मूर्ती विरुद्ध भगत
ऑक्टोबरच्या १-२ तारखेस न्यूयॉर्कमध्ये आय आय टीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन होते. त्या वेळेस नारायण मूर्ती (आय आय टीचे माजी विद्यार्थी) यांनी "आपल्या भाषणात कोचिंग क्लासेसमुळे कुठल्याही मुलांना आय आय टी त प्रवेश मिळू लागला असल्याने तिथल्या मुलांची शिक्षणोत्तर नोकरीतील आणि उच्च शिक्षणातील गुणवत्ता घसरली आहे" अशी खंत व्यक्त केली. टाईम्समधील बातमी प्रमाणे:
"Thanks to the coaching classes today, the quality of students entering IITs has gone lower and lower," Murthy said, receiving a thundering applause from his audience. ..."They somehow get through the joint entrance examination. But their performance in IITs, at jobs or when they come for higher education in institutes in the US is not as good as it used to be. " ...
त्यावर आज चेतन भगत यांनी ट्वीटरद्वारा खालील वक्तव्य केले आहे:
"It is ironic when someone who runs a body shopping company and calls it hi-tech, makes sweeping comments on the quality of IIT students." Bhagat furhter writes, "Mr Murthy had a point, but wish he wasn't so sweepingly high handed. Fix the system. No point judging students."
वास्तवीक क्लासेसचे पेव आधी देखील होतेच, फक्त ते सगळ्यांना मिळण्यासाठी सर्वत्र नव्हते. मध्यंतरी मी ऐकले की आंध्रमधे एक जे ई ई साठीचा क्लास तिथल्या सक्सेस रेट मुळे इतका पॉप्यूलर झाला की त्यांना त्यांचीच प्रवेश (क्लास मधे प्रवेश मिळवण्यासाठी) चालू करावी लागली! हे ऐकून आश्चर्य वाटायच्या आत पुढे असेही समजले की त्या क्लासच्या प्रवेश परीक्षेत यश मिळून क्लासला अॅडमिशन मिळण्यासाठी म्हणून आता नवीन क्लासेस चालू झाले आहेत! पण हा वेगळा मुद्दा आहे.
आता इतकेच विचारावेसे वाटते की मूर्तींच्या दृष्टीकोनातून कामाला योग्य आणि अमेरीकन विद्यापिठात योग्य असणे इतकेच आय आय टीअनचे महत्व आहे का? आय आय टीअन्सच कशाला पण आपण सगळ्याच विद्यार्थ्यांचा केवळ टेक्निकल क्लर्कशिपसाठीच विचार करतो का? जगात इनोवेशन हा शब्द सध्या जास्तच वापरला जात असताना आपण अजूनही बॉडीशॉपमधेच अडकलेले आहोत का?
प्रतिक्रिया
नारायणमूर्ती ही अशीच एक होली
अशा हजारो सायबर कुलींना
मी शेण खाल्लं याचा अर्थ
सहमत
भगतचा शेरा हिणकस वाटला तरी ती
क्रेमर यांचा प्रतिसाद आवडेश !
कडवी
आवडो वा न आवडो - We are not
+१
१ ते ६ सहमत. अजुन एक ,
आपल्या सणांना ह्यांचे "गो
बिलिंग होनाच मांगता ! बाणा
बाणा यल्टीआय मध्ये हे वाक्य
बर्याच आयआयटी आणि आयआयएम
हे काय
माशॅ, अशी भाषा वापरायला
नाही.
अरे मित्रांनो मला प्रतिक्रिया
>>अरे मित्रांनो मला
सौम्य
काही मोजके अपवाद सोडता सर्वजण
शब्द
स्पष्टीकरण
'आमच्यावेळी' हे अस्सं नव्हतं
दोन्ही अतिच
अशांचा
आज ... बीबी वर लोकांनी पार
मूर्ती आपल्या भाषणात कोचिंग
कर्तुत्ववान व्यक्तिंची गरज असते.
माझी आठवण...
माझं मत (कुणी विचारलेलं नसतांना ही देतो)
भारीच
टाईम्स वाहिनि वर चर्चा ऐकताना
सहमत
साहेब, आजही तयार केले असे
बेसिक इंजिनिअरींग
सहमत
Pagination