हाला पण हि quality आणताना नाकी नऊ येतात. तुम्ही तर फारच भारी आहात.
31 Jan 2012 - 8:47 pm | चतुरंग
केवळ पैशांसाठी न करता निर्मितीच्या आनंदासाठी कमालीच्या असोशीने केलेले काम आहे हे दिसतंच आहे. त्यामुळेच ते अतिशय देखणं झालंय. भन्नाट थ्रीडी बनवणार्या तुला आणि ते प्रत्यक्षात आणणार्या तुझ्या मित्राला सलाम!
असेच आणखीन प्रोजेक्ट्स कर आणि आम्हाला माहिती दे. पुढील कामांसाठी शुभेच्छा! :)
चतुरंग
31 Jan 2012 - 10:44 pm | पाषाणभेद
जबरदस्त डिझाईन केलं. अभिनंदन.
31 Jan 2012 - 10:50 pm | स्वाती दिनेश
डिझाइन मस्तच केले आहेस रे..
स्वाती
1 Feb 2012 - 1:00 am | खेडूत
पहात रहावे असे काम झाले आहे.. खूप शुभेच्छा.
1 Feb 2012 - 11:25 am | स्पंदना
सुरेख रे स्पाउ!! मस्त.
मला तु थ्री डी त केलेला सेंटर् पिस फार आवडला, फार भन्नाट दिसतोय तो.
1 Feb 2012 - 11:52 am | जाई.
सर्वच डिझाईन सुंदर आहेत
1 Feb 2012 - 12:05 pm | भिकापाटील
व्वा काका..... मान गये.
1 Feb 2012 - 12:34 pm | नगरीनिरंजन
डिझाईन एकदम झक्कास आहे!
लगे रहो स्पाभाई!
1 Feb 2012 - 1:49 pm | साबु
creativity ......creativity म्हणतात ती हीच.....
मनासारख काम करुन ते सत्यात उतरल्याचा आनन्द कही औरच असेल ना?
जियो...
1 Feb 2012 - 6:53 pm | टिवटिव
अप्रतिम.... सुंदर काम ..
अभिनंदन!!!
1 Feb 2012 - 7:56 pm | Pearl
भन्नाट..
आणि पहिलाच प्रयत्न इतका यशस्वी.. अमेझिंग..
हार्दिक अभिनंदन.
1 Feb 2012 - 7:56 pm | Pearl
भन्नाट..
आणि पहिलाच प्रयत्न इतका यशस्वी.. अमेझिंग..
हार्दिक अभिनंदन.
2 Feb 2012 - 10:59 am | michmadhura
अप्रतिम.... सुंदर काम ..खूपच आवडले.
2 Feb 2012 - 11:10 am | स्पा
सर्व मित्रांचे आभार :)
2 Feb 2012 - 4:34 pm | श्यामल
अप्रतिम ! खुपच सुंदर.........
स्पा, तुझ्या जादुई बोटांमधली नजरबंदी करणारी जादु उत्तरोत्तर वाढत जावो.
2 Feb 2012 - 6:19 pm | पिंगू
कसलं क्लास काम केलयं रे गड्या... मस्त.
- पिंगू
2 Feb 2012 - 7:58 pm | गणेशा
प्रिय मित्र स्पा ,,
तुझे काम बघुन मन भरुन आले ..
अतिशय प्रामाणिक कष्टाचे चीज म्हणजे मनाचे समाधान ! आणि ते तु मिळवलेस हे दिसते आहे.
प्रत्येक कलेची नवनिर्मिती म्हणजे कलाकाराचे नवे जीवनच जणु ..
पालवी फुटावी तसे मन नव चैतन्य घेते ..
आणि तुझा हा धागा पाहुन एकच सांगावे वाटत आहे ..
मित्रा उठ .. स्वताच्या कलेचा स्वता मालक हो ..
कॉन्टक्ट वाढव आणि स्वता एक छोटी का होईना पण कंपणी टाक !
हे अतिशयोक्ती वाटले तरीही, स्वताच्या कामाची .. नवनिर्मीतीची तीच खरी संजीवनी असेल ..
2 Feb 2012 - 8:22 pm | मदनबाण
स्पावडु लयं भारी ! ;)
कॉन्सेप्ट टु रिअॅलिटी... भन्नाट. :)
3 Feb 2012 - 9:47 am | ज्ञानोबाचे पैजार
अरे मग आहेच मुळी आमचा मित्र लै भारी, आमचा स्पावडुच असे काहीतरी करु शकतो. वेगळच पाणी आहे ते.
स्पा जयंतराव म्हणाले तसा खरच स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा विचार कर.
3 Feb 2012 - 10:09 am | इरसाल
अतिशय छान. आवडले.
4 Feb 2012 - 7:56 am | ५० फक्त
या कामाच्या निमित्तानं उजेडात आलेल्या अजुन काही गॉसिप बद्द्ल पुढच्या भागात लिहिणार आहेस का रे स्पा ? नाही, पुणे भेटीत बोलला होतास पण अगदी रिडिंग बिटविन द लाईन करुन सुद्धा काही कळालं नाही.
अर्थात परवा अआ, तिकडे आले होते तेंव्हा त्यांना कल्पना दिली आहेस, पण काही गोष्टी निर्मितीकाराच्या लेखणीतुनच आलेल्या उत्तम.
4 Feb 2012 - 8:46 am | प्रचेतस
त्याला काही बोलायचे आहे पण बोलणार नाही तो.
काही गुपित जपायचे आहे आताच सांगणार नाही तो.
4 Feb 2012 - 12:19 pm | स्पा
गपा कि लेको
कशाला परत बाजार उठव्ताय :)
5 Feb 2012 - 12:08 am | अत्रुप्त आत्मा
@गपा कि लेको
कशाला परत बाजार उठव्ताय>>> ह...ह..अता कसं वाट्टय..? बरं बरं वाट्टय
5 Feb 2012 - 12:08 pm | सूड
आता यात बाजार उठावा असं कायै बुवा ?
5 Feb 2012 - 12:43 pm | प्रचेतस
अरे त्याच्या मनात आता लाडू फुटायला लागलेत ना.
5 Feb 2012 - 2:30 pm | सूड
ओह्ह !! तसं होय. मला वाटलं ते आखूडशिंगी, बहुगुणीचं पण थ्रीडी तयार केलंन का काय. ;). म्हणजे कोणी विचारलं तर सारखं सांगत बसायला नको. नमुना दाखवला की काम संपलं. पुढे शोधाशोध करणं ही त्या त्या माणसाची जबाबदारी. :D
5 Feb 2012 - 2:33 pm | प्रचेतस
हो तर. त्याच पण थ्रीडी मॉडेल तयार केलच असेल की त्याने.