प्रतिसाद

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जे न देखे रवी...
17 Jul 2008 - 12:33 pm

आमची प्रेरणा स्वाती ताईंची कविता खाली-वर, खाली-वर
--------------------------------------------------------------------------
घोंघावणार्‍या चर्चेत
सोडुन दिला एक प्रतिसाद
अलगद
करुन राहिलो गमन
पहात राहिलो मजा
इकडे तिकडे

:
प्रतिसाद..........
आता दिसतही नाही
मी
शोधत आहे.........
नवीन आलेले प्रतिसाद
वर-खाली वर-खाली

विडंबनप्रकटन

प्रतिक्रिया

स्वाती फडणीस's picture

17 Jul 2008 - 12:35 pm | स्वाती फडणीस

:) आवडले

अमोल केळकर's picture

17 Jul 2008 - 12:37 pm | अमोल केळकर

धन्यवाद !

( गमन न केलेला ) अमोल

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

बेसनलाडू's picture

17 Jul 2008 - 12:59 pm | बेसनलाडू

जबर्‍या!
(प्रतिसादी)बेसनलाडू

केशवसुमार's picture

17 Jul 2008 - 1:10 pm | केशवसुमार

केळकरशेठ,
समयोचित विडंबन आवडले
केशवसुमार
स्वगतः केश्या विडंबनाचा वसा पुढे चालू राहणार 8>

अमोल केळकर's picture

17 Jul 2008 - 1:22 pm | अमोल केळकर

साहेब,
आपल्या प्रोत्साहाना बद्दल धन्यवाद
शिकवणी केंव्हापासुन चालु करताय ?

(आपला शिष्य ) अमोल

(स्वगत : स्वगत कसे लिहायचे हे ही जाता जाता शिकेन म्हणतो)
अवांतर : मिरजेत असतानाच गुरुजींना भेटायला पाहिजे होतं .सांगलीहुन जवळ होत. बघुया आता केंव्हा योग येतो ते भेटायचा)
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सहज's picture

17 Jul 2008 - 1:11 pm | सहज

विडंबन आवडले.
:-)

चतुरंग's picture

17 Jul 2008 - 4:32 pm | चतुरंग

एकदम चपखल आणि मार्मिक विडंबन!
तुमच्या कल्पकतेला दाद! :)

(स्वगत - रंगा चल, आता केळकरशेठचे पाय कसे आणि कधी खेचायचे ह्या तयारीला लाग पाहू! ;)

चतुरंग

ब्रिटिश टिंग्या's picture

17 Jul 2008 - 4:56 pm | ब्रिटिश टिंग्या

बॉस १ नंबर!
योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य विडंबन!

लगे रहो!

विसोबा खेचर's picture

18 Jul 2008 - 12:37 am | विसोबा खेचर

प्रतिसाद..........
आता दिसतही नाही
मी
शोधत आहे.........
नवीन आलेले प्रतिसाद
वर-खाली वर-खाली

हा हा हा! मूळ कविता डोक्यावरून गेली परंतु हे विडंबन मात्र आवडलं! :)