तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!

शाहरुख's picture
शाहरुख in जे न देखे रवी...
18 Aug 2009 - 3:54 am

कोनी 'ट' ला 'ट' आनि 'क्ष' ला 'क्ष' जुळिवतंय
आनी पब्लिक त्ये आगदी आतून आलंय म्हनतंय
आमानी नाय कवा काय आतून आल्यागत वाटनांर
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!

लोकं लिवत्यात कोड्यात अन गाव म्हनतंय भारी
आमी मात्र मनात म्हनतुंय हाय काय ही भानगड तिच्यामारी
असली आमची भाषा गावंढळ तरी शिंपल शिंपल लिवनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!

परत्येक वळीतला काना मात्रा उकार येलांट्या मोजत्यात
आनी साळंतल्या बीजगनितावानी बेरीज वजाबाकी करत्यात
आसलं काय गनित आमी नाय मांडनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!

निम्म्यांच्या कवितेत असत्यात पानं फुलं फळं अन पक्षी
आनी राहिलेल्यास्नी दिसतिया ढगांमदी नक्षी
चंद्र सूर्य तारे नदी शेप्रेट फ्रेममदी ठेवनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!

हाय काय आनी नाय काय म्हननार
आनी तिच्यायला आमीबी येक कविता करनार !!

-- कवी शाहरुख

हास्यकविता

प्रतिक्रिया

रेवती's picture

18 Aug 2009 - 4:02 am | रेवती

ग्रेट जमलीये कविता!
आमच्यासारख्यांना कवितेच्या (मुलीचे नाव नव्हे) वाटेला जायला आता धीर येइल. खरच, ते सूर्य, चंद्र, नद्या, डोंगर, लाटा यांनी जीव दडपला होता अगदी!

रेवती

Nile's picture

18 Aug 2009 - 4:08 am | Nile

थोडासा वृत्तात गोंधळ झालाय, फिगर ऑफ स्पीच कडे पण जरा लक्ष द्यायला हवंय, पण जमेल जमेल . प्रदार्पण लै भारी, येउद्या अजुन तिच्यायला. ;)

धनंजय's picture

18 Aug 2009 - 4:45 am | धनंजय

(पण बहुतेक ओळींमध्ये कानामात्रांचे गणित जमलंय खरे.)

लवंगी's picture

18 Aug 2009 - 4:08 am | लवंगी

=)) =)) =))

स्वाती२'s picture

18 Aug 2009 - 4:36 am | स्वाती२

लै भारी!

चतुरंग's picture

18 Aug 2009 - 4:47 am | चतुरंग

फक्कडच जमलिये कविता! :)

(नकवी)चतुरंग

मदनबाण's picture

18 Aug 2009 - 4:49 am | मदनबाण

मस्त कविता... :)
मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

रवि's picture

18 Aug 2009 - 5:05 am | रवि

एकदम झ्याक कविता .........चालू देत .........

रवि

अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......
एक नजर इकडेही टाका

दशानन's picture

18 Aug 2009 - 8:15 am | दशानन

=))

मस्त लिहले आहे....
आवडलं !

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

मस्त !
शिंपल शिंपल असली तरी एकदम भारी कविता ----

सहज's picture

18 Aug 2009 - 8:20 am | सहज

मस्त! छान कविता.

अशीच एक "प्रेमकविता" इथे द्यायचा मोह आवरत नाही आहे. ढकलपत्रातुन साभार.

च्यायला परत हिचा फोन…….,
आणि पुन्हा तेच प्रश्न,
कुठे आहेस..?, कसा आहेस..?,
काय करतोssssssय ..,?
झाली का कामं..?
कप्पाळ माझं…!,
हिला समजत नाही का.., मी कधी गाडीवर असतो,
कधी मीटिंग मध्ये, कधी बॉसच्या केबिनमध्ये,
कुठेही वाजते हिच्या प्रश्नांची रिंगटोन,
चायला, च्यायला परत हिचा फोन…….,
कुठे पाळून नाही जाणार, सयंकाळी येइल न घरी,
‘तेव्हा विचारशीsssल जे विचारायचं ते…,
सारं काही सांगेल.
झालंsssssss.., रडा-रडी सुरु - , ‘तू खुप बदललाय,
लग्न आगोदर असा नव्हातास, माझ्यासाठी किती वेळ असायचा तुझ्याकडे, इत्यादि, इत्यादि.
अगं, ‘ तेव्हा लपून भेटायचो, वाटायचं भेटशील की नाही, वरून घरच्यांची भीती,
आता कधीही भेटलो तरी रोकनार कोण.?,
च्यायला परत हिचा फोन…….,
बरं दिवसातून पन्नास वेळा हिचे SMS,
लव यू, मिस यू, —- यू आणि काय काय..,
SMS पाठवला, भावना पोहोचल्या मग फोन चे काय काम,
तर म्हणे तुझा आवाज ऐकावासा वाटला,v
घे ऐक, बोलतो नाही चांगला मोठ्यानी ओरडतोच,
मग बसते धारण करून मौन,
च्यायला परत हिचा फोन…….,
अगं किती प्रेम करशील, मी तुझ्या लायकीचाच नाही,

छोटा डॉन's picture

18 Aug 2009 - 8:24 am | छोटा डॉन

सहजकाकांशी सहमत ;)
मस्त आहे कविता, आमच्यासारख्या अनेक ज्ञात / अज्ञात, दडपशाहीला बळी पडलेल्या आणि कविपणा कोमेजुन गेलेल्या कविमनांची दाँस्ताँ मस्त मांडली आहे ;)
कविता आवडली, असेच अजुन येऊद्यात ...

------
छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2009 - 10:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

झक्कास कविता. अगदी बोलीभाषेतले शब्द वापरून, प्रसंगी वापरात येणारे इंग्लीश शब्दही वापरल्यामुळे कविता जास्तच आवडली. उगाच बोजड शब्द न वापरता एकदम शिंपल भाषा, तरीही एक नादमयता आहे.

अदिती

घाटावरचे भट's picture

18 Aug 2009 - 8:32 am | घाटावरचे भट

लैच भारी...

भडकमकर मास्तर's picture

18 Aug 2009 - 9:17 am | भडकमकर मास्तर

निम्म्यांच्या कवितेत असत्यात पानं फुलं फळं अन पक्षी
आनी राहिलेल्यास्नी दिसतिया ढगांमदी नक्षी

हे तर अगदी पटले...

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

समंजस's picture

18 Aug 2009 - 10:08 am | समंजस

एकदम झक्कास कविता!
साधी, सोपी पटकन कळेल अशी (माझ्या सारख्याला) !! :)

(नाही तर काही कविता, कोडे सोडवा या प्रकारातल्या असल्या सारख्या) #:S

बाकरवडी's picture

18 Aug 2009 - 10:23 am | बाकरवडी

हाय काय आनी नाय काय म्हननार
आनी तिच्यायला आमीबी येक पर्तिसाद देनार !!

लाय भारी !
चाबूक कविता कर्णार्‍यांना !!

:B :B :B बाकरवडी :B :B :B

खाव खाव खाव !
फक्त मिसळपाव !!

पर्नल नेने मराठे's picture

18 Aug 2009 - 10:27 am | पर्नल नेने मराठे

तिच्यायला मस्त जम्लिये सारुख ;)
चुचु

अवलिया's picture

18 Aug 2009 - 11:30 am | अवलिया

मस्त !

--अवलिया

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Aug 2009 - 11:35 am | बिपिन कार्यकर्ते

एकदम आवडलेली म्हणजे आवडलेलीच आहे. 'अगदी आतून आली आहे' कविता असे वाटले. ;)

बिपिन कार्यकर्ते

मिसळभोक्ता's picture

18 Aug 2009 - 11:44 am | मिसळभोक्ता

लय भारी रे साहरूक. साहरुक नावाचा येकच मानूस लय भारी. दुसरा पुचाट..

-- मिसळभोक्ता

नाना बेरके's picture

18 Aug 2009 - 11:51 am | नाना बेरके

शारुक लई म्हंजी लईच ब्येस हाये तुमची कविता.
येकच काय, तुमी खूप कविता करा. आमी तुम्चे फ्यानच झालो बघा.

प्रशांत उदय मनोहर's picture

18 Aug 2009 - 11:56 am | प्रशांत उदय मनोहर

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))

श्रावण मोडक's picture

18 Aug 2009 - 1:10 pm | श्रावण मोडक

'कराय गेलो गनपती, झाला मारूती' असं तर वाटत नाही ना आता हे सारं कौतूक पाहून? काय आहे की तुम्ही धरून-धरून फुलं-मुलं, झाडं-गाडं, पक्षी-नक्षी वाल्यांना ठोकलंत मस्तपैकी त्यांच्याच फॉर्ममध्ये आणि वाचकांनी तुमची ही 'समीक्षा'ही उत्तम कविता ठरवून टाकली. गेलात त्यांच्याच रांगेत आता!!! :)
'समीक्षाकाव्य' भारीच.

शाहरुख's picture

18 Aug 2009 - 11:05 pm | शाहरुख

'समीक्षाकाव्य' वगैरे शब्द वाचून (ते ही दुहेरी अवतरण चिन्हात नसलेले) अंमळ गुदगुल्या झाल्या पण आम्ही आमची लायकी ओळखून आहोत त्यामुळे काळजी नसावी :-)

सर्वांचे आभार..

मी कवितांच्या वाटेला जात नसलो तरी छंद, वृत्त वगैरे सांभाळून कविता करणार्‍यांचा मला आदरच वाटतो..एखादी गोष्ट मला कळत नाही (किंवा मी कळून घेण्याचा प्रयत्न करत नाही) म्हणून तिची टिंगल करणे हा माझा पिंड नसल्याने हा खुलासा करतोय.

ऋषिकेश's picture

18 Aug 2009 - 1:34 pm | ऋषिकेश

=))
लै भारी..
.....लै लै लै भारी!!!!
पण खरंतर लै लै लै लै लै लै भारी!! ;)

ऋषिकेश
------------------
दुपारचे १ वाजून ३३ मिनीटे झालेली आहेत. रेडीयोवरील निवेदक हसण्यात मग्न आहे .=))

फ्रॅक्चर बंड्या's picture

18 Aug 2009 - 2:06 pm | फ्रॅक्चर बंड्या

मस्त आहे कविता

क्रान्ति's picture

18 Aug 2009 - 2:46 pm | क्रान्ति

गनित बी भारी आन कविता बी भारी! आगदी आतुन आल्याली कविता लय आवडली बगा! =D> =D> =D> =D> =D> =D>
यिऊ द्या आजून!

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

अनिल हटेला's picture

18 Aug 2009 - 11:14 pm | अनिल हटेला

लै बेस कविता !!
आमीबी तीच्यायला मस्त पर्तीसाद देणार .....;-)

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

मेघवेडा's picture

1 Dec 2011 - 3:54 pm | मेघवेडा

निम्म्यांच्या कवितेत असत्यात पानं फुलं फळं अन पक्षी
आनी राहिलेल्यास्नी दिसतिया ढगांमदी नक्षी
चंद्र सूर्य तारे नदी शेप्रेट फ्रेममदी ठेवनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!

हे लै लै खास! अगदीच पटलं! झकास कविता!

आल्या आल्या नवी मंडली एकठोक कविता लिहिनार
आनी आपली जुनी मंडली त्यांना डायऱ्या देणार
डायऱ्या देवून होतंय काय आमी नाय कुणाला डरनार
तरीबी तिच्यायला आमी यक कविता लिवनार

प्यारे१'s picture

1 Dec 2011 - 4:31 pm | प्यारे१

मस्तच...
आमचीच जणू :P

वाहीदा's picture

1 Dec 2011 - 4:43 pm | वाहीदा

आमाला तर यकदम आतून आलेली कविता वाटली !

(खुदके संग बाता : अरेच्चा मी या आधी प्रतिसाद द्यायला कशी काय विसरले ? )

@ प्यारे : हि तुमची कविता नाय ..जणू बिनू पन नाय :P

प्यारे१'s picture

1 Dec 2011 - 4:55 pm | प्यारे१

शारुक लय आवडतो वाट्टं???? ;)

थोडंफार भावना साधर्म्य वाटलं म्हणून जणू आमचीच म्हटलं.
श्रेय लाटायचा, भाजायचा, तळायचा अज्जिबात प्रयत्न नाही हो.
दोन प्रतिभा ;) वंतांना काय असं सारखं सुचू शकत नाही का काय? ;)
बाकी,
त्येंचं उलुलंसं येगळं आमचं लय म्हन्जे लयच येगळं हाय
आपली तं काय लायकीच न्हाय. ;) ;)

शाहरुख भाऊ चा धागा वर आणला पण तुला डिवचण्याचा हेतू नव्हता
फक्त चिडवले येवढेच
ह घे रे बाबा ! श्माईल प्लीज :-)