दिवाळीनिम्मित पुण्याहून कोकणात यायचे ठरले होते. वोल्व्होचे आरक्षण करणे म्हणजे छ्या , एरवी ३०० मध्ये नेणारा तो आता ६०० सांगत होता. ह्यापेक्षा मग एशियाड काय वाईट म्हणून एशियाडने जायचे ठरवले. माझी एक मानलेली बहिण कम मैत्रीण जी माझ्याच गावी राहते तिच्या बाबांनी मला सांगितलं की ती एकटी येतेय रात्रीची, दोघ या त्यापेक्षा.ठीक आहे म्हणत तीच पण माझ्याच जोडीला रिझर्व्हेशन करून टाकल, सीट नंबर १३ खिडकी,१४. पणजी गाडी होती. म्ह्टल चला, १० तासांच्या प्रवासात कोणीतरी बडबड करायला आहे,गाणी तरी ऐकून ऐकून किती ऐकणार ? अगदीच निरस प्रवास होणार नाही असे वाटले होते.
सगळी तयारी आटपून स्वारगेटला पोहोचलो आणि मैत्रिणीचा फोन आला की अरे आज येऊ शकत नाही, प्रॉब्लेम आहे. आता मी ठीक आहे म्हणण्याशिवाय दुसर काय करू शकणार होतो? तोंडावर आलेली 'स्तुतीसुमने' महत्प्रयासाने थांबवत फोन कट केला. E - Reservation असल्याने तिकिटावर नाव गाव फळ फुल होते त्यामुळे तिच्या जागेवर मी ते दुसऱ्याला विकू देखील शकत नव्हतो. पैसे तिचेच गेले असल्याने मला फारशी हुरहूर वाटली नाही. मी गाडी येईपर्यंत स्थानकातल्या बाकड्यावर ठाण मांडले. बाजूला एक प्रौढ बाई आणि तिचा मुलगा बसला होता. त्या बाईने अत्तर लावलं होत की कुंभमेळा समजून त्यात डुबकी मारली होती ते कळायला मार्ग नव्हता पण त्या तीव्र घमघमाटाने माझं डोकं पार उठलं होत एवढ निश्चित.
तेवढ्यात बस आली. रिझर्व्हेशन असताना मी मुद्दाम सगळ्यात उशिरा चढतो, कारण आधी कोणीतरी सीटवर जाऊन बसतात आणि सगळ्यांना नीट बसवून सामान लावतात आणि "हे लगेच चढले पुढे म्हणून जागा मिळाली हा" असं करत महिलावर्ग कौतुक करतो, आणि पुरुषवर्ग जरा कॉलर ताठ करत असतानाच मी एन्ट्री घेतो आणि "माफ करा, पण मी रिझर्व्ह केलेल्या जागेवर तुम्ही बसला आहात, हे पहा माझे तिकीट" असे वाक्य टाकले की त्यांचे चेहरे बघण्यालायक होतात. कौतुक संपून "काय हो, आधी रिझर्व्ह आहे की नाही ह्याची खात्री का नाही केलीत? " असा क्रोधावेशाने ओतप्रोत भरलेला प्रश्न पुरुषवर्गावर फेकला जातो आणि पुरुषवर्ग दुसरी सीट शोधत असतो, अश्यावेळी यांची चिमणी स्टाईल तोंड बघायला खूप मजा येते.
मी आपली सामानाची बॅग वर ठेऊन लॅपटॉपची बॅग मांडीवर ठेवली. इतक्यात कंडक्टर तिकीट चेक करत माझ्याकडे आला तेव्हा मी म्हटलं "बाबारे, बाजूची सीट कॅन्सल झालीय, घे कोणाला तरी", तो मान डोलवित पुढे गेला. गाडी जवळपास पूर्ण भरली होती, दोन तीन रिझर्व्हेशनच्या सीट्स यायच्या बाकी होत्या. एव्हाना कंडक्टर आणि ड्रायव्हर कुठे तरी गायब झाले होते. आता बाजूला कोण पात्र येणार आहे देवास ठाऊक असं म्हणत कानात इअर फोन सारून किशोर कुमारची भक्ती सुरु केली. तेवढ्यात एक मुलगी गाडीत प्रवेश करता जाहली,
मी झटक्यात इयर फोन काढत तिच्याकडे बघत होतो, त्या रिझर्व्हेशनच्या दोन सीट रिकाम्या होत्या तिथे ती गेली तर तिथली काही मंडळी ऑलरेडी आलेली होती, त्यांनी लगेच तिथे रुमाल टाकल्यावर तिने मोर्चा माझ्या सीटकडे वळवला, मी जरा सावरून बसलो.ती, "यहापर कोई है ?" मी, "हा जी मेरे दोस्त का रिझर्व्हेशन है" , ह्यावर तिने ओठांचा चंबू करत निराश चेहऱ्याने माझ्याकडे पाहीले.
"अब बस कबकी है ? ८ बजेकी बस भी मिस हो गयी, अब मै क्या करू" असे तिने म्हणाल्यावर क्षणार्धात डोक्यात होती नव्हती तेवढी चक्र वेगाने फिरवत तिच्याशी बोलायला सुरुवात केली. त्या जागेवरचा रिझर्व्हेशन कॅन्सल झालंय हे मी तिला सांगून टाकायला मी काय अलिबागवरून आलो नव्हतो. लगेच बोलून टाकलं की "अगर आप कहो तो आपके बैठना का इंतझाम कर सकता हु" , तर मोट्ठे डोळे करत ती माझ्याकडे आशेने बघायला लागली. तिला लास्ट स्टेशन अर्थात पणजीला जायचं होतं , जवळपास ४७० रुपये तिकीट आहे. मी तिच्याकडून पैसे घेतले (ती कितीही गोड असली तरी ४७० रुपयाला मी कश्याला खड्यात पडू असा विचार केला) आणि "आप यहापे बैठीये और मेरी लॅपटॉप की बॅग जरा संभालना" असं जरा अधिकारवाणीच्या सुरात बोलत मी पैसे घेऊन बसच्या खाली उतरलो, मोबाईल रिचार्जच्या शॉपकडे कंडक्टर दिसला, तातडीने त्याला गाठत परिस्थिती सांगितली आणि पैसे देत तिकीट मिळवलं. आणि लगबगीने गाडीत आलो, आधी चेहऱ्यावर काही भाव न दाखवता खिडकीजवळ बसलो. ती माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती, "क्या हुआ,बताओ ना" असं म्हणत तिने माझा दंड पकडला तेव्हा सप्तसूर झंकारीत बोले च्या तालावर माझं शरीर थरारल. मी दचकून दंड हलकेच सोडवून घेतला. छातीचे ठोके जरा नॉर्मल झाल्यावर, "मैने बडे अच्छे तरीकेसे बातचीत की है, कोई टेन्शन नही,जगाह मत छोडना नई तो प्रॉब्लेम हो सकता है, ये लीजिये आपका तिकीट" असं म्हणत तिच्या हातात तिकीट दिलं तेव्हा तिने परत परत ते तिकीट वाचून बघितलं आणि परत माझा दंड धरत "शुक्रिया जी" म्हणायला लागली तेव्हा परत सप्तसूर झंकारायला लागले आणि "पाया पडतो ग बाई , हात नको ग धरू, कसं तरी होतंय" असं मनात म्हणत होतो, ती माझ्या हाताला धरून ते तिकीट परत वाचत होती, ह्या सगळ्यात एवढ निश्चित झालं होत की तिची माझ्यावर जबरी श्रद्धा बसली होती, आणि ४०० किमी पार पडेपर्यंत तिची श्रद्धा तुटू द्यायची नही एवढचं मला सांभाळायच होतं.तो कंडक्टर देखील कोल्हापूरला उतरणार असल्याने मी केलेला गोंधळ तिला तसा समजणार नव्हता ही गोष्ट वेगळी होती.
गाडीने स्वारगेट सोडलं होतं, तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. मला सारखे फोन येत होते, आता मला फोन वापरावासा वाटत नव्हता, तो मी सायलेंट करत गप्पा कंटिन्यू केल्या. ती उत्तर प्रदेशची लखनौ मधली होती,amity मध्ये शिकायला होती. तिने तिचे नाव नुरिया असं सांगितलन. मी विचारला नसताना तिने तिच्या नावाचा अर्थ देखील सांगितला पण ते मला काही नीट समजलं नाही आणि परत विचारण प्रशस्त वाटलं नसतं. मध्यम उंची, बाळसेदार बांधा, चेहरा गोल होता, गोरा रंग, काळेभोर केस. हरणीसारखे मोठ्ठे डोळे, किंचित गरुडी बाक असलेले नाक (ह्या अश्या नाकाच्या मुली शक्यतो aggresive असतात आणि यांच्याबरोबर भांडायला खूप मजा येते पण प्रेमळ देखील असतात हेही तितकच खर.), लालचुटुक ओठ आणि चेहऱ्यावर ५ तिळ होते पण ते सौंदर्यात भर घालत होते, एकदम गोग्गोड दिसत होती. T-Shirt आणि पटीयाळा तत्सम वेश परिधान केला होता,त्यातलं फारसं मला काही कळत नाही,आपल्याकडच्या मुली काहीतरी घालतात हेच खूप आहे. तिचं निरीक्षण करताना मी हजारवेळा इकडे तिकडे बघत एक कटाक्ष हळूच तिच्याकडे टाकत तो लोभसवाणा चेहरा मनात साठवला, थेट रोखून तरी कसं बघणार ना (शेवटी संस्कार आहेत म्हटलं) !
कंडक्टरने दिवे मालवून टाकले आणि तेवढ्यात समोरून गाडी येत असताना साईड घेण्याचा नादात ड्रायव्हरने जोरात स्टेरिंग वळवले ( पूर्ण प्रवासात त्याने फार काळ स्टेअरिंग सरळ धरून ठेवले असल्याचे मला स्मरत नाही,पण त्याच्या ड्रायव्हिंगमुळे मला गोड गुदगुल्या खूप झाल्या, मी एवढा खुश होटो त्याच्यावर की त्याचा ऑटोग्राफ घ्यावा असे पण वाटून गेले असो) आणि तिने स्वाभाविक रित्या माझा हात आधारासाठी घट्ट पकडला. तिच्या मुलायम हाताचा स्पर्श झाल्यावर शॉक लगा शॉक लगा असं व्हायचं. ड्रायव्हर फुल मूड मध्ये होता आणि ही काही "आधार" सोडत नव्हती, डोळे मिटून व्याडेश्वराचा धावा केला पण तो काय डोळ्यासमोर येईना ,एक मन म्हणालं की " अरे मेल्या तू धर्म काय बुडवतोस ? पाप लागेल ना ? दुसर म्हणालं "हाड तेच्या आयला, बाजीरावाचा वारसा सांगता ना रे ? हिचा बिचारीचा काय दोष, गोड पोरगी आहे!" अशी मनात आंदोलने सुरु होती आणि मी अभावितपणे "जरा संभालके बैठीये" असं म्हणत तिने माझ्या हातावर हात ठेवला होता त्यावर मी परत हात ठेवला . "उससे अच्छा है की आप मेरे जगाह पे बैठ जाओ, यहासे पडोगी नही"(सत्यानाश, माझं हिंदी म्हणजे कहर आहे. तिचं हिंदी खूप सफाईदार होत. माझी घोडचूक तिच्या लक्षात आली नाही की तिने तस दाखवलं नाही हे देवाला माहित). तिने पडत्या फळाची आज्ञा मानून माझ्या जागेवर खिडकीजवळ बसली. ११च्या सुमारास शिरवळ स्थानक आलं, "१५ मिनिट गाडी थांबेल" असा पुकारा कंडक्टरने केल्यावर तिने विचारले की "बाहर जायेंगे क्या?" मग मी म्ह्टल " इसी टाईम शराबी होंगे, आपको कोई परेशान करेगा तो , आप यहापे बैठीये, मै लाता हु" ,तिने म्ह्टल "तो क्या हुआ? तुम तो हो ना साथ मे " असं म्हणत हात धरलान आणि परत माझ्या high bp -low bp चा खेळ सुरु झाला. ही सारखी सारखी हात धरून माझं bp का वाढवते ते मला समजत नव्ह्त.
आमच्या स्वाऱ्या तिथल्या हॉटेल मध्ये एका बाकावर स्थानापन्न झाल्या, आधी मी समोर बसलो आणि मग हात धुवत परत येऊन तिच्या बाजूलाच बसलो. ऑर्डर घ्यायला आलेला वेटर तर बाराचाच दिसत होता, खांद्यावर एक कळकट्ट फडका अडकवून कराकरा दाढी खाजवत वटारलेल्या डोळ्यांनी तो आमच्याकडे बघत होता. मी म्ह्टल बाबा रे, दोन राईस प्लेट दे . तिथे काही दुसर मिळणार पण नव्ह्त आणि असलं तरी ते खावसं देखील वाटत नव्ह्त. जिंदगी मिलेगी ना दोबारा देखा है क्या तुने ? असं तिला विचारल्यावर " mi naai buva " अश्या अर्थाने तिने मान हलवली. चला बर झाल असं म्हणत , "जब जब दर्द का बादल छाया, जब गम का साया लहराया, जब आंसू पलको तक आया, जब यह तनहा दिल घबराया, हमने दिल को यह समझाया की दिल आखिर तू क्यू रोता है,दुनिया मे यही होता है" ही इम्रान खान ने म्हटलेली शायरी हळू आवाजात गुणगुणली, तिने डोळे विस्फारून विचारलं "तुम शायरी लिखते हो"? मी सस्मित चेहऱ्याने "देवाची कृपा" अश्या थाटात खांदे उडवले. मी खरे तर होय असेही म्हटले नाही आणि नाही असं पण म्ह्टल नाही त्यामुळे कोणी माझ्यावर दावा नाही ठोकू शकत. एक और करो ना , प्लीज प्लीज प्लीज असं म्हणत तिने माझ्या मागे धोशा लावला. झालं आता कल्याण ?
माझ्या मोबाईलमध्ये ९ रुपये होते, ते मी सकाळी घरी फोन करून बोलवण्यासाठी ठेवले होते, पण आता त्याचा झक मारत मला GPRS प्लान सुरु करावा लागला. लगेच तिची नजर चोरत मिर्झा गालिबच्या शायऱ्या गुगलून काढल्या. "वह फिराक और वह विसाल कहा? वह शब ओ रोझ ओ माह ओ साल कहा ?(आयशपथ, तेव्हा मला घंटा देखील कळत नव्ह्त मी काय वाचतोय ते, कुठून उर्दूत शिरलो असं झालं मला.) पण मी आपलं ऐकवत होतो आणि ती ऐकत होती. ती लखनौची आहे शिवाय मुस्लीम आहे म्हटल्यावर तिचे उर्दू चांगले असणार ह्याची मला खात्री होती. शायरी संपल्यावर ती एवढी गोड हसली की त्या हास्यासाठी मिर्झा गालिबला थडग्यातून परत बाहेर ओढून आणावं असं वाटत होत. "आपको उर्दू आती है?" असं तिने प्रश्न टाकल्यावर "आप जैसे बेहतरीन तो नाही आती है" असं म्हणत कॅरम बॉलला द्रविड जसा टुक्क करून खेळतो तसा सेफ गेम खेळला, दरवेळा होय म्हणायला येडा आहे का मी ? जेऊन झाल्यावर पानं खायेंगे आप असं म्हटल्यावर ती आढेवेढे घेत हो म्हणाली, अर्थात हिंदीत. कलकत्ता पानं खाऊन तिचे ओठ छान रंगले होते.
दोघजण परत गाडीमध्ये येऊन बसलो. थंडी वाढायला लागली होती, तिच्याकडे एक स्टोल टाईप काहीतरी होतं. त्याने थंडी काय वाजायची थांबणार होती म्हणा? मी मनात "येस्स" म्हणून लॅपटॉपच्या बॅगमधून शाल काढली आणि म्हटलं "लीजिये" , तिने आधी नकार दिला आणि "फिर आपको भी थंड लगेगी" असं विचारलन. धत्त तेरी ,तू बाजूला असताना थंडी वाजायची काय बिशाद असं मी पुटपुटलो आणि "बाद मे देखेंगे,अभि आप पहन तो लो" असं सांगितलं. तिने शाल स्वतःभोवती गुंडाळून घेतली,मध्ये मध्ये खांद्याला खांदा लागून होणारा तो नाजूक स्पर्श सुखावून जात होता. खिडकीच्या बाबतीत झोल असा झाला होता की खिडकी पूर्ण बंद होत नव्हती आणि त्यातून थंड वाऱ्याचा झोत वेगाने येत होता आणि खिडकीजवळ बसल्यावर साधारण आपण खिडकीवर डोकं ठेवतो तो बार आणि खिडकीची खिट्टी तिथे डोकं टेकवल तर डोक्याला टोचत होत, ह्याचा परिणाम हा झाला की ती त्या बाजूला न झुकता थोडी माझ्यावर भार टाकून बसली होती. ह्यामुळे माझ्या रक्तदाबाचं आंदोलन जोरात सुरु झालं. गाडी अंधार कापत मागर्क्रमण करत होती, सातारा मागे पडत कोल्हापूरच्या वेशीवर आलो. एवढ्यात आमच्या बाईसाहेब (ही संज्ञा वापरताना मनास गोड गुदगुदल्या जाहल्या आहेत) गाढ झोपल्या होत्या. ड्रायव्हर का एवढा चेकाळला होता ते माहिती नाही पण तो दात ओठ खात गाडी हाकत होता आणि बसणाऱ्या धक्यांमुळे तिचं डोकं त्या बारवर आदळत होत, तिची झोपमोड होऊ नये म्हणून तिच्या पाठीमागून हात डावा हात नेत तो बार पकडला. आता तिचं डोकं बारऐवजी माझ्या हातावर आदळत होत म्हणजे तिला त्रास झाला नसता पण तिचं डोकं एवढ जड असल्याची मला कल्पना नव्हती त्यामुळे माझ्या हाताले ते हादरे नंतर सहन होईनात. तर मी थोडा चावटपणा करत बारवरचा हात काढून तो तिच्या डाव्या खांद्यावर ठेवत तिला जरास कुशीत ओढून घेतल्यासारख केलं, आणि हात तसच ठेवत थोडीशी पकड घट्ट केली, आता ती जवळजवळ माझ्या मिठीत शांत झोपली होती. तिला बहुदा हे समजत होत कारण तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य चमकून गेल्याचा भास झाला. हळूहळू मला देखील झोप अनावर होत मी देखील तिच्या डोक्यावर डोकं टेकवून झोपी गेलो. तीन चार तास तिला तसच कवटाळून शांत झोपलो होतो. एवढी छान झोप आणि सुद्धा राज्य परिवहनच्या बस मध्ये आजन्मात लागली नव्हती. जेव्हा जाग आली आणि डोळे किलकिले करत तिच्याकडे पाहिलं तेव्हा तिचं डोकं माझ्या छातीवर टेकलेल होत आणि मी दोन्ही हातानी तिला मिठी मारली होती, एवढी प्रगती मी झोपेत केली होती हे मला आता माहिती पडलं.
घड्याळात बघितलं तर ४.४५ वाजले होते. आता फक्त अर्ध्या पाउण तासाची सोबत होती. ती तर अजून तैशीच छातीवर डोकं घुसळत झोपलेली. त्या स्पर्शाने मनात भावनांच्या लाटा उंचबळून येत होत्या. वाऱ्यावर तिचे केस भुरूभुरू उडून माझ्या चेहऱ्याला स्पर्शत गोड संवेदना जागवित होते. तिचा गरम श्वास हातावर जाणवत होता. तिच्या मऊ शरीराचा स्पर्श खूप सुखावत होता, त्यावेळी मनात शायरींच्या तारा छेडल्या गेल्या "भूल सकता है भला कौन ये प्यारी आंखे, रंग मे डुबी हुई नींद से भारी आंखे, जागती रातो को सपनो का खजाना मिल जाये, तुम जो मिल जाओ जिने का बहाना मिल जाये,अपनी किस्मत पे करे नाझ हमारी आंखे" .फोंडा सोडून बस कणकवलीच्या दिशेने निघती झाली. आता दोघ कदाचित परत कधीच भेटणार नाही ह्या जाणीवेने मन व्याकूळ झालं अगदी प्रभाकर जोग यांची "ही वाट दूर जाते" ही चीज ऐकताना मन जस आर्त व्हायचं तसच. तिची झोपमोड होणार नाही ह्याची काळजी घेत हळूच तिच्या हातातला माझा हात सोडवून घेतला. तिच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव बघून सोडून जावेसे वाटेचना.
कंडक्टर ने "कणकवली आलंय,उतरायला घ्या" अशी हाळी देताच लगेच सामान सावरून घेतले. तिच्या अंगावर शाल तशीच राहू दिली. तिच्या कपाळावर ओठ टेकवत काही क्षण स्तब्ध होतो. नंतर अचानक मन भानावर येत सामान घेऊन उठलो आणि मागे न वळून बघता बसमधून खाली उतरलो. मागे वळून बघितलं तर उतरावस वाटणार नाही अशी भिती वाटली. अतिशय जड अंतकरणाने बसच्या पायऱ्या उतरत झटपट बस बाहेर आलो. ही ओळख माझ्या प्राक्तनातच लिहिली होती. ह्या भेटीत जे झालं ते नकळत पण घडत गेलं, त्यात वासना नावाचा प्रकार नव्हता म्हणून मला त्याची अजिबात खंत वाटत नाही. अचानक पारीजातकासारखी येऊन आयुष्य क्षणभरासाठी का होईना पण प्रफुल्लीत करून जाणारी नुरिया आजपावेतो मला कुठेच भेटली नव्हती. प्रवासात अशी बऱ्याचदा चटका लावून जाणारी माणसे भेटतात .
बेटा, चेहरा मायुस हो गया है तुम्हारा,लो खाना खाव असं म्हणत आग्रह करणारी हावडा ट्रेन मधली म्हातारी, आई वडील वारलेत ह्याची काहीच कल्पना नसताना डान्स इंडिया डान्स मे हिस्सा लेनेवाली हु असं ओरडत कम्पार्टमेंट मध्ये धिंगाणा घालणारी चिमुरडी अर्चना आणि डोळे पुसत तिला प्रोत्साहन देणारे तिचे दादाजी, सुरत ट्रेन मध्ये जागा मिळवताना भांडण करता करता अमित शाहबरोबर झालेली ओळख, त्रिवेंद्रमला जाताना एका मुलाची गर्लफ्रेंड जी जर्मन होती ,ती ह्याच्यावर नाराज झाली असता "अपने लोगोंपे कभी रूठना नही जाहीये जानू" असं त्याला तिला इंग्लिश मध्ये पाठवायचे होते आणि त्याच इंग्लिश म्हणजे हरे राम होत. तेव्हा "sweetu,never get angry on your closer ones" हे वाक्य त्याला सुचवले आणि ते त्याने पाठवले तेव्हा पूर्ण कम्पार्टमेंट तिचं उत्तर काय येत होत ते ऐकायला आतुर होता आणि तिचा हसरा स्मायली आला तेव्हा सगळ्यांनी मिळून केलेला जोश आणि बरेच जण आणि आज ही नुरिया. वाटून गेलं की नंबर मागायला हवा होता, पण नंतर वाटलं की ठरवून झालेल्या भेटीत काय मजा? बघू, नशीब चांगलं असेल तर परत कधीतरी एकत्र येउच. चुकलंच ते , तेव्हाच तिच्या खांद्याला धरून गदागदा हलवत सांगायला हव होत की "I like you Nooriya" पण धाडस झालंच नही.
"एक बात होटो तक है जो आई नही
बस आंखोसे है झाकती
तुमसे कभी,मुझसे कभी
कुछ लब्ज है वो मांगती"
कुठल्या तरी अनाहूत जाणीवेने मन थरारून उठलं आणि अंगावर रोमांच उभे राहिले, चटकन वळून बघतोच तर तीच शाल स्वतःभोवती गुंडाळून घेतलेली नुरिया बस मधून डोकं बाहेर काढून माझ्याकडे बघत होती , एक हात बाहेर काढत तिने तिचा रुमाल माझ्याकडे फेकला, तो धुळीत पडू नये म्हणून धावत जाऊन तो हवेतल्या हवेतच पकडला. ती माझ्याकडे बघून गोड हसली, माहित नाही भास होता की खरंच हसली ते !
प्रतिक्रिया
26 Oct 2011 - 7:10 pm | इंटरनेटस्नेही
मस्त मस्त! चांगलं लिहिलंयत भिडे साहेब. अशी खास कंपनी असेल्/हवी असेल तर ट्रेनचा प्रवास बरा. साईड लोअर/साईड अप्पर अशी तिकीटं बुक करायची.. आणि गपचुप ट्रेनच्या दरवाज्यावर बाहेर चिकटवलेल्या रिर्झवेशन चार्ट मधुन त्या खास व्यक्तीचे नाव जाणून घेऊन.. "युअर नेम इज.. वेट, लेट मी गेस.. 'प्रिया'...? अॅम आय राईट?" असा खडा टाकल्यावर ती अशी काय इंप्रेस होते म्हणुन सांगु.. ;)
26 Oct 2011 - 7:23 pm | रेवती
इंट्या, दिवाळी संपली की अभ्यासाला लाग.;)
26 Oct 2011 - 7:17 pm | अँग्री बर्ड
हा हा !चांगली आयडिया आहे. शेवटी तुमच्या नावात देखील स्नेह आहे म्हटल्यावर तो कसा वाढवायचा ह्याची कला तुम्हालाच जास्त अवगत असणार ना ~
26 Oct 2011 - 7:22 pm | रेवती
अग्ग्ग्ग! तुमची पार विकेट काढली की तिनं!;)
मधेच वर्णन जरा अतिशयोक्तिपूर्ण वाटलं.......पण खरं असूही शकेल्.........मुली बर्याच धीट झाल्यात आजकाल.;)
माझ्या शेजारी बसमध्ये कोणी सज्जन जरी बसला तरी अज्याबात न झोपता मेला काही आगावूपणा करणार नाही ना असा पहारा देत असे.
ती मुलगी पुन्हा तर भेटणारच नाही पण शालही घालवून बसलात की नाही!;)
आता घरी विचारलं कुणी की बाबा रे शाल कुठं गेली? तर काय उत्तर देणार?
26 Oct 2011 - 7:26 pm | अँग्री बर्ड
बडवे(by the way) , शाल घेतलीय हे घरी माहिती नाही, त्यामुळे शाल असली काय नसली काय !
26 Oct 2011 - 7:39 pm | रेवती
एक गोष्ट सांगायची र्हायली. ती म्हणजे तुमची कथा वाचून मिष्टर अॅन्ड मिशेस अय्यर नावाच्या शिनेमाची आठवण आली. बाकी आजकाल आपल्या छोट्या मोठ्या खरेद्या घरी न सांगण्याचे फायदे समजतायत.;)
अवांतर: कृपया तुमचे सहीतील वाक्य तुटक रेषेनी वेगळे दाखवा म्हणजे तो प्रतिसादाचा भाग वाटणार नाही.
26 Oct 2011 - 8:51 pm | अँग्री बर्ड
sorry
26 Oct 2011 - 9:31 pm | चिंतामणी
ती मुलगी पुन्हा तर भेटणारच नाही पण शालही घालवून बसलात की नाही
अगदीच असे काही नाही. तीने रूमाल दिला ना. भले कोहळा घेतला असेल, पण आवळातर दिला ना.;) ;-) :wink:
26 Oct 2011 - 7:26 pm | इंटरनेटस्नेही
=)) अगदी बरोबर.. अजुन बर्याच आयडियाज आहेत आमच्याकडे.. अधिक माहितीसाठे व्यनि करा.. ;)
+१ हेच म्हणतो.. खरंतर जी सिच्युएशन समोर येते त्यातुन जो सक्सेसफुली मार्ग काढतो/काढु शकतो तो खरा इंटेलिजंट. तुम्ही कसं ४७० रुपये पण कमवलेत आणि शिवाय रुमाल देखील! ;)
26 Oct 2011 - 7:30 pm | अँग्री बर्ड
:D :D :D
26 Oct 2011 - 7:57 pm | तिमा
तुम्ही देव आनंद होऊन 'नुरिया अब कैसे आ बन गयी, अजब इत्तफाक है' असं गाणं पण म्हणायला हवं होतं.
अरेरे, आम्ही आमचं तरुणपण, असं काही न करताच वाया घालवलं!
26 Oct 2011 - 8:38 pm | यकु
मस्त लिहीलंय.
आवडलं.
अवांतरः मिपावरील 'शर्मसार' प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत ;-)
27 Oct 2011 - 9:11 am | अर्धवट
बरं, ही घ्या,
असले लेख मिपावर येऊ लागलेले पाहून एक मिपाकर म्हणून आज शरम वाटली.
27 Oct 2011 - 2:28 pm | यकु
या प्रतिक्रियेतून तुम्ही कॉपीराईटचा भंग केल्याने आज बालगंधर्व चौकात एक उदबत्ती लाऊन तुमचा निषेध केला जाईलच :)
9 Dec 2011 - 5:38 pm | किचेन
मी त्याच उदबदत्तिला पेटवून तुमचा निषेध व्यक्त करणार आहे.
27 Oct 2011 - 2:33 pm | अँग्री बर्ड
तुमच्या अभिरुचीच्या वाख्या नेमक्या किती लवचिक आहेत ह्याची अजूनपर्यंत कल्पना न आल्यामुळे मला डबल शरम वाटली.
27 Oct 2011 - 3:04 pm | यकु
अरे भिडे साहेब तुम्ही तर शिरेस झाले..
मी आवाहन केलेली व अर्धवटांनी दिलेली प्रतिक्रिया काय मजा आणते ते तुमच्या लक्षात आलं नाही?
सिरियस नव्हती ती प्रतिक्रिया..
उलट ती आली नसती तर मजा आली नसती.. कुणालाही विचारा
:)
27 Oct 2011 - 3:43 pm | अँग्री बर्ड
असे का ? मला लक्षात नाही आले. मी नवीन आहे ना म्हणून . शब्द मागे घेतो.
27 Oct 2011 - 3:06 pm | यकु
प्रकाटाआ
26 Oct 2011 - 10:00 pm | निनाद मुक्काम प...
नुरिया हे नाव अरब मुलींमध्ये लोकप्रिय आहे.
बाकी भिडे साहेब तुमचा लेख व निर्णय आवडला .
प्रवासात अनेक वेगवेगळ्या स्वभावाची मनसे भेटतात .माझ्या मते मुलींना चांगल्या व वाईट माणसांची नजर लगेच कळते .म्हणूनच तिने एवढा विश्वास तुमच्यावर टाकला .
मानलेल्या बहिणीचे आभार माना.
पण तुम्ही नंबर घेतला नाही हे हे खूप आवडले .नशिबात असेल तर परत भेटेन
तेव्हा मात्र तुम्ही राऊ च्या भूमिकेत शिरले पाहिजे .
पु ले शु
26 Oct 2011 - 10:04 pm | जाई.
मस्त लिहीलय
खुसखुशीत लेखन
अवांतर=बायदवे = रच्याकने(रसत्याच्या कडेने)
27 Oct 2011 - 3:14 pm | अप्पा जोगळेकर
एक हात बाहेर काढत तिने तिचा रुमाल माझ्याकडे फेकला, तो धुळीत पडू नये म्हणून धावत जाऊन तो हवेतल्या हवेतच पकडला.
इतक्या पुढे गेल्यानंतर तुम्ही फोन नंबरसुद्धा नक्कीच घेतला असणार याबद्दल मला खात्री वाटते. अभिनंदन.
ह्या भेटीत जे झालं ते नकळत पण घडत गेलं, त्यात वासना नावाचा प्रकार नव्हता
तुम्ही तरुण आहात असे वाटते. त्यामुळे आश्चर्यच वाटले.
'अमुक एक मुलगी मला आवडते' असं काहीजण सांगतात तेंव्हा आश्चर्य वाटत नाही. स्त्री ही आवडण्यासारखीच गोष्ट आहे. त्यापलीकडे जाउन 'पण तिच्याकडे मी तशा नजरेने पाहात नाही' असे जेंव्हा कोणी म्हणते तेंव्हा तो मूर्खपणा वाटतो.
27 Oct 2011 - 3:52 pm | अँग्री बर्ड
तिने रुमाल फेकला, फोन नंबर नाही. स्त्री आवडण्याची गोष्ट असली तरी ते स्त्री कशी आहे ह्यावरून देखील अवलंबून आहे. काही मुली असतातच अश्या की त्यांच्याशी जवळीक साधाविशी वाटते पण ती हळुवार पद्धतीने हे, धसमुसळेपणाने नाही. आणि काही स्त्रिया अश्या असतात की बघताच क्षणी वाटते की ------------------------ पण ही तशी नव्हती.
असो , तुमच्या बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया मनात नेमके काय ठेऊन दिलेल्या असतात ते समजत नाही, त्यामुळे काही बोलायला जावे तरी पंचाईत. सब्जेक्ट मध्ये काय लिहावे इथपासून सुरुवात आहे.हळूहळू सवय होते आहे. सर्वार्थाने मिपाकर बनायला आवडेल.
27 Oct 2011 - 6:04 pm | यकु
भिडे , रुमाल नीट तपासलात का?
27 Oct 2011 - 6:20 pm | मन१
------/\------
संवाद आवडला.....
27 Oct 2011 - 6:43 pm | श्रावण मोडक
अनुभव, अनुभव. लिहा तुम्हीही. ;)
27 Oct 2011 - 6:47 pm | चतुरंग
रुमालात हात बांधोन शरण आलेले असणार यकु कधीतरी! ;)
(रुमाली) रंगा
28 Oct 2011 - 6:46 pm | वाहीदा
भिडे , रुमाल नीट तपासलात का?
हो ना, कदाचित शिंकली असेल त्या रुमालात ती ;-)
29 Oct 2011 - 6:12 pm | इंटरनेटस्नेही
=)) =))
30 Nov 2011 - 5:42 pm | वपाडाव
हे मेलं आपलं काहीतरी खुळ्यागत......
ल्येका.... तो रुमाल फ्रेम करुन भितीला सजवुन ठंव रं.....
काय माहीत... ती बिच्चारी हनिमुनला जाताना तुझी शाल घेउन गेली असंन....
बी ऑप्टिमिस्टिक.....
9 Dec 2011 - 5:40 pm | किचेन
क्रिकेट अनि फुट्बॉल मध्ये चांगल नाव कमवाल तुम्हि.
27 Oct 2011 - 6:48 pm | स्मिता.
चित्रपटाची कथा होईल असा अनुभव छान रंगवला असला तरी थोडा अतिशयोक्तिपूर्ण वाटतो या रेवतीताईंच्या म्हणण्याला सहमत. आजही भारतातल्या मुली इतक्या धीट नसतात. अनोळखी मुलगा कितीही सज्जन वाटला तरी एवढ्या पुढे कोणी जाणार नाही असं वाटतं.
27 Oct 2011 - 7:01 pm | चेतन सुभाष गुगळे
<< आजही भारतातल्या मुली इतक्या धीट नसतात. >>
असं काही नाही. मला तर १९९२ साली याहूनही धीट तरूणीचा अनुभव आला आहे.
27 Oct 2011 - 7:08 pm | यकु
लिहा की मग तुम्ही पण ..
वाट कसली पाहताय..
अवांतरः फक्त लिहीताना तो तुमचा अतिगंभीर मीटर्बाज स्वभाव जरा खुंटीला अडकवून ठेवा ( ह. घ्या.) ;-)
10 Nov 2011 - 7:28 pm | चेतन सुभाष गुगळे
<< फक्त लिहीताना तो तुमचा अतिगंभीर मीटर्बाज स्वभाव जरा खुंटीला अडकवून ठेवा >>
तेव्हापासूनच तर माझा स्वभाव बदलला की. http://www.misalpav.com/node/19708 इथे वाचा म्हणजे समजेलच.
8 Dec 2011 - 9:29 am | चिंतामणी
वाचले हो. पण............
खोदा पहाड.........
(ह.घे.)
27 Oct 2011 - 7:12 pm | कानडाऊ योगेशु
१९ सालानंतरही तुम्हाला आठवतोय म्हणजे नक्कीच खतरनाक अनुभव असणार. वाचायला नक्कीच आवडेल.
27 Oct 2011 - 7:55 pm | इंटरनेटस्नेही
मला असा अनुभव २००३ साली आला आहे. ऑनलाईन कॉपीज ऑफ अनुभव डिसक्राईब्ड इन पीडीएफ अव्हेलेब्ल फॉर प्राईव्हेट सर्क्युलेशन. ;) =))
27 Oct 2011 - 7:57 pm | रेवती
२००३?
अरे ए इंट्या, तेंव्हा बालवाडीत होतास तू.
काहीही ठोकू नकोस.;)
27 Oct 2011 - 8:07 pm | चेतन सुभाष गुगळे
<< अरे ए इंट्या, तेंव्हा बालवाडीत होतास तू. >>
हे पण अगदीच अशक्य नाही. गजानन जागिरदार नावाचे एक ज्येष्ठ अभिनेते असं लिहून गेलेत की ते दुसरीत असताना त्यांच्या वेरोनिका नावाच्या ऍंग्लोइंडियन शिक्षिकेवर प्रेम करीत आणि तिला पटविण्याकरिता जोरदार प्रयत्न करीत असत. "माझे प्रियाराधन" नावाच्या त्यांच्या लेखात मला हे वाचल्याचे स्मरते.
28 Oct 2011 - 2:00 am | शिल्पा ब
तुमच्या प्रत्येक प्रतिसादागणिक तुमच्याबद्द्लचा आदर वाढतच चाललाय.
28 Oct 2011 - 6:33 pm | प्रदीप
प्रतिसाद आवडला!
28 Oct 2011 - 1:42 am | इंटरनेटस्नेही
रेवतीताई मी नववीला होतो तेव्हा आणि ती सातवीला..(बाबांच्या मित्राची मुलगी).. बस्स एवढे डिटेल्स पुरे झाले.. मला लाज वाटते आता! :shy: :shy:
27 Oct 2011 - 8:46 pm | प्रचेतस
इंट्या लेका, आधी दिवस फुलपाखरी पूर्ण कर की रे.
28 Oct 2011 - 3:42 am | इंटरनेटस्नेही
वल्ली, अरे जाऊ दे.. इथे पब्लिक (थोडेच आहेत पण आहेत काही) फारच पर्सनल होतं.. :( आणि एनीवेज, दिवस फुलपाखरी आणि उपरोल्लिखित २००३ चा अनुभव यात जमीन अस्मानचा फरक आहे.
27 Oct 2011 - 8:06 pm | स्मिता.
मला तर १९९२ साली याहूनही धीट तरूणीचा अनुभव आला आहे.
आता भिड्यांनी सुरूवात केलीच आहे तर तुम्हीही तुमचा अनुभव सांगाच. खाली इंट्यानेही असा अनुभव असल्याचे लिहिले आहे. मुलींची धीटाई जाणून घेण्याची उत्सुकता वाटतेय ;)
28 Oct 2011 - 10:19 am | चेतन सुभाष गुगळे
लेखनाची जुळवाजुळव सुरू असून याकरिता वेगळा धागा काढला जाईल.
28 Oct 2011 - 5:46 pm | मोहनराव
त्या धाग्याची वाट पाह्तोय!! :)
10 Nov 2011 - 7:26 pm | चेतन सुभाष गुगळे
हा घ्या धागा :- http://www.misalpav.com/node/19708
9 Dec 2011 - 5:35 pm | किचेन
ती सिंहिण वाटत! ;)
27 Oct 2011 - 9:28 pm | बिपिन कार्यकर्ते
शैली आवडली! अजून लिहा.
27 Oct 2011 - 9:58 pm | हंस
व्वा रोहितराव, मस्त लिहीले आहे!
ह्यावरुन माझा एक किस्सा आठवला, अश्याच प्रवासात शेजारी बसलेल्या मुलीचे डोके झोपेत अलगद माझ्या खांदयावर आले, आणि नंतर हवेची झुळुक्.......केस...... अगदी तुम्ही लिहिल्याप्रमाणे माझी अवस्था झाली होती!
त्या रापमच्या खटार्यात आणि चांद्रभूमीसद्रुश्य रस्त्यांवरुन जातानाही आम्ही अंतरिक्षात होतो....................!
28 Oct 2011 - 11:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान.....! प्रवास लेखनासारखाच चांगला रंगलाय तुमचा. :)
-दिलीप बिरुटे
28 Oct 2011 - 12:35 pm | गवि
झक्कास लेखन.. मस्त अनुभव.
आता प्रतिसादांकडे वळतो.
प्रतिसाद अत्यंत विंट्रेस्टिंग झालेले आहेत. सर्वांनाच विविध अनुभव आलेले दिस्ताहेत.
चार्पाच लोकांनी लिहिले आणि भीड चेपली की मीही माझा एखादा अनुभव लिहीन.
एकदा लहानपणी लपाछपी खेळताना आम्ही दोघे कपाटात लपलो ती गंमत..
30 Nov 2011 - 6:20 pm | विजुभाऊ
एकदा लहानपणी लपाछपी खेळताना आम्ही दोघे कपाटात लपलो
एवढा मोठा मुलगा कपाटात मावूच कसा शकेल ;)
30 Nov 2011 - 11:39 pm | गवि
त्यामुळेच तर जास्त गंमत आली ना विजुभाऊ.म्हणजे अम.. जागाच नव्हती ना नीट..
19 Jul 2012 - 11:35 pm | चिगो
विजुभाऊ कहर आणि त्यावर गवि महाकहर..:-D. मरलोय पुरता..:-O
28 Oct 2011 - 2:23 pm | गणपा
मेल आमच्या नशीबातच नेमके टोणगे कसे येतात बाजुला माहीत नाही.
आता एकदा नाडी तपासायलाच हवी.
28 Oct 2011 - 6:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> मेल आमच्या नशीबातच नेमके टोणगे कसे येतात बाजुला माहीत नाही.
खरंय रे गंपा, आपल्याला वाट्याला लैच बेक्कार लोक येतात. खांद्यावर दोन दोन मिनिटाला माना टाकणारे, ' अरे भो नीट बैस ना' म्हटल्यावर थोडसं सावरून पुन्हा पाचेक मिनिटांनी खांद्यावर मान टाकणारे. खांदे हलविल्याने बिचार्याची झोपमोड तर होत नसेल अशी कधी कधी मला वजन पेलून दयाही येते. पण, खांद्यावर मान टाकणारा सर्वात बेक्कार मनुष्य प्राणी कोण असेल तर खांद्यावर मान ठेवल्यावर तोंडातून लाल गाळणारा. परमेश्वरा प्लीज प्रवासात असा माणूस माझ्या शेजारी कधीच देऊ नको ही नम्र विनंती.
बाकी, नुरियासारखी सखी शेजारीन प्रवासात नशिबानेच यावी लागते. अर्थात याबाबतीत काही सहप्रवासी जरा 'धीट'च असतात. कधी कधी 'कैसे मजा ली उसकी' असे म्हणनारेही असतात. आणि कधी-कधी तर काही सहप्रवासी जरा जास्तच मोकळे ढाकळे असतात तो भाग जरा वेगळा .....असो, आवरतो.
-दिलीप बिरुटे
(प्रवासी)
28 Oct 2011 - 4:51 pm | पैसा
नावाला जागलात हो!! एक साधा फोन नंबर मागितलात नाही?
असो. लेख छान जमलाय, पण बरेचदा "चलो एक बार फिरसे अजनबी बन जाए हम दोनों" असं म्हणून आपल्या वाटेने जाण्यात शहाणपणा असतो.
28 Oct 2011 - 5:50 pm | वाहीदा
कम्माल आहे या मुलीची अन तुमचीही !! ___/\__
शी बाई ! बोलताना अजनबी(मराठी ?? ) पुरुषाच्या दंडाला काय तो हात लावायचा ?
आमच्या शेजारी रात्रीच्या प्रवासात कोणी चुकुन माकून जरी बसला ना, तर आम्ही त्याला नीट झोपू देत नाही
अन असं काही घडलं तर आम्ही त्याची नक्कीच 'निंद हराम' करु ;-)
हि खुबसुरत बला त्यावेळी तुमच्या दंडाला हात लावत होती आता कधी भेटली तर - 'कहीं गिरेबान ना पकड लें' ;-)
( गिरेबान ला मराठीत काय म्हणतात माहीत नाही ) तेव्हा सांभाळून !
@ इंट्या अभ्यासाला लागा आता, मला एसएमएस पाठविलास कि आता सिरीयसली अभ्यास करणार आहे अन हा सिरीयस अभ्यास आहे का रे तुझा ?
---तुझी (सिरीयस) ताईडी
28 Oct 2011 - 5:58 pm | स्मिता.
वाहिदाताई,
अजनबी = अनोळखी
अवांतरः आजवर मी रात्रीचा प्रवास कुणा अनोळखी पुरुषाच्या बाजूला बसून केलेला नसल्याने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपेन की नाही सांगता येत नाही पण मी बसच्या रात्रीच्या प्रवासात स्वतः तर झोपू शकतच नाही आणि नवर्यालाही झोपू देत नाही. तो शेवटी कंटाळून एखादी रिकामी जागा शोधून तिकडे जावून बसतो (झोपतो) ;)
28 Oct 2011 - 6:57 pm | वाहीदा
'गिरेबान' अन 'खुबसुरत बला' ला मराठीत काय म्हणतात.. ते माहीत नाही ग , खव त सांगीतलेस तरी चालेल
28 Oct 2011 - 8:56 pm | अर्धवट
'खुबसुरत बला' याला इष्टापत्ती असं म्हणता येईल किंवा बोरकरांच्या भाषेत 'जंबिया मधाचा' म्हणता येईल.
पण गीरेबान म्हणजे मुळात काय माहित नसल्याने प्रतिशब्द सुचत नाही. अर्थ सांगितल्यास बरे होईल.
28 Oct 2011 - 8:59 pm | रेवती
गिरेबान म्हणजे कॉलरला हात घालणे, गचांडी धरणे असा अर्थ आहे असे वाटते. तो इथे साजेसा नाही असेही वाटते.
28 Oct 2011 - 9:03 pm | अर्धवट
मग इथं समर्पक होईल असा 'मानगुटीवर बसेल' असा शब्द वापरता येईल :)
29 Oct 2011 - 6:46 am | रेवती
हो. बरोबर वाटतोय.
29 Oct 2011 - 12:12 pm | वाहीदा
स्वातीताई, अर्धवट (तुम्हाला हे नाव मात्र नक्कीच समर्पक नाही हे आधीच नमूद करु इच्छिते)राव, रेवतीताई , धन्यवाद !
माझ्या शब्दकोशात नविन भर पडली :-)
29 Oct 2011 - 6:15 pm | इंटरनेटस्नेही
अगं दिवाळी आहे म्हणुन थोडा ब्रेक घेतला होता. :) आजपासुन बॅक टु बुक्स!
---तुझा (स्टूडिअस), बाळ इंटेश.
30 Nov 2011 - 6:17 pm | विजुभाऊ
व्व.... मस्त
जपून ठेवावा असा अत्तरी अनुभव.
7 Dec 2011 - 5:15 pm | विवेकखोत
आमच्या प्रवासात चायला एकदा पोरगी आली होती, थोडी फार लाईन पण भेटली पण चायला बोलायची हिम्मत काय झाली नाही, तुमी हिम्मत केली . उत्तम प्रवास वर्णन
8 Dec 2011 - 11:17 am | दिपक
खुसखुशीत लेखन आवडले. शेवटचा पॅरा जास्तच आवडून गेला. लिहित रहा.
9 Dec 2011 - 5:48 pm | किचेन
चार चौघात आम्ही नवर्याशेजारीही सांभाळून बसतो.
हि बाय अनोळखी असून कशी काय एवढी जवळ आली?
19 Jul 2012 - 1:02 pm | विकाल
उत्खनन.... धाग्याचे उत्खनन...!!
जबराट..!
...एक बात होटो तक है जो आई नही
बस आंखोसे है झाकती
तुमसे कभी,मुझसे कभी
कुछ लब्ज है वो मांगती"....!!!
अपूर्णतेचं तीट..!!
19 Jul 2012 - 1:08 pm | बॅटमॅन
चायला इचिभना काय भारी नशीब तुमचं. लै प्रवास केला सर्व प्रकारे पण आमचं नशीब म्हणजे तिच्यायला *डू ते *डूच :(
19 Jul 2012 - 1:29 pm | मन१
सदर धागा हा अजून एका गाजलेल्या धाग्याची प्रेरणा होता.(http://www.misalpav.com/node/19536#comment-348627)
गाजलेला धागा :- http://www.misalpav.com/node/19708