वसा..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
16 Dec 2011 - 12:49 am

बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा
सहज यावे शब्द आणि भाव उमजावा जसा!

आज कविते ये फ़िरूनी सांध शब्दांनी दुवा
टाक उघड्यावर मनाला, अन जराशी दे हवा
लख्ख झाल्या कल्पनेला दाव आता आरसा
बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा

पावसाच्या हालचाली, गर्द हिरवी वाटही
प्रेम शृंगारात भिजली, तारकांची रातही
अन पहाटेच्या मनावर, गोड उमटावा ठसा
बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा

घाल कविते दान थोडे फ़ाटक्या झोळीत या
अर्थ ओथंबून जावा मांडल्या ओळीत या
वाहुदे जन्मांतरी मजला तुझा हा वारसा
बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा

-प्राजु

शृंगारकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Dec 2011 - 12:58 am | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर रचना!!

अभिजीत राजवाडे's picture

16 Dec 2011 - 4:23 am | अभिजीत राजवाडे

कविता आवडली

वाटी's picture

16 Dec 2011 - 8:45 am | वाटी

सुंदर रचना फारच छान :)

पियुशा's picture

16 Dec 2011 - 11:34 am | पियुशा

मस्त रचना :)

क्रान्ति's picture

16 Dec 2011 - 12:30 pm | क्रान्ति

सुंदर!

घाल कविते दान थोडे फ़ाटक्या झोळीत या
अर्थ ओथंबून जावा मांडल्या ओळीत या

हे खासच! वारसा तर तुला दिलाच आहे कवितेनं. :)

राघव's picture

16 Dec 2011 - 2:19 pm | राघव

वारसा तर तुला दिलाच आहे कवितेनं - सहमत.

शेवटचे कडवे अतिशय सुंदर!

राघव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Dec 2011 - 7:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घाल कविते दान थोडे फ़ाटक्या झोळीत या
अर्थ ओथंबून जावा मांडल्या ओळीत या

हे खासच! वारसा तर दिलाच आहे कवितेनं

सेम टू सेम बोल्तो.

-दिलीप बिरुटे

गणपा's picture

16 Dec 2011 - 1:03 pm | गणपा

गेले काही दिवस मिपाच्या या दालनात चांगल दान पडतय.

आनंद जाहला. :)

छान आहे कविता !

घाल कविते दान थोडे फ़ाटक्या झोळीत या
अर्थ ओथंबून जावा मांडल्या ओळीत या
सुंदर ...!

मदनबाण's picture

16 Dec 2011 - 7:12 pm | मदनबाण

छान कविता... :)

सुंदर आहे कविता
आवडेश

प्राजु's picture

16 Dec 2011 - 7:17 pm | प्राजु

मनापासून आभार सर्वांचे! :)

मेघवेडा's picture

16 Dec 2011 - 9:05 pm | मेघवेडा

वा! आवडली!

पैसा's picture

17 Dec 2011 - 11:00 pm | पैसा

कविता खूप आवडली.