शैलेश कुलकर्णी याची ..मी कुठे काही म्हणालो ? ही दर्जेदार गझल वाचून सद्य राजकीय परिस्थितीवर काही ओळी सुचल्या.. त्या कोण म्हणतंय हे ओळखु येईल अशी आशा आहे ;)
त्याच जागा , त्याच चाली , मी कुठे नाही म्हणालो ?
तोच सौदा, ती खुशाली , मी कुठे नाही म्हणालो ?
धावते मग सोनिया माझ्यापुढे , टाकीत धापा ,
सांगते व्हा सरकारी, मी कुठे नाही म्हणालो ?
मजवरी होत्या परजल्या पार्टित तलवारी, जरी तू
लाज विसरू, गिळू थोडी, मी कुठे नाही म्हणालो ?
लाल चीनचे कवच होते, ते भांडले काही करोनी
वाचवणार माझे मवाली , मी कुठे नाही म्हणालो ?
"आपुली ही प्रीत ,म्हणशी, अणूकराराचेच नाते",
डाव्यांस तोडू, मोडू खोडी , मी कुठे नाही म्हणालो ?
-ऋषिकेश
प्रतिक्रिया
13 Jul 2008 - 9:10 pm | प्राजु
सध्या चालू मुद्द्यावरची... गझल (गझलच ना?) आवडली..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Jul 2008 - 5:23 pm | विसोबा खेचर
सही आहे कविता.. :)
तात्या.
14 Jul 2008 - 6:12 pm | विकास
एकदम मस्त कविता!
म.टा. अथवा सकाळ ला पाठवून पहा. लोकसत्तेत पाठवल्यास मात्र केतकर (सोनीयापुढे) म्हणतील "मी इथे (या कवितेस) नाही म्हणालो!"
14 Jul 2008 - 7:08 pm | सहज
वाचुन राजकीय गझलेला मतदार कोड्यात पडाला
मेंदु म्हणला देईन की मत, मी कुठे नाही म्हणालो?
14 Jul 2008 - 11:17 pm | सर्किट (not verified)
शब्दांत खूपच सुधारणा करता येईल.
दहा पैकी सहा गुण.
- (गुणकारी) सर्किट
15 Jul 2008 - 6:21 pm | धनंजय
करायच्या ऋषिकेश यांच्या कल्पना छानच असतात.
+१
15 Jul 2008 - 10:07 am | ऋषिकेश
प्राजु, तात्या, विकास, सहजराव आणि गुणकारी सर्किट ;)
प्रतिसादाबद्दल अनेक आभार! :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
15 Jul 2008 - 8:15 pm | प्रकाश घाटपांडे
तिच मान्स आन त्योच तमाशा , मी कव्हा नाई म्हन्ल
तिच बिअर आन त्योच बार, मी कव्हा नाई म्हन्ल
हासत हासत जगायला , मी कव्हा नाई म्हन्ल
तुपल्याशी नात जोडायला, मी कव्हा नाई म्हन्ल
प्रकाश घाटपांडे
15 Jul 2008 - 8:18 pm | चतुरंग
घाटपांडे साहेब, आज जोरात एकदम! मस्तच!!
चतुरंग