मन म्हणजे मन म्हणजे मन असते,
तुमचे आमचे सगळ्या॑चे जीवन असते,
लग्नाचे मु॑जीचे केळवण असते,
ह्या सोहळ्या॑चे औचीत्य साधून केलेली आठवण असते,
मन म्हणजे मन म्हणजे मन असते,
तुमचे आमचे सगळ्या॑चे हेवन (स्वर्ग) असते,
मनाचा मनाला नाही लागत मेळ,
हीच तर खरी आहे जीवनाची भेळ,
कशाला करताय फूकाचा त्रागा.....
मनाने मनाशी बा॑धू मैत्रीचा धागा......
मान्य आहे की मन हे च॑चल असते,
तरीही ते जीवनातील अमुल्य असे पवीत्र ग॑गाजल असते..........
म्हणून म्हणतो मन म्हणजे मन म्हणजे मन असते,
तुमचे आमचे सगळ्या॑चे हेवन (स्वर्ग) असते,
मन म्हणजे मन म्हणजे मन असते..............
प्रतिक्रिया
27 Oct 2011 - 6:31 pm | अत्रुप्त आत्मा
:-) मनी जे जाहले,कुणा सांगु कसे,काहीतरी...हृदय शब्दात मी अणावे कसेऽऽ?...सांऽऽऽगू कसे!?...
:-)
27 Oct 2011 - 6:34 pm | लीलाधर
धन्यवाद..... ब॑धुराज........
27 Oct 2011 - 8:36 pm | प्रचेतस
मस्त कविता
ओ चचा, अनुस्वार पक्षी टिंबे द्यायला shift + M वापरा.
29 Oct 2011 - 8:24 pm | पैसा
पुढील लेखनास शुभेच्छा! इथे इतर अनेक उत्तमोत्तम लेखक कवींच्या कृती आहेत, वाचाल तसे तुम्हीही आणखी चांगलं लिहू शकाल.
29 Oct 2011 - 8:33 pm | लीलाधर
आभारी आहे.... प्रतिक्रीया दील्याबद्द्ल आभारी आहे.......
29 Oct 2011 - 8:26 pm | इंटरनेटस्नेही
वा! वा! चान!! चान!!
29 Oct 2011 - 8:34 pm | लीलाधर
धन्यवाद....
11 May 2015 - 2:48 pm | स्पा
नितळ निर्झरासारखे काव्य
आहा काय अवीट गोडी आहे या काव्याची
अतिशय रसाळ महाराजा
11 May 2015 - 2:53 pm | सूड
रसाळ का? बरं बरं!!
11 May 2015 - 3:34 pm | बॅटमॅन
तरी केळवणाचा उल्लेख येऊनही कवीने पुढे कवितेत राखलेल्या संयमाबद्दल त्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
11 May 2015 - 3:39 pm | सूड
मिपानियल कझिन्सचा अनेकानेक उल्लेखनीय कविता दिल्याबद्दल येत्या एखाद्या कट्ट्याचे औचित्य साधून सत्कार करावा.
11 May 2015 - 4:03 pm | बॅटमॅन
काय द्यावे ब्रे?
11 May 2015 - 4:04 pm | सूड
चरवी आणि लोटा!! ;)
11 May 2015 - 4:30 pm | बॅटमॅन
भांडे का लपविता? =))
11 May 2015 - 4:38 pm | सूड
आयला, मग एक मेटल डिटेक्टर पण !! ;)
12 May 2015 - 12:08 am | सतिश गावडे
अतिशय सुंदर कविता. आवडली !!!
जगातील यच्चयावत मानसोपचारतज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी, मनोविश्लेषकांनी, मनोउपचारकांनी जे आजवर मोठ मोठे ग्रंथ लिहून सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते कवीने किती मोजक्या आणि हळूवार शब्दांत सांगितले आहे.
28 Feb 2016 - 8:49 pm | स्पा
अतिशय निरव काव्य