विकी वरची माहिती
भाषांतरित करून
मेगाबायटी प्रतिसाद देणार
मीही हुच्चभ्रू होणार ||१||
धागे हायजॅक करून
गोंधळ मी घालणार
मीही हुच्चभ्रू होणार ||२||
राजकीय-धार्मिक मुद्यांनाच
हात मी लावणार
मीही हुच्चभ्रू होणार ||३||
ललित लेखनाला
फाट्यावर मारणार
मीही हुच्चभ्रू होणार ||४||
इतर धाग्यांना
तुच्छ मी मानणार
मीही हुच्चभ्रू होणार ||५||
मराठी संस्थळावर
इंग्रजी प्रतिसाद मी देणार
मीही हुच्चभ्रू होणार ||६||
संस्थळांवर लॉगिन न करता
वाचनमात्र मी राहणार
मीही हुच्चभ्रू होणार ||७||
प्रतिक्रिया
22 Jan 2012 - 2:24 pm | दादा कोंडके
मजा आली. काही भर घालतो. :)
काय लिहिलंय त्यापेक्षा,
कोणी लिहिलय ते बघणार,
मीही हुच्चभ्रू होणार||८||
22 Jan 2012 - 6:05 pm | पक पक पक
१ नं.....
काव्यास आणि काव्यपुर्तीस देखिल ___/\___
22 Jan 2012 - 2:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चालू दे..... !!! :)
-दिलीप बिरुटे
22 Jan 2012 - 2:39 pm | पैसा
आणि एक र्हायलं, प्रतिसादांमधे 'अव्यक्त जाणीवा, नेणीवेची पातळी, संपृक्त, व्यवच्छेदक' असले जडजंबाल शब्द वापरा, भले त्याचा अर्थ तुम्हाला पण कळला नाही तरी चालेल; की झालातच तुम्ही हुच्चभ्रू.
22 Jan 2012 - 6:08 pm | पक पक पक
सहमत आहे....
येक्दम खरं बोललात....
22 Jan 2012 - 2:47 pm | सुहास..
हा हा हा !!
फक्कड
माझा लई मेगाबायटी प्रतिसाद इथे अपेक्षित असेल काही लोकांना ;)
त्यापेक्षा खव मधे एक जुनी लिंक देतो रे अन्या
22 Jan 2012 - 3:07 pm | अत्रुप्त आत्मा
वा अन्या भौ...अगदी मोजुन मारल्या हायती,पन दादा कोंडक्याची भर जोरदार दनका देनारि हाय...!
22 Jan 2012 - 3:16 pm | ५० फक्त
अपु-या अन जुन्या पुराण्या माहितीवर आधारीत कविता आहे.
हल्लीचे हुच्च्भ्रु असे नसतात, किंबहुना हल्ली असे प्रकार करुन हुच्चभ्रु होता येत नाही, त्यासाठी , जाउदे उगा फुकट सल्ले का द्या ?
तात्पुरती सही -
नव्यांना प्रतिसाद. जुन्यांना वा वा, धाग्याला टिआरपी वरच्यावरी - हुच्चभ्रुपणा येता घरी.
22 Jan 2012 - 3:52 pm | सुहास..
नव्यांना प्रतिसाद. जुन्यांना वा वा, धाग्याला टिआरपी वरच्यावरी - हुच्चभ्रुपणा येता घरी. >>>
टिआरपी नाय वो, ट्यार्पी >>>>
तात्पुरती सही -
तुमचं आमचं सेम नसतं !!
22 Jan 2012 - 5:26 pm | प्रचेतस
ट्यार्पी ला आता मी,
टिआरपी च म्हणत बसणार,
मीही हुच्चभ्रू होणार.
22 Jan 2012 - 3:31 pm | यकु
नव्यांना प्रतिसाद. जुन्यांना वा वा, धाग्याला टिआरपी वरच्यावरी - हुच्चभ्रुपणा येता घरी.
=)) =)) =)) =))
22 Jan 2012 - 3:47 pm | अन्या दातार
काही गोष्टी राहिल्या असतील तर दादा कोंडकेंनी केल्याप्रमाणे अॅड करा.
@ ५० फक्तः ज्या गोष्टी सार्वकालिक आहेत त्यावर लिहिले आहे. नव्या गोष्टींवर एक नवी कविता करु कि! हाकानाका :D
22 Jan 2012 - 4:24 pm | सुहास झेले
हा हा हा ... लैच !!
_/\_
_/\_
22 Jan 2012 - 5:10 pm | सूड
धाग्यांना ही & हि
प्रतिसाद देणार
मीही हुच्चभ्रू होणार !!
22 Jan 2012 - 7:02 pm | वपाडाव
मी तर इतका वेळ प्रतिसाद न देउन हुच्चभ्रुच झालो होतो असे जाता जाता णमुद करतो.....
22 Jan 2012 - 7:09 pm | किचेन
कॉलिंग सौ. साराभाई.....त्य शिक्वतिल तुम्हल हुछब्रू होन काय असत.
22 Jan 2012 - 7:09 pm | किचेन
कॉलिंग सौ. साराभाई.....त्य शिक्वतिल तुम्हल हुछब्रू होन काय असत.