|| श्रीराम समर्थ ||
नमस्कार,
मागे मिपावर लिहल्याप्रमाणे दासबोध अभ्यास संकेतस्थळाच्या उद्घाटनाचा आणि प.पू. चैतन्य महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे दोन्ही दिवस भरत नाट्य मंदिर भरले होते.समर्थ आणि वारकरी संप्रदायातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. (येथे फोटो कसे लावतात याचे तांत्रिक माहीती नसल्याने चेपु चा दुवा देत आहे. )
http://www.facebook.com/media/set/?set=a.318136148214176.90028.100000533...
जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज प्रा. डो. सदानंद मोरे यांच्या शुभ हस्ते,संत शिरोमणी ज्ञानेश्वरांचा वारसा सांगणारे प.पू. चैतन्यमहाराज आणि आदरणीय समर्थ भक्त श्री. सुनीलजी चिंचोलकर यांच्या शुभंकर उपस्थितीत दासबोध अभ्यास संकेतस्थळाचे औपचारिक उदघाटन संपन्न झाले. हा एक अपूर्व योग होता.
http://www.youtube.com/watch?v=huAiLZYGdpY
समर्थ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यातील समान धागा व्यासंगी प्रा. डो. सदानंद मोरे यांनी हळूवार पणे उलगडून दाखवला. आणि गलिच्छ राजकारणांसाठी या पवित्र संप्रदाय़ांमध्ये फूट पाडणार्याचा निषेध केला.
आणि यानंतर सुरु झाला गंगौघ ... प.पू. चैतन्य महाराज - श्री. समर्थ रामदासांची करुणाष्टके
http://www.samarthramdas400.in/audio/cm_pravachane_01.mp3
http://www.samarthramdas400.in/audio/cm_pravachane_02.mp3
दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे यांच्या सुश्राव्य भजनाने झाली. वरील दुव्यांमध्ये ही भजने आहेत.
>||जय जय रघुवीर समर्थ ||strong>
प्रतिक्रिया
14 Dec 2011 - 4:34 pm | इरसाल
जय जय रघुवीर समर्थ
|| श्रीराम समर्थ ||
जय सदगुरु
14 Dec 2011 - 7:39 pm | देविदस्खोत
जय जय रघुवीर समर्थ !!! संकेतस्थळाविषयी आणी प्रवचनाविषयी माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद !!!!
14 Dec 2011 - 11:20 pm | अर्धवटराव
धन्यवाद विटेकर साहेब.
अर्धवटराव
15 Dec 2011 - 12:45 am | अत्रुप्त आत्मा
संकेतस्थळाला आमच्या शुभेच्छा व धन्यवाद...
15 Dec 2011 - 5:29 pm | मूकवाचक
संकेतस्थळाच्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा व धन्यवाद...