उकडीचे मोदक

शेखर's picture
शेखर in जनातलं, मनातलं
28 Mar 2008 - 8:26 pm

मंडळी उकडीचे मोदक खायचे आहेत का? चला तर मग ते कसे बनवतात ते पाहु.

साहित्य
४ वाट्या किसलेला ओला नारळ
२ वाट्या कुटलेला अथवा किसलेला गुळ
१/२ चमचा वेलदोडे पुड अथवा जायफळ पुड
३ वाट्या तांदुळाचे पीठ
३ कप पाणी
३ चमचे लोणी
१/२ चमचा मीठ

कृती
एका भांड्यात खोवलेला ओला नारळ, गुळ, वेलदोडे पुड अथवा जायफळ पुड एकत्र करा व ते मिश्रण बर्‍यापैकी कोरडे व मोकळे होई पर्यंत गरम करा व नंतर बाजुला ठेवा.
हे मिश्रण गरम होई पर्यंत , दुसर्‍या बाजुला एका भांड्यात पाणी गरम करा. त्या पाण्यात चिमुटभर मीठ आणी थोडेसे लोणी टाका. हळुहळू त्या पाण्यात तांदुळाचे पीठ सोडा व ढवळत रहा. पीठ सोडत असताना पीठाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. दहा मिनीटे भांड्यावर झाकण ठेऊन मंद आचेवर गरम होऊ द्या.
ही उकड गरम असतानाच चांगली मळुन घ्या. मळताना हाताला थोडेसे तेल लावा म्हणजे उकड हाताला चिकटणार नाही.
उकड मळुन झाल्यावर लिंबा एवढे गोळे करा व गोळे पुरीच्या आकारात लाटा किंवा हातावर सपाट करा. नारळ आणी गुळाचे मिश्रण उकडीत भरा. उकड भरुन झाल्यावर सर्व बाजुने बंद करा व मोदक टोकदार करा.
मोदक तयार झाल्यावर एका भांड्यात पाणी ते भांडे गॅस वर ठेवा. त्या भांड्यावर चाळणी अथवा पातळ सुती कापड ठेवा. त्या चाळणीत अथवा कापडावर मोदक ठेऊन चाळणी अथवा कापड झाका. २० मिनीटे मोदक वाफेवर उकडुन घ्या. ही क्रिया तुम्ही ईडली पात्रात सुध्दा करू शकता.

आता मोदक खाण्यास तयार झाले.

गरम गरम मोदक ताटात घ्या आणी त्यावर भरपुर तुप घाला. तुपाशिवाय मोदक खाणे म्हणजे मोदकाचा अपमान ....

शेखर
(जगण्या साठी खाऊ नका... खाण्यासाठी जगा)

टीप : तात्या ह्यातील फोटो खादाडी वर टाकले तरी चालतील.

पाकक्रियामाहिती

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

23 Jul 2008 - 12:54 pm | विजुभाऊ

आहाहा भूक लागली.
हे असले मोदक एकदा गणपतीपुळ्याला खाल्ले होते केळीच्या पानात

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

धोंडोपंत's picture

23 Jul 2008 - 1:09 pm | धोंडोपंत

वा वा वा वा वा वा,

अतिशय सुंदर मांडणी आणि छायाचित्रेही छान. गणपतींच्या आधी अगदी योग्य वेळेस पाठविलेली माहिती.

शेखरराव, तुम्हाला आमच्या अनेक शुभेच्छा.

आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

स्नेहश्री's picture

23 Jul 2008 - 1:11 pm | स्नेहश्री

भुक चाळ्वली माझी........ फोटो जरा जास्ताच त्रासदायक आहेत हे.......बाप्पा आल्यशिवाय काही नाही मिळणार नाही......

स्वगतः आईला चतुर्थी साठी मस्का लावावा लागणार बहुदा..... :D

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

धोंडोपंत's picture

23 Jul 2008 - 1:19 pm | धोंडोपंत

स्नेहश्रीताई,

तुम्हांला मिसळपावावर पाहून आम्हाला आनंद झाला. खवय्येगिरी हा तुमचा प्रांत आहेच.

मिसळपाव वर हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा. तुमच्या "चित्तपावन खवैय्या" समूहातील पाककृती मिसळपाववर द्याव्यात.

आपला,
(पंतकाका) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

नंदन's picture

23 Jul 2008 - 1:14 pm | नंदन

लेख वाचताना खूप त्रास झाला खरा, पण फोटोज सुरेख आहेत.

>>> (जगण्या साठी खाऊ नका... खाण्यासाठी जगा)
-- अगदी! १००% सहमत आहे :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती दिनेश's picture

23 Jul 2008 - 1:17 pm | स्वाती दिनेश

केळीच्या पानावरील अन्नब्रह्म आणि सगळेच फोटो सुरेख!
मोद देणारा तो मोदक! किती सुंदर आणि अर्थपूर्ण व्याख्या आहे ना मोदकाची?
उकडीचे मोदक म्हणजे आपला लई म्हणजे लईच अशक्त बिंदू.(आता कधी बरं करावेत?इथे मोदक करायचे म्हणजे किती जमवाजमव करावी लागते..देवा गणेशा तुलाच रे माहिती..)
स्वाती

सहज's picture

23 Jul 2008 - 1:37 pm | सहज

असेच म्हणतो.

शेखरराव अश्या आवडीच्या पण परदेशात मिळायला / करायला अवघड पदार्थाचे फोटो दाखवुन जळवल्याबद्दल चिडू की नयनसुखाबद्दल धन्यवाद देऊ?

:-)

झकासराव's picture

23 Jul 2008 - 1:44 pm | झकासराव

=P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~

वर दिलेल्या स्मायलीइतके मोदक गट्टम करण्यास तयार आहे आत्ताच्या आत्ता. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

श्रीमंत दामोदर पंत's picture

23 Jul 2008 - 2:05 pm | श्रीमंत दामोदर पंत

भूक चाळवलित तुम्ही............

मनस्वी's picture

23 Jul 2008 - 2:11 pm | मनस्वी

सुंदर उपयुक्त पाककृती.
फोटो तर फार म्हणजे फार म्हणजे फारच सुंदर!
धन्यवाद शेखर!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

धमाल मुलगा's picture

23 Jul 2008 - 2:22 pm | धमाल मुलगा

जगदंब..जगदंब !!

आताच हापिसाच्या रद्दड क्यान्टीनला जेवून आलो आणि पाहतो तर उकडीचे मोदक!!!!

तोंडाला नुसतं पाणी सुटलं....
=P~ =P~ =P~ =P~

शेखरभाऊ,
मस्तच :)

आणि हो, छुपे रुस्तुम निघालात की! एकदम पेठकरकाका, विजुभाऊ ह्या बल्लवाचार्यांच्या पंगतीतले निघालात की तुम्ही!

छान छान!
खिलवा अजुनही मस्त मस्त पदार्थ :)

जादू's picture

23 Jul 2008 - 2:52 pm | जादू

सुंदर लेख सुंदर छायाचित्र, आताच भूक लागली.
पण थोडी वाट पाहावी लागेल.
"गणपती बाप्पा मोरया"

अन्जलि's picture

23 Jul 2008 - 5:21 pm | अन्जलि

इतके सुन्दर मोदक दिसतात लगेच खावेसे वाटले पण ते करणे सोपे नाहि कारण उकड चागलि जमलि नाहि तर नुस्ते उकडलेले गोळे खावे लागतात. तेथे पहिजे जतिचे.... फोटो खुप छान.

चकली's picture

23 Jul 2008 - 11:17 pm | चकली

छान पाककृती. मोदक जेवढे जास्त वेळा करू तेवढे छान होत जातात, असा अनुभव आहे.

चकली
http://chakali.blogspot.com

धनंजय's picture

24 Jul 2008 - 12:47 am | धनंजय

उकडीची पारी करून ती न फुटता भरणे, हे कधी मला जमलेलेच नाही. त्यामुळे मी उकडीला मीठ लावून फोडणी देतो, तशी खातो. सारण तसेच ताटात वाढून घेतो आणि खातो.

या फोटोंमध्ये हे मोदक सहजगत्या झालेले आहेत, सुंदर दिसत आहेत, आणि मला भूक लागलेली आहे. निषेध, निषेध, निषेध.

शितल's picture

24 Jul 2008 - 1:59 am | शितल

उकडीचे मोदक एकदम सही कृती आणि फोटो ही मस्त
माझ्या आजु बाजुचे मला ते करायला घरी बोलवतात आम्ही कोकणस्थ असल्याने उकडीचेच मोदक दर संकष्टीला करतो त्यामुळे हात पटपट वळतात.
केळीच्या पानात मस्त वरण- भात, तुप सोडलेले मोदक. बास स्वर्ग मग तेथे.

=P~ शेखरभौ, का, का असं करताय?
अहो ते मोदक चिडवतायत हो मला! =P~ =P~ =P~

चतुरंग

संदीप चित्रे's picture

24 Jul 2008 - 2:18 am | संदीप चित्रे

ह्यावर्षी गणपती लवकर येतील का?
--------------------------
www.atakmatak.blogspot.com

स्वप्निल..'s picture

24 Jul 2008 - 4:45 am | स्वप्निल..

इथे अमेरीकेत असल्याचा पश्चाताप होत आहे..बर्गर वगैरे खाल्ल्यानंतर अस काही पाहीले की फार त्रास होतो..

शेखर,
एकदम मस्त कृती ...छान चित्रं..

स्वप्निल..
>>शेखर तुम्ही अमेरीकेत असता काय हो..यावेळेस गणपति उत्सव तुमच्याकडेच साजरा करुया म्हनतो..;)

शेखर's picture

24 Jul 2008 - 11:11 am | शेखर

नाही हो... पुण्यात असतो.... पुण्यात आलातर तुम्हाला घरी घेउन जाईन खायला...

मदनबाण's picture

25 Jul 2008 - 2:42 pm | मदनबाण

व्वा,,मोदक्..माझा एकदम आवडता पदार्थ..मला तर सारण खाण्याचीच घाई जास्त होते ..जरा पण धीर धरवत नाही..

(खादाड)
मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda