सस्नेह निमंत्रण

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
7 Dec 2011 - 2:15 pm

नमस्कार,

माझ्या 'संगणकावर मराठीत कसे लिहाल?' या पहिल्या वाहिल्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी दिनांक १०/१२/२०११ रोजी माननीय श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते होणार आहे.

तरी ह्या आनंदाच्या प्रसंगी सर्व मिपाकरांची उपस्थिती आवश्यकच आहे. मिपाकरांच्याच आशीर्वादाने, प्रेमाने आणि पाठिंब्याने आज हे यश मिळत आहे. तेव्हा सर्वांनी यायचेच आहे.

प्रकाशन स्थळ :- उन्नती गार्डन मैदान, देवदया नगर, ठाणे (पश्चिम)
कार्यक्रमाची वेळ :- संध्याकाळी ७.०० वाजता.*

*माननीय श्री. राजसाहेब ठाकरे येणार असल्याने, होणारी गर्दी लक्षात घेता जागा मिळवण्यासाठी शक्यतो थोडे आधीच आल्यास उत्तम.

प्रसाद ताम्हनकर
९७३०९५६३५६

साहित्यिकसमाजतंत्र

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

7 Dec 2011 - 2:19 pm | कपिलमुनी

तुझ्या वाटचालीस आणि पुस्तकास खुप खुप शुभेच्छा !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Dec 2011 - 9:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मालक, आपल्या पहिल्या वाहिल्या पुस्तकाचं स्वागत आहे.
आपल्या पुढील लेखन वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

आहा.. उत्तम बातमी... हजेरी लावण्याचा १००% प्रयत्न केला जाईल.

हार्दिकेस्ट अभिनंदन... :) पुस्तकही तिथे विक्रीस असेल तर खरीदले जाईलच हेवेसांनल.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Dec 2011 - 5:40 pm | विश्वनाथ मेहेंदळे

येस्स, हार्दिकेस्ट अभिनंदन !!!!
आमच्याकडूनही हजेरी लावण्याचा १००% प्रयत्न केला जाईल. (म्हणजे, मुंबईत असेन तर येईन)

विवेकखोत's picture

7 Dec 2011 - 2:22 pm | विवेकखोत

खुप खुप शु भे च्या

अन्या दातार's picture

7 Dec 2011 - 2:23 pm | अन्या दातार

पर्‍याचे पुस्तक निघणार आहे तर.. अभिनंदन.

अवांतरः हा परा अपेक्षाभंग करण्यात कुणाचाही हात धरणार नाही. एकतर असे क्रमशः टाकून लेख अडकवून ठेवतो. सस्नेह निमंत्रण म्हणून धागा पाहिला तर वाटले याचे लग्न-बिग्न ठरले की काय? बघतोय तर वेगळेच कायतरी ;)

छोटा डॉन's picture

7 Dec 2011 - 2:23 pm | छोटा डॉन

हार्दिक अभिनंदन आणि प्रकाशनास शुभेच्छा :)
लै लै आनंद झाला बातमी वाचून, पार्टीची सोय झाल्याचे सुख आहेच ;)

- छोटा डॉन

सोत्रि's picture

7 Dec 2011 - 2:28 pm | सोत्रि

हायला डॉन्राव,

काय 'तार' जुळलीय हो आपली. अगदी हेच (म्हणजे पार्टीचेच हो) लिहायला इथे आलो तर तुमचा प्रतिसाद.
आपण ठिकाण ठरवू आणि सगळ्यांना कळवू, काय म्हणता ?

- ('प्यार्टी' मिळणार ह्या आनंदात असलेला) सोकाजी

प्रीत-मोहर's picture

7 Dec 2011 - 3:05 pm | प्रीत-मोहर

+२

आणि पुस्तक फुकटात मिळेल हीही अपेक्षा :)

चिंतामणी's picture

7 Dec 2011 - 7:24 pm | चिंतामणी

सोक्या/ डान्राव

निरोपाची वाट बघत आहे.:party:

मृत्युन्जय's picture

8 Dec 2011 - 10:15 am | मृत्युन्जय

डान्रावांशी पुर्णतः सहमत आणि पुस्तक प्रकाशनाचे अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा आहेतच हे वेगळे सांगायला नको. अतिशय आनंदाची बातमी आहे आणि त्यामुळे आज एक कप चहा जास्त पिउन ही बातमी साजरी केली जाणार आहे :)

पियुशा's picture

7 Dec 2011 - 2:25 pm | पियुशा

हार्दिक अभिनंदन :)

पैसा's picture

7 Dec 2011 - 2:25 pm | पैसा

अभिनंदन, शुभेच्छा!!!
आज एक मिपावासी असल्याबद्दल अभिमान वाटला! (तुझ्या शब्दात जरा बदल करून)
पुस्तक नक्कीच विकत आणणार.

वा वा वा अभिनंदन !!!
आमचा परा लेखक झाला (एकदाचा).

पराशेठ, हार्दिक अभिनंदन.
अशीच अनेकानेक पुस्तके प्रसिद्ध होवोत.

५० फक्त's picture

7 Dec 2011 - 2:31 pm | ५० फक्त

अभिनंदन रे परा.

पुष्करिणी's picture

7 Dec 2011 - 2:32 pm | पुष्करिणी

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !
आता पराला प्रसादराव / प्रसादसाहेब असं म्हणायला सुरूवात करायला हवी.

किचेन's picture

7 Dec 2011 - 2:33 pm | किचेन

+१००

अरे वाह...अभिनंदन!
पराशेठ मी पुण्याहून तिथे येऊ शकणार नाही पण कार्यक्रमाचे फोटो अपलोड करा.
आणि ह्या पुस्तकाची मला भयंकर गरज आहे.कसे मिळेल तेही सांगा.

मन१'s picture

7 Dec 2011 - 2:33 pm | मन१

हार्दिक अभिनंदन पराशेठ.
"मराठित कसे लिहाल" हे सांगण्यासाठी पुस्तक का लिहिलय हे समजले नाही.
किंवा त्यात काय काय समाविष्ट आहे, ह्याचे कुतूहल आहे.

छोटा डॉन's picture

7 Dec 2011 - 2:37 pm | छोटा डॉन

>>"मराठित कसे लिहाल" हे सांगण्यासाठी पुस्तक का लिहिलय हे समजले नाही.

ते "संगणकावर मराठित कसे लिहाल"असे आहे, असो.

- छोटा डॉन

मन१'s picture

7 Dec 2011 - 3:26 pm | मन१

जाल जोडणी (net access) असेल, तर सर्वच काही plug and play आहे की.
नुसतं उघडा मिपा,मीम्,ऐसी वगैरे आणि करा टाइप.
ह्यामध्ये नक्की हा विषयावर सविस्तर म्हणजे काय लिहिले आहे ते जाणून घेउ इच्छितो.(अर्थातच पुस्तक घेइनच. पण इथे त्या पुस्तकाची index कळली तरी पुरे.)

धमाल मुलगा's picture

8 Dec 2011 - 10:46 am | धमाल मुलगा

आणि इंटरनेट नसेल तेव्हा?
अर्थातच, अनुक्रमणिकेतले काही प्रकरणांची नावे कळण्याबाबत सहमत आहेच. :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Dec 2011 - 2:33 pm | ज्ञानोबाचे पैजार

अरे वा, फारच छान बातमी आहे, आनंद झाला वाचुन, परा चे हार्दिक अभिनंदन,

पैजारबुवा,

स्मिता.'s picture

7 Dec 2011 - 2:35 pm | स्मिता.

अरे वा! ही गोष्ट माहितीच नव्हती... वाचून आनंद झाला.
नवीन पुस्तकाकरता मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!

इच्छा असूनही उपस्थित राहता येणार नसल्याने लवकरच फोटो बघावयास मिळतील अशी आशा आहे.

सुहास झेले's picture

7 Dec 2011 - 2:34 pm | सुहास झेले

व्वा व्वा.. अभिनंदन पराशेठ.... :) :) :)

कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा नक्की प्रयत्न करतो.

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !!

विशाखा राऊत's picture

7 Dec 2011 - 2:44 pm | विशाखा राऊत

अभिनंदन परासाहेब :) ( आता मोठ्या माणसांना असे आदरानेच बोलावे लागेल ना) मस्त बातमी. आनंद झाला आहे

प्यारे१'s picture

7 Dec 2011 - 2:52 pm | प्यारे१

हार्दिक अभिनंदन....!

स्वगतः शिवसेनेच्या सामना मध्ये लेख आणि मनसे अध्यक्षांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन. काही लोक्स कसं काय मॅनेज करतात ते एक 'सर'च जाणे... ;)

सोत्रि's picture

7 Dec 2011 - 3:11 pm | सोत्रि

हा प्रतिसाद लैच भारी!

- ('कसं काय मॅनेज करतात' असा प्रश्न पडलेला) सोकाजी

मृगनयनी's picture

7 Dec 2011 - 6:49 pm | मृगनयनी

स्वगतः शिवसेनेच्या सामना मध्ये लेख आणि मनसे अध्यक्षांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन. काही लोक्स कसं काय मॅनेज करतात ते एक 'सर'च जाणे...

+१११११
काय रे पर्या.... तुला शिवसेना आणि मनसे यान्च्याशी सौहार्दाचे सम्बन्ध ठेवल्याबद्दल मिसळपाव'चा "अवधूत गुप्ते" हीच्च पदवी दिल्या गेली पायजेल.... ;)
:) :) :) :)

बाकी ही बातमी "लय भारी"... :) अभिनन्दन... अभिनन्दन....अभिनन्दन! :)
राज'जींच्या उपस्थितीमुळे दत्तपौर्णिमेची सुसन्ध्या खूपच रम्य जाणार! :)

वाहीदा's picture

7 Dec 2011 - 10:50 pm | वाहीदा

चला फार दिवस प्रतिक्षेत असलेली बातमी एकदाची प्रकाशित झाली तर !

अभिनंदन पराशेठ !
अन हो नविन छानसे पारकर पेन बरोबर असू द्या... पटापट लोकं सिग्नेचर / सही साठी रांगा लावतील (अन हे ही विसरतील राज ठाकरे ही आले आहेत समारंभाला )अन तुझ्या पेनातील शाई नक्को बाई संपायला.

तुझे पुस्तक विकत घेऊनच वाचणार अन तुझी सही ही त्यावर घेणार ..देणार ना रे परा, आम्हाला पण तुझी सही ?? SIGN IT PLZ !!! :-)

प्यारे१'s picture

9 Dec 2011 - 12:02 pm | प्यारे१

>>>अन हो नविन छानसे पारकर पेन बरोबर असू द्या...

राजसाहेबांबरोबर शिरीष पारकर येणार असतील पर्‍याचं कामच झालं. ;)

कुंदन's picture

7 Dec 2011 - 2:54 pm | कुंदन

अभिनंदन परा साहेब.
पुस्तकाच्या किंमती बद्दल लिहिले नाहित.
अर्थात आमच्या साठी ते अमुल्यच आहे.

( परा चा फॅन / पंखा )कुंदन

नितिन थत्ते's picture

7 Dec 2011 - 2:59 pm | नितिन थत्ते

अभिनंदन.

येईनच नक्की.

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Dec 2011 - 3:01 pm | बिपिन कार्यकर्ते

अभिनंदन रे *&#(@!!!!!

विनायक प्रभू's picture

7 Dec 2011 - 3:46 pm | विनायक प्रभू

बिका शी सहमत रे मी परा %^*(*&*))&%$#$%^))*)*&*%$%&*

मोहनराव's picture

7 Dec 2011 - 3:01 pm | मोहनराव

अभिनंदन पराशेठ!!

sneharani's picture

7 Dec 2011 - 3:06 pm | sneharani

अभिनंदन अन खूप खूप शुभेच्छा!!
:)

साबु's picture

7 Dec 2011 - 3:06 pm | साबु

पराशेठ अभिनन्दन...

जागु's picture

7 Dec 2011 - 3:06 pm | जागु

अरे वा अभिनंदन.

सविता००१'s picture

7 Dec 2011 - 3:13 pm | सविता००१

आणि अभिनंदन!!! :)

लीलाधर's picture

7 Dec 2011 - 3:20 pm | लीलाधर

हार्दिक अभिनंदन परा :)

चिरोटा's picture

7 Dec 2011 - 3:21 pm | चिरोटा

अभिनंदन.
पुस्तक फ्लिपकार्टवर येईल ना? म्हणजे पुस्तकात सवलत शिवाय मोफत घरपोच पण.

मेघवेडा's picture

7 Dec 2011 - 3:23 pm | मेघवेडा

अभिनंदन रे सायबा!

नरेश_'s picture

7 Dec 2011 - 3:24 pm | नरेश_

अभिनंदन रे परा!!!
येण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल.

हवांतर : इंग्रजाळलेले प्रतिसाद पाहता अशा पुस्तकाची गरजच अधोरेखित होते ;)
सहघ्या.

योगी९००'s picture

7 Dec 2011 - 3:27 pm | योगी९००

परा साहेब..

हार्दिक अभिनंदन आणि प्रकाशनास शुभेच्छा..!!!

बाकी 'राज' साहेबांना कसे राजी केलेत..?

प्रकाश१११'s picture

7 Dec 2011 - 3:30 pm | प्रकाश१११

हार्दिक अभिनन्दन . .
पुस्तक तर जरुर घेईन. विकत ,
खूप छान मस्त वाटले. पुढील वाट्चालिस खूप शुभेच्छा आहेतच .

जोशी 'ले''s picture

7 Dec 2011 - 3:31 pm | जोशी 'ले'

हार्दिक शुभेच्छा, हजर राहण्याचा जरुर प्रयत्न करु

सोत्रि's picture

7 Dec 2011 - 3:34 pm | सोत्रि

पराशेठ,

हार्दिक अभिनंदन!

- (बातमीने आनंदीत झालेला) सोकाजी

प्राजक्ता पवार's picture

7 Dec 2011 - 3:34 pm | प्राजक्ता पवार

हार्दिक अभिनंदन :)

इरसाल's picture

7 Dec 2011 - 3:54 pm | इरसाल

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

मी-सौरभ's picture

7 Dec 2011 - 3:55 pm | मी-सौरभ

हबिणंदन!!

तिमा's picture

7 Dec 2011 - 4:02 pm | तिमा

परा,
नव्या पुस्तकाबद्दल वाचले. आनंद झाला.
आता, मिपावर शुद्ध लिहू न शकणार्‍या लोकांनी 'परां' चे पुस्तक विकत घ्यावे.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Dec 2011 - 4:08 pm | अत्रुप्त आत्मा

पराच्या राज्यात पुस्तक निर्मिती....वाहव्वा....आम्हाला ह्ये पुस्तक हवच आहे. कुठुन..कसे..कधी मिळेल? तेही कळविणे...

गणपा's picture

7 Dec 2011 - 4:27 pm | गणपा

एक विचारयच राहीलचं रे.
"संगणकावर मराठीत कसे लिहाल?" मध्ये शुद्ध लेखनाचे धडे ही आहेत का रे?
असल्यास एखादी प्रत माझ्यासाठी राखुन ठेवावी.
आणि शक्य झाल्यास कार्यक्रमाची चित्रफीत तुनळीवर टाक म्हणजे आमच्यासारख्या अनेक अनिवासींना त्याचा आस्वाद घेता येईल.

शाहिर's picture

7 Dec 2011 - 4:39 pm | शाहिर

हार्दिक अभिनंदन.हार्दिक अभिनंदन.हार्दिक अभिनंदन.

किसन शिंदे's picture

7 Dec 2011 - 4:58 pm | किसन शिंदे

भेटूच पुस्तक प्रकाशनाला

अमृत's picture

7 Dec 2011 - 5:08 pm | अमृत

आणि शुभेछा... (छ ला छ जोडून कसा लिहावा) लवकरच पुस्तक घ्यावे लागणार असं दिसतय.....

अमृत

गणपा's picture

7 Dec 2011 - 5:10 pm | गणपा

मदत करणार होतो. पण जाउदे उगाच एका पुस्तकाची विक्री कमी झाली तर पर्‍या पार्टी देणार नाही. ;)

दादा कोंडके's picture

7 Dec 2011 - 5:29 pm | दादा कोंडके

अभिनंदन!

मूकवाचक's picture

7 Dec 2011 - 5:29 pm | मूकवाचक

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

जाई.'s picture

7 Dec 2011 - 5:36 pm | जाई.

हार्दिक अभिनंदन

अमोल केळकर's picture

7 Dec 2011 - 6:06 pm | अमोल केळकर

मनापासून ( मनसे ) अभिनंदन !!! :)

अमोल केळकर

चतुरंग's picture

7 Dec 2011 - 6:12 pm | चतुरंग

प्यार्टी कधी आणि कुठे देणार आहेस ते कळव! ;)

(खुद के साथ बातां : रंगा, साला हा परा अगदी छुपा रुस्तुम आहे नै?)

-रंगा

रेवती's picture

7 Dec 2011 - 6:20 pm | रेवती

अभिनंदन परा!

प्रभाकर पेठकर's picture

7 Dec 2011 - 7:02 pm | प्रभाकर पेठकर

हार्दीक अभिनंदन.

भारताबाहेर असल्याकारणाने कार्यक्रमास शारीरिक उपस्थिती अशक्य आहे पण मन तिथे असेलच.

पुन्हा एकदा हार्दीक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा..!

विवेक मोडक's picture

7 Dec 2011 - 7:12 pm | विवेक मोडक

हार्दिक अभिनंदन परा

चित्रा's picture

7 Dec 2011 - 7:44 pm | चित्रा

अभिनंदन!!

पुस्तकाचे मुखपृष्ठ सुरेख झाले आहे.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 Dec 2011 - 7:47 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

ठाण्यातच आहे तर जमवायलाच हवे.
नक्की येतो.

वा.. वा!!
आनंद झाला.
पराशेठ, पुस्तक प्रकाशनाचा सोहळा जालावर उपलब्ध करुन द्यायला विसरु नका.

अप्पा जोगळेकर's picture

7 Dec 2011 - 8:21 pm | अप्पा जोगळेकर

अभिनंदन आणि शुभेच्छा.

निवेदिता-ताई's picture

7 Dec 2011 - 8:46 pm | निवेदिता-ताई

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !

पिवळा डांबिस's picture

7 Dec 2011 - 8:48 pm | पिवळा डांबिस

हार्दिक अभिनंदन, प्रसाद!
अरे कुणीतरी नंतर या समारंभाचा वृत्तांतही लिहा रे आमच्यासाठी...

विनोद१८'s picture

7 Dec 2011 - 9:04 pm | विनोद१८

अभिनन्दन........^.......

विनोद१८

उल्हास's picture

7 Dec 2011 - 9:32 pm | उल्हास

पुढिल पुस्तकास शुभेच्छा .

पराशेठ खूप खूप शुभेच्छा.. बाकी पार्टीचं लक्षात ठेवा...

- पिंगू

आनंदी गोपाळ's picture

7 Dec 2011 - 10:05 pm | आनंदी गोपाळ

च्याय्ला! भलेही कुणाला अस वाटू देत की हा परा काय नवीन लिहून र्‍हाय्लाय?
पण त्यावर पुस्तक छापून विक्तो आहेस. त्याला बेष्ट लक.

आनंदी गोपाळ's picture

7 Dec 2011 - 10:05 pm | आनंदी गोपाळ

च्याय्ला! भलेही कुणाला अस वाटू देत की हा परा काय नवीन लिहून र्‍हाय्लाय?
पण त्यावर पुस्तक छापून विक्तो आहेस. त्याला बेष्ट लक.

रामदास's picture

7 Dec 2011 - 10:19 pm | रामदास

शनीवारची वाट बघतो आहे.

मयुरपिंपळे's picture

7 Dec 2011 - 10:24 pm | मयुरपिंपळे

अभिनंदन

प्रभो's picture

7 Dec 2011 - 11:18 pm | प्रभो

ब्येस्ट रे!!

कौशी's picture

7 Dec 2011 - 11:19 pm | कौशी

परा,
फोटो आणि सविस्तर माहितीची वाट बघणार....
पुन्हा येकदा अभिनन्दन....

क्रान्ति's picture

7 Dec 2011 - 11:20 pm | क्रान्ति

परा, जोरदार झालंय रे मुखपृष्ठ. पुण्यात आले की पुस्तक घेते.
प्रकाशन समारंभासाठी हार्दिक शुभेच्छा!

अर्धवटराव's picture

8 Dec 2011 - 12:54 am | अर्धवटराव

अभिनंदन परा !!

(मराठी) अर्धवटराव

इंटरनेटस्नेही's picture

8 Dec 2011 - 12:54 am | इंटरनेटस्नेही

हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा..!

इन्दुसुता's picture

8 Dec 2011 - 6:53 am | इन्दुसुता

अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा.

पराजी पुणेकरांचे हार्दिक अभिनंदन

अर्धवट's picture

8 Dec 2011 - 9:31 am | अर्धवट

स्वगतः
हं.. पुस्तकं काढतायत..
काम काय असतं म्हणतो मी.. तिकडं सौंदर्यफुफाट्यात बसायचं आणी लिहायची पुस्तकं..
मराठी आंतरजाल आहेच जाहिरात करायला.
असो. इनो घ्यावं लागणार आज..

प्रगट : वाहवा आमचा परा म्हणजे अगदी हुशार बरं का, अभिनंदन रे भावा.

अवांतर - पराचं पुस्तक असल्यानं मी प्रकाशनाचं नाव चुकून 'नवटा'क वाचलं ;)

दिपक's picture

8 Dec 2011 - 9:51 am | दिपक

माननीय श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते होणार आहे

अरे वाह राज ठाकरेंचे अभिनंदन ! ;-)

परा आगे बढो! खुप खुप शुभेच्छा !! :-)