असावी मुलगी एक तरी

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
16 Jul 2008 - 2:53 am

व्हावी एक तरी मुलगी
असे आल्याने प्रत्यंतर
मुली शिवाय कसले जीवन
अन नसे कसले गत्यंतर
करावी तिच्यावर एव्ह्डी प्रीती
की जग फिरावे तिच्या भोंवती

जन्माने असेल जरी ती बाई
करू नका गैरसमज काही
क्षणात ती हंसे अन क्षणात ती रुसे
विचारपूस करण्याची करू नका घाई
नाही सांगणार ती मनातले काही

असे ती गोड अन प्रेमळ
अन असे ती हुषार सोज्वळ
मन,बुद्धी अन मृदू हृदयाची
असे ती मुर्तीमंत त्रिवेणी संगमाची

उमले ती कळी बनून
अन
फुलते ती फूल बनून
बालपणाच्या बहरातून
सुगंध दरवळे चोहिकडून

विकसूनी होई जणू सुंदरी
उमलते ती अपुली कळी
होऊनी माता भविष्यातली
उघडी रहस्य निसर्गाचे

उरी धरूनी त्या देवदुतासी
सांगे अपुल्या लोचनातूनी
तिच करीते जीवनऊत्पत्ती

म्हणून वाटे
असावी एक तरी मुलगी
करावी तिच्यावर एव्ह्डी प्रीती
की जग फिरावे तिच्या भोंवती

श्रीकृष्ण सामंत

कविता

प्रतिक्रिया

शितल's picture

16 Jul 2008 - 2:56 am | शितल

उमले ती कळी बनून
अन
फुलते ती फूल बनून
बालपणाच्या बहरातून
सुगंध दरवळे चोहिकडून


हे तर मस्तच जमले आहे.

प्रियाली's picture

16 Jul 2008 - 4:16 am | प्रियाली

असावी मुलगी एक तरी

अगदी खरं! मुलगी असणं ही अतिशय आनंदाची गोष्ट!!

असे ती गोड अन प्रेमळ
अन असे ती हुषार सोज्वळ
मन,बुद्धी अन मृदू हृदयाची
असे ती मुर्तीमंत त्रिवेणी संगमाची

अगदी!

कविता आवडली.

(आनंदी) प्रियाली

श्रीकृष्ण सामंत's picture

16 Jul 2008 - 5:33 am | श्रीकृष्ण सामंत

प्रियाली ,शितल
आपल्याला कविता आवडली हे वाचून बरं वाटलं
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

अरुण मनोहर's picture

16 Jul 2008 - 7:41 am | अरुण मनोहर

माझ्याही अशाच भावना आहेत. मुली म्हणजे elegance. मुली म्हणजे मानवी मने सांधणारे पूल. स्त्री जेवढे effective networking मानवी दृष्टी न विसरता करू शकते तेवढे पुरूषाला कधीच जमणार नाही. असे असतांनाही पुरूषांनी जे इतिहास लिहीलेत त्यात पुष्कळदा स्त्रीलाच लढायांसाठी, भांडणासाठी अकारण दोष दिलेले आढळतात. आनंदीबाईंना पुरूषी कारस्थानानेच ध चा मा केल्याचा डाग लावण्यात आला.

श्रीकृष्ण सामंत's picture

16 Jul 2008 - 10:35 am | श्रीकृष्ण सामंत

अरुण मनोहरजी,
मी आपल्या विचाराशी पुर्ण सहमत आहे.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

16 Jul 2008 - 11:07 am | विसोबा खेचर

अतिशय सुरेख कविता....!

श्रीकृष्ण सामंत's picture

16 Jul 2008 - 11:12 am | श्रीकृष्ण सामंत

विसोबाजी,
आपल्याला कविता आवडल्याचं वाचून खूप बरं वाटलं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Jul 2008 - 12:38 pm | बिपिन कार्यकर्ते

काका, कविता छानच आहे.

उमले ती कळी बनून
अन
फुलते ती फूल बनून
बालपणाच्या बहरातून
सुगंध दरवळे चोहिकडून

(डब्बल आनंदी) बिपिन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jul 2008 - 12:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका,
माझ्याबाबतीत माझ्या बाबांचं काय मत होतं काय माहित! पण कविता छानच आहे.
म्हणून वाटे
असावी एक तरी मुलगी
करावी तिच्यावर एव्ह्डी प्रीती
की जग फिरावे तिच्या भोंवती

आपल्यावर एवढं प्रेम करणारे (आई आणि) बाबा आहेत ही भावना किती सुखावणारी आहे.

इंग्लिशमधे म्हणतात ना त्याची आठवण झाली:
"A son is a son till he gets him a wife, but a daughter’s a daughter the rest of your life."

संहिता

प्राजु's picture

16 Jul 2008 - 6:09 pm | प्राजु

सामंत काका,
सुंदर आहे कविता...

असे ती गोड अन प्रेमळ
अन असे ती हुषार सोज्वळ
मन,बुद्धी अन मृदू हृदयाची
असे ती मुर्तीमंत त्रिवेणी संगमाची

मस्तच. मुलगी असणं म्हणजे खरंच भाग्याचं आहे.

एक मुलगीच,
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

16 Jul 2008 - 7:32 pm | चतुरंग

काव्य सुरेख आहे!

(मुलगी/स्त्री ही बर्‍याचवेळा अत्यंत लवचिक मनोवृत्तीची, सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात वाकबगार अशी असते.
कठिण परिस्थितीत पुरुष व्यसनाधीन होतात, आत्महत्या करतात (स्त्रियाही हे करतात पण फार क्वचित), परिस्थितीला तोंड देऊन, टक्कर देऊन उभे रहाण्याचे बळ हे स्त्रीच जास्तवेळा दाखवून देते. अशा वेळी 'अबला' हा शब्द किती चुकीचा आहे हे कळते.)

चतुरंग

स्वाती राजेश's picture

16 Jul 2008 - 7:46 pm | स्वाती राजेश

कविता छान आहे,
आवडली....:)