मंगेश पाडगावकरांचे बेळगावात काव्यवाचन.

अविनाश ओगले's picture
अविनाश ओगले in जनातलं, मनातलं
13 Jul 2008 - 9:46 pm

आज १३जुलै. नामवंत कवयित्री इंदिरा संत यांचा ८वा स्मृतिदिन. संत कुटुंबियांच्यावतीने दरवर्षी या दिवशी एक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थिनीचा आणि तिच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात येतो. या वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर उपस्थित होते. डोह, कोरडी भिक्षा या पुस्तकांचे लेखक आणि मौजेचे संपादक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला लाभली होती. पाडगावकरांच्या सत्कारानंतर त्यांनी त्यांच्या सर्व लोकप्रिय रचना सादर केल्या. ८०व्या वर्षातला त्यांचा उत्साह, तडफ, जोम सर्वानाच चकित करून गेला. सुमारे दोन तास चाललेल्या या काव्यवाचनाला बेळगावकरांनी मोठ्या रसिकतेने दाद दिली. सलाम या कवितेने पाडगावकरांनी या कार्यक्रमाचा समारोप केला. ''या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे'' असे म्हणणार्‍या या कवीच्या काव्यप्रतिभेला बेळगावकरांनी 'सलाम' केला आणि बेळगावची नाळ महाराष्ट्राशीच जोडली आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले.

हे ठिकाणबातमी

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

13 Jul 2008 - 9:56 pm | केशवसुमार

ओगलेशेठ,

चांगली बातमी दिल की हो तुम्ही..
ते कार्यक्रमाची चलचित्रे पण टाकता आली तर बघा की हो इथे म्हणतोमी..
१९८६ साली कराडला असताना ते पाडगावकर ऐकल होतं बघा..करंदिकर आणि बापट बरोबर.. काय मजा आल होत म्हणुन सांगू.. त्याच आठवण झालं बघा..

(बाळेकुंद्रीचं)केशवसुमार

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Jul 2008 - 11:03 pm | श्रीकृष्ण सामंत

अविनाशजी,
मंगेश पाडगांवकर हे माझे सर्वांत आवडते कवी.त्यांना मी दीर्घायुष्य मिळो अशी त्या दयाघनाकडे प्रार्थना करतो.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

14 Jul 2008 - 8:19 am | विसोबा खेचर

ओगलेसाहेब, हे वाचून आपला हेवा वाटला! पाडगावकर माझेही अतिशय आवडते कवी. कार्यक्रम खूपच छान झाला असणार! :)

तात्या.