मी मराठी.नेट लेखन स्पर्धा २०१२

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
25 Nov 2011 - 1:27 pm

नमस्कार,

मी मराठी.नेटवर नेहमी नवनवीन योजना राबवल्या जातात, त्यातील एक लेखन स्पर्धा. मागील वर्षी घेतलेल्या लेखन स्पर्धेला व कविता स्पर्धेला सर्वांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी मराठी सर्वांचा ऋणी आहेच. या वर्षी देखील आपण एक लेखन स्पर्धा घेत आहोत लेखन स्पर्धा २०१२ यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. सर्व मराठी जाणकारांनी यात आवर्जून भाग घ्यावा आणि लेखन स्पर्धेत भाग घेऊन भाषा समृद्धीच्या प्रयत्नात आपला वाटा उचलावा ही विनंती.

स्पर्धा १० डिसेंबर २०११ सकाळी १० वा. सूरू होईल व प्रवेशिका घेण्याची सुरवात देखील तेव्हा होईल. स्पर्धा पुर्ण होईपर्यंत स्पर्धेच्या घोषणेचा हा अधिकृत धागा असेल.

स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:

  • स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वत:चे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे. लेखन मुद्रण माध्यमात पूर्वप्रकाशित झालेले नसावे. लेखन महाजालावर/इंटरनेटवर पूर्वप्रकाशित नसावे
  • एक लेखक जास्तीत जास्त ३ प्रवेशिका सादर करू शकतो.
  • लेखनाचा प्रकार हा लघुकथा लेखन असा ठेवण्यात आला आहे. लघु / दीर्घकथा द्याव्यात, शब्द बंधन नसले तरी क्रमशः लेखन स्पर्धेत घेतले जाणार नाही. इतर विषय स्विकारले जाणार नाहीत.
  • डाव्या बाजूला लेखन करा मध्ये लेखन स्पर्धा २०१२ हा विभाग या विभागामध्ये लेखन प्रकाशित करावयाचे आहे
  • विजेत्यांची निवड करताना शुद्धलेखन व कथेची मांडणी यांचा विचार केला जाईल यांची नोंद घ्यावी.
  • सर्व प्रवेशिकाचे परिक्षण लेखन क्षेत्रातील ३ मान्यवर व्यक्ती करतील, त्यांची नावे स्पर्धा चालू होईल त्या दिवशी येथे दिली जातील
  • स्पर्धा १० डिसेंबर ते १० जानेवारी २०१२ या कालावधीसाठी खुली राहील. त्यानंतर अंदाजे १४ फेब्रुवारी २०१२ च्या सुमारास अंतिम निकाल जाहीर केला जाईल, जो मीमराठी.नेट या संकेतस्थळावर तसेच संबंधित संस्थांच्या मुद्रित वितरणातून जाहीर केला जाईल.
  • स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील जी पुस्तक स्वरूपात असतील. या तिघांव्यतिरिक्त अंतिम फेरीत पोचलेल्या सर्वांना मीमराठी.नेट तर्फे प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. प्रथम क्रमांक :१२ पुस्तके (किमान किंमत ३०००.०० रु.), द्वितीय क्रमांक :८ पुस्तके (किमान किंमत १८००.०० रु.), तृतीय क्रमांक :५ पुस्तके (किमान किंमत १०००.०० रु.)
  • स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. विजेते लेखन मीमराठी तर्फे मुद्रण माध्यमात प्रसिद्ध करावयावे झाल्यास लेखकांशी स्वतंत्रपणे पत्रव्यवहार केला जाईल.
  • बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पुणे अथवा मुंबई येथे होईल. विजेत्यांनी बक्षीस स्वहस्ते घेणे आहे. बक्षीस वितरणासंबधीची घोषणा वेगळ्या धाग्यावर केली जाईल.
  • स्पर्धा सुरळीत पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन नि मीमराठी संचालक मंडळ राखून ठेवत आहे.
  • सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मधे होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. मीमराठी.नेट येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.

प्रवेशिका सादर करण्याची पद्धत.

१. लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात मीमराठी.नेट इथे प्रकाशित करावे लागेल.

२. यासाठी लेखकाला मीमराठी.नेट चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. १८ वर्षे पूर्ण केलेल्या कोणाही व्यक्तीला मीमराठी.नेट चे सभासदत्व विनामूल्य घेता येते.

३. स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे याचा व्यक्तिगत निरोप व्यवस्थापक या आयडीला पाठवणे आवश्यक आहे. अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही. या निरोपात लेखकाचे मूळ नाव (स्पर्धेच्या निकालात मूळ नावाची घोषणा केली जाईल.), प्रवेशिका म्हणून सादर करावयाचे असलेले लेखन मीमराठीवर स्पर्धा विभागात प्रसिद्ध करून त्याचा मीमराठीवरील दुवा, संपर्क क्र., विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पत्ता देणे बंधनकारक आहे.

४. सदर स्पर्धा मीमराठी.नेट चे मालक व त्यांच्या कुटुंबियाव्यतिरिक्त इतर सर्वांसाठी खुली आहे.

५. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.

६ एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क मीमराठी.नेट राखून ठेवत आहे.

७. अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखे आधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क मीमराठी.नेट राखून ठेवत आहे.

८. निकालाबाबत मीमराठी.नेट ने नियुक्त केलेले पर्यवेक्षक / परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास मीमराठी.नेट बांधील नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
______

पुढील सर्व बदल/घोषणा/ स्पर्धेची सुरवात या बद्दलची माहिती येथे अद्यावत केली जाईल.
सर्व मीमकरांना नम्र विनंती आहे की सर्वांनी भरभरून भाग घ्या व हा धागा/ स्पर्धेची माहिती आपल्या ओळखीतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.

व्यवस्थापक,

मी मराठी.नेट

* स्पर्धेचा मुळ धागा

भाषासाहित्यिकसमाज

प्रतिक्रिया

निवेदिता-ताई's picture

25 Nov 2011 - 1:32 pm | निवेदिता-ताई

छान ....पाठविन एखादे

मिसळपाव वर अशा स्पर्धा होत नाहीत काय?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Nov 2011 - 1:45 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मिसळपाव वर अशा स्पर्धा होत नाहीत काय?

तुच कां नाही सुरु करत एखादी स्पर्धा...
आम्ही आनंदाने सहभागी होऊ, फक्त परिक्षक म्हणून कोणाला निवडशील त्यावर लक्ष ठेवून असू :davie:

मी परीक्षकपदासाठी उमेदवार म्हणून उभी राहायला तयार आहे.
मी बहुमताने विजयी होईल यात मला काहीच शंका नाही.सर्व अशुद्ध लेखानावले मिपाकर मलाच मत देतील याची मला खात्री आहे.

आदिजोशी's picture

25 Nov 2011 - 4:44 pm | आदिजोशी

मागच्या वर्षीही घेतला होता आणि बक्षिसही मिळवले होते :)

सुहास झेले's picture

25 Nov 2011 - 4:52 pm | सुहास झेले

यप्प :) :)