इच्छा मरण

रघु सावंत's picture
रघु सावंत in जनातलं, मनातलं
11 Jan 2012 - 7:56 pm

मला मरण यावे ते समुद्रात यावे
एकदा तरी मनसोक्त मला माशांनी खावे
आयुष्यभर मी ज्यांचे लचके तोडले
त्यांनी मला एकदा फाडले तर काय बिघडले
ज्यांच्या मऊ अंगावर मसाला लिंबू चोळून
तव्यावर खरपूस भाजून टाकले मी खाऊन
मी मेल्यावर हे हात त्यांना दिसावेत
एकदा तरी मनसोक्त मला बोंबलानी खावे.
कधी सुंगटाची कढी कधी तव्यावर जवला
वांग्याचं भरीत ,कधी कोलंबी मसाला
बाहेर पडलेल्या जिभेवर त्यांनी हक्काने बसावे
एकदा तरी मनसोक्त मला कोलंबीने खावे
कोळणीकडे निपचीत पडलेली सुरमई पापलेट
किंमत कमी करून मी दिली सारात सोडून
त्या सुरमई पापलेटाने मला कमी भावात आणावे
एकदा तरी मनसोक्त मला सुरमई पापलेटाने खावे
खोबरं लाल तिखट धणे कोकम तिरफळ खास
बांगड्याच्या तिखल्याचा मी रोज घेतला वास
त्यांना रसरशीत शरीर हे मी मेल्यावर दिसावे
एकदा तरी मनसोक्त मला बांगड्यांनी खावे
आठवड्याचे चार वार असंख्य बंधू केले ठार
जी मांदेली वाट्यावर स्वस्त एकावेळी केली दहा मी फस्त
त्या सगळ्यांनी मिळून मला चक्र व्युहात फसवावे
एकदा तरी मनसोक्त मला मांदेलीने खावे
वर्षातून एकदा महागडा हलवा घरात आणला
ज्यास्त पैसे दिले म्हणून काट्यासकट खाल्ला
त्या हलव्याने मला एकटं खिंडीत गाठावे
एकदा तरी मनसोक्त मला हलव्याने खावे
म्हणूनच मला मरण यावे ते समुद्रात यावे
एकदा तरी मला मनसोक्त मला माशांनी खावे

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

11 Jan 2012 - 8:15 pm | कपिलमुनी

याची चिंता लागुन राह्यली

गेले चौर्यायशी लक्ष योनी इतरांकडुन हाल भोगत इथे तिथे फिरल्यावर, बहुतेक या जन्मात उट्टं भरुन काढायला मुद्दाम गणपाचा जन्म मिळाला असावा तेव्हा आपण तर बॉ मनोसोक्त बदला घेणार.
कल किसने देखा हय. ;)

आईगं! नको नको.
त्या हलव्याने मला एकटं खिंडीत गाठावे
त्या हलव्याने मला एकटे खिंडीत गाठावे.

तिमा's picture

12 Jan 2012 - 6:43 pm | तिमा

काट्यासकट हलवा खाल्यावर त्या काट्याने जिवंतपणीच तुमची खिंड लढवली का हो ?

पैसा's picture

11 Jan 2012 - 8:56 pm | पैसा

तू आणि जागुतै लौकरात लौकर शाकाहारी व्हा!!!

आणि आमचं शाकाहारी लोकांचं काय होणार? नारायण धारपांच्या गोष्टीतल्यासारखं गवत मला खायला येणार अशी दृश्यं आताच डोळ्यासमोर दिसायला लागलीयत!

haha

अवांतर:
बरय बाबा.. तु माशेच खावून राहिलाय ..
उगा चिकन बिकन खात असता तर तुला कोंबड्याच्या पोल्ट्रीतच नायतर गावराण खुराड्यातच मरण आणावे लागले असते ना..

मुद्द्याचे :
लेखन आवडले

खास कविता. आवडेश.
भीतीही वाटली..
देवा रे. मला तर मोरीचं कालवणही आवडतं.

प्रशांत's picture

11 Jan 2012 - 9:11 pm | प्रशांत

हे लिहितांना सुद्धा तुमच्या तोंडाला पाणि सुटलं असेन.
मस्त लिहिलयं..
अवांतरः मासे कधि खात नाहि त्यामुळे भिती वाटली नाहि.

जागु काकु तर हे वाचुन बेशुद्धच पडतील ;-)

मन१'s picture

11 Jan 2012 - 9:59 pm | मन१

कविता आवडली, त्याहूनही प्रतिसाद जास्तच आवडले. "बाकिबाब " बा भ बोरकर ह्यांनीही गंमतीत शेवटची ईच्छा "आजवर मी माशांवर जगलो आता माशांना माझ्यावर जगू द्या" असे म्हणत आपला देह समुद्रार्पण करायची कल्पना मांडली होती.

शाकाहारी,

टुकुल's picture

11 Jan 2012 - 10:17 pm | टुकुल

मस्त कविता.. आवडली.

आधी शिर्षकावरुन वाटल कि काही लेख आहे कि काय, आणी त्यावर आधी सारखी झुंबड उडणार, पण कविता वाचुन बर वाटल.

--टुकुल.

किचेन's picture

11 Jan 2012 - 11:22 pm | किचेन

माझे आवडते बोंबील,पापलेट,सुरमई,कोळंबी,ओयास्तर,काटेक्रली माझ्या चौबाजूंनी येऊन माझे तुअकडे तोडतायत अस स्वप्न पडणार आज.
नशीब त्यात चिकन,मटन,एकदा खाल्लेलं हॅम हे सगळे नाहीयेत.नुसत्या कल्पनेनच कसातरी होतंय.
सगळ्या माशांना सोर्री. :(

अवांतर:
एकदा पटायाला समुद्राखाली गेलो होतो.तिथल्या गायीडणे हातात माशांच एक अन्न दिल तेव्हा चहुबाजूने शेकडो मासे जमा झाले होते.माशांनी आमच्या हाताला खाऊ नये म्हणून हातमोजा घालयाला दिला होता.त्या सगळ्या माशांनी आम्हाला खाल्ल असत तर?तेव्हा किती सुन्दर वाटल होत.

प्रभाकर पेठकर's picture

12 Jan 2012 - 2:09 am | प्रभाकर पेठकर

निसर्ग नियमानुसार सर्व घडते.

ज्या ज्या माशांना आपण खातो तेही लहान माशांना, आपल्याच धाकट्या सहचरांना, खाऊन जीवन जगत असतात. कित्येकदा एखादा मासा साफ करायला घ्यावा तर त्याच्या पोटातून लहान मासे मिळतात.

ज्या माशाच्या तोंडात, मासे पकडायचा, काटा आपण अडकवून त्यांना पकडतो तेच मासे कधी मरणोत्तर त्यांचा 'काटा' आपल्या घशात अडकवून आपले प्राण कंठाशी आणतात.

जीवो जीवस्य जीवनम् असे कांहीसे संस्कृत वचन आहे. त्याला स्मरून मासे, कोंबड्या, बोकड खाताना कधी अपराधी वाटत नाही.

मृत्युन्जय's picture

12 Jan 2012 - 12:56 pm | मृत्युन्जय

पॉर्क आवडणार्‍या लोकांची दया यायला लागली आज अचानक. ;)

कवितेचे तात्पर्य खायचे तर फक्त बीफ खा. धोका नाही ;)

रघु सावंत's picture

16 Jan 2012 - 2:36 pm | रघु सावंत

धन्यवाद सभ्य स्त्री पुरुष हो , तुम्ही माझ्या या ' इच्छा मरण ' ला होय्कार दिलात . म्हणजे मी हा जो विचार केला आहे. तो बरोबरच आहे. ईतरहि बरच खाल्ल गेल आहे माझ्या कडुन. एतके कशाला मि जे शिंपले खाल्ले आहेत त्या शिंप्ल्याने मला गिळले तरी माझा मोती होणार नाही. --- रघूसावंत या नंतर मी पाहिलेली 'हिरकणी' सादर करीन तुम्ही असेच माझ्या बरोबर असाल हि आशा (मुलगी नाही). रघू सावंत