मूर्ती विरुद्ध भगत

विकास's picture
विकास in काथ्याकूट
4 Oct 2011 - 10:36 pm
गाभा: 

ऑक्टोबरच्या १-२ तारखेस न्यूयॉर्कमध्ये आय आय टीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन होते. त्या वेळेस नारायण मूर्ती (आय आय टीचे माजी विद्यार्थी) यांनी "आपल्या भाषणात कोचिंग क्लासेसमुळे कुठल्याही मुलांना आय आय टी त प्रवेश मिळू लागला असल्याने तिथल्या मुलांची शिक्षणोत्तर नोकरीतील आणि उच्च शिक्षणातील गुणवत्ता घसरली आहे" अशी खंत व्यक्त केली. टाईम्समधील बातमी प्रमाणे:

"Thanks to the coaching classes today, the quality of students entering IITs has gone lower and lower," Murthy said, receiving a thundering applause from his audience. ..."They somehow get through the joint entrance examination. But their performance in IITs, at jobs or when they come for higher education in institutes in the US is not as good as it used to be. " ...

त्यावर आज चेतन भगत यांनी ट्वीटरद्वारा खालील वक्तव्य केले आहे:

"It is ironic when someone who runs a body shopping company and calls it hi-tech, makes sweeping comments on the quality of IIT students." Bhagat furhter writes, "Mr Murthy had a point, but wish he wasn't so sweepingly high handed. Fix the system. No point judging students."

वास्तवीक क्लासेसचे पेव आधी देखील होतेच, फक्त ते सगळ्यांना मिळण्यासाठी सर्वत्र नव्हते. मध्यंतरी मी ऐकले की आंध्रमधे एक जे ई ई साठीचा क्लास तिथल्या सक्सेस रेट मुळे इतका पॉप्यूलर झाला की त्यांना त्यांचीच प्रवेश (क्लास मधे प्रवेश मिळवण्यासाठी) चालू करावी लागली! हे ऐकून आश्चर्य वाटायच्या आत पुढे असेही समजले की त्या क्लासच्या प्रवेश परीक्षेत यश मिळून क्लासला अ‍ॅडमिशन मिळण्यासाठी म्हणून आता नवीन क्लासेस चालू झाले आहेत! पण हा वेगळा मुद्दा आहे.

आता इतकेच विचारावेसे वाटते की मूर्तींच्या दृष्टीकोनातून कामाला योग्य आणि अमेरीकन विद्यापिठात योग्य असणे इतकेच आय आय टीअनचे महत्व आहे का? आय आय टीअन्सच कशाला पण आपण सगळ्याच विद्यार्थ्यांचा केवळ टेक्निकल क्लर्कशिपसाठीच विचार करतो का? जगात इनोवेशन हा शब्द सध्या जास्तच वापरला जात असताना आपण अजूनही बॉडीशॉपमधेच अडकलेले आहोत का?

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2011 - 11:00 pm | टवाळ कार्टा

मी स्वता एका आय.आय.टी. इंजिनीअर्ला सपोर्ट प्रोजेच्त वर बघीतले आहे
तेही इन्फी बेन्गलुरु मधे

धन्या's picture

4 Oct 2011 - 11:10 pm | धन्या

त्यात काय झालं? आयायटी इंजिनीयरने सपोर्ट प्रोजेक्टवर काम केलं तर त्यात काय बिघडलं?

जाता जाता, तुमी इन्फी मदे कुते असता? :)

कुंदन's picture

4 Oct 2011 - 11:49 pm | कुंदन

To err is development , to fix is Production Support

बाकी चाल्यु द्या.

धन्या's picture

5 Oct 2011 - 5:11 am | धन्या

development आणि Production Support या दोन्ही गोष्टींचा अनुभव असल्याने म्हणावेसे वाटते.

development is पाटया टाकणं and Production Support is एन्ड युजरला थुकपट्टी देणं. म्हणून तर दोन्ही दुकानं मजबूत चालतात. ;)

देवाची मुर्ती कशीही असली तरी तिच्या पूजेने सर्वसामान्यांना आणि पैसेवाल्यांना मनाला शांती मिळते. भगताचं काय जातंय बोंबलायला. त्याला आपल्या थातूर मातुर पुजा सांगून लोकांकडून पैसे उकळायचे असतात.

राजेश घासकडवी's picture

4 Oct 2011 - 11:20 pm | राजेश घासकडवी

त्यांचा ऑडियन्स होता माजी आयायटीयनांचा, जे अमेरिकेत येऊन यशस्वी झालेले आहेत. त्यांना 'तुमच्या काळी आयायटीत शिरणं कठीण होतं, त्यावेळी हुशारच लोक आत जायचे आणि बाहेर पडणाऱ्यांना मान होता. आता काय कोणी सोम्यागोम्या जातो' असं ऐकायला बरं वाटतं. त्यामुळे असं विधान यावं यात काही विशेष नाही.

खरी गोष्ट अशी आहे की पंचवीस वर्षांपूर्वीही क्लासेस, करस्पॉंडन्स कोर्सेस वगैरे जोरात होते. आयायटीत शिरणारा जवळपास प्रत्येकजण काही ना काही क्लास, कोर्स करूनच शिरत असे. आणि अशा क्लासेस, कोर्सेसना जाणारे जेमतेम ५ टक्के आयायटीत शिरायचे. त्यामुळे तेव्हाही जवळपास सॅचुरेशन होतं. आयायटीत शिरल्यावर खालच्या ८० टक्क्यांना जड जात असेच.

म्हणून मूर्तींचं विधान स्वीपिंग आहे, हे भगतांचं बरोबर वाटतं. मात्र 'बॉडिशॉपवाल्याने असं म्हणावं ही आयरनी आहे' हे अनाठायी आहे. मूर्तींनी शॉपबॉडीज पलिकडे संशोधन वगैरे होण्यासाठी काय करावं याविषयीही काही विचार मांडले आहेत. ते विचार बरोबर असोत नसोत, त्यांचा हेतू निश्चित चांगला आहे.

मात्र 'बॉडिशॉपवाल्याने असं म्हणावं ही आयरनी आहे' हे अनाठायी आहे.

हेच खटकलं. कारण नसताना केलेली चिखलफेक आहे ही. कुणी ताणून धरलं तर भगत साहेब अशी माघार घेतीलच.

विकास's picture

4 Oct 2011 - 11:56 pm | विकास

मात्र 'बॉडिशॉपवाल्याने असं म्हणावं ही आयरनी आहे' हे अनाठायी आहे.

मला देखील हे खटकले. हा शब्द येथेच नाही तर एकंदरीतच खटकतो. कदाचीत १४० अक्षरांमधे ते बसत असावे म्हणून भगतसाहेबांनी घातले असावे.

मूर्तींनी शॉपबॉडीज पलिकडे संशोधन वगैरे होण्यासाठी काय करावं याविषयीही काही विचार मांडले आहेत. ते विचार बरोबर असोत नसोत, त्यांचा हेतू निश्चित चांगला आहे.

बोलण्यातला हेतू चांगला असावा यात शंका नाही पण जर तसे (संशोधनाचे वातावरण प्रत्यक्षात इन्फोसिसमधे नसेल तर त्यांचे बोलणे वरकरणी ठरते. तसे आहे का हे तेथे काम करणारे थोडेफार सांगू शकतील. पण असले तरी फक्त ते केवळ इन्फोसिससाठीच लागू नाही असे वाटते/

राजेश घासकडवी's picture

5 Oct 2011 - 12:09 am | राजेश घासकडवी

पण जर तसे (संशोधनाचे वातावरण प्रत्यक्षात इन्फोसिसमधे नसेल तर त्यांचे बोलणे वरकरणी ठरते.

इन्फोसिस ही काही विशिष्ट ध्येयं साध्य करणारी संस्था आहे. आयायटींची ध्येयं वेगळी आहेत. आयायटीची ध्येयं गाठण्यासाठी आयायटीत अमुक तमुक हवं असं जर मूर्तींनी म्हटलं तर 'कायरे, तुमच्या इन्फोसिसमध्ये आहे का ते अमुक तमुक?' असा प्रश्न विचारणं योग्य नाही. प्रत्येक संस्थेत सुधारणेला जागा असते, मग ती कंपनी असो किंवा युनिवर्सिटी. पण दोन्हीत समान गोष्टी आवश्यक आहेत असं का म्हणावं?

उद्या ते भारतीय आर्मीविषयी म्हणाले की आजकाल सैनिक कमकुवत असतात, त्यांना भरपूर व्यायाम दिला पाहिजे. तर तसाच व्यायाम इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी दिला पाहिजे म्हणणं बरोबर ठरणार नाही. सैनिक खरंच कमकुवत आहेत का, असल्यास व्यायामाची कमतरता हे कारण आहे का वगैरे प्रश्न चर्चिले जाऊ शकतात.

विकास's picture

5 Oct 2011 - 12:22 am | विकास

या मुद्याशी सहमतच. इन्फोसिस आणि व्यायामाचे उदाहरण एकदम चपखल.

माझ्या डोक्यात तो प्रतिसाद लिहीताना जे चालले होते त्याचे थोडे स्पष्टीकरणः चार वर्षांच्या शिक्षणानंतर जर मुलगा/मुलगी केवळ आपल्याला नोकरी कुठे लागणार इतकाच विचार करत असेल. आणि त्यातही मॅनेजमेंट कन्सल्टंट का सॉफ्टवेअर कन्सल्टंट तर मग संशोधनाच्या ट्रेनिंगचा फायदा काय? शेवटी तिथल्या प्राध्यापकांना देखील आपली मुले कशी यशस्वी झालीत हे दाखवायचे असते. आणि संशोधनाचे वेड असलेल्याला व्यावहारीक यशाच्या संध्या मिळून काय होणार. म्हणून संशोधनाच्या वातावरणावर बोलत होतो.

हे केवळ आय आय टीतील विद्यार्थ्यांनाच लागू नाही तर इतर मान्यवर आणि व्यावहारीक संस्थांना देखील लागू होते. इंटरेस्टींगली, गेल्या शनीवारीच एका नवीन venture बद्दल ऐकत असताना समजले की एम आय टी आणि इतर आयव्हीलीग स्कूल्स मधे देखील ४७% विद्यार्थी हे गोल्डमन सॅक्स पासून मेकेन्झीसाठीच धडपडत असतात...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2011 - 12:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

राजेश आणि पिडाकाकांच्या प्रतिसादांशी सहमत.

"समीक्षकांनी टीका करण्याआधी एवढंतरी लिहून दाखवावं", असा कांगावा करणार्‍या लेखकूंसारखं वाटतं हे!

भगत, मूर्ती ही नावं आणि धागप्रवर्तक विकास अशा काँबिनेशनमुळे धागा उघडावा का न उघडावा असा प्रश्न पडला. पण धागाप्रवर्तकाची पूर्वपुण्याई चिक्कार असल्यामुळे धागा उघडलाच. ;-)

संशोधनाचे वातावरण प्रत्यक्षात इन्फोसिसमधे नसेल तर त्यांचे बोलणे वरकरणी ठरते. तसे आहे का हे तेथे काम करणारे थोडेफार सांगू शकतील.

अगदी R & D गुणवत्तेचे नाही परंतू नविन काही करुन बघण्यासाठी स्वतंत्र टीम आहेत आणि त्यांना ग्राहकाची कामे दिली जात नाहीत हे माहिती आहे.

पिवळा डांबिस's picture

5 Oct 2011 - 12:03 am | पिवळा डांबिस

त्यांचा ऑडियन्स होता माजी आयायटीयनांचा, जे अमेरिकेत येऊन यशस्वी झालेले आहेत. त्यांना 'तुमच्या काळी आयायटीत शिरणं कठीण होतं, त्यावेळी हुशारच लोक आत जायचे आणि बाहेर पडणाऱ्यांना मान होता. आता काय कोणी सोम्यागोम्या जातो' असं ऐकायला बरं वाटतं. त्यामुळे असं विधान यावं यात काही विशेष नाही.
याला यजमानांनी केलेल्या आतिथ्याला जागणं असं म्हणतात. आणि यात गैर काही नाही. फक्त "आता काय कोणी सोम्यागोम्या जातो'"अशा अर्थाचं विधान मूर्तींनी केलं नसतं तर (जर प्रत्यक्षात केलं असेल तर) भगतांना (आणि विकासला) वाईट वाटलं नसतं, इतकंच! ;)
खरी गोष्ट अशी आहे की पंचवीस वर्षांपूर्वीही क्लासेस, करस्पॉंडन्स कोर्सेस वगैरे जोरात होते.
खरं आहे. १९७५-८०च्या काळातही मुंबईत अग्रवाल क्लासेस वगैरे होतेच. आमच्या बरोबरची ज्यांना इंजिनियरिंगला जायचं आहे अशी मुलं तिथे जातच होती आणि त्या काळीही त्या क्लासची फी त्या काळच्यामानाने जबरदस्त होतीच!!

बाकी युएस मध्ये उच्च शिक्षण/ जॉब वगैरेबद्दल म्हणाल तर माणसाने कुठल्या संस्थेतून शिक्षण घेतलं आहे याचा फायदा त्याच्या लगेच पुढच्या अ‍ॅडमिशनसाठी किंवा पहिल्या जॉबसाठी अवश्य होतो. पण त्यानंतर मग तुमचा करंट परफॉर्मन्स बघून तुमचं परीक्षण केलं जातं. विशेषतः जर इंजिनियरींगमधील जॉब असेल तर आयायटीच्या इंजिनियरला नक्कीच प्राधान्य मिळतं. परंतु जर इतर क्षेत्रातील जॉब असेल विशेषतः मॅनेजमेंट (जो बहुसंख्य आयायटियन्सना हवा असतो असं पाहण्यात आलं आहे) त्यात उमेदवार कधी काळी आयायटीत गेला होता याचा विशेष फायदा दिसून येत नाही.

बाकी "आयायटी पूर्वी काय बुवा बुद्धिमंतांचं आगर होतं, आता काय राहिलं नाही", अशा अर्थाच्या बोलण्यात नॉस्टाल्जिया सोडला तर बाकी काही अर्थ नाही असं मला वाटतं....
उदा.
"आमच्या काळी मुंबई काय झकास होती, आता साली नुसती वाट लागलीये!!"
"पूर्वीचं पुणं राहिलं नाही राव, च्यायला, आमच्या काळी हे असं नव्हतं!!!"
"पूर्वी मिपा काय छान होतं, आता नुसत्या येडपट कविता आणि बुद्रुक पाकक्रिया!!!"
:)

शिल्पा ब's picture

5 Oct 2011 - 12:16 am | शिल्पा ब

<<<येडपट कविता आणि बुद्रुक पाकक्रिया

=)) =))

वास्तवीक क्लासेसचे पेव आधी देखील होतेच
आंध्रात असलेल्या क्लाससारखाच कुठला तरी क्लास कोटा, राजस्थानात आहे म्हणे! माझ्या मैत्रिणीच्या सासूसासर्‍यांचा व्यवसाय हाच की त्यांच्या घराला लागून त्यांनी आठ खोल्या बांधून घेतल्यात आणि तिथे ठिकठिकाणांहून आलेली मुलं राहतात आणि या क्लासला जातात. त्यांच्यामते या मुलांची तिथल्या थोडक्या वास्तव्यातही अनेक लफडी असतात. ती कधीकधी यांना निस्तरावी लागतात. लफडी म्हणजे मुलगी इन्व्हॉल्व असेलच असे नाही पण हुषार मुलाला परिक्षेला बसता येऊ नये म्हणून शक्यतेतली सगळी काळी कृत्ये करणे. कित्येकांचे आईवडील आपल्या मुला/मुलीच्या संरक्षणासाठी येऊन रहतात. असे कितीतरी प्रकार त्या बाई सांगत होत्या. महाराष्ट्रीयन मुले त्यातल्यात्यात बरी असतात. प्रकरणांपासून जरा तरी लांब असतात.
बाकी मूर्ती म्हणताहेत ते मला तरी पटते.

धन्या's picture

4 Oct 2011 - 11:39 pm | धन्या

प्र. का. टा. आ.

रेवती's picture

4 Oct 2011 - 11:42 pm | रेवती

आता काय झालं?

तै, उप-प्रतिसाद गुर्जींच्या प्रतिसादाला पडण्याऐवजी तुमच्या प्रतिसादाला पडला. म्हणून काढून टाकला.
बाकी काही नाही. तुम्ही अंमळ हळव्या दिसता. इतके हळवेपणा जालावर चालत नाही, हे आम्ही का तुम्हाला सांगायचं. :)

हळवेपणाचा प्रश्न नाही.
प्र. का. टा. आ. हे वेगळ्या अर्थानेही वापरले गेले असल्याचे उदाहरणे आहेत. तोच अर्थ असावा असे समजून विचारले.
अतोनात हळवी असते तर एव्हाना पळून गेले असते.

शिल्पा ब's picture

5 Oct 2011 - 12:52 am | शिल्पा ब

कय ओ वाकडे, मी इतकी हळवी आहे पण मला प्रतिसाद देताना करता का विचार? आँ?

तुम्ही धाग्या-धाग्यांवर देत असलेल्या प्रतिसादांवरुन मुळीच वाटत नाही की तुम्ही हळव्या आहात म्हणून. :)

तुम्हाला वाटण्या न वाटण्यानी काय होतंय? मी सांगतेय ना!!

अगदी या उप-प्रतिसादानेसुद्धा सिद्ध केलं की तुम्ही हळव्या नाही. ;)

शिल्पा ब's picture

5 Oct 2011 - 5:38 am | शिल्पा ब

मेला किती तो चिवटपणा हो वागळे!!

मन१'s picture

5 Oct 2011 - 7:37 am | मन१

वाकड्यांचे नवीन आड नाव आवडले.

शिल्पातै, तुमच्यासारख्या मिपाकरांच्या प्रतिक्रियांना पुरुन उरायचं म्हटलं की ईतका चिवटपणा लागतोच.

बाकी तुम्ही आम्हाला दिलेलं नविन आडनाव आवडल्या गेल्या आहे. तसाही वाकडे आणि वागळे यामध्ये फारसा फरक नाही. (इथे वाकडे हा शब्द विशेषण म्हणून वापरला आहे ;) )

प्रचेतस's picture

5 Oct 2011 - 10:06 am | प्रचेतस

वागळे की दुनिया ही अंजन श्रीवास्तव-भारती आचरेकरची गाजलेली मालिका आठवली.

आम्हाला कुणा एका वागळेचा उल्लेख अपेक्षित नव्हता. आम्ही सार्‍या महानगराचा आयबीएन लोकमतवाले करतील तसा विचार केला होता. ;)

प्रचेतस's picture

5 Oct 2011 - 10:42 am | प्रचेतस

वागळे म्हणजे एक आपल्यासारखाच सर्वसामान्य पापभीरू माणूस. त्याची दुनिया ती आपलीच की. :)
तेव्हा मी आख्या आपल्या दुनियेचा विचार करतोय आणि तुम्ही फक्त महानगराचाच. ;)

धन्या's picture

5 Oct 2011 - 10:48 am | धन्या

तेव्हा मी आख्या आपल्या दुनियेचा विचार करतोय...

गुड नो... :)

मृत्युन्जय's picture

5 Oct 2011 - 10:25 am | मृत्युन्जय

तसाही वाकडे आणि वागळे यामध्ये फारसा फरक नाही.

त्यांना *"वेगळे'' म्हणायचे होते. चुकुन वागळे म्हणाल्या त्या ;)

* संदर्भः चौकट राजा ;)

धन्या's picture

5 Oct 2011 - 10:40 am | धन्या

त्यांना *"वेगळे'' म्हणायचे होते. चुकुन वागळे म्हणाल्या त्या
* संदर्भः चौकट राजा

चौकट राजा म्हणजे दिलिप प्रभावळकर आणि स्मिता तळवळकर यांनी काम केलेला सिनेमा का इथपासून सुरुवात झाली. :)

मृत्युन्जय's picture

5 Oct 2011 - 10:51 am | मृत्युन्जय

एज दिल्यावर वाईड बॉल धरत नाही भौ. ;)

आम्ही परवाच एका व्यनित म्हटलं होतं की आम्हाला क्रिकेटमधलं काहीही कळत नाही. इथून पुढे क्रिकेटचे संदर्भ वापरणे नाही. :)

तिमा's picture

5 Oct 2011 - 7:16 pm | तिमा

धागा भरकटायला लागला की प्रतिसाद उजवीकडे सरकतात अशी काही खास व्यवस्था आहे की काय मिपावर ?

---- तिरशिंग भरकटणे

चित्रा's picture

5 Oct 2011 - 5:00 am | चित्रा

>लफडी म्हणजे ..इन्व्हॉल्व असेलच असे नाही पण हुषार मुलाला परिक्षेला बसता येऊ नये म्हणून >शक्यतेतली सगळी काळी कृत्ये करणे. कित्येकांचे आईवडील आपल्या मुला/मुलीच्या संरक्षणासाठी >येऊन रहतात.

रेवती,
आपल्या मुलाचे प्रेमात पडणे झाकण्यासाठी तर असे आईवडिल बोलत नसतील ना?

खरे तर पंधरासोळाच्या मुलांनी खर्‍याखोट्या प्रेमात नाही पडले तरच मी आश्चर्य करेन. असो. पण आईवडिलांनी संरक्षण करायचे म्हणजे काय? तुझ्या सोळा वर्षाच्या मुलीपासून मी माझ्या सोळा वर्षाच्या मुलाचे रक्षण करतो असे?
हा प्रतिसाद तुला उद्देशून नाही, पण नक्कीच अशा भ्रामक समजुती आईवडिल स्वत:च्याच करून घेत असावे असे वाटते. किंवा लोकांसमोर आपल्या मुलाचा 'पाय घसरला', तो कोणाच्या तरी 'जाळ्यात अडकला' इ. बर्‍याच लोकांकडून ऐकले आहे. ही किती फसवणूक असते आणि ती कोण, कोणाची आणि का करत असते हा जरा गोंधळच आहे.

बाकी आयआयटीवरून वाचताना अचानक काही जुने आयडी आठवले. कहां गये वो लोग असे काही झाले आहे खरे.

बाकी आयआयटीवरून वाचताना अचानक काही जुने आयडी आठवले. कहां गये वो लोग असे काही झाले आहे खरे.

छे, तुमचं आपलं काहीतरीच. आवसे पुनवेला जनसामान्यांना सावध करण्याचं महान कार्य केवळ आयायटीयनच करत आहेत.

इतरही अद्वैतवादी आयायटीयन इथे आहेत असं ऐकून आहे. खरं खोटं प. पू. गुरुवर्य घासुरुद्ध जाणोत.

नाही गं, तसं नाही. प्रेमात पडतच असतील (किंवा नसतीलही).;) मुलांच्या मारामार्‍या असतात. जायबंदी करण्याइतपत. आता जर मी दिल्ली, पंजाबकरांबद्दल बोलले तर त्यावर वेगळा धागा निघेल असे वाद होतील.;)
आयायटीवरून तर मला असा आयडी नेहमी आठवतो.........ती ष्टोरी फोन होईल तेंव्हा सांगीन.

अशा मुलांना आयायटीमध्ये प्रवेश नाहीच मिळाला तर पुढे जाऊन ती एखादी नवनिर्माण सेना काढतील आणि दुसर्‍या राज्यांमधील लोक आपल्या राज्यात एखादया सरकारी नोकरीच्या परीक्षेला आले की त्यांना रेल्वे स्टेशनवरच ठोकतील. :)

क्रेमर's picture

4 Oct 2011 - 11:36 pm | क्रेमर

आयआयटी हाच एक मोठा कोचिंग क्लास असल्याने मुर्ती व भगत यांची विधाने अनावश्यक आहेत.

मुक्तसुनीत's picture

4 Oct 2011 - 11:40 pm | मुक्तसुनीत

उत्तम प्रतिसाद.

५० फक्त's picture

5 Oct 2011 - 8:58 am | ५० फक्त

+१०० टु क्रेमर आणि मुसुकाका.

आयआय्टित न गेलेला पण एका अतिशय उत्तम आयआयटियनच्या हाताखाली नोकरीतल्या धंद्याच्या राजकारणाची गणितं शिकलेला, सध्या त्या गणितांचा वापर करुन माझ्या बॅचच्या आयआय्टियनपेक्षा जास्त यशस्वि असलेला,

चतुरंग's picture

4 Oct 2011 - 11:38 pm | चतुरंग

'भगत'च 'मूर्तीं'विरुद्ध जायला लागले तर अवघड आहे! :)

(मूर्तिपूजकभगत) रंगास्वामी

आय आय टीला डोक्यावर बसवल्याचे परीणाम आहेत. इतर मुलं काय यशस्वी होत नैत काय?

कोदरकर's picture

5 Oct 2011 - 12:15 am | कोदरकर

साठी महत्वाकांक्षी उद्दीष्ट ठेवत आहेत हे चांगलेच आहे.. १०-२० वर्ष काय काय काम करायचे हे दिशा दर्शन महत्वाचे ठरते.. त्यांचा दुरदर्शी पणा कलामांच्या पठडीतला आहे... बाकी चेतन भगत उंची वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत असे वाटते...

>> जगात इनोवेशन हा शब्द सध्या जास्तच वापरला जात असताना आपण अजूनही बॉडीशॉपमधेच अडकलेले आहोत का? >>

जोपर्यंत बेसिक गरजा - प्रदूषणमुक्त हवा, सार्वजनिक स्वच्छतागृहे , कमी गर्दी अर्थात पुरेशी पर्सनल स्पेस दुसर्‍या देशात मिळते तोपर्यंत (काही!!!!) लोकांचा ओढा अन्य देशांकडे रहाणारच. दुसर्‍या देशात जाऊन फारसा तीरही मारता येत नाही. खूपशी उर्जा स्वतःला, कुटुंबाला स्थिरस्थावर करण्यात, परिस्थितीशी जुळवून घेण्यातच जाते. त्यामुळे बॉडीशॉप, क्लेरीकल वर्क यापलीकडे जाता येत नाही बहुतेक.

नितिन थत्ते's picture

5 Oct 2011 - 8:48 am | नितिन थत्ते

भगत यांच्याशी सहमत आहे.

राजेश घासकडवी यांनी मूर्ती यांच्या बोलण्याचा जो उद्देश सांगितला आहे (जुन्या आयआयटीयन्सना सुखावणारे बोलणे) तोच बरोबर वाटतो.

वेळोवेळी आपल्या देशात होली काऊज निर्माण होतात. मग त्यांनी बोललेले काहीतरी खूप महत्त्वाचे आहे असा आभास निर्माण होतो.

नारायणमूर्ती ही अशीच एक होली काऊ आहे.

बाकी क्रेमर यांच्याही प्रतिसादाशी पूर्ण सहमत आहे.
.
.
.
.
.
(शरीरविक्रयात* एकदा भाड्याने गेलेला सायबर कुली) नितिन थत्ते

*शरीरविक्रय = Body Shopping :)

नगरीनिरंजन's picture

5 Oct 2011 - 8:55 am | नगरीनिरंजन

वेळोवेळी आपल्या देशात होली काऊज निर्माण होतात

सहमत. आयआयटी हीसुद्धा एक 'होली काऊ'च आहे आणि या होली काऊवाल्यांचं 'होलीयर दॅन दाऊ' हे आवडतं घोषवाक्य आहे.

आयआयटी हीसुद्धा एक 'होली काऊ'च आहे आणि या होली काऊवाल्यांचं 'होलीयर दॅन दाऊ' हे आवडतं घोषवाक्य आहे.

प्रचंड सहमत आहे.

सुंदर मुर्ती घडवण्यासाठी भगताला कदाचित पुढचे सात जन्मही कमी पडतील. त्याने लोकांना हरिदासाच्या कथा सांगूनच आपली शेखी मिरवावी. :)

अप्पा जोगळेकर's picture

6 Oct 2011 - 4:38 pm | अप्पा जोगळेकर

आयआयटी हीसुद्धा एक 'होली काऊ'च आहे
असेच म्हणतो. किंबहुना सगळीच नावाजलेली कॉलेजेस जसे - आय आयटी, व्हीजेटीआय, सिओईपी इत्यादी ही होली( काउ आहेत. अन्यथा या ठिकाणीच कँपस सिलेक्शन व्हावीत आणि लोकल कॉलेजमधले विद्यार्थी स्वस्तात काम करण्यासाठी तयार असताना कंपन्यांनी (यात इन्फोसिस सुद्धा आहेच) त्यांच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहू नये असं झालं नसतं.

नारायणमूर्ती ही अशीच एक होली काऊ आहे.

थत्तेचाचा, बोलणं खुप सोपं असतं हो.

तुमच्याच भाषेत सांगायचं तर शरीरविक्रयात भाडयाने जाण्यासाठी सायबर कुली रक्त आटवत असतात. आणि एकदा का तसं झालं की स्वर्ग हाताला लागल्याचं समाधान मिळत असतं. कदाचित तुम्हीही अशा अनुभवातून गेला असाल. कुणा एका सायबर कुलीची ही अवस्था तर अशा हजारो सायबर कुलींना भाडयाने पाठवणारा अगदी महान नसला तरी कर्तृत्ववान नक्कीच असला पाहिजे ना. ;)

मराठी_माणूस's picture

5 Oct 2011 - 10:21 am | मराठी_माणूस

अशा हजारो सायबर कुलींना भाडयाने पाठवणारा अगदी महान नसला तरी कर्तृत्ववान नक्कीच असला पाहिजे ना

सत्यम चा राजु हा पण एक तसाच कर्तुत्ववान.

धन्या's picture

5 Oct 2011 - 10:34 am | धन्या

मी शेण खाल्लं याचा अर्थ माझ्यासारखे हजारो आय टी हमाल शेण खातात असा होत नाही. माझं शेण खाणं हे माझ्यापुरतंच मर्यादीत असेल, त्याचं सारे सॉफ्टवेअर इंजिनीयर शेण खातात असं जनरलायझेशन होऊ शकत नाही. बरोबर ना?

क्लिंटन's picture

5 Oct 2011 - 9:51 pm | क्लिंटन

वेळोवेळी आपल्या देशात होली काऊज निर्माण होतात. मग त्यांनी बोललेले काहीतरी खूप महत्त्वाचे आहे असा आभास निर्माण होतो.

नारायणमूर्ती ही अशीच एक होली काऊ आहे.

सहमत.

मराठी_माणूस's picture

5 Oct 2011 - 9:54 am | मराठी_माणूस

भगतचा शेरा हिणकस वाटला तरी ती वस्तुस्थिती आहे. एव्हढी कॅश रिच कंपनी असुन , आजतागायत त्यांच्याकडुन , ऑपेरटींग सिस्टीम, कंपायलर, डेटाबेस, ईआरपी ह्या सारखे एकही सॉफ्टवेअर बनवण्याच्या प्रयत्न झालेला दिसत नाही.

दुसरे म्हणजे मुर्तींच्या शिक्षणावरच्या मताला एव्हढे महत्व का? त्यांचा ह्या क्षेत्रातील काही अनुभव आही का ?

क्रेमर यांचा प्रतिसाद आवडेश ! :)
बाकी चतुर रामलिंगम सारखे नमुने अश्या संस्थात किती असावेत / यातुन बाहेर पडत असावेत ? असा सहज विचार आला बाँ. ;)
बाकी बुद्धीमत्ता आणि शिक्षण संस्था यांचा संबंध असायलाच हवा असे वाटत नाही. अनेक मोठे मोठे शोध लावणारे/ कर्तुत्व असलेले, कोणत्याच विद्यापिठात किंवा तत्सम शिक्षण संस्थात गेले नव्हते अशी बरीच उदाहरणे आढळुन येतील. :)
यातलेच एक उदा:--- Luther Burbank
http://en.wikipedia.org/wiki/Luther_Burbank

चिरोटा's picture

5 Oct 2011 - 11:00 am | चिरोटा

घासकडवींच्या प्रतिसादाशी सहमत. मागे २००३ साली Brand IIT हा प्रोग्रॅम अमेरिकेतल्या एका चॅनेलवर लागला होता. मूर्ती मुलाखतीत म्हणाले होते- माझ्या मुलाला आय.आय.टी.ला प्रवेश नाही मिळाला पण कॉर्नेलला मात्र प्रवेश मिळाला.संचालिकेने एकदम मोठा आ करुन "बापरे आय आय टी, जगातली सर्वात कठिण परीक्षा दिस्तेय" असे उद्गार काढले.
जगात इनोवेशन हा शब्द सध्या जास्तच वापरला जात असताना आपण अजूनही बॉडीशॉपमधेच अडकलेले आहोत का?
भारतात एन्फिच नाही तर अनेक आय्टी कंपन्यांनी ईनोवेशनसाठी प्रयत्न करुन पाहिले गेल्या १० वर्षात्.आवडो वा न आवडो - We are not made for that. ही वस्तुस्थिती आहे.

आजतागायत त्यांच्याकडुन , ऑपेरटींग सिस्टीम, कंपायलर, डेटाबेस, ईआरपी ह्या सारखे एकही सॉफ्टवेअर बनवण्याच्या प्रयत्न झालेला दिसत नाही

अनेक प्रयत्न अनेक कंपन्यांकडून झाले आहेत. हे सगळे बनवून विकण्यासाठी मोठी eco system लागते किंवा बिल जॉय(http://en.wikipedia.org/wiki/Bill_Joy ) स्टीव वॉझ (http://en.wikipedia.org/wiki/Steve_Wozniak ) सारखे जिनियस लागतात. भारतात ह्या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे.

धन्या's picture

5 Oct 2011 - 11:10 am | धन्या

आवडो वा न आवडो - We are not made for that. ही वस्तुस्थिती आहे.

सहमत आहे. भारतातील आय टी कंपन्या "जे तुमच्या मनात ते आमच्या दुकानात" या तत्वावर चालतात. भले मग ग्राहकाच्या मनात डेटा टेक्स्ट फाईलमधून उचलून एक्सेल शीटमध्ये का टाकायचा असेना. कारण तेच सोयीचं आहे. इनोवेशन आलं की आपलं उत्पादन लोकांच्या मनात ठसवणं, बाजारातील जीवघेण्या स्पर्धेला तोंड देणं आलं.

प्रोडक्ट डेव्हलपर असण्यापेक्षा सर्विस प्रोवायडर असणं हे फायदयाचं गणित आहे. :)

मदनबाण's picture

5 Oct 2011 - 11:43 am | मदनबाण

वाकडोबांशी सहमत. ;)
प्रोडक्ट डेव्हलपर असण्यापेक्षा सर्विस प्रोवायडर असणं हे फायदयाचं गणित आहे.
:)
आमच्या सारख्या आयटी हमालांच्या भाषेत काही घोष वाक्ये/म्हणी :---
१) सपोर्ट द्या बस्स्स्स्स !
२)कंन्सल्टंट जगो वा मरो बिलिंग होनाच मांगता !
३) मॉनिटरिंग करणे आणि आयुष्याचा कोळसा करणे यात फरक तो काय?
४)२४X७ सपोर्ट देणे म्हणजे आयुष्याची काशी मथुरा करणे.
५) "गो लाईव्ह" म्हणजे "जीव जाई" पर्यंत काम.
६) नेटवर्क डाऊन तो एस्कलेशन चालु.

मराठी_माणूस's picture

5 Oct 2011 - 11:49 am | मराठी_माणूस

१ ते ६ सहमत.

अजुन एक , आपल्या सणांना ह्यांचे "गो लाईव्ह" "रीलीज" ईत्यादी म्हणजे अगदी कळस . हे म्हणजे दुसरे पारतंत्रच वाटते.

मदनबाण's picture

5 Oct 2011 - 12:05 pm | मदनबाण

आपल्या सणांना ह्यांचे "गो लाईव्ह" "रीलीज" ईत्यादी म्हणजे अगदी कळस . हे म्हणजे दुसरे पारतंत्रच वाटते.
आणि त्यांच्या सणांना यक्स्ट्रा सपोर्ट देणे. घर म्हणजे फक्त झोपायला जाण्यासाठी कंपनीने दिलेली सुट ? :(
अश्या पारतंत्र्यात साडेतीन वर्ष घालवली आहेत मी ! ती आयष्यातली वर्ष कुठे गेली याचा अजुन पत्ता लागला नाहीये मला ! ट्रान्स म्हणु का त्याला ? असे वाटते:( काही दिवस मोकळा झालो होतो आता परत तेच होणार! चक्की दळींग अ‍ॅड दळींग अ‍ॅड दळींग ! :(

बिलिंग होनाच मांगता !

बाणा यल्टीआय मध्ये हे वाक्य दिवसातून दहा वेळा तरी ऐकावं लागतं ना रे. ;)

बाणा यल्टीआय मध्ये हे वाक्य दिवसातून दहा वेळा तरी ऐकावं लागतं ना रे.
खी खी खी... आणि आयुष्यभर हेच ऐकावे लागणार आहे याची खात्री पण आहे. ;)
परत तेच पालुपद मनात म्हणायचे !
काम करा बस्स्स्स ! ;)

माझीही शॅम्पेन's picture

5 Oct 2011 - 11:03 am | माझीही शॅम्पेन

बर्‍याच आयआयटी आणि आयआयएम च्या पब्लिक बरोबर काम करून त्यातले बरेचसे भिकरोचोट असतात हे मी छाती ठोक पणे सांगू शकतो. :)

चिरोटा's picture

5 Oct 2011 - 11:34 am | चिरोटा

मूर्तींनीही तसेच म्हंटले आहे पण सौम्य भाषेत. मा.शॅ्. ह्यांनी संस्थळावर सौम्य भाषा वापरावी ही विनंती.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Oct 2011 - 4:10 pm | विश्वनाथ मेहेंदळे

माशॅ, अशी भाषा वापरायला तुम्ही स्वतःला विदुषक समजता की काय ?? ;-)

धन्या's picture

5 Oct 2011 - 6:18 pm | धन्या

बहुतेक ते स्वतःला जुने मालक समजत असावेत. :)

माझीही शॅम्पेन's picture

5 Oct 2011 - 11:53 pm | माझीही शॅम्पेन

अरे मित्रांनो मला प्रतिक्रिया संपादित करता येत नाही , मला विवादित शब्द बदलून भिकार-क्रिएटिव करायचा आहे !

अजुन काही प्रतिक्रिया आल्या तर चपलान्च दुकान टाकाव लागेल :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Oct 2011 - 7:06 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>अरे मित्रांनो मला प्रतिक्रिया संपादित करता येत नाही
अजिबात संपादित करू नकोस. असे लिहिल्यामुळे तू जुना-जाणता म्हणून प्रसिद्ध होशील. मग तू इतरांनी संस्थळाचा वाट लावली अशी बोंब ठोकायला मोकळा होशील.

>>अजुन काही प्रतिक्रिया आल्या तर चपलान्च दुकान टाकाव लागेल
दीड वर्ष झाले तुला इथे, अजून कातडी इतकी मऊ आहे ?? हापिसात कसे पण पी.एल. कम्प्लायंस च्या नावाने बोम्बलला तरी दुर्लक्ष करतो तसे दुर्लक्ष करायचे सरळ. काय बोलतोस, कशी आहे आयडिया ????

विनायक प्रभू's picture

5 Oct 2011 - 11:50 am | विनायक प्रभू

माझा अनुभवः गेल्या ३० वर्षात खुप आय आय टी यन महानुभव संपर्कात आले.
काही मोजके अपवाद सोडता सर्वजण आपले दिड फुट ह्या अविर्भावात असतात.

काही मोजके अपवाद सोडता सर्वजण आपले दिड फुट ह्या अविर्भावात असतात.

ज्ञान फुटपट्टीने मोजता येते आणि ते दिड फुट असू शकते हे नव्यानेच कळले. ;)

विनायक प्रभू's picture

5 Oct 2011 - 11:53 am | विनायक प्रभू

प्रतिसादात नाक हा शब्द राहुन गेला.

daredevils99's picture

5 Oct 2011 - 2:04 pm | daredevils99

स्पष्ट केलेत हे बरे केलेत!

मुळातच 'आमच्यावेळी' हे अस्सं नव्हतं हे सांगण - असं वाटणं हे आयटीच अनाहि तर प्रत्येक ठिकाणी स्वाभाविक आहे आणि दिसतेही. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीने असं बोलावं आणि नव्या दमाच्या व्यक्तीने ते (फुकाच्या) हिरीरीने खोडायला जावं त्याचंच हे संभाषण एक्सटेंशन वाटत. प्रत्यक्षात पूर्ण बरोबर कोणीही नसतं - नाहिये!

मैत्र's picture

5 Oct 2011 - 2:31 pm | मैत्र

भगत या मनुष्याला थेट इन्फी चं बॉडी शॉपिंग काढण्याची गरज नव्हती पण तसंच वर अनेकांनी लिहिल्याप्रमाणे मुर्तींनी इतकी सरसकट विधान करण्याची काही गरज नव्हती.
एन आर एन अतिशय उत्तम वक्ते आहेत यात काहीही शंका नाही आणि कुठलंही महत्त्वाचं भाषण देण्यासाठी ते अतिशय व्यवस्थित पूर्वतयारी करूनच येतात अशी त्यांची प्रसिद्धी आहे. मग त्यांनी विचारपूर्वक असं स्विपिंग स्टेटमेंट करण्याची गरज नाही. खरं तर आमच्या वेळी आय आय टी चा दर्जा चांगला होता तर आता पॅन आय आय टी अ‍ॅलम्स ने एकत्र येऊन किंवा पुनर्विचार करून तो सुधारावा वगैरे हा खरंच पिडाकाकांनी म्हटल्याप्रमाणे नॉस्टॅल्जियाच आहे...

हा धागा पुन्हा त्याच मार्गावर जातोय पण बहुतेकांचा सूर आय आय टी म्हणजे काय लय भारी नाय हां असाच आहे.
अशी कोल्ह्याला द्राक्षे आंबट का असावीत ? सर्व नॉन आयआयटियन काय ठरवून ती काय भि**** संस्था आहे आपण आपले शिक्षनमहर्षींच्या कालिजातच शिकणार. आज इन्फी बीबी वर लोकांनी पार रामानुजनचा दाखला दिला की तो कुठे महान कॉलेजात गेला होता. जॉब्ज, गेट्स, प्रेमजी, अंबानी ही मंडळी कुठल्या आयआयटी आणि केंब्रिज हार्वडात गेली होती. अरेच्या म्हणजे तिथे जाउच नये काय ?
असा सूर असेल तर बंद करा आय आय टी आणि आय आय एम्स...
गावातल्या / कोपर्‍यावर्च्या कॉलेजात आणि आय आय पी एम किंवा हायवेलगत निघालेल्या नवीनच मॅनेजमेंट कॉलेजात शिकून त्याहून उत्तम विद्यार्थी बाहेर पडतील..

मदनबाणाने लिहिलेले मुद्दे हे भारतीय आय टी चं वास्तव आहे (केवळ इन्फी नव्हे). त्यामुळे एका अर्थी भगत आणि एन आर एन दोघंही बरोबर आहेत पण ही झाकली मूठ आहे. अमेरिकेत किंवा ट्विटर वर ओरडून जगाला आपली स्थिती सांगण्याची गरज नाही !

चिरोटा's picture

5 Oct 2011 - 2:57 pm | चिरोटा

आज इन्फी बीबी वर लोकांनी पार रामानुजनचा दाखला दिला की तो कुठे महान कॉलेजात गेला होता. जॉब्ज, गेट्स, प्रेमजी, अंबानी ही मंडळी कुठल्या आयआयटी आणि केंब्रिज हार्वडात गेली होती

हा हा. असे बोलणार्‍यांचा अंतु बर्वा झाला आहे असे मला वाटते.पूर्वी आय आय एमची बातमी वाचली "अंबानी/बिर्ला थोडीच गेले होते आय आय एम मधे?" असे आमचा एक कोकणी मित्र विचारायचा.

आज ... बीबी वर लोकांनी पार रामानुजनचा दाखला दिला

जगातले यच्चयावत ज्ञानी पुरुष आणि विदुषी इथे हजेरी लावून जातात असे स्वानुभवाने सांगावेसे वाटते. ;)

मूर्ती आपल्या भाषणात कोचिंग क्लास मधून आलेल्या मुलांची वृत्ती केवळ मार्कांसाठी अभ्यास अशा प्रकारची असते या अर्थाने बोलले होते.
त्या अगोदरच कोणीतरी आय आय टी मध्ये आपण इंजीनिअर हे प्रॉडक्ट निर्माण व्हावे या साठी विद्यार्थी( कच्चा माल ) घेतो मात्र हे प्रॉडक्ट्स फायनान्स कडे वळते याचे दु:ख होते असे म्हणाले होते त्यावर कोणीच बोलले नाही.
भारतात आयटी मध्ये सम्शोधन अभावानेच होते. आजवर एखाद्या भारतीय कंपनीने ओ एस केलेली नाहिय्ये. प्रोग्रॅमिंग भाषा वगैरे दूरच.
हे असे असले तरीही आय आय टीच्या विद्यार्थ्यांची विचार क्षमता थोडी वरच्या दर्जाचीच असते कदाचित हा त्या संस्थेच्या वातवरणाचा परीणाम असावा.
मागे एकदा शिवाजी विद्यापिठाच्या पदवीला बाहेर कोणी विचारत नाही असे म्हणताना ऐकले होते यात तो दोश विद्यार्थ्यांच्या माथी का मारला जातो? शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले असतात तो त्यांचा दोश नसतो. मात्र ते ज्या संस्थेत शिक्षण घेतात तेथे विद्याभ्यास सोडता इतर अ‍ॅक्टीव्हीटी ज्यांचा मुम्बै पुणे वगैरे शहरातील विदद्यार्थ्याना उपलब्ध होतात अशा उपलब्ध होत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांची जडणघण होत नाही..

मध्ये (२००६) एक परिसंवाद ऐकला होता. वक्ते कानपूर चे डिन होते. त्यांनी बरीच माहिती दिल्यानंतर प्रश्नोत्तराचा भाग झाला. एका पालकाने प्रश्न विचारला की माझ्या पाल्याला जर आयाअयटीत प्रवेश नाही मिळाला तर, he will go mad. तर वक्त्याने त्वरीत सांगितले की, don't worry.he is already mad,

त्यावर त्याने स्पष्टीकरण दिले की भारतात दरवर्षी लाखो टॅलेंटेड ( कर्तुत्ववान) लोकं लागतात, त्यातून आयाअयटी तून फक्त १०००० लोक बाहेर येतात.

अर्थातच प्रत्येक व्यवसाय चालवण्यासाठी कर्तुत्ववान लोकांची गरज असते आणि आयाअयटीतून येणे हेच एक महत्वाचे कर्तुत्व असते.

योगप्रभू's picture

6 Oct 2011 - 1:21 am | योगप्रभू

हा धागा आणि प्रतिक्रिया वाचून मला नारायणमूर्ती आणि चेतनशी झालेल्या भेटींची आठवण झाली. (प्रसिद्धीच्या झोतात असलेली माणसे जवळून निरखणे आणि त्यांना मुक्त बोलताना ऐकणे, हा माझ्या आनंदाचा भाग आहे. देवाने मला खूपदा तो मिळवून दिला आहे)

पुण्यात नारायणमूर्तींना दोनदा अगदी जवळून बघण्याचा योग आला. ते बोलताना विचारपूर्वक बोलतात आणि आपण काय बोलतोय, हे त्यांना पक्के ठाऊक असते. ते व्यक्तीमत्त्व प्रचंड इन्स्पायरिंग आहे, यात शंकाच नाही. चंदीगडच्या एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वतःच्याच कंपनीतील बड्या लोकांबद्दल एक मतप्रदर्शन केले होते. ते म्हणाले, की माझ्याच कंपनीत अनेक लोक असे आहेत, की ज्यांच्याकडे पगार आणि कंपनीच्या शेअर्सपोटी (एसॉप) कोट्यवधी रुपयांचे भांडवल तयार आहे. पण ते लोक स्वतंत्र कंपन्या स्थापन करत नाहीत, इनोव्हेशन दाखवत नाहीत. त्यांची स्थिती सोन्याच्या पिंजर्‍यात राजस खाणे खात बसलेल्या सुस्त पोपटासारखी आहे. इन्फोसिस स्थापन करताना मी पत्नीने दिलेल्या १०००० रुपये भांडवलावर दहा बाय दहाच्या खोलीत सुरवात केली. या लोकांना पैशाची कमतरता नाही तरी त्यांच्यातून उद्योजक का घडत नाहीत? एकदा त्यांना विचारले गेले असताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले, की माझ्या मुलाला आवड असेल आणि त्याने कर्तृत्व सिद्ध केले तरच तो इन्फोसिसची धुरा सांभाळू शकेल.

चेतनशी गेल्या वर्षी भेट झाली. लवासा सिटीत एका चर्चासत्रात व्याख्यानासाठी तो आला होता. उत्साही आणि गडबडीत असणारा हा तरुण माणूस. तरी पाच मिनिटे मोकळेपणाने बोलला. त्यावेळी 'थ्री इडियट' च्या श्रेयनामावलीचा विषय 'हॉट टॉपिक' होता. मला त्यात काही रस नव्हता. मी त्याला एवढेच विचारले, 'चेतन! ब्लॉग बरेच दिवसात अपडेट केला नाहीस आणि नवीन पुस्तकाचा काही विचार आहे का?' त्यावर चेतन गडबडीने म्हणाला, 'हो दोन्ही गोष्टींमध्ये माझी थोडी दिरंगाई झालीय खरी. पण पुस्तक पुढच्या वर्षी येईल आणि ब्लॉग १५ दिवसांत अपडेट होईल.' या दोन्ही गोष्टी घडल्या. माझ्या लक्षात राहिली ती त्याच्या देहबोलीतील गडबड-धांदल.

मला आताच्या या दोघांच्या विधानावरुन पुन्हा एकदा त्यांचे स्वभाव आठवले.
एनआरएन शांतपणे विचारपूर्वक बोलतात
चेतन गडबडीत धांदलीत रिअ‍ॅक्ट होतो.

हा वयातील फरक असावा बहुतेक.

गोड मानून घ्या. :-)

प्रथमतः सगळ्यांना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!!

नारायणमूर्ती: फक्त दहा हजार रुपये खिशात असतांना इंन्फोसिस ही कंपनी स्थापन केली. त्याआधी त्यांनी स्थापन केलेली सॉफ्ट्रॉनिक्स ही कंपनी अयशस्वी झाली. त्यांनी स्थापन केली तेव्हा (१९८१ साली) इंन्फोसिस ही अगदी छोटी कंपनी होती. आज इंन्फोसिसचा रेवेन्यू $ ६ बिलीयन पेक्षा जास्त आहे. $ २ बिलीयनच्या आस-पास नफा आहे. नॅसडॅकवर पताका फडकाविणारी पहिली भारतीय कंपनी इंन्फोसिस आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा झेंडा जगभर रोवणारी कंपनी इंन्फोसिस आहे. इंन्फोसिसला जी प्रतिष्ठा मिळाली ती कुठल्याच भारतीय कंपनीला मिळाली नाही. १,३०००० लोकांना थेट रोजगार आणि ३००००० लोकांना अप्रत्यक्ष रोजगार पुरवणारी कंपनी म्हणून इंन्फोसिसचा नावलौकिक आहे. स्वच्छ आणि पारदर्शक मुल्यांच्या भक्कम आधारावर इन्फोसिस नावाचा वटवृक्ष उभा आहे. कर्मचार्‍यांमध्ये नफा आणि समभाग वाटून इन्फोसिसने आपले मुल्य सिद्ध केलेले आहे. इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे अनेक लोकोपयोगी उपक्रम खूप मोठ्या प्रमाणात राबवले जातात. मैसूरला 'ग्लोबल एज्युकेशन सेंटर' ही जगातली सगळ्यात मोठी कॉर्पोरेट युनिवर्सिटी इन्फोसिसने स्थापन केली. वेल्थ डिस्ट्रीब्युशनची संकल्पना इन्फोसिसने अंमलात आणली. कितीतरी प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान वापरून इन्फोसिसने काही नावीन्यपूर्ण सॉफ्टवेअर सोल्युशन्सची निर्मीती केली. फिनॅकल हे इन्फोसिसचे बँकींग सॉफ्टवेअर खूप बँकांमध्ये वापरले जाते. भारतीय परंपरेच्या तुलनेत इन्फोसिसचा नवतेचा ध्यास नेहमीच स्पृहणीय राहिलेला आहे. आपल्या इथे नवीन काही तयार करणे अजून रुजले नसल्याकारणाने इन्फोसिसचे बरेच प्रॉडक्ट्स तितकेसे यशस्वी झाले नाहीत परंतु त्यामुळे इन्फोसिसच्या प्रयत्नांचे महत्व कमी होत नाही. नारायणमूर्तींचे नाव त्यांच्या या उत्तुंग कार्यामुळे नेहमीच आदराने घेतले जाते.

चेतन भगतः आय आय टी मधून उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी सोडून पुस्तके लिहिली. 'फाईव्ह पॉईंट समवन' हे पुस्तक खूप गाजले. नंतर '३ मिस्टेक्स ऑफ माय लाईफ' हे अत्यंत फिल्मी पुस्तक आले. '२ स्टेट्स' हे पण काही सकस दर्जेदार लिखाण म्हणता येणार नाही. चेतन भगत हा एक उथळ लोकप्रियता लाभलेला लेखक आहे या पलिकडे त्याचे कर्तुत्व काहीच नाही. त्याचे लेखन काही अभिजात, दर्जेदार या प्रकारात मोडत नाही. उठ-सूठ सल्ले देणं आणि आपल्याला सगळ्याच क्षेत्रातलं सगळंच सगळ्यांपेक्षा जास्त कळतं हा चेतन भगतचा मोठा गोड गैरसमज आहे. कुठलीही प्रत्यक्ष कृती न करता उपदेश करण्यात त्याचा हातखंडा आहे.

आयआयटीविषयी नक्की माहित नाही पण आजकाल सगळ्याच संस्थांमध्ये (कुवत, अ‍ॅटीट्युड, सिन्सीरीटी या गुणांच्या बाबतीत) कमी दर्जाच्या लोकांचा भरणा होत आहे ही गोष्ट नाकारून चालणार नाही. खुद्द इन्फोसिसमध्ये येणार्‍या कर्मचार्‍यांचा दर्जा खालावल्याचे मी कित्येक लोकांकडून ऐकले आहे. क्लासेसच्या जोरावर आयआयटीमध्ये शिरणार्‍या सगळ्याच लोकांचा दर्जा चांगला असेल असे नाही. मी स्वतः ओळखत असलेल्या आयआयटीयन्सचा दर्जा गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मधून उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांपेक्षा काही फार वेगळा नाही. भारंभार शिक्षणसंस्था सुरु झाल्याने आणि घोकंपट्टी करून प्रवेश मिळवण्याच्या धंद्याला जोर आल्याने गुणवत्ता खालावणार हे नक्की. मी ज्या शाळेत होतो त्या शाळेचा मी असतांनाचा दर्जा आणि आता २०-२१ वर्षांनंतरचा दर्जा यात जमीन-आसमानचा फरक आहे. फर्ग्युसन कॉलेजचा मी असतांनाचा दर्जा आणि आताचा दर्जा यात फरक जाणवतोच. हे थोड्याफार प्रमाणात सगळ्याच संस्थांमध्ये दिसते. आय आय टी याला अपवाद असेल असे वाटत नाही. या पार्श्वभूमीवर नारायणमूर्तींचे विधान अगदी चुकीचे असेल असेल वाटत नाही. आणि महत्वाचे म्हणजे त्यांच्या या विधानाने दर्जा सुधारण्यास मदतच मिळणार आहे; त्यामुळे चेतन भगतने एवढे चिडून जाण्याचे आणि इन्फोसिसला नावे ठेवण्याचे काहीच कारण नव्हते. नारायणमूर्तींचे कर्तुत्व केव्हाही चेतन भगतच्या कर्तुत्वापेक्षा लाखपट जास्त मोलाचे आहे कारण त्या माणसाच्या कष्टामुळे, बुद्धीमत्तेमुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झालेला आहे आणि भारताची एक ओळख निर्माण झाली आहे.

चेतन भगत हा इसम नेहमीच सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी स्वतःचे तोंड उघडत आला आहे. नारायणमूर्तींना मिळणारा मान, त्यांचे कर्तुत्व, इन्फोसिसचा भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सिंहाचा वाटा या गोष्टींकडे त्याने एक कटाक्ष जरी टाकला असता तर असे बिनडोकसारखे विधान त्याने केले नसते. आपल्याकडे उत्तुंग यश मिळवणार्‍या लोकांना अकारण नावे ठेवण्याची एक संकुचित मनोवृत्ती फार मोठ्या प्रमाणावर आढळते. चेतन भगतचे विधान त्याचाच एक नमुना म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणेच श्रेयस्कर. नारायणमूर्तींना चेतन भगतच्या असल्या बाष्कळ विधानावर भाष्य करण्याची गरजही वाटली नाही यातच चेतन भगतची लायकी दिसून येते...

--समीर

अप्पा जोगळेकर's picture

6 Oct 2011 - 4:48 pm | अप्पा जोगळेकर

मुद्देसूद प्रतिसाद आवडला.

चेतन भगत हा एक उथळ लोकप्रियता लाभलेला लेखक आहे या पलिकडे त्याचे कर्तुत्व काहीच नाही. त्याचे लेखन काही अभिजात, दर्जेदार या प्रकारात मोडत नाही.
शत प्रतिशत सहमत.

अविनाशकुलकर्णी's picture

6 Oct 2011 - 2:13 pm | अविनाशकुलकर्णी

टाईम्स वाहिनि वर चर्चा ऐकताना एका मान्यवराने ४-५ लाख विद्यार्थि परिक्षेस बसतात व ८००० ना प्रवेश मिळतो..
२०-२५ सिट हजार सिट का करत नाहित? असा सवाल केला
मुळात आय टी च्या नादापायी मेकॅनिकल ईंजीनिअरिंग ईंडस्ट्रीची पार वाट लागली..
सगळयांना बीई ना ए.सी मधे कळ फलक बडवायची ओढ लागली असते...
मशिन शॉप मधे १०-१२ तास उभे राहुन काम करणे खायचे काम नाहि..
आज एम आय डी सी मधे कामगार मिळत नाहि..मिळाले तर टिकत नाहि..
ईंग्रजी भाषा व लिपि वर [आपल्या तुलनेने]प्रभुत्व नसल्याने चायना ने सॉफ्ट वेर च्या ऐवजी मेक. ईंडस्ट्री वर जोर दिला...
मेक ईं मधे सामान्य बुद्धिमता असलेल्या मुलांना कामगार..कुशल कामगार म्हणुन खुप संधि असते..व त्या मुळे खुप मोठ्या प्रमाणावर नोक~या च्या संधि निर्माण होतात..
भारताची बस चुकली..काहि वर्षात च चायना सा~या जगाला हार्ड वेर/मशिन टुल्स व इतर माल पुरवणारा एकमेव देश होईल...नव्हे झालाच आहे. मेड इन चायना ची वेब साईट पाहिल्यावर ते काय बनवतात याची कल्पना येईल..व प्रष्ण पडतो ते काय बनवत नाहित? सा~या वस्तु तयार करतात..
चायनाशी स्पर्धा करणे मुश्किल काम आहे.
उच्च शिक्षणावर चर्चा करण्या पेक्षा दर वर्षी साधारण बुद्धिमता असलेली लाखो मुले पास होत आहेत..त्यांना नोक~याच्या संध्या कुठे?
गावोगाव आय.टी.आय सारख्या संस्थांचे जाळे उभारुन व मुलांना टर्नर फिटर मशिनिस्ट चे प्रशिक्षण देवुन व कारखाने उभारुन ह्या मुलांना काम देणे गरजेचे आहे...

प्रदीप's picture

6 Oct 2011 - 5:41 pm | प्रदीप

भारताची बस चुकली..

१०० % सहमत. इंजिनीयरींग शिकून सगळे आय. टी. व म्यॅनेजमेंटच्या मागे लागल्याने मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व सिव्हील इंजिनीयर्स हव्या त्या प्रमाणात भारतात आता उपलब्ध नाहीत, ह्याचे दुष्परिणाम आपल्याला आता भोगावे लागणार आहेत.

गेल्या वर्षी हे चांगले आर्टिकल वाचनात आले होते:

http://tinyurl.com/3dek4xy

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Oct 2011 - 7:12 pm | विश्वनाथ मेहेंदळे

साहेब, आजही तयार केले असे इंजिनीयर्स तर त्यांना आयटी एवढा पगार देणार आहे का कुणी? नाही दिला तर का जातील ती लोकं तिथे ?

असेही, आयटी मधील काम हा प्रकार अत्यंत ओवररेटेड आहे. गेली अनेक वर्षे या क्षेत्रात काम करून मग हे मत झाले आहे. आपण अफाट काम करतो असे येथील लोकांना उगीचच वाटत असते.

क्लिंटन's picture

6 Oct 2011 - 6:28 pm | क्लिंटन

इंजिनीयरींग शिकून सगळे आय. टी. व म्यॅनेजमेंटच्या मागे लागल्याने मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व सिव्हील इंजिनीयर्स हव्या त्या प्रमाणात भारतात आता उपलब्ध नाहीत, ह्याचे दुष्परिणाम आपल्याला आता भोगावे लागणार आहेत.

मला वाटते की यासाठी अनेक गोष्टी जबाबदार आहेत आणि त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पाल्याने इंजिनिअर व्हायलाच पाहिजे हा अनेक पालकांचा अट्टाहास.त्यातून आवड नसताना इंजिनिअरींगला जावे लागलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आहेत.अशांना पुढे इंजिनिअरींगमधून बाहेर पडायची संधी मिळाली आणि त्या संधीचा त्यांनी फायदा उठवला तर त्याचे नवल वाटू नये.तेव्हा दोष द्यायचाच झाला तर अशा पालकांना/समाजव्यवस्थेला द्यायला हवा.

दुसरे म्हणजे बेसिक शाखांमधील इंजिनिअर भारतात हव्या त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत असे तुम्ही म्हणत आहात. आपली लोकसंख्या बघितली तर असे व्हायला नको.पण ते तरीही होत असेल तर त्या कॉलेजमध्ये शिक्षण त्या दर्जाचे मिळत नाही असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये.तेव्हा सगळा दोष "पैशाच्या लोभाने" आय.टी किंवा मॅनेजमेन्टकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कसा काय?

तिसरे म्हणजे जर पाहिजे त्या प्रमाणावर इंजिनिअर उपलब्ध नसतील किंवा डॉलरच्या दरात काही फेरफार झाले तर मागणी-पुरवठा न्यायाने आय.टी. पेक्षा बेसिक इंजिनिअरींगमध्ये पगार जास्त झाले तर केवळ पैशामुळे आय.टी. कडे जाणारे लोंढे परत बेसिक इंजिनिअरींगकडे वळतीलच की.

माझे स्वत:पुरते सांगायचे झाले तर मी एक reluctant इंजिनिअर होतो. अनेक वर्षे त्यातून बाहेर कसे पडायचे हा मार्ग न सापडल्यामुळे मोठ्या अनिच्छेने पुढे जात होतो.पण एक दिवस मोठी रिस्क घेऊन सगळे काही सोडून इंजिनिअरींगला टाटा-बाय बाय केला. आज मी माझ्या आवडत्या क्षेत्रात मोकळा श्वास घेऊ शकत आहे याचे फारच मोठे समाधान आहे. तेव्हा मी जरी इंजिनिअर क्षेत्रात असतो तर एक सुमार इंजिनिअर असतो. देशाला बेसिक इंजिनिअर कमी पडतात म्हणून माझी आवड नसताना त्या क्षेत्रात राहणे समर्थनीय नसतेच.

असो.

विकास's picture

6 Oct 2011 - 7:10 pm | विकास

तिन्ही मुद्यांशी सहमत.

पण एक दिवस मोठी रिस्क घेऊन सगळे काही सोडून इंजिनिअरींगला टाटा-बाय बाय केला. आज मी माझ्या आवडत्या क्षेत्रात मोकळा श्वास घेऊ शकत आहे याचे फारच मोठे समाधान आहे.

गेल्या डिसेंबरमध्ये मला टिआयएसएस मध्ये एक लेक्चर देण्याची संधी मिळाली होती. विषय हा social innovation/entrepreneurship शी संबंधातला होता. मला धक्का बसला कारण तेथे जवळपास पन्नास एक विद्यार्थी आले होते. (एक अमेरीकेतील विद्यार्थिनी देखील एका टर्मसाठी आली होती). त्यातील काहीजणांशी त्यांच्या प्रॉजेक्ट्सवरून नंतर बोलत असताना समजले की बरेचसे हे आयटी क्षेत्रातील होते, काही डॉक्टर्स देखील होते. त्यांना विचारले की इथे कुठे वाट चुकलात. तर एकाकडून उत्तर मिळाले की आम्हाला सॉफ्टवेअर इंजिनिअर वगैरे म्हणून पैसा खूप मिळत होता, पण नंतर वाटू लागले की ह्या क्षेत्रात सतत काम करून वयाच्या ४०व्या वर्षी फ्रस्ट्रेशन घेण्यापेक्षा आत्ताच सोडून जे आवडू शकेल त्यात काम करायला जाऊ.

जेंव्हा असे कुठल्याही पद्धतीचे, (पेशा, पैसा, समाज) पिअरप्रेशर न घेता आपण आपले निर्णय घेऊ लागू आणि त्यासाठी कष्ट करायला लागू तेंव्हा मोठा फरक दिसू लागेल. चुकीमुळे येणार्‍या अपयशाने त्रास नक्कीच होईल पण, अपयशाच्या भितीने आलेली निष्क्रीयता ही उभ्या आयुष्याला पुरून आपल्या जीवनावर मात करू शकेल असे वाटते.

--------------------

अवांतरः काहीसे याच संदर्भात. स्टीव्ह जॉब्जबद्दल आत्ता ऐकत होतो. ८४ साली मॅक आणला पण ८५ साली त्याला अ‍ॅपल सोडावे लागले. (काढले). मग अ‍ॅनिमेशनसाठी तत्कालीन संगणक विकणार्‍या पिक्सारला विकत घेतले. त्यांना काहीतरी वेगळे करायचे होते. त्यात गुंतला आणि स्वतःचा पैसा गुंतवला. सलग पाच वर्षे $१ मिलीयन्स प्रतिवर्ष स्वतःच्या पैसे घालवणे सहन केले. नंतर काहीसे यश येऊ लागले. डिस्नीला इंटरेस्ट आला आणि १९९५ (अ‍ॅपल मधून काढल्यावर दहा वर्षांनी) टॉयस्टोरी प्र्काशीत झाला आणि नशीब बदलले. नंतर पिक्सार पब्लीक कंपनी झाली, नेटस्केपपेक्षा ही त्या वर्षाचा मोठा आयपीओ ह्या कंपनीचा होता. मग डिस्नीने पिक्सार विकत घेतली आणि जॉब्ज डिस्नीचा सर्वात मोठा व्यक्तीगत शेअर होल्डर झाला. मग परत ९७-९८ मधे त्याला अ‍ॅपलने बोलावले! केवळ ८५-९७ हा असा काळ होता जेंव्हा अ‍ॅपल हे तोट्यात गेले होते. आणि तोच काळ केवळ असा होता जेंव्हा ती कंपनी "प्रोफेशनल्स मॅनेजमेंटनी" चालवली होती. ह्यात प्रोफेशनल मॅनेजमेंट असणे वाईट असते असे म्हणायचे नाही. पण "थिंक डिफरंट" अ‍ॅप्रोच हा केवळ अ‍ॅपल पुरताच नसतो कुठेही लागू होऊ शकतो असे वाटते.