मी- एक शून्य

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in जनातलं, मनातलं
16 Nov 2011 - 9:34 am

प्रेरणांचा सध्या सुकाळ आहे. विसुनानांच्या शब्दांत सोपे फुलटॉस. घड्याळ थोडे हळू झाले आहे आणि हाताशी अखंड आंतरजाल आहे. असे आउटसाईड दी ऑफस्ट्म्प चेंडू मिळाले की रावसाहेबांच्या शब्दांत 'कसं आवरायचं हो मन?'
धनंजय, माफ करा

शून्य
खांद्यावरचा पदर काढला, की काय होते? पदर होतो वेगळा - आता तो पदर असला काय आणि नसला काय. महत्त्वाचा राहातो तो गड्डा म्हणजे खांदा. 'पिंजरा' मध्ये संध्या म्हणते तसा 'अटकर बांधा, गोरा गोरा खांदा, पदर वार्‍यावरी' खांदा ही कल्पना पदराशिवाय शिल्लक राहाते. एक एक पदर काढता-काढता शेवटी असे होते - शेवटचा पदर बाजूला केल्यावर काहीच शिल्लक राहात नाही. असे कसे? पदर बाजूला केल्यानंतर तर अखंड विश्वरुपदर्शन होते....
म्हणजे पदर नसलेल्या"खांदा" कल्पनेसाठी आवश्यक काय? हाती येते शून्य. एक शून्य शून्य . म्हणजे एक आणि चांगली दोन शून्ये. शून्याच्या आतले एक शून्य. शून्यावरचे एक शून्य. गरगरीत शून्यावरच्या पिगमेंटेड शून्यावरचे टपोरे शून्य. शून्यसुकाळ. सुस्त सकाळ. मस्त दुधाळ.. तुस्त कपाळ... "धनंजय"ची टोपी उतरवल्यावर राहातो तो "धनंजय". पण टोपी चढवणे-उतरवणे हे सगळे शून्यानंतरचे प्रयोग. आधी शून्य तर हाताशी लागू द्या. पण टोपी महत्त्वाची. टोपी नसेल तर परत घोटाळ्याचे शून्य. त्याचे केस कापल्यावर केस जातात ... नाही नाही, हे संपादकीय कात्रीतून सुटणार नाही, म्हणून याचे विडंबनही वर्ज्य. शून्य विडंबन. राहातो तो "धनंजय". त्याचा श्वास आत-बाहेर होतो. आत-बाहेर... हां हे सुसूत्र झालं. पदर, खांदा, शून्य आणि आता....आत-बाहेर. गब्बर म्हणतो तसं ... हां. अब ठीक है....बाहेर गेलेल्या श्वासाचा हिशोब खलास -. अपघातात हात-पाय गमावले, तर हात-पायांचे सोडावेच. त्यांच्याविना राहातो तो "धनंजय". म्हणजे ठाकूर की काय? पण ठाकूरला तर पाय होते. सांप को हाथ से नही, पैरोंसे कुचला जाता है गब्बर...ये हाथ मुझे दे दो ठाकूर.. पण पायाचं काय? काही समजत नाही. शून्य समजतं आहे. आणि हातपाय नसतील तर ..? बघू, पुढे समजेल काहीतरी...हार्ट ट्रान्स्प्लांट करा. मूळचे निकामी हृदय सोडून द्यायचे - राहातो तो "धनंजय". बापरे! आता हार्ट पण गेले. आधी हात-पाय आणि आता हार्ट - पहिल्या ओव्हरमध्ये सचिन-सेहवाग आउट, दुसर्‍या ओव्हरमधे रैना-युवराजही तंबूत... कसं होणार भारतीय क्रिकेटचं? आता मध्येच धनंजय.. नानू सरंजामे झाला रे तुझा...हिमालयाची उशी करुन झोप....

एक
कोणी म्हणेल खांदा कुरवाळायचा तर नाहीच. इतकेच काय, बोट दाखवून म्हटले - "हा घ्या खांदा", तर तिकडे दुर्लक्ष करायचं. मास्तरसारखं . बघू नको मास्तरा, बघू नको. अचपळ माझे मन नावरे आवरीता.... आज खांदा बघशील, उद्या गुढगा. चंद्रकले, कुठे फेडशील ही पापे? लेप लाव मास्तर, लेप लाव... आमसुलाचं सार करुन दे चंद्रकलेला.. अर्र... खडू पडला की रे सारात. खडू म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट नाही का? बरंय. नाचून नाचून हाडे दमली असतील चंद्रकलेची. कॅल्शियम सप्लिमेंट बरीच म्हणायची. पण खडू घातलेलं सार कसं लागेल? काहीच कल्पना येत नाही. दाखवायचा खांदा आणि खायचा कांदा, निशिगंधाचा कांदा आणि चंद्रकलेचा खांदा, फिरतीचा भोवरा आणि गरतीचा फेरा, चंद्रकलेचा निशिगंध ....हेच शेवटी खरे. काय ते ज्ञान हवे? चंद्रकला, चंद्रकला.......
कांदा फार खाऊ नये म्हणतात. तोंडाला वास येतो. पण त्याशिवाय दारुचा वास कसा लपणार? शिवाय कांद्याचे इतरही काही गुण ऐकून आहे. कांद्याला स्वाद असतो नि रंग असतो. कांद्याचे पदार्थ लक्षात आले, तर मग कांदा कळेल. पण कांदा खायचा असतो की कळायचा असतो? काय टोटल लागंना राव! पण मुळे आणि पाती आणि पदार्थ समजायला हवेत ना? पदार्थाचं मरु द्या, आधी काय लिहिताय ते तरी कळू द्या, मग कांद्याचं बघू. काय राव, सकाळीसकाळी ग्रेस मारुन आलाय काय? वास बगा कसा घणायला लागलाय? का कालचा पुशिरेगे अजून उतरला न्हाई?
तर सगळे विश्वच एक आहे. हे विश्वचि माझे घर. भूदान करा. विनोबा, पाय कोठे आहेत तुमचे? दाढी आवरा विनोबा. कालची लापशी वाळून कडक झालीय दाढीत. आता तुम्हीच माझे आईबाप. त्वमेय माता, पिता त्वमेव. तुम्हीच चंद्रकला आणि तुम्हीच तिचा खांदा. तुमचा खांदा बघू द्या विनोबा. तुम्ही सांगाल तसे मी आता वागणार. तुमच्या खांद्याची शपथ. थोरामोठ्यांनी, आईवडलांनी समजावून सांगितलेल्या कितीतरी गोष्टी आहेत. पटत नाहीत तरी आपण तसे वागतो. आणि "शून्य" आणि "एक" हे विचार तर पटतात! चंद्रकला पटेल का हा कळीचा प्रश्न आहे. प्रफुल्ल पटेल. नागरी उड्डयन मंत्री. विजय मल्ल्या. किंगफिशर एअरलाईन्स. शी! दाढीधारी कुठला! दाढी कशी, विनोबांसारखी पाहिजे. ओ विनोबा, तिकडे कुठे चाल्लात? चंद्रकला तर इकडे हाये....

कधीकधी वस्तू उपयोगात आणण्यासाठी तिचे थोडेसे नकोसे भाग छाटायचे असतात. छा, कैच्या काय! चंद्रकलेचा उपयोग करुन घ्यायचा म्हटल्यावर तिचे नाक छाटावे काय? कधीकधी वस्तू उपयोगात आणण्यासाठी तिचे आजूबाजूचे भागही सामील करून घ्यायचे असतात. म्हणजे चंद्रकलेला पटवायचे असेल तर आधी मावशीला पटवले पाहिजे. न्हाव्याच्या दुकानात माझे वाढून त्रासदायक झालेले केस छाटायचे असतात. केसांबरोबर कान छाटायचे नसतात. सणावारात माझ्याबरोबर कुटुंबालाही छानछान खायला मिळाले तरच मला आनंद मिळतो. पण जगाभराच्या तोंडात गोड पडण्याची वाट बघत नाही. पण विषय तर कांद्याचा चालला होता. कांदा कुठे गोड असतो? काय समजंना, अश्शी कश्शी ओढ बाई, असं कसं वेड गं, काय समजंना....

महत्त्वाचे काय?
धनंजय म्हणजेच कांदा, कांदा म्हणजेच विनोबा आणि विनोबा म्हणजेच प्रफुल्ल पटेल. धनंजयला शून्य करा. आपोआप कांदा शून्य होईल, विनोबा शून्य होतील आणि प्रफुल्ल पटेल शून्य होतील. अब क्या करोगे शरद पवार? हमने आपके लाडले प्रफुल्ल पटेलको शून्य कर दिया है. अब करो तडजोड.
उगाच तो तडजोडीचा व्याप. खरे तर व्यवहारासाठी "विश्व शून्य" किंवा "विश्व एक" असे टोकाशी न जाता उपदेश करता येतो. कपडे-धन-... वगैरे "मी"पासून सोला. किंवा आप्त-राष्ट्र-मानवता... वगैरे "मी"मध्ये जोडा. हे उपदेश व्यवहारात आणता येतात. आणि "विश्व शून्य" विरुद्ध "विश्व एक" या चक्रावणार्‍या वादामध्ये उगाच गुंततही नाही.

अगदी अंतिम सत्य काय आहे? काही दशके सबुरीने वाट बघितली, तर "धनंजय" शून्य होईल किंवा विश्वाशी एक होईल. "शून्य" खरे की "एक" खरे? सध्या त्याचा काही फरक पडत नाही. आणि मग तर सत्यच असेल, प्रश्नच पडणार नाही.
एवढ्या सगळ्या गोंधळात चंद्रकला विनोबांबरोबर पळून गेली आहे हे कुणाच्या लक्षातही येत नाही. अगदी विजय मल्ल्याच्याही.

संस्कृतीविरंगुळा

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

16 Nov 2011 - 9:40 am | ऋषिकेश

खो खो खो =)))

काय राव आज सकाळी सकाळीच! ;)

अन्या दातार's picture

16 Nov 2011 - 9:57 am | अन्या दातार

पार फुटलो!!!!

भंजाळलो आहे..

सकाळी सकाळीच मल्ल्याला आर्थिक मदत करण्याची इच्छा होते आहे..

यकु's picture

16 Nov 2011 - 12:16 pm | यकु

सहमत.
=)) =)) =))=))
=)) =))
=))

जयंत कुलकर्णी's picture

16 Nov 2011 - 10:19 am | जयंत कुलकर्णी

सकाळीसकाळी ग्रेस मारुन आलाय काय?

:-) :-) :-)
:-) :-) :-)
:-) :-) :-)

योगप्रभू's picture

16 Nov 2011 - 10:35 am | योगप्रभू

संजोप,
हसा आणि लठ्ठ व्हा, म्हणीनुसार तुझं असलं लेखन वाचलं तर काही खरं नाही रे.

सक्काळी सक्काळी ग्रेस मारून आला का, की कालचा पुशिरेगे अद्याप उतरला नाही? हे वाचून मी येड्यासारखा हसत सुटलोय.

५० फक्त's picture

16 Nov 2011 - 10:40 am | ५० फक्त

पार मेलो वाचुन मेलो, आज १६ म्हणजे १९ ला चवथा ना रे, तयारी करा.

अवांतर - मला तर मल्ल्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणुन सणस मैदानावर उपोषणाला बसावंसं वाटतय.

साबु's picture

16 Nov 2011 - 11:22 am | साबु

आपले पाय कोठे आहेत? पाय काढुन ठेवा... आम्हाला दर्शन घ्यायचे आहे..

मैत्र's picture

16 Nov 2011 - 1:00 pm | मैत्र

+११११११११

श्रावण मोडक's picture

16 Nov 2011 - 11:33 am | श्रावण मोडक

काय झालं? शनिवारीच आपण भेटलो होतो. आपण बरोबरच निघालो, तुम्ही थेट घराच्याच दिशेनं गेल्याचंही मी पाहिलं, मीही थेट घरीच गेलो. तेव्हापर्यंत तर तुम्ही आधुनिकोत्तर होण्याची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. हे अचानक काय झालं? ;)
बाकी शून्य म्हणण्याची वेळ तुम्हीही आणाल असं वाटलं नव्हतं. ;)

मूकवाचक's picture

16 Nov 2011 - 11:58 am | मूकवाचक

_/\_

चेतन's picture

16 Nov 2011 - 12:09 pm | चेतन

रावसाहेब एक्दम फॉर्मात आणि त्यांना चेंडुही एकदम सध्याच्या वेस्टंडीज टीमचे मिळत आहेत. ;)

__/\__

चेतन

विसुनाना's picture

17 Nov 2011 - 10:46 am | विसुनाना

हसून हसून मुरकुंडी वळली. शीर्षक 'एक शून्य सन्जोपराव' असेही दिसले.
धन्य तुम्ही, धन्य 'तुमच्या' विनोबांची दाढी आणि धन्य तो कुणाचातरी पदर वार्‍यावर उडाल्यावर दिसणारा खांदा किंवा पदर सोलल्यावरही न दिसणारा कांदा...

मन१'s picture

16 Nov 2011 - 1:12 pm | मन१

लेखन शहाण्याने शुद्धीवर लिहिले नसावे.
किंवा शहाण्यांना शुद्धीवर राहू न देण्यासाठे केले असावे.
किंवा शुद्धीत असलेल्यांना शहाणे राहू न देण्यासाठी केले असावे.

आत्मशून्य's picture

17 Nov 2011 - 5:47 pm | आत्मशून्य

__/\__

"धनंजय"ची टोपी उतरवल्यावर राहातो तो "धनंजय". पण टोपी चढवणे-उतरवणे हे सगळे शून्यानंतरचे प्रयोग. आधी शून्य तर हाताशी लागू द्या.

Melo melo

आता उपाय सापडलाय असं म्हणतात बरेच ठीकाणी पण खात्री होइपर्यंत डबल कॅप चढवणंच सूरक्षीत.

धनंजय's picture

16 Nov 2011 - 7:35 pm | धनंजय

मजेदार पदर उकलला आहे!

प्रास's picture

16 Nov 2011 - 7:47 pm | प्रास

डोक्याचा येळकोट झालाय पण लिखाण अगदी क ह र आहे.

साष्टांग दण्डवत रावसाहेब!

:-)

चतुरंग's picture

16 Nov 2011 - 8:14 pm | चतुरंग

जाम सोलून काढलात की कांदा! ;)
ग्रेस मारुन येणे आणि कालचा पुशिरेगे उतरला नाही का हे तर कहरच आहेत...........

<=०()8=<

(ग्रेस'फुल्')रंगा

sagarpdy's picture

17 Nov 2011 - 2:33 pm | sagarpdy

लई भारी!!!

तिमा's picture

17 Nov 2011 - 7:38 pm | तिमा

फुलटॉस मिळाले म्हणून काय सहाच्या सहा सिक्सर मारायच्या ?

शून्याच्या आतले एक शून्य. शून्यावरचे एक शून्य. गरगरीत शून्यावरच्या पिगमेंटेड शून्यावरचे टपोरे शून्य.

अहो ते शून्य शोधताहेत आणि तुम्ही त्यांना भलतीच शून्यं दाखवता आहात.

मी-सौरभ's picture

17 Nov 2011 - 7:44 pm | मी-सौरभ

'शून्यातून स्रुष्टी निर्माण होणे' असें का म्हणतात ते आता कळल मला ;)

मोहनराव's picture

17 Nov 2011 - 7:50 pm | मोहनराव

ग्रेट!!