<<<<आज बसावे उद्या बसावे >>>

सुहास..'s picture
सुहास.. in जे न देखे रवी...
24 Dec 2011 - 10:15 am

कच्चा माल : http://www.misalpav.com/node/20177 (सोनलताईंची माफी मागुन )

आज बसावे उद्या बसावे
दोन थेंब सांडुन देणे
डोक्यामध्यल्या शॉटालाही
सोडुन द्यावे जमवुन प्यावे

दोन पेयपांनांच्या मधले अंतर
आहे केवळ झुरत राहणे
कसे कळावे खुळ्या जगाला
सांजकाळीचे बहकुन येणे

ग्लास मद्याचे असेच ताटवे
त्यात बुडावे दिसावे काजवे..
ओठांवरचे शब्द गरिबडे
श्वासागणती बरळत जाणे

सिगारेटीचे वलय खेळावे
नको मेंदुशी फाटे फोडणे
तंदुरीचे चिकन घेउनी
संध्या काळी आपले बसणे

भयानकसंस्कृती

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

24 Dec 2011 - 10:26 am | नितिन थत्ते

दारू, बायको किंवा बायकोच्या माहेरचे लोक हे विषय न घेता केलेले विडंबन कधी बघायला मिळेल?

सुहास..'s picture

26 Dec 2011 - 12:07 pm | सुहास..

हे घ्या !!

प्रेरणा :: (आंद्याची कविता, कुठे खपलय काय माहीत ? )

http://misalpav.com/node/12472

उगवलेले पक्ष
पसरलेले राजकारणी
पाय ओढ
आणि हिरव्या नोटांत बांधलेल्या भिंती

युतीच्या जोड्या
भगव्या हिरव्या लाल निळ्या
भागवणारा तिढा
सिंचन बांधकाम गृह पसारा

जातीपातींच्या होड्या
सडा .. मताधिक्याचा वेढा
तिच्याच छातीवरचे दळभद्री
वंदेमातरमचा एकच नारा ..

अवांतर : या निमीत्ताने नितीनदां चा प्रतिसाद तर आला (आधी खराट्याने झाडला असे लिहीले होते) ;)

@ ज्यो , जुन्या आठवणी ;)

चिंतामणी's picture

24 Dec 2011 - 10:35 am | चिंतामणी

"इयर एंड"चा ज्वर चढायला लागलेला दिसत आहे.
:bigsmile:

>>>संध्या काळी आपले बसणे
कुठल्या संध्याकाळी येउ??? ;) ;-) :wink:

पैसा's picture

24 Dec 2011 - 10:39 am | पैसा

पण तू आता फक्त चहा पितोस ना?

sneharani's picture

24 Dec 2011 - 10:50 am | sneharani

चहा घेतोस ना?
बाकी विडंबन जमलं!
:)

परिकथेतील राजकुमार's picture

24 Dec 2011 - 11:12 am | परिकथेतील राजकुमार

पण विडंबनात दारू आल्याने आता गणेशाकाका तुला रागावणार.

मग तुला दु:ख होणार.

मग आपण ते दु:ख दारूत बुडवणार.

वाह वाह !

अत्रुप्त आत्मा's picture

24 Dec 2011 - 6:26 pm | अत्रुप्त आत्मा

ही कविता वाचुन असे मत नोंदवण्यात येते आहे की,कॉकटेल नीट जमले नसले तरी करंट जबरा बसला आहे... धण्यवाद ;-)

प्रकाश घाटपांडे's picture

24 Dec 2011 - 7:08 pm | प्रकाश घाटपांडे

जास्ती बसू नका बुडाला बेंड येतयं!