गॉसिप

स्पा's picture
स्पा in कलादालन
30 Jan 2012 - 9:12 am

Architectural Animation हा प्रकार आता Design क्षेत्रात चांगलाच रुळला आहे, आता तर तो त्याचा एक अविभाज्य घटकच झाला आहे.
3D visualisation हे एक करिअर होऊ शकत यावर माझा स्वताचाही आधी विश्वास नव्हता, किंबहुना मला त्याविषयी काही माहिती देखील नव्हती. Animation म्हटल कि डोळ्यासमोर कार्टूनच उभी राहायची, किंवा 3D गेम . पण त्यापुढेही हे क्षेत्र किती अफाट आहे , हे हळू हळू आता कळायला लागलंय.
पूर्वी एखाद्याला बिल्डींग, स्टोर, किंवा interior करायचं असेल, तर त्याला संपूर्णपणे interior designer किंवा Architect च्या भरोसे रहाव लागायचं. तो त्याला प्लान, एलीवेशन, इथून तिथून ढापलेले रेफरंसेस इत्यादी दाखवून समाधान करण्याचा प्रयत्न करी. पण माझी बिल्डींग, स्टोर, घर, हे झाल्यानंतर कस दिसेल हे त्या बिचार्याला शेवटपर्यंत कळत नसे.
नंतर हळू हळू visualisation प्रकार वाढायला लागला. जे. जे ची वेग्रे मुल हाताने चित्र काढून बिल्डींग्स कशा दिसतील हे दाखवण्याचा प्रयत्न करू लागली. पण हे काम खूपच किचकट आणि वेळखाऊ होत. बर त्यात काही बदल करायचे म्हटले तर ते लगेच शक्य नसायचं, पुन्हा पहिल्यापासून चित्र काढा. फारच खर्चिक काम होत.
पण जेव्हा या कामासाठी सोफ्टवेर ची मदत घेतली जाऊ लागली, तेंव्हा काम करण्याची पद्धतच बदलली, clients न आपल प्रोडक्ट कस दिसेल ते कळायला लागलं, त्यात हवे ते बदल लेवेन्थ अवर ला सुद्धा करता यायला लागले, कितीही ऑप्शन बनवा.. डोक्याला ताप नाही. सर्वात शेवटी जो ऑप्शन फायनल होईल, तो approve झाल्यावरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात. झाली कि नाही पैशाची आणि वेळेची बचत !!!!
आता नक्की यात होत काय ते खाली सविस्तर सांगतो
--------------------------------------------------------------------------------------------
बरेच दिवस एकाच टाईप च काम करून कंटाळा आलेला,
माझ्या एका designer मित्राने , मला एके दिवशी एक international ब्रांड(Gossip - Shoe brand ) साठी काम करशील का म्हणून विचारल. ऑफिस च भन्नाट प्रेशर होत, पण काहीतरी वेगळ करायला मिळेल, म्हणून होकार दिला. आम्ही अजून एक दोन जणांची टीम बनवली. सर्वात आधी concept , त्याशिवाय गाडी पुढे हलत नाही.
काहीतरी international लेवेल च काम करायचं डोक्यात होत, साधी बुटांची दुकान लाखोने असतात, आपण काय वेगळ देऊ शकू. काही सुचत नव्हत
१० वाजता हापिसातून घरी अल कि जेवून ..२ २ वाजेपर्यंत जागून स्केचेस बनवायला लागलो . नेत वर शोधाशोधी केली ,२ ३ वह्या भरल्या .. पण काही मजा येत नव्हती . शेवटी एक भन्नाट विचार मित्राच्या डोक्यात आला
आणि खालील काही स्केचेस फायनल झाली.
हा साईट चा प्लान
१.

२.

३.

४.

५.

६.

लगेच 3d वर काम सुरु केल , त्यातही वेळ जात होता...
चायला कितीही ऑप्शन केले तरी client ला अजिबात आवडत नव्हत, काय करू कळेनास झालेलं, शिवाय ऑफिस च्या कामामुळे जास्त वेळही देता येत नव्हता.
पण हळू हळू काम जमायला लागलं. ३D सुरु होताच.. साईट वर हि काम सुरु झाल.

७.

८.

९.

मध्ये मध्ये चेंजेस येतंच होते, काम सोडून द्यावास वाटत होत. मित्र कुत्र्यासारखा मागे लागलेला .... त्याला म्हणालो "साले तू मेरा दोस्त हे या दुश्मन.. त्याच्यावर ढिम्म परिणाम झाला नाही.. त्याला अपेक्षित output येई पर्यंत तो 3D करून घेतंच होता . अतिशय हतबल झालेलो.. भिक नको पण कुत्र आवर तशी गत ...
पण प्रयत्न सोडले नाहीत .
हे मी केलेले 3DViews

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

३ ते ४ महिन्यानंतर १० दिवसांपूर्वी कुर्ल्याच्या फिनिक्स मॉल मध्ये हे स्टोर उघडल . बघायला गेलो आणि डोळ्याच पारणच फिटल, मित्राला मिठी मारायचीच बाकी होती... भयानक कष्ट उपसून त्याने client ला दिलेला शब्द पाळला होता... हुबेहूब 3D मध्ये दाखवल्यासारख त्याने खरच स्टोर बनवलेलं होत . अक्ख्या मॉल मध्ये हेच एक स्टोर वेगळ दिसत होत .. हे खालचे साईट चे फोटू (मोबिल ने काढलेत , इतके खास दिसणार नाहीत कदाचित )

१६.

१७.

१८.

१९.

२०.

२१.

सर्वांनी आमच विशेष अभिनंदन केल .. पण स्टोर उघडेपर्यंत झालेली हालत आम्हालाच माहित होती....
काल त्याचा फोन आलेला, म्हणत होता साले लोचा हुआ हे
स्टोर इतना ढासू बना हे कि.. लोग अभी अंदर आनेसे भी डर रहे हे .. ..
client कि हवा टाईट हो गयी हे :D

२२.

कला

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

7 Feb 2012 - 10:56 am | मी-सौरभ

पण योग्य वस्तू / व्यक्ती मिळणे हा नशीबचा भाग आहे.
डी मॉडेल बनवच पण ते बनवल्याने गधडी मिळानार नाहीच असे नाही ;)

अन्या दातार's picture

7 Feb 2012 - 12:05 pm | अन्या दातार

सौरभसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊदेत :)

अत्रुप्त आत्मा's picture

7 Feb 2012 - 11:57 pm | अत्रुप्त आत्मा

@नमुना दाखवला की काम संपलं. पुढे शोधाशोध करणं ही त्या त्या माणसाची जबाबदारी.>>> राजकुमार स्पा यांनी जर खरच तसं मॉडेल स्वतःसाठी तयार केलं,तर ते उपकार...आणी दुसर्‍यांनाही करुन दिलं तर परोपकार ;-)

चिमी's picture

4 Feb 2012 - 12:50 pm | चिमी

अल्टिमेट डिझाईन - सुन्द् र कलाक्रुती . मी पुन्हा पुन्हा येउन पहात आहे. अन ओफिसमधे पन सर्वान्ना दाखवत आहे.

सर्वान्नाच खुप आवडले आहे

पुढील कामासाठी शुभेछ्छा.

JAGOMOHANPYARE's picture

4 Feb 2012 - 4:27 pm | JAGOMOHANPYARE

छान

सुधीर मुतालीक's picture

5 Feb 2012 - 12:22 pm | सुधीर मुतालीक

विश्वामित्रा ची संकल्पना - विश्व निर्मिती करणाऱ्या - तुझ्या सारख्या कलाकाराकडे पाहूनच कुणालातरी सुचली असावी. विश्वमित्रच आहेस. कमाल केलीयस मित्रा. थांबू नकोसच आणि अश्या यशामध्ये फार काळ अडकुही नको. फक्त धाव.

सुमीत's picture

7 Feb 2012 - 10:41 am | सुमीत

मला तर ३डी इतके जिवंत वाटले आणि महत्वाचे म्हणजे इतके सुंदर fashion statement असणारे स्टोअर fashion चे माहेरघर PARIS मध्येच शोभले असते.
ह्या पेक्षा सुंदर घडवाल , माझ्या शुभेच्छा!

एक बॉड्री मारावी म्हणतोय मी येथे ..
म्हणजे ९६ चे १०० रिप्लाय होतील

काय म्हणतो ?

एक बॉड्री मारावी म्हणतोय मी येथे ..

बॉड्री म्हणजे काय रे भाऊ?

५० फक्त's picture

7 Feb 2012 - 11:59 pm | ५० फक्त

बॉडी + लाँड्री असं आहे ते, अर्थात काही गोष्टी लग्नाआधी कळतात काही लग्नानंतर, कधी कधी क्रम वेगळा असु शकतो, आणि बायको पगार कुठल्या घरात देते हे पण महत्वाचं असतं.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Feb 2012 - 12:03 am | अत्रुप्त आत्मा

ए ढिंक चिका ढिंक चिका
ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए हे...ए ए ए ह्हे...
शंभर शंभर...ते दाखवायला माझा पहिला नंबर नंबर

हे जाम भारी आहे रे !!!

सुन्दर :)

पहाटवारा's picture

5 Apr 2012 - 5:25 pm | पहाटवारा

मालक .. तुमच्या ३ डि चित्रांकडे पाहुन वाटत नाहिये कि ते नुसतेच सोफ्टवेअर ने बनवले आहे आणी रिअल नाहिये .. क्ला ....स !!

मृत्युन्जय's picture

5 Apr 2012 - 6:29 pm | मृत्युन्जय

मस्त रे स्पावड्या. अभिनंदन.

जेनी...'s picture

5 Apr 2012 - 9:02 pm | जेनी...

अप्रतिम आहे सगळं..!!
आज मिसळ्पाव वर आल्याच खरच सार्थक झालं अस मुद्दामहुन नमूद करायची इच्छा झाली.
खूप शुभेच्छा ...:)

पिवळा डांबिस's picture

5 Apr 2012 - 9:48 pm | पिवळा डांबिस

मस्त प्रोजेक्ट रे स्पा!
आवडला...
बाकी कुर्ल्याच्या फिनिक्स मॉल मध्ये आहे म्हणतोस तर किमान दोन ग्राहिका तरी मिळवून देईन तुला!
(आमची आपली फूल ना फुलाची पाकळी कॉन्ट्रीब्युशन!!)
:)
एक शंका:
जर गॉसिप हे इंटरनॅशनल ब्रॅन्ड/ चेन आहे तर त्यांचे दुकानाचं डिझाईन कशा स्टाईलचं असावं याविषयी नियम नव्हते का?
नाही म्हणजे टिफनी, गूची वगैरेंचे असतात म्हणून विचारलं...
चूभूद्याघ्या...

स्पा's picture

7 Apr 2012 - 8:36 am | स्पा

जर गॉसिप हे इंटरनॅशनल ब्रॅन्ड/ चेन आहे तर त्यांचे दुकानाचं डिझाईन कशा स्टाईलचं असावं याविषयी नियम नव्हते का?
नाही म्हणजे टिफनी, गूची वगैरेंचे असतात म्हणून विचारलं...

सदर ब्रांड हा तुम्ही दिलेल्या ब्रांड नामावली इतकाही मोठा नाहीये ;)
टिफनी, गूची या सारख्या ब्रान्द्स च्या इन्हावउस टीम असतात . ते बाहेर काम देत नाहीत.

मी जा हो ब्रांड केला.. त्या बाबतीत गोष्ट अशी होती कि.. त्याचं आधीच एक standard design होत
पण त्यांना ते बदलायचं होत. आता हे नवीन design जर workout झाल, तर बाकीच्या stores मध्ये सुद्धा अस्च्या अस छापलं जाईल :)

वपाडाव's picture

10 Apr 2012 - 9:06 am | वपाडाव

आता हे नवीन design जर workout झाल, तर बाकीच्या stores मध्ये सुद्धा अस्च्या अस छापलं जाईल

एक शंका :: तुला त्यात रॉयल्टी मिळेल का? तुझे काही राइट्स असतील की नाही त्या डिझाइन मध्ये?

विकास's picture

5 Apr 2012 - 10:13 pm | विकास

एकदम आवडलं! पिडांसारखा मला देखील प्रश्न पडला: "इंटरनॅशनल ब्रॅन्ड/ चेन आहे तर त्यांचे दुकानाचं डिझाईन कशा स्टाईलचं असावं याविषयी नियम नव्हते का?"

सॉफ्टवेअर कुठले वापरले होते?

हा अनुभव केवळ कलादालनापेक्षा "जनातलं-मनातलं" मधे शोभला असता.

चित्रगुप्त's picture

11 Apr 2012 - 8:51 pm | चित्रगुप्त

अद्भुत डिझाईन...
अश्याच अद्भुतरम्य जागा डिझाईन करत राहण्यासाठी शुभेच्छा.

सुमीत भातखंडे's picture

9 Sep 2012 - 10:20 pm | सुमीत भातखंडे

सही यार...
स्वतःचा व्यवसाय सुरु कर याबाबत सहमत...नक्की विचार कर

आज मिसळपाव वर आल्याचे सार्थक झाले असे प्रकर्षाने वाटले. स्पांडुरंगा नमोस्तुते _/\_

तुमच्या चिकाटी, जिद्द आणि कलेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. पोकळ वाचिवीरांच्या गर्दीत असे हे भरीव कामाचे धागे प्रकर्षाने लक्ष वेधून घेतात. पुन्हा एकदा नमोस्तुते _/\_

( स्वतः वाचिवीर असलेला परंतु खर्‍या कर्त्यांचा ५ वर फिरणारा पंखा ) बॅटमॅन.

एस's picture

31 May 2014 - 5:16 pm | एस

स्पाशेट, दंडवत हो!