अनामिक भटकंती ४: केरळ - B. अॅलेप्पी: http://www.misalpav.com/node/20253
अनामिक भटकंती ४: केरळ - A.मुन्नार: http://www.misalpav.com/node/20240
अनामिक भटकंती ३ - रतनगड: http://www.misalpav.com/node/19239
अनामिक भटकंती २ - सांदण दरी: http://www.misalpav.com/node/18728
अनामिक भटकंती १ - राजा रायगड: http://www.misalpav.com/node/18323
त्रिवेंद्रम - कोवलम मध्ये दुपारी आल्यावर, संध्याकाळ मस्त लाईट हाउस( हवा) बीच वर घालवायची असा इरादा होता, पण अचानक जवळ असलेले पूवार आठवले, पूवार तसे पर्यटनापासुन अजुन तरी दूर होते., नजिकच्या काळात तो एक हॉट स्पॉट होउ पहात आहे.
ड्रायवर ला निटसे विचारुन घेतले, आनि समुद्रावर मस्त हुंदाडायला घातलेल्या साध्या कपड्यावरच पूवारला जाणे फायनल झाले..
कोवलम पासुन १७ किमि दूर, आणि कन्याकुमारी ला जोडुन केरळचे सर्वात शेवटचे टोक म्हणजे पूवार. नेय्यार नदि येथे समुद्राला मिळते, जेथे समुद्राला मिळते तेथे बॅक वॉटर मध्ये तीन आयलंडस तयार झालेत, गर्द झाडी.. निळेशार नदिचे स्वच्छ पाणी, आणि नदी आणि समुद्राच्या मध्ये असलेला सोनेरी बीच, (Golden beach म्हणजे येथे संध्याकाळी सर्व किनारा सोनेरी होतो)
आता आमची पाण्यातील प्रवासाला ( जे मला खुप आवडते) सुरवात झाली...
पलिकडे दिसत आहे तो बीच, आता आम्ही नदिच्या पाण्यात आहोत, त्या बिच च्या पलिकडे समुद्र आहे, उजव्या कोपर्याला नदि समुद्राला मिळते, पण सध्या पाणी कमी झाल्याने, आणि वाळु जास्त वाहत आल्याने प्रत्यक्ष तो क्षण टिपता आला नाही, उगाच तेथे उड्या मारल्या...
समुद्रः
एका बाजुला समुद्र, दुसर्या बाजुला नदि
D. कोवलम :
सकाळी त्रिवेंद्रम ला पद्मनाभ टेंपलला भेट देवुन , आरतीच्या टाईमला बरोबर दर्शन घेवून पुन्हा जेवुन कोवलम ला आलो,
केरळा राईस प्लेट, नंतर घम्याले (भाताचे) घेवुन अनलिमेटेड वाडले जाई,
लाईट हाऊस बीच :
आमच्या हॉटेल मागील बीच :
प्रतिक्रिया
5 Jan 2012 - 5:01 am | पाषाणभेद
यावेळचे फोटो थोडे काळसर का दिसत आहेत? की मलाच ते दिसत आहेत?
5 Jan 2012 - 1:36 pm | गणेशा
तुम्हाला एकदम काळे दिसत असले तर तसे नाहियेत फोटो,
परंतु संध्याकाळची वेळ आणि परिसराच्या हिरव्या सावलीमुळे फोटो तसे वाटत असतील.
संध्याकाळचे फोटो संध्याकाळचेच वाटावेत म्हणुन शक्यतो फ्लॅश मोड ऑन नव्हता केला
5 Jan 2012 - 12:06 pm | प्रचेतस
मस्त फोटो रे गणेशा.
(प्रेमाच्या वर्षावात डुंबत असल्यामुळेच की काय) पाण्यात डुंबला नाहीस का यावेळी? ;)
5 Jan 2012 - 12:11 pm | अन्या दातार
गणेशाचे पाणीप्रेम पावसाळी सहलीत उफाळून आलेले बघितले असल्याने शंका रास्त आहे. यावेळचे त्याचे पाणीप्रेम दुसरीकडे उतू गेले वाटते. (अर्थात तेच अपेक्षित आहे म्हणा) :)
5 Jan 2012 - 1:33 pm | गणेशा
कोवलम बिच वर मस्त भिजलो रे... उंच लाटांवर स्वताला झोकुन देण्यात खुप आनंद होता...
5 Jan 2012 - 12:21 pm | गवि
सुंदर ठिकाण आहे रे हे... फोटोंद्वारे आम्हाला सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद..
5 Jan 2012 - 2:12 pm | प्रास
अगदी असंच बोल्तो मी पण.....
5 Jan 2012 - 6:31 pm | रेवती
सगळे फोटू भारी आलेत.
पहिला फोटू अंमळ रोम्यांटीक आल्या गेला आहे.;)
केरळ म्हटले की फोटूत नारळाची झाडे हवितच.
राईसप्लेट ही खरोखर फक्त राईसचीच प्लेट असते.
केळं दिलेलं पाहून हसू आलं.
5 Jan 2012 - 7:05 pm | अन्या दातार
>>केळं दिलेलं पाहून हसू आलं.
यात हसण्यासारखं काय आहे? आय मीन, केळं हे राईसप्लेटमध्ये स्वीट डिश म्हणून दिलेले असेल कदाचित. प्लेटमध्ये असलेल्या स्थानामुळे अन्य काही हेतूने दिल्यासारखे नक्कीच वाटत नाही. ;)
5 Jan 2012 - 9:13 pm | रेवती
मला स्वतंत्र भारताची नागरिक म्हणून हसण्याच्या अधिकार घटनेनी दिलेला आहे.;)
आपल्याकडे राईसप्लेट म्हटले तरी एखादी पोळी/ दोन पुर्या देतात पण केरळात देत नाहीत हे समजले. स्वीट डीश म्हणून खीर वगैरे प्रकार असतो पण फळ दिले आहे म्हणून मजेदार वाटले इतकेच.
5 Jan 2012 - 9:59 pm | अन्या दातार
>>स्वीट डीश म्हणून खीर वगैरे प्रकार असतो पण फळ दिले आहे म्हणून मजेदार वाटले इतकेच.
ओके. मी एकदा असा प्रकार अनुभवला असल्याने मला आश्चर्य वाटले नाही. (हॉटेल जाई-जुई-मोगरा, कोल्हापूर) :D
(डाऊन मार्केट) अन्या
5 Jan 2012 - 9:43 pm | अत्रुप्त आत्मा
जबरीच फोटो हो गणेश भाऊ....! तुंम्ही फार अप्रतिम सफर केलीयेत राव...!
5 Jan 2012 - 10:20 pm | ५० फक्त
वेळात वेळ काढुन लई भारी फोटो काढल्याबद्दल आणि इथं डकवल्याबद्दल अतिशय धन्यवाद, मन डळ आभारी आहे.
6 Jan 2012 - 9:50 am | बज्जु
सुरेख फोटो. मला सुध्दा ३ वर्षापुर्वी केलेल्या कोस्टल कर्नाटक ट्रीपची आठवण झाली. धन्स.
बज्जु.
6 Jan 2012 - 12:32 pm | गणेशा
सविस्तर धागा आणि फोटो यावेत अशी मनोमन इच्छा ..
फोटो छान आला आहे तुमचा
6 Jan 2012 - 10:43 am | वपाडाव
गण्या, शेवटून दुसर्या फटुत तु सावधान मध्ये का उभा आहेस ???
6 Jan 2012 - 10:48 am | प्रचेतस
त्याआधी कोणीतरी त्याला 'विश्राम' केलं असेल.
6 Jan 2012 - 12:32 pm | वपाडाव
ह्याला बीच असे लिहावे.... नाहीतर वेगळा अर्थ निघतो....
6 Jan 2012 - 10:37 pm | पैसा
हे ठिकाण छानच दिसतंय.
7 Jan 2012 - 6:42 am | मराठमोळा
केरळ ला भेट देणं किती वर्षांपासून राहुनच गेलय..
कधी योग येतोय देव जाणे.
बाकी फोटु मस्त. :) तो फोटोतला भात पाहून मला माझ्या चेन्नईतल्या वास्तव्याची आठवण झाली.
7 Jan 2012 - 3:50 pm | सुहास झेले
व्वा...मस्त फटू.... :)