गीतगुंजन - ७
गीतगुंजन - ६
गीतगुंजन - ५
गीतगुंजन - ४
गीतगुंजन - ३
गीतगुंजन - २
गीतगुंजन - १
'Immigrant Song' -> Led Zappelin
जिमी पेज, रॉबर्ट प्लाण्ट, जॉन बोन्हॅम आणि जॉन पॉल जोन्स ही चार नावं एकत्र घेताच, जसं 'त' वरून 'ताकभात' ओळखतात, तसं दर्दी कानसेन केवळ एकाच नावाचा गजर करतात आणि ते नाव म्हणजे 'लेड झॅपलिन'. साठच्या दशकाच्या उत्तरार्धात स्थापन झालेला हा म्युझिकल बॅण्ड आज अनेक वर्षांनंतरही आपली लोकप्रियता टिकवून आहे. झालेत बहु होतील बहु पण 'लेड झॅपलिन' नही सुना तो हार्ड रॉक नि हेवी मेटल म्युझिकको नहीच सुना अशी परीस्थिती आहे हे नक्की!
सत्तर सालच्या सुमारास 'लेड झॅपलिन' आईसलँडचा स्थानिक सांस्कृतिक खात्याच्या निमंत्रणावरून दौरा करत असताना, रेक्याविक शहरात त्यांचा ज्या दिवशी कार्यक्रम होता त्याच दिवशी तिथल्या सर्व सरकारी कर्मचार्यांनी सरकारच्या इमिग्रंट पॉलिसीविरुद्ध संप पुकारला (असं सांगतात). त्यामुळे ही कॉन्सर्ट होतेय की नाही अशी परीस्थिती निर्माण झाली. पण तिथल्या विद्यापीठाने त्यासाठी आपले सभागृह उघडून दिले आणि विद्यार्थ्यांच्या अपूर्व उत्साहात ही कॉन्सर्ट संपन्न झाली. बॅण्डच्या या दौर्याच्या अनुभवांचा एक भाग म्हणून जिमी पेज आणि रॉबर्ट प्लाण्ट यांनी 'Immigrant Song' हे हेवी मेटल - हार्ड रॉक गाणं रचलं. या गाण्यात स्कॅण्डेनेवियन वायकिंग स्पिरिट पुरेपुर उतरलंय असं 'लेड झॅपलिन' मानतं.
मी हे गाणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हा लक्षात राहिलं ते सुरुवातीचं गिटारचं जबरदस्त ओपनिंग जे पुढे आपला सतत माग घेत जातं. हे आहे जॉन पॉलचं तुफान गिटार बॅस रिफ. नंतर जिमी पेजने आपल्या इलेक्ट्रिक गिटारचा करिष्मा दाखवलाय. जॉन बोन्हॅमचे ड्रम्स गिटार बेसचा झकास पाठपुरावा करतात. या सगळ्याचं एकत्रित रसायन अस्सल हेवी मेटलची ओळख करवून देतं आणि अर्थातच त्याबरोबर ती एका मुलीची वैशिष्ट्यपूर्ण आरोळी जी या गाण्यात कडव्याच्या सुरूवातीला आपल्याला ऐकू येते, पण नंतर कळलं की ती आरोळी स्वतः बॉब प्लाण्टचीच आहे.
हे अख्ख गाणं एकूणच झिंगाट आहे यारों!!!
मजा लुटा.........
हे Immigrant Song चे शब्द -
Ah, ah,
We come from the land of the ice and snow,
From the midnight sun where the hot springs blow.
The hammer of the gods will drive our ships to new lands,
To fight the horde, singing and crying: Valhalla, I am coming!
On we sweep with threshing oar, Our only goal will be the western shore.
Ah, ah,
We come from the land of the ice and snow,
From the midnight sun where the hot springs blow.
How soft your fields so green, can whisper tales of gore,
Of how we calmed the tides of war. We are your overlords.
On we sweep with threshing oar, Our only goal will be the western shore.
So now you'd better stop and rebuild all your ruins,
For peace and trust can win the day despite of all your losing.
प्रतिक्रिया
28 Dec 2011 - 11:18 pm | पार्टनर
त्यांचं हे माझं सर्वात आवडतीचं गाणं ! पण 'लेड झेप' ची ही ओळख फारच तोकडी वाटतेय .. बाकी स्टेअरवे टू हेवन , ते उलटं पळवल्यानंतर ऐकू येणारा त्यातला subliminal message वगैरे पण भारीच.
अवांतर : हे गाणं ऐकताना हटकून 'स्कूल ऑफ रॉक' मधला Jack Black डोळ्यासमोर येतोच येतो !
मस्त लेखमाला ! एक विनंती आहे, की Heavy Metal, Metal, Rock, Punk असे प्रकार कुठून आले, आणि हे कसे ओळखावेत, 'लेड झेप', 'पिंक फ्लॉईड' ई. चा प्रभाव, काही विशिष्ट गाणी / Bands वर त्या का़ळी बंदी का होती वगैरे माहिती या लेखांमध्ये पेरत गेलात तर अजून रंगत येईल.
लेखमालेस शुभेच्छा.
-पार्टनर
29 Dec 2011 - 1:24 am | आत्मशून्य
अवांतरशी अत्यंत सहमत.
बाकि प्रास्जि गाणं तुफ़ानच. आपण रॉक ऐकता समजल्याने फ़ार बरं वाटलं, शक्य झालं तर रोक्सि म्युजिकच "इफ़ देर इज समथिंग" व सिस्टम ओफ़ अ डॉवनचं "एरियल्स" वर रसग्रहण होउन जाउदे.