एक प्रायोगिक कविता

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
16 Jul 2008 - 3:54 am

परवा आम्ही जे अकलेचे दिवे लावले त्याबद्दल रामदासशेठची व्यनि करून माफी मागितली.
हल्ली विडंबनांना मिळणारा प्रतिसाद त्यातच भर म्हणून वाढते विडंबनकार, ह्या सगळ्याचा विचार करता आता विडंबनाचे दुकान बंद करून दुसरे काहीतरी सुरू करावे ह्या विचारात असतानाच रामदासशेठचे उत्तर आले
माफी? कशाबद्दल? मला विडंबन फार आवडले/आवडते.
आता आणखी एक गंमत करू या. मी शेवटचे कडवे देतोय. आधीची कडवी बघा जमतात का?
कुणी सांगतो म्हणून केसू नवीन कडवी वळतो आहे
नवीन काथ्याकुटाखाली सूंभ पुराणा जळतो आहे.
रामदास.
रामदासशेठने दिलेले हे काम कठिण होते पण आमच्या सुमार बुद्धीला जे सुचेल ते खरडले.. आता तुम्हीच बघा जमतंय का..
सूचना: रामदास आणि केसू ह्या दोन व्यक्ती सोडून खालील लिखाण संपूर्णपणे काल्पनिक आहे. उगाच संदर्भ शोधण्यात वेळ वाया गेल्यास आम्ही जबाबदार नाही.

चला करूया गंमत थोडी 'रामदास' हा म्हणतो आहे
कुणी सांगतो म्हणून 'केसू 'नवीन कडवी वळतो आहे

जमीन दिधली आहे तुजला कडवे हे घे शेवटचे
खाज खाजवून डोके 'केश्या' कडवी पहिली लिहितो आहे
कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे

प्रेम घातले अर्था चमचा, विरह घेतला जोडीला
धोका वचने स्वप्नभंगही मसाल्यात या भरतो आहे
कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे

चंद्र चांदणे, पाऊस ओला, एकांतातील ते हळवे क्षण
त्याच त्याच या जुन्या कल्पना कविते मध्ये दळतो आहे
कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे

बाप धुलाई, लाथा बुक्या, बाई बाटली आणिक लफडी
सुमार काव्ये पाडून असली रसिकांना हा छळतो आहे
कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे

ढुंगण, कुल्ले, नितंब गोंडसं हा शब्दांचा खेळ बरा
छचोर किरणे नास्तिक चाळे पुन्हा पुन्हा हा करतो आहे
कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे

घरटे, राक्षस, बगळे, कमळे, पिसी जेसी झाडून सगळे
प्रायोगिक कवितेला मेला शाब्दिक ठिगळे शिवतो आहे
कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे

क्लास, पुस्त़के, भटकंती अन व्यक्तिचित्रे, चित्रकळा
फळे एप्रिल, प्रवास क्रमशः तर्रीत पाणी भरतो आहे
कुणी सांगतो म्हणून 'केसू'नवीन कडवी वळतो आहे

लग्ने मुंजी, वाढदिवस अन कुठे चालली खादाडी
संगीत, गाणी जुन्या मैफिली कट्टे भरवत फिरतो आहे
कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे

अस्वल, पाली, मांजर, कुत्री जनावरांची रांग किती
जो तो मेला आता येथे संपादक मी म्हणतो आहे
कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे

इतिहासाच्या गप्पा भांडण त्याच त्याच त्या बाष्कळ चर्चा
नवीन काथ्याकुटाखाली सूंभ पुराणा जळतो आहे.
कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे

केशवसुमार

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

कोलबेर's picture

16 Jul 2008 - 4:18 am | कोलबेर

बटाट्याची जिलबी आणिक रताळ्याचे गुलाबजामून
कोक्यांची ही फणस बिर्याणी गोरील्लाला देतो आहे
केसू सांगतो म्हणून 'कोलू' नवीन कडवी वळतो आहे

(कोलू) कोलबेर

सर्किट's picture

16 Jul 2008 - 4:43 am | सर्किट (not verified)

केसू-कोलू ह्या नावाने आता विडंबने येतील तर !

(स्वगतः विडंबन मार्केटचे बाल्कनायझेशन होत असताना, कॉन्सॉलिडेशन करण्याकडे लक्ष द्यावे का ?)

- (उत्कंठेत) सर्किट

केशवसुमार's picture

16 Jul 2008 - 12:21 pm | केशवसुमार

कोलूशेठ,
कडवे मस्त वळलय.. अजून येऊ द्या..
केशवसुमार.

बेसनलाडू's picture

16 Jul 2008 - 4:25 am | बेसनलाडू

प्रयोग सक्सेस्सफुल्ल!!!!!!! सर्व निकाल समाधानकारक!
(प्रयोगशील)बेसनलाडू

सर्किट's picture

16 Jul 2008 - 4:46 am | सर्किट (not verified)

केसूशेठ,

रामदासांनी दिलेली दुसरी ओळच वृत्तात न बसणारी असल्याने आपला नाईलाज झाला हे मान्य.

ती ओळ

नवीन काथ्याकुटात साला सुंभ पुराणा जळतो आहे

अशी असती, तर तो खडा लागला नसता. त्यामुळे तुमचा अर्धा मार्क कापतो आहे, जरी तुमचा दोष नसला तरी.

आणखी काही सूचना:

इतिहासाच्या गप्पा भांडण त्याच त्याच त्या बाष्कळ चर्चा

ऐवजी

इतिहासा आडून धुमाळी, त्याच त्याच त्या निष्फळ चर्चा

अणि

फळे एप्रिल, प्रवास क्रमशः तर्रीत पाणी भरतो आहे

च्या ऐवजी

एप्रिलातली फळे चाखुनी तर्रित पाणी भरतो आहे

असे वृत्तात ओढाताण न करता बसते.

एकूण गुण ९.

घरटे, राक्षस, बगळे, कमळे, पिसी जेसी झाडून सगळे
प्रायोगिक कवितेला मेला शाब्दिक ठिगळे शिवतो आहे
कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे

झकास !

(स्वगतः तरी सांगत होतो रामदासाला, केसूला च्यालेंज करू नकोस म्हणून.)

- (संतुष्ट) सर्किट

विजुभाऊ's picture

16 Jul 2008 - 10:16 am | विजुभाऊ

फळे एप्रिल, प्रवास क्रमशः तर्रीत पाणी भरतो आहे
च्या ऐवजी
एप्रिलातली फळे चाखुनी तर्रित पाणी भरतो आहे

येथे वृत्ता ऐवजी वृत्त म्हणजे बातमी ला महत्व आहे सर्किट राव. गुण नका कापु त्याबदाल त्यांचे.
(शंका चुकीचे मार्क कापल्याबद्दल मास्तरांचे मार्क कापता येतात का)
केसुशेठ तुम्ही जबराच .आमच्या क्रमशः तर्रीवर भारीच लिवलय. :)
स्वगतः इतकी सुंदर प्रतिभा असणारा हा माणुस विडंबनात का अडकलाय?

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मुक्तसुनीत's picture

16 Jul 2008 - 5:03 am | मुक्तसुनीत

सर्किट तर्कट, माथे फिरुनी उधळीत गुण फिरतो आहे
मुक्तसुनितही "मुसू" होऊनि नवे दळण दळतो आहे
विंगेमध्ये बाकीच्यांचा जथा सुसज्ज उभा राहे
कुणी सांगो ना सांगो , नळ हा केसूचा गळतो आहे !

केशवसुमार's picture

16 Jul 2008 - 4:42 pm | केशवसुमार

मुसूशेठ,
कडवे मस्त वळलय.. अजून येऊ द्या..
केशवसुमार.

प्रियाली's picture

16 Jul 2008 - 6:31 am | प्रियाली

अस्वल, पाली, मांजर, कुत्री जनावरांची रांग किती

गेंड्यासारख्या भरभक्कम आणि महत्त्वाच्या प्राण्याचा विसर पडल्याने अर्धा मार्क कट!

बाकी मात्र फर्मास!!! साडे नऊ गुण :)

केशवसुमार's picture

16 Jul 2008 - 10:04 am | केशवसुमार

खरच की,
'जो तो मेला आता येथे संपादक मी म्हणतो आहे' ह्या ओळी 'आणिक मेला गेंडा येथे संपादक मी म्हणतो आहे'
अश्या लिहायला हव्या होत्या म्हणजे १/२ मार्क गेला नसता..
(खजिल)केशवसुमार

पिवळा डांबिस's picture

16 Jul 2008 - 7:36 am | पिवळा डांबिस

माफ करा सुमारस्वामी, पण आम्हाला हे जबरदस्ती निर्माण केल्यासारखं वाटलं...
नेहमीची मजा वाटली नाही.

चलो मछिंदर, गोरख आया....
आपला परखड शिष्य

धमाल नावाचा बैल's picture

16 Jul 2008 - 8:26 am | धमाल नावाचा बैल

नेहमीची मजा वाटली नाही.???

मी सांगू का ते???... काका अहो आता वय झालं!!!

आता विचार करायचा सुखहर्त्या दुखहर्त्याचा..

ही टवाळकी आमच्या सारख्या तरुण बैलांसाठी.. तुमच आरंभी वंदू चालू द्या.. :D

(आस्तिक) बैलोबा

पिवळा डांबिस's picture

16 Jul 2008 - 10:07 am | पिवळा डांबिस

वा बैलोबा!
नांवाला जागलात खरे!!
अहो मला जे या कवितेबद्द्ल वाटलं ते मी लिहिलं, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहा....
पण बैलोबाकडून या कॉमनसेन्सची अपेक्षा करणंही चुकीचं असेल कदाचित!!!
:))

केशवसुमार's picture

16 Jul 2008 - 10:28 am | केशवसुमार

बरोबर पिंडाशेठ,
सगळी कविताच(??)मुळी जबरदस्ती निर्माण केली आहे.. आणि आम्ही ते पहिल्या कडव्यातच मान्य केले आहे..

जमीन दिधली आहे तुजला कडवे हे घे शेवटचे
खाज खाजवून डोके 'केश्या' कडवी पहिली लिहितो आहे
कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे

असो..परखड प्रतिसादाबद्दल धन्यवाद
(आभारी)केशवसुमार

पिवळा डांबिस's picture

16 Jul 2008 - 10:39 am | पिवळा डांबिस

केशवसुमारजी,
तुमच्या प्रतिभेबद्द्ल आम्ही संशय व्यक्त करतो आहोत असे नका कृपया समजू. गैरसमज नसावा...
आम्ही तुमच्या काव्याचे चाहतेच आहोत. उगाच का गुरू केलं तुम्हाला!:)
आम्ही फक्त हा (आणि फक्त हाच!) प्रयोग ताणल्यासारखा वाटतो असं म्हटलं. तो तुम्ही केला म्हणून ताणला असं नव्हे तर कदाचित कोणीही केला असता तर तसाच झाला असता. शेवट्च्या दोन ओळींवरून आधीची कविता रचणं कठीण आहे. आणि ते तुम्हालाही लक्षात आल्याचं तुमच्या उत्तरावरून वाटतंय.
असो.
आम्ही आता तुमच्या पुढच्या कवितेची उत्सुकतेने वाट पहात आहोत.
आपला शिष्य,
पिडा

सांड भांड उच्छाद मांडती झाला गेंडाही वक्री
केसुची प्रतिभा न्यारी मिळते जेव्हा भांडवल भारी
रंगा देखील हात धुण्या मग नंबर लावी बाजारी
अवाक वाचक थक्क होउनी प्रतिसादी लावी हजेरी

मुक्तसुनीत's picture

16 Jul 2008 - 8:06 am | मुक्तसुनीत

यू टू , सहज ! :-)

विसोबा खेचर's picture

16 Jul 2008 - 8:09 am | विसोबा खेचर

केशवा, पायांचा फोटू पाठवून दे. फ्रेम करून घरात लावेन म्हणतो..! :)

मस्त कविता..

केसूच्या विडंबनापेक्षा त्याच्या कविता आम्हाला अधिक आवडतात...

तात्या.

धमाल नावाचा बैल's picture

16 Jul 2008 - 8:21 am | धमाल नावाचा बैल

फुल्ल सहमत!!!

केसुशेठ पायांचा फोटू पाठवाच..

बैलोबा

चतुरंग's picture

16 Jul 2008 - 8:12 am | चतुरंग

साष्टांग दंडवत, गुरुवर्य!!

अत्यानंदाने लोटपोट झाल्यामुळे सहर्ष सादर -

जमाव काही विडंबनाला पाने आता पुसतो आहे
कुणी सांगतो म्हणून 'केसु' नवीन कडवी वळतो आहे

एकामागेएक विडंबुन कविता आता छळतो आहे
कुणी सांगतो म्हणून 'केसु' नवीन कडवी वळतो आहे

कवयित्री वा कवी बिचारा पहा कसा कळवळतो आहे
कुणी सांगतो म्हणून 'केसु' नवीन कडवी वळतो आहे

'रंगा' म्हणवी शिष्य 'केसु'चा, जिलब्या मेला तळतो आहे
कुणी सांगतो म्हणून 'केसु' नवीन कडवी वळतो आहे

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

16 Jul 2008 - 8:15 am | मुक्तसुनीत

:-)

केशवसुमार's picture

16 Jul 2008 - 5:18 pm | केशवसुमार

रंगाशेठ,
कडवी मस्त वळली आहेत..आवडली
केशवसुमार

प्राजु's picture

16 Jul 2008 - 8:36 am | प्राजु

के.सु... सह्हीच.. चतुरंगराव.. आपल्यालाही सलाम !
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश's picture

16 Jul 2008 - 10:07 am | ऋषिकेश

वा वा मस्तच!
केसु द ग्रेट, लई झ्याक!!!!!!!!!!!!!
अगदी टोपी उडवली (हॅट्स ऑफ ;) )

-(केसुच्या विडंबनांचा पंखा) ऋषिकेश

namdev narkar's picture

16 Jul 2008 - 10:32 am | namdev narkar

सलाम प्रतिभेला तुझ्या
गुलाम विड॑बनाचा होऊ नको
लगाम नको घालु लेखनिला
कविता वळणे सोडु नको

साती's picture

16 Jul 2008 - 1:53 pm | साती

प्रायोगिक कविता आवडली.

साती

केशवसुमार's picture

17 Jul 2008 - 12:00 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jul 2008 - 9:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रायोगिक कविता आवडली.
केसू ज्या कविता वळतो ते आवडतेच :)

वरदा's picture

17 Jul 2008 - 11:27 pm | वरदा

केसु आणि चतुरंग छान वळलेयत कडवी...मज्जा आली......
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt