खरं तर http://www.misalpav.com/node/19536#comment-348648 इथेच कबूल केलं होतं त्याप्रमाणे लिहीणार होतो पण काही कारणास्तव तेव्हा जमलं नाही. आज सायंकाळी आमच्या दारावरील घंटी वाजली. दरवाजा उघडून पाहिले असता कोणी दिसले नाही परंतू आमच्या पत्रपेटीत खालील कागद आढळला. हा कागद वाचताच माझी एक जुनी आठवण जागी झाली.
साधारण दोन दशकांपूर्वीची हकीगत आहे. तेव्हाही असाच एक कागद आमच्या पत्रपेटीत आढळला होता. फक्त तेव्हा वक्तृत्व स्पर्धा होती आणि स्पर्धेचे आयोजक होते लायन्स क्लब ऑफ निगडी, पुणे. स्पर्धेसाठी विषय होता जातीयवाद - समस्या आणि उपाय.
कागदावरील आवाहनास अनुसरून लगेचच जुळवाजुळव सुरू झाली. दोन दिवसांत भाषण लिहून काढले आणि पुढचा एक आठवडा पाठांतर व सरावात घालवला. स्पर्धेचा दिवस उजाडला. ज्या क्रमाने स्पर्धेकरीता नावे नोंदविली गेली होती त्या क्रमाने एकेक जण पुढे येऊन व्यासपीठावर भाषण करू लागला. ती भाषणे ऐकताच माझा उत्साह मावळला. बहुतेक सर्वांनीच जातीयवादाचा संदर्भ चालु घडामोडींशी जोडला होता. जातीनिहाय आरक्षण ठेवल्यामुळे गुणवत्तेला डावलले जाऊन अपात्र लोकांना संधी मिळत असून त्यामुळेच समस्या निर्माण होत आहेत व यावर उपाय म्हणजे जातिनिहाय आरक्षण पूर्णपणे नष्ट करून गुणवत्ता हा एकमेव निकष ठेवला जावा असाच सर्व स्पर्धकांचा सूर होता.
याउलट माझ्या भाषणात मी जातीयवादाचा संबंध प्राचीन काळाशी जोडून त्याकाळी चातुर्वर्ण्य पद्धतीमुळे शूद्र ठरविल्या गेलेल्या जातींवर इतर तथाकथित उच्च जातींकडून कसा अन्याय झाला वगैरे मुद्दे मांडले होते. जातिभेदामुळेच पानिपतच्या लढाईत मराठे अब्दाली पुढे हरले या गोष्टीचेही दाखले माझ्या भाषणात होते. जातिभेद विसरून सर्वांनी एकजुटीने राष्ट्राची प्रगती साधण्याकरिता कटिबद्ध व्हायला हवे हा संदेशही शेवटी होताच. आपले भाषण आऊड ऑफ डेट आहे हे मला जाणवू लागले तसेच इतर स्पर्धकांच्या तूलनेत माझ्या भाषणात अतिशय साधी व अनाकर्षक वाक्ये होती. इथे स्पर्धकांच्या वाक्यांना टाळ्यावर टाळ्या पडत होत्या आणि माझ्या मनावर निराशेचे सावट पडू लागले होते.
तरीही, त्याच मनस्थितीत माझे नाव पुकारले गेल्यावर मी व्यासपीठावर गेलो आणि पाठ केलेले भाषण एका लयीत म्हंटले. अपेक्षेप्रमाणेच पूर्ण भाषणा दरम्यान व भाषण संपल्यावरही सभागृहात स्मशान शांतता होती. इतर स्पर्धकांना हंशा व टाळ्या यांचा भरघोस प्रतिसाद देणार्या प्रेक्षकांनी माझ्या भाषणाला अतिशय शांत चित्ताने ऐकून घेतले होते. आपला काय निकाल लागणार हे उमजून मी जागेवर जाऊन बसलो.
त्यानंतर परीक्षकांनी आपले मनोगत ऐकवायला सुरूवात केली. त्यांच्या दृष्टीने लोकानुनय करण्यासाठी इतर स्पर्धकांनी जी टाळ्याखेचक वाक्ये भाषणात वापरली होती ती केवळ जनक्षोभ भडकविण्याच्या लायकीची होती. स्पर्धेत अशी भाषणे बाद केली जात असल्याने त्यांचा विचार गुणांसाठी केला गेलेला नव्हता. त्यामुळे अगदी अनपेक्षितरीत्या परीक्षकांनी मला त्या स्पर्धेचा विजेता घोषित केले. त्याच दिवशी सायंकाळी आठ वाजता लायन्स क्लबच्या गेट टुगेदर मध्ये मला पारितोषिक स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले गेले.
सायंकाळी मी कार्यक्रमाला निघण्याआधी आई मला म्हणाली, "नेहमीप्रमाणे बोरिंग कपडे घालु नको. तुझ्याकरिता मी नवीन ड्रेस आणलाय तो घालुन जा." हा नवा कोरा ड्रेस म्हणजे गुलाबी रंगाची बॅगी जीन्स पॅन्ट, जिला गुडघ्यावर खिसा, खिशाला एक फ्लॅप, फ्लॅप वर बोटभर लांबीची पट्टी आणि ती पट्टी अडकविण्यासाठी पुन्हा खिशावर एक स्टील ची रिंग आणि या पॅन्ट सोबत भडक काळ्या रंगाचा टीशर्ट, टीशर्ट वर पोटाजवळ अगदी मधोमध कांगारूच्या पोटपिशवीची आठवण व्हावी इतका मोठा खिसा. हा पोशाख बघूनच मला झिणझिण्या आल्या. पण आईच्या मते क्लबातल्या पार्टीत जायचे म्हणजे असाच "मॉडर्न" ड्रेस हवा. शेवटी अनिच्छेनेच मी तो पोशाख परिधान केला. त्यानंतर माझ्या चेहर्यावर बळेच कुठलीशी पावडर थोपली गेली आणि कपड्यांवर परफ्युम शिंपडण्यात आले. कहर म्हणजे पायांत हिरव्या पांढर्या रंगातील स्पोर्ट शूज. कारण पार्टीत फॉर्मल शूज बरे दिसत नाहीत. अशा प्रकारे एकदाचा मी माझ्या मातोश्रींच्या अपेक्षेप्रमाणे पार्टी ऍनिमल दिसू लागल्यावरच मला घराबाहेर जाऊ देण्यात आले.
तर अशा अवतारात मी एकदाचा गेट टुगेदरच्या स्थळी ठीक आठ वाजता पोचलो. अर्थात तेव्हा तिथे चिटपाखरूही हजर नव्हते. साडेआठ नंतर हळूहळू एक एक करून मंडळी येऊ लागली. हे सर्व क्लबचे सदस्य होते. त्यांच्या आपसात गप्पा रंगु लागल्या. माझ्या ओळखीचे कोणीच नसल्याने मला अवघडल्यासारखे होऊ लागले.
थोड्या वेळाने एका व्यक्तिने ओरडून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. हा एक मध्यमवयीने इसम दिसत होता. त्याने हातात एक मोठे कापड घेतले होते. दुसर्या हातात सीझ फायर सारखे एक उपकरण होते. अर्थात त्याच्या या वस्तुचे नाव वेगळे होते. त्याच्या म्हणण्याप्रमाणे हे उपकरण त्याच्या वर्कशॉपमध्ये बनले होते आणि आग विझविण्यासाठी सीझ फायरपेक्षा अनेक पटींनी जास्त कार्यक्षम व स्वस्त ही होते. म्हणजे थोडक्यात तो तिथे त्याच्या उत्पादनाची जाहिरात करीत होता. तरी आता वेळ घालवावा म्हणून मी त्याचा उपद्व्याप पाहत होतो. त्याने बराच गाजावाजा करून आधी ते कापड पेटविले आणि डाव्या हातात धरले. नंतर लोकांचे आपल्याकडे पुरेसे लक्ष आहे ह्याची खात्री करून घेत उजव्या हातातील फायर एक्स्टिन्ग्विशरने त्यावर फवारा सोडण्यास सुरूवात केली. भरपूर फवारा सोडूनही ती आग काही आटोक्यात येईना. नंतर त्याच्या डाव्या हाताला चटके बसू लागले. शेवटी लोक ओरडू लागल्यावर त्याने ते जळते कापड खाली फरशीवर सोडले आणि शेवटी त्यास बुटांच्या साहाय्याने विझविले. त्याची फजिती पाहून लोक फिदीफिदी हसत कुजबुजू लागले.
एक शॉर्ट फिल्म संपली. चला आता पुन्हा कंटाळवाणी प्रतिक्षा असा विचार करून मी एका रिकाम्या जागी जाउन बसू लागलो तोच मला कोणीतरी "हॅल्लो हॅल्लो" करून बोलावते आहे असे जाणविले. आवाजाच्या दिशेने पाहिले असता, एक तरूणी हात करून मला तिच्या जवळच्या रिकाम्या आसनावर बोलावत असल्याचे दिसले. तिने गरबा/दांडिया खेळताना वापरतात तसा भडक जांभळ्या रंगाचा पोशाख (त्यास चणिया चोली का कायसे म्हणतात. अर्थात हे मला तेव्हा ठाऊक नव्हते) परिधान केला होता. तशाच जांभळ्या रंगाची लिपस्टीक व चेहर्यावरही खुपसा मेक-अप केला होता. पापण्या व भुवयांसोबतच डोक्यावरचे केसही रंगविलेले होते. तिच्या आवाजाला एक वेगळाच घोगरा टोन होता (नेमक्या शब्दांत सांगायचं तर तिचा आवाज अगदी राणी मुखर्जीसारखा होता. अर्थात तेव्हा मी राणी मुखर्जीचा आवाज ऐकला नव्हता). त्या अमराठी तरूणीने मला स्वत:च्या शेजारी बसवून हिंदी-इंग्रजी मिश्र भाषेत संवाद सुरू केला जो मी इथे मराठीत देत आहे.
ती : हाय. नवीन सभासद का?
मी : नाही. वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक मिळालेय, ते घ्यायला आलोय.
ती : व्वॉव! अभिनंदन! काय विषय होता?
मी : जातीयवाद - समस्या आणि उपाय.
ती : ????
मी : (घसा खाकरून) जातीय...
ती : बरं ते जाऊ दे. आज रात्री काय प्रोग्रॅम आहे?
मी : रात्री? आता रात्रच नाही काय? आता दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपला की सरळ घरी जाऊन झोपणार.
ती : (माझ्या डावीकडून स्वत:चा उजवा हात माझ्या उजव्या खांद्यावर ठेवत) बोरिंग! काहीतरीच... ही काय रात्र थोडीच आहे? ही तर सायंकाळ आहे. आणि आताशी सव्वानऊ वाजतायेत. हा कार्यक्रम साडे अकरा आधी संपत नाही. तू काही दहा वाजता घरी पोचू शकत नाहीस.
मी : (तिने ज्या पद्धतीने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला वेढून घेतले होते तो अनुभव मला एकदम नवीनच होता. त्यामुळे अतिशय गडबडून) काय? छे! इतका उशीर. मला घरी रागावतील. मला निघायलाच हवे. (मी उठून उभा राहू लागलो)
ती : (हातांनी माझा खांदा दाबून मला खाली बसवत) बस रे! असा कसा जातोस? तुझं प्राईझ नाही का घेऊन जाणार? आणि इतका भितोस काय? साडे अकरा म्हणजे काही उशीर नाही. मी तर त्यानंतर एका डान्स पार्टीला जाणार आहे. इन्फॅक्ट मी तुला तेच विचारणार होते. मला कुणी पार्टनर नाहीये. तू होतोस का माझा डान्स पार्टनर?
मी : पण मला दांडिया खेळता येत नाही.
ती : (हसत) तूला कोणी सांगितलं मी तिथ दांडिया खेळणार आहे म्हणून?
मी : तुमच्या ड्रेस कडे पाहून मला वाटलं तसं...
ती : (आणखी मोठ्याने हसत) अरे मला तुम्ही काय म्हणतोस. कॉल मी XYZ (तिने तिचे नाव सांगितले).
मी : बरं, पण मला कुठलाच डान्स येत नाही (मला आता तिथून माझी सुटका करून घ्यावीशी वाटत होती).
ती : अरे त्यात फारसं काही अवघड नसतं, आणि त्यातूनही काही अडचण आलीच तर मी आहेच की तुझ्याबरोबर. बाय द वे तुझं नाव काय?
चे त न
खरं तर माझ्या घशाला इतकी कोरड पडली होती की त्यातून एखादा शब्द मोठ्या मुश्किलीने कुजबुजण्याइतपत आवाजातच निघाला असता. अचानक माझा आवाज इतका मोठा कसा झाला? अर्थात मला जास्त वेळ आश्चर्य करावेच लागले नाही कारण पुन्हा तितक्याच मोठ्याने माझ्या नावाचा पुकारा करणारा आवाज आला आणि माझ्यासह इतर अनेकांनी आवाजाच्या दिशेने पाहिले. माझे वडील माझ्याकडे अतिशय रागाने पाहत सभागृहाच्या प्रवेशद्वारातून आत येत होते.
मी चटकन त्या तरूणीचा माझ्या खांद्यावरील हात झटकून टाकीत वडिलांपाशी पोचलो. मला घेऊन ते कार्यक्रमाच्या आयोजकांपाशी गेले आणि म्हणाले, "मी चेतनला इथून घेऊन चाललोय." आयोजक उद्गारले, "अहो, असं काय करता? सकाळी स्पर्धेच्या वेळी आमचे सभासद हजर नव्हते. आता सर्वांनाच चेतन त्याचं सकाळचं भाषण ऐकवेल. मग आम्ही त्याला पारितोषिक देऊ." " हे पाहा. तुम्हाला वेळेवर कार्यक्रम सुरू करता येत नाही की संपवता येत नाहीत. तिकडे सगळे त्याची घरी वाट पाहतायेत आणि इथे तुम्ही अजून त्याला थांबवून ठेवायची भाषा करताय. तुमचं बक्षीस बिक्षीस काही नको आम्हाला. हा मी त्याला घेऊन चाललो." माझ्या वडीलांचा उग्र आवेश पाहून आयोजक बावरले. त्यांनी लागलीच पारितोषिकाची ट्रॉफी माझ्या हाती ठेवली आणि मी वडिलांसोबत घरी निघालो.
घरी पोचेपर्यंत आणि त्यानंतरही वडील घडल्या प्रसंगाबद्दल काहीच बोलले नाहीत. परंतु जे घडले ते त्यांना निश्चितच आवडले नसणार. त्यानंतर मी ठरविले की जीन्स टीशर्ट असा विदुषकी पोशाख कधीच परिधान करायचा नाही. तेव्हापासून मी पिकनिक असो की पार्टी कायमच कटाक्षाने "फॉर्मल अटायर" परिधान करतो आणि स्पोर्ट शूज ही मॉर्निंग वॉक शिवाय इतर वेळी वापरत नाही.
प्रतिक्रिया
12 Nov 2011 - 12:27 am | पाषाणभेद
>>>>>तामिळनाडूत असताना लुंगी नेसून पिक्चरला जायचो तेव्हा रस्त्यात असंख्य स्वर्नलथा, अन लक्स्मीप्रिया माझ्याकडे बघूही शकायच्या नाहीत.. तेजस्वीपणा.. दुसरं काय?
अच्छा! तर तो मानूस म्हंजे तुमी व्हता व्हय? आता भ्येटतो तुमाला आन मंग दावतो काय त्ये.
आवो म्या पन तवाच तामिळनाडूत व्हतो. नाय म्हंजे आमच्याकल्ड्या गायी म्हशी चारत चारत ग्येलोथो तिथं. आमच्या कायी गायी म्हशींचे नाव बी स्वर्नलथा, अन लक्स्मीप्रिया, नयनथारा, भुवनेस्वरी हायेत. तवा एक मानूस न्हेमी लुंगी वर करूनशान आमच्या गोठ्यावरून रानात जायाचा. त्येच्यानंतर आमच्यावाल्या गायीम्हशी अशा काय बिथरायच्या बाब्बौ का सांजच्याला दुध काय द्येयाच्या न्हायी. त्यो मानूस तुमी व्हता म्हंजे.
12 Nov 2011 - 8:38 am | शिल्पा ब
:D :D
12 Nov 2011 - 2:00 pm | गवि
खी खी खी... :)
11 Nov 2011 - 11:49 am | मदनबाण
तिच्या आवाजाला एक वेगळाच घोगरा टोन होता (नेमक्या शब्दांत सांगायचं तर तिचा आवाज अगदी राणी मुखर्जीसारखा होता.
फाटक्या स्पीकरच आवाज = राणी मुखर्जीसारखा आवाज ! ;)
11 Nov 2011 - 12:15 pm | चेतन सुभाष गुगळे
<< फाटक्या स्पीकरच आवाज = राणी मुखर्जीसारखा आवाज ! >>
हो पण अशा आवाजात समोरच्याला संमोहित करण्याची जरब असते. अर्थात हे व्यक्तिगत मत आहे. इतरांना पटेलच असे नाही.
11 Nov 2011 - 3:03 pm | किचेन
<< फाटक्या स्पीकरच आवाज = राणी मुखर्जीसारखा आवाज ! >>
हो पण अशा आवाजात समोरच्याला संमोहित करण्याची जरब असते. अर्थात हे व्यक्तिगत मत आहे. इतरांना पटेलच असे नाही.
अरे वा..... अनेकांच्या मते माझाही आवाज राणी मुखर्जी सारखा आहे.याचा आज पहिल्यांदा आनंद होतोय! :)
याबद्दल अनेक वर्ष वाटत आलेल्या दुखावर आपण फुंकर घातलीत यासाठी धन्यवाद.
11 Nov 2011 - 3:26 pm | चेतन सुभाष गुगळे
<< अरे वा..... अनेकांच्या मते माझाही आवाज राणी मुखर्जी सारखा आहे.याचा आज पहिल्यांदा आनंद होतोय! >>
चला माझ्या प्रतिसादामुळेही कुणाला आनंद मिळाला तर. टंकनश्रमांचे चीज झाले.
<< याबद्दल अनेक वर्ष वाटत आलेल्या दुखावर आपण फुंकर घातलीत यासाठी धन्यवाद. >>
दु:ख करण्यासारखे त्यात काही नाही. आता उलट त्याबद्दल अभिमानच बाळगा.
11 Nov 2011 - 3:42 pm | मोहनराव
<<अनेकांच्या मते माझाही आवाज राणी मुखर्जी सारखा आहे.याचा आज पहिल्यांदा आनंद होतोय!>>
कोणाला कशाचा आनंद होइल सांगता येत नाही बुवा!!! ;)
11 Nov 2011 - 11:51 am | परिकथेतील राजकुमार
अतिशय प्रभावशाली लेखन.
श्री. गुगळे ह्यांच्या लिखाणात कायमच काही ना काही संदेश दिलेला असतो. 'वयात आलेल्या मुलीचीच नव्हे, तर मुलाची देखील काळजी घ्यायला हवी, त्याला जपायला हवे' हे आपल्याला ह्यातून शिकायला मिळते.
11 Nov 2011 - 11:56 am | चेतन सुभाष गुगळे
तुमचीच प्रतिक्षा होती. http://www.misalpav.com/node/19708#comment-351524 इथे मी तुमची आठवण काढली आणि तुम्ही अवतीर्ण झालात.
बाकी तुमचा नेहमीप्रमाणेच प्रोत्साहनपर प्रतिसाद पाहून अतिशय आनंद झाला.
आपला आभारी
11 Nov 2011 - 12:12 pm | Dhananjay Borgaonkar
खुप दिवसांनी मिपा वर कॉमेडी लेख वाचला. धन्यवाद गुगळे.
असच लिहित जा ;)
11 Nov 2011 - 12:21 pm | चेतन सुभाष गुगळे
धनंजय बोरगांवकर.
<< खुप दिवसांनी मिपा वर कॉमेडी लेख वाचला. >>
आभारी आहे. अर्थात या मागची प्रेरणा म्हणजे रोहित भिडे यांच्या लेखावरचा स्मिताजींचा प्रतिसाद. तेव्हा त्यांना आणि त्याचबरोबर यशवंत एकनाथ कुलकर्णी व इतरही सदस्यांना याचे श्रेय द्यायला हवे ज्यांनी हा किस्सा इथे मांडण्याची आग्रही मागणी केली होती.
<< असच लिहित जा >>
आपल्या सारखे प्रोत्साहन देणारे वाचक असल्यावर भविष्यातही असेच लिहीण्याचा प्रयत्न केला जाईल.
12 Nov 2011 - 1:55 am | स्मिता.
माझ्या विनंतीला मान देवून इथे किस्सा टाकल्याबद्दल धन्यवाद चेतन!
लेख आणि त्यावरचे प्रतिसाद वाचून भरपूर करमणूक झाली.
11 Nov 2011 - 12:41 pm | प्यारे१
आपल्याला त्या पोरीच्या चाणाक्ष बुद्धीची दाद द्यावीशी वाटते..... ;)
१३.५ वर्षाचे अतिशय विदूषकी दिसणारे पण अगदी निरुपद्रवी पोर (हा सगळा डेटा चे.सु.गुगळे यांचाच) ग्रुपला दाखवायला बरे पडेल असा काहीसा विचार त्या कन्यकेने केला असेल.
(थोडेसे भेजा फ्राय सारखे असावे काय परकरन? ;) )
11 Nov 2011 - 1:48 pm | विनायक प्रभू
मस्त लेख.
असो.
एक प्रश्न : आता तरी दांडिया रास खेळु लागलात का नै?
11 Nov 2011 - 3:00 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मास्तरांनु, तुमका भारी चवकश्या !! ईचार काय असा तुमचा नेमका ?? ;-)
11 Nov 2011 - 3:29 pm | चेतन सुभाष गुगळे
नृत्याविषयी पूर्वीपासूनच नावड आहे, म्हणूनच तिने नृत्याचा विषय काढताच मी तिथून जाऊ लागलो होतो. नृत्याविषयीची ही नावड अजूनही तशीच आहे त्यामुळे पुन्हा कुठल्याही नृत्यप्रकाराच्या वाट्याला गेलो नाही.
11 Nov 2011 - 3:59 pm | विनायक प्रभू
बोंबला.
जे आयला दांडिया रास हा नृत्य प्रकार आहे हे तुम्हाला कुणी सांगितले?
11 Nov 2011 - 6:20 pm | जोशी 'ले'
हुर्रे°°°° सेंन्चुरी झाली
11 Nov 2011 - 6:32 pm | नरेश_
अभिनंदन गुगळेसाहेब या शतकोत्तर प्रतिसादी धाग्याबद्दल!
जियो.
आणि हो - धन्यवाद, आभारी आहे असले शब्द लिहून आपल्या मित्रांना परकं नाही करायचं.
You deserve it!
11 Nov 2011 - 7:01 pm | तिमा
मूळ धागा वाचून जेवढी करमणुक झाली त्यापेक्षा जास्त करमणुक शतकोत्तर प्रतिक्रियांनी झाली. म्हणून लेखकाचे व सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार!!!
11 Nov 2011 - 11:33 pm | जाई.
+१
११/११/११ च्या मुहुर्तावर चांगले मनोरंजन झाले
11 Nov 2011 - 7:29 pm | यकु
हया शतकोत्तरी धाग्याबद्दल पुणें येथील मिपाकरांनी श्रीयुत गुगळे यांच्याकडून पार्टी वसूल करावी.
:)
11 Nov 2011 - 11:04 pm | पक्या
जवळपास २० वर्षापूर्वीचा काळ , लेखकाचे साडे तेरा वय लक्षात घेता आणि पोशाखाचे वर्णन वाचून (गुलाबी पँट, लूझर टि शर्ट - टिपीकल गोविंदा स्टाईल) लेखातील सर्व प्रसंग पटले.
12 Nov 2011 - 12:40 am | धन्या
तुम भी ना...
वोह रायटरने थोडाभौत तेरेको हवा क्या दिया और तू हल्लूच उडने लगा?
12 Nov 2011 - 8:30 am | सूड
>>त्यानंतर मी ठरविले की जीन्स टीशर्ट असा विदुषकी पोशाख कधीच परिधान करायचा नाही.
गुगळेकाका, मला तुमचा निर्णय आवडला. गुलाबी रंगाची जीन्स घालण्यापेक्षा फॉर्मल कधीही बेस्ट !!
12 Nov 2011 - 2:27 pm | चिरोटा
वाचनिय विनोदी लेख.
12 Nov 2011 - 2:37 pm | चेतन सुभाष गुगळे
अभिप्रायाबद्दल धन्यवाद चिरोटाजी.
अर्थात या लेखाकरिता मी विशेष मेहनतही घेतली नाही. जसं घडलं तसं केवळ वीसेक मिनीटांत टंकलं. माझ्या कल्पनाशक्तीला इथे वाव नव्हता. तरीही केवळ वीस तासांत शतकी प्रतिसाद मिळालेले पाहून मलाही आश्चर्यच वाटलं. कित्येक दिवस विचार करून मेहनत घेऊन टंकलेल्या माझ्या पूर्वीच्या लेखांनाही इतका भरघोस प्रतिसाद मिळाला नव्हता.
12 Nov 2011 - 2:40 pm | स्पा
तरीही केवळ वीस तासांत शतकी प्रतिसाद मिळालेले पाहून मलाही आश्चर्यच वाटलं. कित्येक दिवस विचार करून मेहनत घेऊन टंकलेल्या माझ्या पूर्वीच्या लेखांनाही इतका भरघोस प्रतिसाद मिळाला नव्हता.
५० रन्स तर तुमच्याच आहेत गुगळे काका ;)
12 Nov 2011 - 6:05 pm | वेताळ
एक तरुणी तुम्हाला नाचासाठी निमंत्रण देते व तिच्या हेतुविषयी तुम्ही घेतलेली शंका शंकास्पद आहे. निदान नाचा व्यतिरिक्त तिचा दुसरा कोणताही हेतु तुमच्याबद्दल होता, हे तुमचा फोटो पाहुन वाटत नाही.
9 Apr 2014 - 10:00 am | प्रसाद गोडबोले
लेख शोधुन काढुन वाचला ... लईच भारी
नशीबवान आहात तुम्ही ...आमच्या तर स्वप्नातही असे काही होत नाही :D
9 Apr 2014 - 4:46 pm | आदूबाळ
अगागागा... हा लय भारी लेख आहे!
9 Apr 2014 - 5:20 pm | राजो
मुक्तपीठीय लेख..
9 Apr 2014 - 8:01 pm | जातवेद
परिक्षेत उत्तरे लिहिल्यासारख्या प्रतिक्रीया का देता हो चेतन? लास्ट ईयरला काय गोल्डनला राहिलेलं काय?
9 Apr 2014 - 8:11 pm | प्यारे१
ह्याला म्हनायचं खरा पच्चिम म्हाराष्ट्र ;)
9 Apr 2014 - 8:48 pm | जातवेद
ख्याक ;)
9 Apr 2014 - 10:15 pm | आयुर्हित
जातिभेद विसरून सर्वांनी एकजुटीने राष्ट्राची प्रगती साधण्याकरिता कटिबद्ध व्हायला हवे हेच खरे!
अजून एक विनंती: जातिभेदामुळेच पानिपतच्या लढाईत मराठे अब्दाली पुढे हरले या गोष्टीचेही दाखले मिपावर वाचायला नक्कीच आवडतील.
9 Apr 2014 - 10:28 pm | प्यारे१
सिंहीण हा लेख तुमच्यामुळे पुन्हा वाचला.
मज पामराच्या मनात सिंहीण लेखाचा विषय वेगळाच आहे असा संशय होता तो आपल्या प्रतिसादामुळं दूर झाला.
आभार.
11 Apr 2014 - 8:37 am | धन्या
आपण आणि मा. वपाडाव यांनी "सिंहाचा" पुणे गेट कटट्याला केलेला सत्कार आमच्या लक्षात आहे. :)
11 Apr 2014 - 4:12 pm | प्यारे१
कसचं कसचं!
11 Apr 2014 - 5:28 pm | अत्रुप्त आत्मा
@पुणे गेट कटट्याला केलेला सत्कार>>> =)) +++++१११११ =))
.
.
.
.
सदर- सत् कारास, हजर असलेला-आत्मू खोड्याळ! =)) :p =))
11 Apr 2014 - 5:33 pm | बॅटमॅन
आँ??? काय झाल्तं म्हणे गुर्जी? जमल्यास शेअर करा की ;)
11 Apr 2014 - 5:39 pm | अत्रुप्त आत्मा
@ काय झाल्तं म्हणे गुर्जी?>>> काय सांगू तुला, त्या दोघांची गोष्टंsssss!
11 Apr 2014 - 5:41 pm | बॅटमॅन
त्या दोघांची गोष्टं, सांगा करून सपष्टं!!!!
10 Apr 2014 - 2:43 am | रामपुरी
ह्या सिंहीणीला पिंजर्यातून बाहेर कोणी काढलं? हसून हसून परत एकदा प्राण कंठाशी आले ना राव. चेतन सुभाष गुगळे यांना "मिपा ब्रम्हे" (आठवा- मुक्तपिठ...ब्रम्हे...लुना...४००० रूपये...) हा पुरस्कार देण्यात यावा अशी नम्र सुचना. हा त्याहून एक कांकणभर सरसच आहे.
10 Apr 2014 - 2:51 am | रामपुरी
बाकी हा लेख वाचल्यापासून "फॉर्मल अटायर" वर "स्पोर्टस शूज" हा "विदूषकी" पोशाख बघायची फार्फार इच्छा आहे.
(अति अवांतरः जाण्यापूर्वी चेसुगु ना ते जॉगींग कुठ करतात हे विचारून घ्यायला हवं होतं.. छ्या...)
10 Apr 2014 - 1:52 pm | आदूबाळ
मला गुलाबी जीन्स आणि "लूझर" (!) टीशर्ट बघायची उत्सुकता आहे.
बाकी काही असो, पण लायन्स क्लबचं ऐकीव वर्णन या लेखापेक्षा फारसं दूरचं नाही...
11 Apr 2014 - 4:21 pm | आत्मशून्य
=)) लहानपणी मोठ्या लोकांसोबत त्यांच्या मिटींगला जाणे होत असे... तो काळ वेगळा होता म्हणा तरीही जर माझी स्मृती धोका देत नसेल तर आपल्या वाक्याशी संपुर्ण सहमत व्हावे असेच म्हणेन.
10 Apr 2014 - 2:20 pm | भाते
धागा आणि इथे दिसत असलेल्या प्रतिक्रिया वाचुन धागा संपादित करायला सं.मं.ला बराच त्रास झाला असेल याची जाणिव झाली. :)
11 Apr 2014 - 7:11 am | चौथा कोनाडा
धमाल धागा . . . मस्त लिहिलाय अनुभव ! अजय देवगणच्या सिंघम नंतर थेट चेतन गुगळेंची सिंहिण सुपरहिट ! लेखाखालच्या प्रतिक्रिया वाचून तर हसून हसून मुरकुंडी वळाली ! पैशे वसूल धागा !
4 Feb 2016 - 7:44 pm | ईश्वरसर्वसाक्षी
लायनेस क्लब म्हणायचय का आपल्याला
5 Feb 2016 - 4:14 pm | चंबा मुतनाळ
परवाच ह्याधाग्यााची फार्फार आटवण आली होती. तेंव्हा धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद !!
5 Feb 2016 - 4:25 pm | होबासराव
स्वरि बर का ! हा आय डी म्हंजि कस आहे, विचारायच हे हा कि हे एग्झॅक्टलि काय आहे म्हंजि 'मुतनाळ'
6 Feb 2016 - 8:36 pm | चौथा कोनाडा
होबास राव, तुम्ही कल्पना करताय तसे काही नाही.
काही वर्षांपुर्वी "चंबा मुतनाळ " असा कुस्तीगिर असल्याचे आठवते.
मि. चंबा मुतनाळ , जर प्रकाश टाका की तुमच्या नावावर ! काय आहे हे नक्की ?
मिपाकरांचे गैरसमज होताहेत नावा बद्दल.
9 Feb 2016 - 3:48 pm | बॅटमॅन
होय, चंबा मुतनाळ या नावाचे एक फेमस पैलवान होते, १९६०-८० मध्ये कधीतरी आय गेस. सत्पाल, गणपतराव आंदळकर, हरिश्चंद्र बिराजदार, दादू चौगुले, हिंदकेसरी मारुती माने यांच्या लायनीत यांचेही नाव असायचे.
(संदर्भः मातीवरील कुस्तीचे फ्यान असलेले आमचे पिताश्री)
5 Feb 2016 - 7:14 pm | अजया
तेरा वर्षाच्या पोरामागे सिंहिण का लागली राणी मुखर्जीसारखा आवाज काढून?
( उत्तर माहित असून न देणाऱ्याच्या मिपा आयडीची शंभर शकले होतील )
6 Feb 2016 - 11:34 pm | माहितगार
फ्रँकली चेतनचे तेव्हाचे वय या धाग्यावर आणि मिपाधाग्यावर शोधण्या दुष्टपणा आत्ता मी सुद्धा केला मला त्यांचे नेमके वय शोधता आले नाही, आपण १३ हा आकडा कसा आणला ते उमगले नाही.
6 Feb 2016 - 11:40 pm | अभ्या..
13 आकडा अशुभ असतो. आज पण तोच आकडा आहे. काही व्यक्ती अन वये स्थिरांक असतात.
8 Feb 2016 - 3:25 pm | माहितगार
न्युमरॉलॉजीवाले अशुभच शुभ करण्यासाठी आकड्यांची बेरीज करतात म्हणे :) (ह.घ्या.)
वयाचा उंबरठा पार करतानाचा स्थिरांक समजता येतो, पुढच्या वयाचा उंबरठा गाठताना आधीच्या वेळी एखादा विशीष्ट रंगीत चष्मा लागला कि असे होत असावे बर्याच व्यक्तींच्या बाबतीत !
7 Feb 2016 - 10:13 am | अजया
http://www.misalpav.com/comment/351516#comment-351516
बघा.पुराव्याने शाबित केलंय ;)
7 Feb 2016 - 10:52 am | माहितगार
अरे व्वा ये कैसे आमच्या नजरेतून सुट्या. आता धाग्यावर पुढचा प्रतिसाद देता येईल. धन्यवाद.
7 Feb 2016 - 10:54 am | माहितगार
( उत्तर माहित असून न देणाऱ्याच्या मिपा आयडीची शंभर शकले होतील )
आपण म्हटले तर पुढच्या प्रतिसादातून प्रयत्न करेन नाही तर माझा आयडी जायचा शंभरच्या भावात :)
7 Feb 2016 - 10:56 am | अजया
;)
9 Feb 2016 - 2:39 am | माहितगार
अजया ताळी ('ताळी' उच्चारणात सर्वत्र ळ सुप्त धरावा; विक्रमादित्याची तलवार अन क्षमता नसल्यामुळे तसेच 'ताळी'ंचे उत्तर पूर्णत्वास जाईल की नाही याची खात्री नसल्याने 'वे' हे अक्षर खाल्ले आणि भांबवले जाण्यासाठी वयाचा संबंध नसतो हे उमगले :)) या मि.पा. संस्थळकरीण, मि.पा. झाडाच्या वरल्या फांदीवर बसल्या असताना, झाडाखाली सळसळ झाली, जुनाट पाचोळ्यातून गायब झालेला हा धागा का कोण जाणे कुणा मिपाकराने सर्र्र्र्र्र्रकन वर काढला, ताळींची झोप मोडली अख्खा धागा आणि त्यावरील शतकी प्रतिसाद अभ्यासूनही त्यांच्या लक्षात येइना त्यांच्या गाढ निद्रेच्या काळात एका १३ -साडे तेरा वर्षीय कोकराच्या मागे सिंहिण का लागली होती ? धाग्यावरील या प्रतिसादातून मग या धाग्याच्या वेलीवर "तेरा वर्षाच्या पोरामागे सिंहिण का लागली राणी मुखर्जीसारखा आवाज काढून? "( उत्तर माहित असून न देणाऱ्याच्या मिपा आयडीची शंभर शकले होतील ) अशी ताळीने दिलेली भारदस्त दवंडी अस्मादीक माहितगाराने वाचली, आणि इकडे आड अन तिकडे विहीर अशी स्थिती जाहली, सिहिंण का मागे लागते हे सिंह वर्गिय प्राण्यांच्या अनाहिताच फक्त निटसे सांगू शकतात , माहितगारास काय माहित असे पाहून माहितगाराचे गर्वहरण जाहले :). पण प्रश्नाचा संबंध कोकरा सोबत सुद्धा असल्यामुळे पार्ट ऑफ अन्सर आपल्याबाजूने दिले नाहीतर आपल्या आयडीची शंभरी भरेल या भितीने गार पडलेला माहितगार जमेल तसे कयासपूर्ण उत्तर लिहु लागला.
कोकराच्या माउलीने आपल्या कोकराने संपादन केलेल्या यशाच्या आनंदाने आणि कोकरु जेथे जाणार त्या वातावरणात अधिक उठून आणि आकर्षक दिसावे म्हणून ईस्मार्ट कॅज्युअल पोषाखामध्ये त्याला तयार केले आणि त्या माऊलीने करून दिलेली तयारी काळ आणि वेळ यांना जुळणारी ठरली हे नंतरच्या प्रसंगावरून सिद्ध झालेच ;). कौटूंबिक सोज्वळतेत वाढलेली अनेक/किमान काही कोकरे तेरा - साडे तेरा या वयात लाजाळूचे झाडा एवढी भाबडी सहज गोरी-मोरी होणारी असू शकतात सोबतीला संस्कार म्हणून काही असतेना ! तर त्या कोकरासाठी तो पोषाख कितीही आकर्षक ठरणारा म्हणून दिला तरी त्याच्या मनो शुचितेच्या सांस्कृतिक शुचितायूक्त संस्कारीत संस्कृतीला न मानवल्यामुळे -सांस्कृतिक शुचितेचे विशेष प्रयोग नाही केले तरीही त्या वयाचा उंबरठ्यावरची सर्वसाधारण मानवी कोकरे अशाच जराशी लाजाळू टाईपची असू शकतात, वयाच्या पुढच्या उंबरठ्यांवर बहुतेक त्या त्या वयातला चष्मा उतरवून पुढच्या वयाचा (भान) चष्मा घालतात काही मात्र मागच्याच उंबरठ्यांपाशी खोळंबून राहतात - तो त्याच्या आठवणीत अगदी पार्टीत पोहोचण्यापुर्वीपासून पोषाखाच्या योग्यते बाबत नर्व्हस फील करत असावा काय कारण त्याच्या आठवणीच्या नोंदीत हा पोशाख बघूनच मला झिणझिण्या आल्या.... शेवटी अनिच्छेनेच मी तो पोशाख परिधान केला... कहर येणार्या या शब्दांमधून समारंभात कशा बशा पोहोचलेल्या लाजाळूच्या रोपाची भांबावलेली मनस्थिती लक्षात येते का ?
आता त्या लाजाळूच्या रोपाची मनस्थिती अभ्यासल्या नंतर सिंहीण त्याच्या मागे का लागली असावी या ताळींच्या मुख्य प्रश्नाकडे येऊ. तेरा वर्षाच्या पोरामागे सिंहिण का लागली ? आता इथे ज्या माहितीची कमतरता आहे म्हणजे त्या तथाकथीत (नेमक माहित नाहीए सिंहिणच आहे का अजून कुणी) सिंहिणेचे स्वतःचे मत म्हणजे असे की इथे जे काही रंगवले जाताहेत ते कयासच, धागा लेखक त्याचे लेखन काल्पनिक नाही याचे आश्वासन देत असला तरीही ते सिंहिणीच्या बाबतीत कयासांच्या बाहेर आहे असे होत नाही.
दुसरे मह्त्वाचे सिंहिणीचे वय नमूद केलेले नाही. त्या सिहिंणेचे अनोळखी व्यक्तीशी मोकळे वागणे जरासे काठावरचे असू शकते -असेलच असे नाही- ज्या बाबत सावधानता दाखवली जाणे सहाजिक असू शकते. आमच्या मर्यादापूर्ण कयासांनुसार सिंहिंणीचा कोकराच्या मागे लागण्याचा उद्देशाचा कयास तिचे वय काय असेल यावर अंशतः अवलंबून असू शकेल का ?
१) म्हणजे ती त्याच वयाची अथवा एखाद दोन वर्षांनीच मोठी असेलतर
१अ)त्या वाढत्या वयात मुलींची वाढ मुलांपेक्षा अधिक असते आणि तिला केवळ पार्टी अॅनिमल आहे आणि तिच्या सोबतच्या इतर मैत्रिंणींप्रमाणे तिला ती डॅन्सपार्टी एंजॉय करण्याची इच्छा आहे त्या पलिकडे काही नाही. तिला पार्टनर म्हणुन नेण्या जोगा मुलगा दिसला त्याला डान्ससाठी म्हणून पटवण्या साठी सलगी म्हणून खांद्यावर आपलेपणा दाखवण्यासाठी हात ठेवला ती जे काही म्हणाली त्या अबकडचा अर्थ केवळ अबकड असण्याची शक्यता असू शकते पण लाजाळूच्या झाडाने नंतरचे अबकड+क्ष+क्षक्ष+क्षक्षक्ष असे स्वतःच्याच 'कल्पनेने' जोडले किंवा कसे ?
१ब) खरेच बोल्डमुलगी आहे तीला तो डान्सपार्तनर म्हणून सिंप्ली आवडला ती अबकड एवढेच म्हणाली पण लाजाळूच्या झाडाने नंतरचे अबकड+क्ष+क्षक्ष+क्षक्षक्ष असे स्वतःच्याच 'कल्पनेने' जोडले किंवा कसे ?
२) सिंहीण मुलगी १८ ते २५ दरम्यानच्या वयोगटातील आहे
२ अ) एकट कोकरू भांबावलेल दिसतय तिला तो तीच्या लहान भावासारखा वाटतो आहे त्याला जस्ट रिलॅक्स करण्यासाठी ती त्याच्याशी मोकळेपणाने गप्पा करते आहे ती अबकड एवढेच म्हणाली पण लाजाळूच्या झाडाने नंतरचे अबकड+क्ष+क्षक्ष+क्षक्षक्ष असे स्वतःच्याच 'कल्पनेने' जोडले किंवा कसे ?
२ ब) एकट कोकरू लाजाळूच रोप भांबावलेल दिसतयं तिचाही तिथे वेळ जात नाहीए म्हणून चला गंमत म्हणून कोकराची फिरकी घेऊ म्हणुन ती त्याची फिरकी घेते आहे. ती अबकड एवढेच म्हणाली पण लाजाळूच्या झाडाने नंतरचे अबकड+क्ष+क्षक्ष+क्षक्षक्ष असे स्वतःच्याच 'कल्पनेने' जोडले किंवा कसे ?
२ क) तिला खरेच डॅन्स करावयास जावयाचे आहे पण तिला सेफ पार्टनर भेटला नाही आणि हे कोकरु नाममात्र पार्टनर म्हणुन नेता येते आणि सेफपण आहे हा हिशेब करून ती केवळ अबकड मोकळे पणाने म्हणाली पण लाजाळूच्या झाडाने नंतरचे अबकड+क्ष+क्षक्ष+क्षक्षक्ष असे स्वतःच्याच 'कल्पनेने' जोडले किंवा कसे ?
३) सिंहीणीचे वय ३० ते ४०च्या दरम्यान आहे -
३अ) भांबावलेल कोकरू आवडल आहे त्याला रिलॅक्स करण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणून सिंहिण तीला सूचेल तशा गप्पा मारते आहे ती केवळ अबकड मोकळे पणाने म्हणाली पण लाजाळूच्या झाडाने नंतरचे अबकड+क्ष+क्षक्ष+क्षक्षक्ष असे स्वतःच्याच 'कल्पनेने' जोडले किंवा कसे ?
३ ब) ती २२ ते ४० वयोगटातली असून तीच्या अज्ञात कखगघ गरजे पोटी खरेच पोटेंशीअल चाईल्ड अब्युजचा प्रयत्न आहे ज्या मध्ये व्यक्तिगत गरज भागवणे अथवा चुकीचे काम करून घेणे असा काही उद्देश आहे. म्हणजे इथे अज्ञात कखगघ अथवा कोकरु समजते आहे तशी खरोखरच क्ष+क्षक्ष+क्षक्षक्ष अशी शक्यता आहे. या शक्यतांसाठी २१-२२ वया पेक्षा लहानमुली सरावलेल्या असू शकतील असे प्रथमदर्शनी वाटत नाही.
अजून काही शक्यता असू शकतील का ? आम्हालातरी एवढ्याच सुचल्या इतरांनी अधिक सुचवल्यास समजून घेणे आवडेल.
क्रमांक १ जर बरोबर असेल तर ती त्या वयातील एक सहाजिक प्रतिक्रीया असावी तिला पोषाखाच्या सोबत पोषाखातील व्यक्ती कोकरु सिंप्ली आवडले असू शकते, एका सांस्कृतिक पछाडलेले दृष्टिने न पाहीले असता त्यात त्या वयासाठी वावगे असे काय ? पण कोकरूला वेगळे काही वाटत असेल तर एकतर तो त्याच्या वयाचा स्वाभावीक परिणाम असू शकतो अथवा टाळता येण्या जोग्या मनो- सांस्कृतिक शुचितेचा प्रभाव.
क्रमांक २ बाबत स्वतःचे अंग काढून घेणे अथवा क्रमांक ३ बाबत अधिक सावधानता बाळगणे समजण्या जोगे आहे.
धागा लेखकाने लिहिलेल्या पूर्ण स्टोरीत एक महत्वपूर्ण उणीव दिसते ती म्हणजे मुलगा वडलांना काय वाटले असेल ते गृहीत धरून सारे आयुष्य कंठतो आहे, पिता-पुत्रात आई आणि मुलीत अशा विषयांवर मनमोकळे मार्गदर्शक संवाद अपेक्षीत असावयास हवे अशा प्रत्यक्ष संवादाचा अभाव.
हे सर्व कयास आहेत. कयास हे कयास असतात संपुर्णता चुकीचे असू शकतता. धागा लेखकाने मनो-सांस्कृतिक शुचितेची भूमिका रिव्हीजीट करता येणे शक्य आहे का ते पहावे. कयासाधारीत अंशतः टिका आहेच पण व्यक्तिगत पणे घेण्याचे टाळावे. कोकरू हा शब्द भाबड्या वयाचा निदर्शक म्हणुन वापरला आहे (ह. घ्यावे हि विनंती)
आता अजया ताळी म्हणतील की राणी मुखर्जी टाईप आवाजाचे काय जर वय १ची शक्यता आणि त्यात त्या वयाला अभिप्रेत आकर्षण असेल आणि या अबकड विचारणे तिच्यासाठीही पहिलेच असेल तर त्या बिचारीस आवाजही फुटण्यास वेळ लागून घोगरा झाला असू शकतो. आम्हाला वाटलेल्या शक्यता एवढ्याच. ताळी वाली उत्तरपावून पळो आणि माहितगारचा आयडी शंभर शकले होण्या पासून वाचो :)
9 Feb 2016 - 8:37 am | अजया
=))))))
दंडवत घ्या _/\_
9 Feb 2016 - 10:54 am | माहितगार
दंडवत नको हो आयडीची शकले होण्या पासून माफ म्हणा म्हणजे झाले ;), काही चुकले असेल तर सांगा कारण सिहिंणीचे विश्लेषण खरेतर महिला मंडळाने करावयाचे पण त्या फांद्यांवर लटकून उत्तर द्या नाहीतर आयड्यांची शकले होतील म्हणून सांगतात उत्तर दिले तर alter ego चे प्रत्यारोपण करतात.
-पाप बिचारा माहितगार :(
बाकी हे.लाटकर काका आणि काकासाहेब कें. यांच्या भूमिकांचेही या विषया संदर्भाने विवेचन करावयाचे होते ते मात्र राहीले.
9 Feb 2016 - 9:06 am | पैसा
इतके विश्लेषण!! मारवा हा तुमचा alter ego नाही ना!? =))
9 Feb 2016 - 11:10 am | माहितगार
पै तै काय हे ? स्त्रीयांनी स्वतःच्या बाजूनेही काही लिहावयाचे नाही फांद्यांवर बसून फक्त पॉपकॉरन हाणायची. बरे प्रश्न सरळ मला विचारला असतात ना ? तसे न करता सरळ alter ego प्रत्यारोपण केलेत, शिवाय हा गृहीत धरणारा तर्कदोष आहे. मारवांशी स्त्रीयांच्या बाजूने वाद विवादात मेगा बायटी प्रतिसाद देऊन दोन हात करतानाही आम्हीच पुढे होतो हे एवढ्या लवकर विसरलात सुद्धा :( ?? !!! :)
9 Feb 2016 - 12:46 pm | पैसा
थांबा, थांबा, मारवा काय उत्तर देतात बघू! =)) =))
9 Feb 2016 - 10:19 am | टवाळ कार्टा
आग्गाग्गा....काय तो व्यासंग =))...बाकी पुरुषच ते मेले वैट्ट हा अॅटिट्युड वैट्ट
9 Feb 2016 - 11:25 am | माहितगार
इतर वेळी सहमत पण तुमचा प्रतिसाद आमच्या प्रतिसादावर असल्यामुळे आमची प्रतिक्रीया सावधच असणे अपेक्षीत नाही का ? आधी सिंहीणीचे आपादमस्तक वर्णन करून क्ष+क्ष्क्ष विचार मनात तरळणारे शुकमुनींच्या गटातले का गांधीजींच्या ह्याचे उत्तर द्यावे ;) तर एकुण पुरुषांचे शुकासारीखे वैराग्य या विषयावरही आम्ही धागा लेख टाकला आहे त्याकडे तुमचे दुर्लक्ष झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तुम्ही हि प्रतिक्रीया दिली नसतीत चालले नसते का ? आम्ही तारेवरची निष्कक्ष आणि निष्पक्ष मंडळी आमच्या पुरुषांच्या बाजूने लिहिण्याच्या विचारात आहोत पण आता त्याचे क्रेडीट 'मीच उचकवलं होतं हो माहितगारांना' म्हणून घेऊन जाला का काय ;)
9 Feb 2016 - 11:37 am | टवाळ कार्टा
खि खि खि....वस्ताद हो तुम्ही...रत्नांग्रीचे कै? ;)
9 Feb 2016 - 2:42 am | माहितगार
अजून एक राहीले ते म्हणजे धागा लेखातील स्वानंद महिला संस्थेचा उल्लेख अस्थानी, अनावश्यक आणि धागा विषयाच्या औचित्यास अनुसरून वाटत नाही.
6 Feb 2016 - 8:31 pm | चौथा कोनाडा
आयला,हा धागा धम्माल आहे. एव्हरग्रीन आहे.
वर काढला म्हणुन परत वाचला. मज्जा आली.
क्काय प्रतिसाद आहेत एकेक ! अशी मजा आता येत नाही हेच खरे ! गुगळे साहेबानी एव्हढ्यात काही नविन लिहिलेय ? भारी लिहितात !
6 Feb 2016 - 8:31 pm | चौथा कोनाडा
आयला,हा धागा धम्माल आहे. एव्हरग्रीन आहे.
वर काढला म्हणुन परत वाचला. मज्जा आली.
क्काय प्रतिसाद आहेत एकेक ! अशी मजा आता येत नाही हेच खरे ! गुगळे साहेबानी एव्हढ्यात काही नविन लिहिलेय ? भारी लिहितात !
6 Feb 2016 - 8:50 pm | अभ्या..
एव्हर पिंक आहे.
चैला मला ती डिटेल वर्णन करुनसुध्दा पिंक्जीन्स अन पोटपिशवीवाला लूजर काई इमॅजिन व्हुईना. :(
6 Feb 2016 - 11:10 pm | टवाळ कार्टा
म्हणजे तुझी कल्पनाशक्ती अज्जून म्हणावी तेव्हडी डेव्हलप नै झालिये =))
6 Feb 2016 - 11:20 pm | अभ्या..
नेक्स्ट कट्ट्याला तू घालून ये तसला डिरेस. न जाणो एखादी शिव्हिंण फिदा व्हायची तुझ्यावर. तुझी लाईफ डेव्हलप हूईल. माझी कल्पना शक्ती डेव्हलपमेंट हूईल.
7 Feb 2016 - 10:52 am | टवाळ कार्टा
खिक्क....
9 Feb 2016 - 11:46 am | वेल्लाभट
जीन्स टी शर्ट या पोशाखावर एकांगी टीका केलेली आवडली नाही.
बाकी अनुभव रंजक. :)
13 Mar 2016 - 6:42 pm | जव्हेरगंज
सगळं कसं अगदी जबराट आहे!
अवांतर :
श्री. गुगळे आजकाल दिसत नाहीत !
13 Mar 2016 - 7:54 pm | Rahul D
येउ द्यात अजुन भन्नाट जुने लेख....
21 Sep 2021 - 8:01 pm | सुबोध खरे
सीउव्हीण वरचा हा लेख वाचून परत एकदा ह ह पु वा
26 Sep 2021 - 5:43 pm | चौथा कोनाडा
निस्ती मज्जा
:-)