गीतगुंजन - १
गीतगुंजन - २
गीतगुंजन - ३
गीतगुंजन - ४
गीतगुंजन - ५
गीतगुंजन - ६
गीतगुंजन - ७
गीतगुंजन - ८
गीतगुंजन - ९
आपल्या या धाग्यावर अनेक उत्तमोत्तम इंग्लिश गाण्यांची माहिती आपण घेत आहोत, आता यातच आणखी एका अवीट गाण्याची भर पडत आहे.
हॅल डेव्हिड आणि बर्ट बकाराक यांनी १९६९ मध्ये लिहिलेलं आणि बिली जो थॉमस ने गाऊन प्रसिद्ध केलेलं "Raindrops Keep Falling On My Head" हे गाणं त्यावेळच्या 'Butch Cassidy and the Sundance Kid' या अप्रतिम चित्रपटात वापरण्यात आलं. या गाण्याला त्या वेळचा सर्वोत्कृष्ट गाण्याबद्दलचा आणि ओरिजिनल संगीताचा 'ऑस्कर' पुरस्कार मिळाला.
मला वाटतं की या गाण्याचं आणि 'Butch Cassidy and the Sundance Kid' चित्रपटाचं एकमेकांशी नक्कीच काहीतरी नातं असावं. नाही तर रे स्टेवेन्सला त्याच्या चित्रपटासाठी देऊ केलेलं हे गाणं त्याने नाकारलंच नसतं. त्याने नाकारलं आणि या चित्रपटाने स्विकारलं. ते म्हणतात ना, रेस्ट इज हिस्ट्री....
पॉल न्यूमन, रॉबर्ट रेडफोर्ड आणि कॅथरीन रॉस अभिनित या नितांत सुंदर चित्रपटात या गाण्याचं 'पिक्चरायझेशन' सुद्धा पॉल न्यूमन आणि कॅथरीन रॉस यांच्यावर फारच छान केलेलं आहे.
या गाण्याची दोन व्हर्जन्स आहेत. एक, बी. जे. थॉमसचं मूळ सिंगल व्हर्जन आणि 'Butch Cassidy and the Sundance Kid' चित्रपटासाठीचं खास नव्याने ध्वनिमुद्रित झालेलं दुसर. चित्रपटातल्या व्हर्जनमध्ये बी. जे. थॉमसचा आवाज काहीसा जड वाटतो. काही ठिकाणी तो चिरकतोही. या व्हर्जनच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी थॉमसला लॅरिंजायटीसचा त्रास होत असल्यामुळे असं घडलेलं पण ते ही ऐकायला छान वाटतं. पॉल न्यूमन करत असलेल्या सायकलवरील कसरतीसाठी गाण्यात इन्स्ट्रुमेन्टल ब्रेक घेण्यात आलाय पण या ब्रेकमुळे गाण्याची आणि सादरीकरणाची खुमारी अधिकच वाढलीय असं मला वाटतं.
१९७० साली हे गाणं युरोप आणि अमेरिकेतल्या चार्टसमध्ये १ल्या क्रमांकावर पोहोचलं. २००८ साली बिलबॉर्ड हॉट १०० ऑल टाईम टॉप गाण्यांच्या क्रमवारीत हे ८५व्या क्रमांकावरचं प्रसिद्ध गाणं बनलं.
या श्रवणीय गाण्याचा आनंद घेणे वादातीत आवश्यक आहे. प्रेक्षणियतेच्या दृष्टीने 'Butch Cassidy and the Sundance Kid' मधलंच ऐकू या!
हे गीत -
Raindrops keep fallin' on my head
And just like the guy whose feet are too big for his bed
Nothin' seems to fit
Those raindrops are fallin' on my head, they keep fallin'
So I just did me some talkin' to the sun
And I said I didn't like the way he got things done
Sleepin' on the job
Those raindrops are fallin' on my head, they keep fallin'
But there's one thing I know
The blues they send to meet me won't defeat me
It won't be long till happiness steps up to greet me
Raindrops keep fallin' on my head
But that doesn't mean my eyes will soon be turnin' red
Cryin's not for me
'Cause I'm never gonna stop the rain by complainin'
Because I'm free
Nothin's worryin' me
[trumpet - Instrumental break]
Raindrops keep fallin' on my head
But that doesn't mean my eyes will soon be turnin' red
Cryin's not for me
'Cause I'm never gonna stop the rain by complainin'
Because I'm free
Nothin's worryin' me
छायाचित्रे आंतरजालावरून साभार....
प्रतिक्रिया
9 Jan 2012 - 1:07 pm | बिपिन कार्यकर्ते
अजून एक उत्तम गाण्याची ओळख! धन्यवाद प्रास! :)
9 Jan 2012 - 1:14 pm | पियुशा
+१ हेच म्हणते :)
9 Jan 2012 - 1:15 pm | गवि
गाण्याच्या शब्दांत गोडवा.. चालीत गोडवा.. वरच्या कडव्यात एक निरागस गोड विचार आणि लगेच खालच्या कडव्यात दुर्दम्य आशावाद..
हे गाणं म्हणजे उत्कृष्ट लिरिक्सचा आणि उत्कृष्ट संगीताचा नमुना आहे.
या गाण्याचं पॅरडी साँग स्पाय हार्ड या स्पूफपटात घेतलं होतं. अगदी सायकलच्या सीनसह. ;)
लगे रहो प्रासभाय.. यादों की बारात, असं नाव द्यायला हवं तुझ्या लेखमालेला...
9 Jan 2012 - 3:19 pm | इष्टुर फाकडा
अतिशय आवडतं गाणं !! सुंदर माहितीबद्दल धन्यवाद :)
9 Jan 2012 - 7:57 pm | मराठी_माणूस
ह्या गाण्या वरुन "तेरे मेरे सपने" मधले "ए मैने कसम ली " हे गाणे आठवले
10 Jan 2012 - 2:40 pm | राजा
चलते चलते चित्रपटातील " दुर दुर तुम रहो" हे ते गाणे आहे
9 Jan 2012 - 10:03 pm | जाई.
हे ही गाणं छान आहे