शाळा
अथांग सागर यांच्या आठवणी या कवितेमुळे आम्हाला ही शाळेची आठवण झाली
-------------------------------------------------------------------------
शाळे समोरुन जाताना
बालपण मनात गवसत
वर्गात डोकाऊन पहाताना
आठवणींनी मन भरतं
मागे वळुन पहाताना
वाटत तिथेच आहोत आज
तेच सर्व मित्र अन्
तोच बसायचा बाक
आठवणी असतात अभ्यासाच्या
मार दिलेल्या गुरु़जींच्या
मधल्या सुट्टीत गंमत भारी
होती शाळा माझी न्यारी.
माझ्याही आहेत अनेक आठवणी
शाळे मधल्या गमतीच्या
खेळामधल्या मस्तीच्या
सहलीतल्या सफरीच्या
ह्रदयात त्या रुजल्या आहेत
कायमच्या घर करुन बसल्या आहेत
जरी...
दिवस आता बदलले आहेत.
आठवणी विसरत नसतात
संस्कारां बरोबर येत असतात
घडवायचे असते जिवन आपुले
शाळेला कधी विसरायचे नसते.
प्रतिक्रिया
23 Jul 2008 - 1:58 pm | सैरंध्री
छान आहे कविता. आपले व्यकीमत्व घडताना आपल्या आयुष्यात शाळेने महत्वाची भूमिका बजावलेली असते. भूतकाळ आठवताना लहानपणीच्या आठवणींमध्ये शा़ळेच्या आठवणी हा एक मस्त टॉपिक असतो.
माझ्याही आहेत अनेक आठवणी
शाळे मधल्या गमतीच्या
खेळामधल्या मस्तीच्या
सहलीतल्या सफरीच्या
ह्रदयात त्या रुजल्या आहेत
कायमच्या घर करुन बसल्या आहेत
ह्या ओळी आवडल्या.
सैरंध्री
23 Jul 2008 - 2:13 pm | मनस्वी
शाळे समोरुन जाताना
बालपण मनात गवसत
वर्गात डोकाऊन पहाताना
आठवणींनी मन भरतं
खरं आहे! छान कविता! आवडली.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
23 Jul 2008 - 2:15 pm | बिपिन कार्यकर्ते
अमोल, कविता आवडली. सद्ध्या आम्ही काही मित्र परत भेटण्याचे ठरवतो आहोत. त्यातल्या एकाने अगदी अश्याच भावना व्यक्त केल्या आहेत.
मागे वळुन पहाताना
वाटत तिथेच आहोत आज
तेच सर्व मित्र अन्
तोच बसायचा बाक
मला तर बहुतेक सगळ्या वर्षांचे वर्ग आणि बाक आठवत आहेत. :)
बिपिन.
23 Jul 2008 - 3:01 pm | अनिल हटेला
शाळेची आठवण झाली !!!
तो बाक ,ते दप्तर ,
ते मित्र , आठवले ते शिक्षक ...
त्यान्नी दिलेला मार ,धरलेले कान !!!!
पाठीवर दिलेली शाबासकी !!
सगळ सगळ आठवल !!!
छान कविता!!!
हे वे सा न.....
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
23 Jul 2008 - 11:31 pm | llपुण्याचे पेशवेll
अमोलशेठ छान कविता. शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या.
(शेवटच्या बाकावरचा आणि १०वीला सक्तिने पहील्या बाकावर बसवला गेलेला)
पुण्याचे पेशवे
23 Jul 2008 - 11:34 pm | वरदा
मग ही कविता...
छे आता खूपच नॉस्टॅल्जीक वाट्टंय...
छान कविता...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
23 Oct 2023 - 9:47 pm | रंगीला रतन
मस्त कविता.