कासचे पठार आणि आमचं हे वरातीमागुन आलेलं घोडं

झकासराव's picture
झकासराव in कलादालन
14 Nov 2011 - 5:14 pm

नमस्कार मंडळी!!
आज बरेच दिवसानी की महिन्यानी इकडे फोटू टाकतोय. तसं पहायला गेलं तर कासला जाउन आलो त्यालाच २ महिने उलटुन गेले. पण फोटो शेअर करणं होतच नव्हतं म्हणून हे आमच वरातीमागुन आलेलं घोडं ...

कासच पठार अफाट आहे. विस्ताराने, सौंदर्याने आणि विविधतेने संपन्न अस हे पठार.
तिथे आपल्याला अनेक प्रकारचे लोक आलेले दिसतील, हौशे, नवशे, गवशे, कचरा करणारे, कचरा होउ न देणारे, कचरा साफ करणारे, फोटोसाठी आलेले, ये कास कीस चिडिया का नाम है बघुन येवु असा आविर्भाव असलेले, अजुन एक वीकेंड साजरा करण्यासाठी आलेले, सगळ्यानी पाहिल म्हणुन आपणहि बघु म्हणून आलेले,
मोबाइलमध्ये मिलिमीटरच्या आकारात असलेल्या फुलांचे फोटु काढण्याचे प्रयत्न करणारे, फुलांची काळजी असणारे, फुल तुडवुन उधळलेले, फुलांच्या ताटव्यात बसुन वनभोजन करणारे, छोट्याशा रस्त्यावर आपली चारचाकी कशीही पार्क करुन छोटासा रस्ता जॅम करणारे, वनरक्षकांच म्हणण्याप्रमाणे खालीच चारचाकी पार्क करुन महमंडळाच्या एस टी साठी रांगेत उभा राहुन तिकिट काढुन निसर्गाची काळजी घेणार्‍या लोकांना आदर देणारे, पार्किंग पासुन पठारावर चालत जाणारे....
तर मंडळी आपण हे बघत बघत जायच पठारावर आणि अदभुत निसर्गसौंदर्याची अनुभुती घेत जमेल तसं कॅमेर्‍यात सौंदर्य पकडण्याचा प्रयत्न करायचा. हा असाच एक प्रयत्न. साध्या डिजिटल कॅमेर्‍याने केलेला. फुलं एकतर छोटी, त्यात डिजिटल कॅमेर्‍यातील मॅन्युअल फोकसींगची बोंब, वरुन सुर्यदेव अतिप्रसन्न असल्याने त्या दिवशी असलेला भरपुर प्रकाश. ह्या सर्व कारणाने जमेल तसं मॅन्युअल सेटींग करत फोटॉ काढले आहेत ते गोड मानुन घ्या. :)

कॅमेरा सोनी एच ७.
१) गालिचा
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

२) समोरच सज्जनगड दिसतोय.
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

३) मिकि माउस / कवळा
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

४)
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

५) हे फुल खुपच छोटं होतं.
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

६) सीतेची आसवं
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

७)
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

८) ही वाट दुर जाते, फुलांच्या गावा
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

९)
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

१०)नफाडी??
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

११)
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

१२)From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

प्रवासतंत्रछायाचित्रण

प्रतिक्रिया

पैसा's picture

14 Nov 2011 - 5:25 pm | पैसा

सगळे फोटो झकास हो झकासराव!

मदनबाण's picture

14 Nov 2011 - 5:27 pm | मदनबाण

मस्त ! :)
एकदा जायलाच हवे तिथे...

(निसर्ग प्रेमी) :)

किसन शिंदे's picture

14 Nov 2011 - 5:30 pm | किसन शिंदे

१ल्या फोटोतल्या फ्रेममध्ये ती माणसं जर नसती तर त्या फोटोचं सौंदर्य अजुन जास्त खुललं असतं, असं वाटतयं.

९वा फोटो जरा जास्तच आवडला गेला आहे.!

सुहास झेले's picture

14 Nov 2011 - 5:53 pm | सुहास झेले

व्वा व्वा... दिल गार्डन गार्डन हो गया :) :)

मस्त आलेत फटू... !!

सर्वसाक्षी's picture

14 Nov 2011 - 6:08 pm | सर्वसाक्षी

आवडले, रचना उत्तम आहे. नफाडी सुस्पष्ट आली आहे, थोडे जवळुन घेतले असते तर अधिक मजा आली असती. दोन पाने, देठे आणि फूल यांची संगती झकास दिसली असती.

मोहनराव's picture

14 Nov 2011 - 6:13 pm | मोहनराव

चान चान!!

सुहास..'s picture

14 Nov 2011 - 7:42 pm | सुहास..

येलकम बॅक !!

मस्त फोटो !!

अवांतर : आता परत किती दिस गायब होणार आहात ;)

सगळे फोटू छान आलेत.
क्र. ९ तर भारीच आलाय.

देर आये दुरुस्त आये झकासराव.. बाकी फोटो आणि तुमचा आयडी यात कमालीचे साधर्म्य आहे.

- पिंगू

चला मी पहिलाच नाही नवव्याला पहिला क्रमांक देणारा.

आणि वरातीमागुन आलेले असलं तरी घोडं बळकट आहे.

चिंतामणी's picture

15 Nov 2011 - 8:54 am | चिंतामणी

गोड मानुन घेतले आहे. ;) ;-) :wink:

सगळेच झकास आहेत. पण ९,१० आणि १२ जास्त छान.

उदय के'सागर's picture

15 Nov 2011 - 5:51 pm | उदय के'सागर

चला उशीरा का होईना पण तुम्हि हे फोटो टाकुन खुश केलत. ९ वा फोटो अप्रतिम :)

वरातीमागून आलेलं घोडं कमालीचं आवडलय.

स्वतन्त्र's picture

15 Nov 2011 - 10:24 pm | स्वतन्त्र

झ 'कास' राव !!!!
लई भारी फोटो काढले आहेत तुम्ही !
९) नंबर च्या फुलाचे नाव 'कौमुदी' आहे का?
मी देखील कासला गेलो असताना हे नाव तिथल्या एका निरीक्षकाकडून कळाले होते.

धन्यवाद सर्वाना. :)

कासला गर्दी नाही अस होण कठीण किसनराव. त्यामुळे तो फोटो तसाच.
सर्वसाक्षीजी, बरोबर आहे आपले. पण त्यावेळी माझ्या कॅमेर्‍याच्या बॅटरीने मान टाकलेली होती :( आणि तो फोटो मी झुम करुन काढण्याचा प्रयत्न केल्यावर कॅमेरा बंद होत होता म्हणून झुम न करताच काढला.
क्रोप केल्यावर त्यातली स्पष्टता जात होती.
स्वतन्त्र फुलांची नावं माहिती नाहिये. :(
बाणा पुढच्या वर्षी काहिही करुन जमवच रे भाउ. खुप जबरी अनुभव आहे. :)
सुहास जमेल तस येत राहिन आता.

चाफा's picture

18 Nov 2011 - 7:02 pm | चाफा

झकोबा फोटो मस्तच, जमुन गेली फोटोग्राफी :)
आजकाल भेटायचे बंद झालात ते !

Bhakti's picture

25 Sep 2024 - 7:30 am | Bhakti

सुरेख :)

सर्वसाक्षी यांनी उल्लेख केलेलं निफाडी फूलं कोणतं?(फोटो क्र.?) नफाडी म्हणजेच नभाळी का?(बहूतेक फोटो क्र.७)
फोटो क्र.४ आभाळी आहे वाटतं स्पष्ट दिसत नाही.
आभाळी म्हणजे जांभळ्या पाकळ्या आभाळाकडे तर निभाळी म्हणजे पाकळ्या जमिनीच्या दिशेने असतात.
यासाठी गाईड पाहिजे होता पण खुप गर्दी असल्यामुळे,आणि फ्री बुकिंग असल्यामुळे गाईड नियोजन करता आले नाही.

झकासराव's picture

25 Sep 2024 - 2:19 pm | झकासराव

10 वा फोटोत असणार ते फुल
मलाही आता अंधुक आठवतेय
एक।तळ्यासारखे होते तिथे हे नफाडी / निफाडी होते असे उल्लेख आठवत आहेत.

परंतु फोटो सगळे छान आले आहेत. ज्ञानात भर पडली. धन्यवाद...

जुइ's picture

7 Oct 2024 - 10:34 pm | जुइ

फुलांची नावे फारशी माहित नाहीत किंवा प्रकार ओळखू येत नाहीत. नवीन माहिती समजली. धन्यवाद उशीराने का होईना फोटो टाकल्याबद्दल.

झकासराव... सर्व फोटोज एकदम झकास आहेत राव 👍
आमच्या मिपाजन्माच्या बराच आधिचा धागा असल्याने पहाण्यात आला नव्हता, पुन्हा वर आल्याने छान नेत्रसुख मिळाले...