✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मूर्ती विरुद्ध भगत

व
विकास यांनी
Tue, 10/04/2011 - 22:36  ·  लेख
लेख
ऑक्टोबरच्या १-२ तारखेस न्यूयॉर्कमध्ये आय आय टीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन होते. त्या वेळेस नारायण मूर्ती (आय आय टीचे माजी विद्यार्थी) यांनी "आपल्या भाषणात कोचिंग क्लासेसमुळे कुठल्याही मुलांना आय आय टी त प्रवेश मिळू लागला असल्याने तिथल्या मुलांची शिक्षणोत्तर नोकरीतील आणि उच्च शिक्षणातील गुणवत्ता घसरली आहे" अशी खंत व्यक्त केली. टाईम्समधील बातमी प्रमाणे: "Thanks to the coaching classes today, the quality of students entering IITs has gone lower and lower," Murthy said, receiving a thundering applause from his audience. ..."They somehow get through the joint entrance examination. But their performance in IITs, at jobs or when they come for higher education in institutes in the US is not as good as it used to be. " ... त्यावर आज चेतन भगत यांनी ट्वीटरद्वारा खालील वक्तव्य केले आहे: "It is ironic when someone who runs a body shopping company and calls it hi-tech, makes sweeping comments on the quality of IIT students." Bhagat furhter writes, "Mr Murthy had a point, but wish he wasn't so sweepingly high handed. Fix the system. No point judging students." वास्तवीक क्लासेसचे पेव आधी देखील होतेच, फक्त ते सगळ्यांना मिळण्यासाठी सर्वत्र नव्हते. मध्यंतरी मी ऐकले की आंध्रमधे एक जे ई ई साठीचा क्लास तिथल्या सक्सेस रेट मुळे इतका पॉप्यूलर झाला की त्यांना त्यांचीच प्रवेश (क्लास मधे प्रवेश मिळवण्यासाठी) चालू करावी लागली! हे ऐकून आश्चर्य वाटायच्या आत पुढे असेही समजले की त्या क्लासच्या प्रवेश परीक्षेत यश मिळून क्लासला अ‍ॅडमिशन मिळण्यासाठी म्हणून आता नवीन क्लासेस चालू झाले आहेत! पण हा वेगळा मुद्दा आहे. आता इतकेच विचारावेसे वाटते की मूर्तींच्या दृष्टीकोनातून कामाला योग्य आणि अमेरीकन विद्यापिठात योग्य असणे इतकेच आय आय टीअनचे महत्व आहे का? आय आय टीअन्सच कशाला पण आपण सगळ्याच विद्यार्थ्यांचा केवळ टेक्निकल क्लर्कशिपसाठीच विचार करतो का? जगात इनोवेशन हा शब्द सध्या जास्तच वापरला जात असताना आपण अजूनही बॉडीशॉपमधेच अडकलेले आहोत का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18697 वाचन

💬 प्रतिसाद (87)

प्रतिक्रिया

मी स्वता एका आय.आय.टी.

टवाळ कार्टा
Tue, 10/04/2011 - 23:00 नवीन
मी स्वता एका आय.आय.टी. इंजिनीअर्ला सपोर्ट प्रोजेच्त वर बघीतले आहे तेही इन्फी बेन्गलुरु मधे
  • Log in or register to post comments

त्यात काय झालं? आयायटी

धन्या
Tue, 10/04/2011 - 23:10 नवीन
त्यात काय झालं? आयायटी इंजिनीयरने सपोर्ट प्रोजेक्टवर काम केलं तर त्यात काय बिघडलं? जाता जाता, तुमी इन्फी मदे कुते असता? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सपोर्ट प्रोजेच्त

कुंदन
Tue, 10/04/2011 - 23:49 नवीन
To err is development , to fix is Production Support बाकी चाल्यु द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खिक !!!

धन्या
Wed, 10/05/2011 - 05:11 नवीन
development आणि Production Support या दोन्ही गोष्टींचा अनुभव असल्याने म्हणावेसे वाटते. development is पाटया टाकणं and Production Support is एन्ड युजरला थुकपट्टी देणं. म्हणून तर दोन्ही दुकानं मजबूत चालतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

देवाची मुर्ती कशीही असली तरी

धन्या
Tue, 10/04/2011 - 23:13 नवीन
देवाची मुर्ती कशीही असली तरी तिच्या पूजेने सर्वसामान्यांना आणि पैसेवाल्यांना मनाला शांती मिळते. भगताचं काय जातंय बोंबलायला. त्याला आपल्या थातूर मातुर पुजा सांगून लोकांकडून पैसे उकळायचे असतात.
  • Log in or register to post comments

ऑडियन्स

राजेश घासकडवी
Tue, 10/04/2011 - 23:20 नवीन
त्यांचा ऑडियन्स होता माजी आयायटीयनांचा, जे अमेरिकेत येऊन यशस्वी झालेले आहेत. त्यांना 'तुमच्या काळी आयायटीत शिरणं कठीण होतं, त्यावेळी हुशारच लोक आत जायचे आणि बाहेर पडणाऱ्यांना मान होता. आता काय कोणी सोम्यागोम्या जातो' असं ऐकायला बरं वाटतं. त्यामुळे असं विधान यावं यात काही विशेष नाही. खरी गोष्ट अशी आहे की पंचवीस वर्षांपूर्वीही क्लासेस, करस्पॉंडन्स कोर्सेस वगैरे जोरात होते. आयायटीत शिरणारा जवळपास प्रत्येकजण काही ना काही क्लास, कोर्स करूनच शिरत असे. आणि अशा क्लासेस, कोर्सेसना जाणारे जेमतेम ५ टक्के आयायटीत शिरायचे. त्यामुळे तेव्हाही जवळपास सॅचुरेशन होतं. आयायटीत शिरल्यावर खालच्या ८० टक्क्यांना जड जात असेच. म्हणून मूर्तींचं विधान स्वीपिंग आहे, हे भगतांचं बरोबर वाटतं. मात्र 'बॉडिशॉपवाल्याने असं म्हणावं ही आयरनी आहे' हे अनाठायी आहे. मूर्तींनी शॉपबॉडीज पलिकडे संशोधन वगैरे होण्यासाठी काय करावं याविषयीही काही विचार मांडले आहेत. ते विचार बरोबर असोत नसोत, त्यांचा हेतू निश्चित चांगला आहे.
  • Log in or register to post comments

मात्र 'बॉडिशॉपवाल्याने असं

धन्या
Tue, 10/04/2011 - 23:40 नवीन
मात्र 'बॉडिशॉपवाल्याने असं म्हणावं ही आयरनी आहे' हे अनाठायी आहे.
हेच खटकलं. कारण नसताना केलेली चिखलफेक आहे ही. कुणी ताणून धरलं तर भगत साहेब अशी माघार घेतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

मला देखील...

विकास
Tue, 10/04/2011 - 23:56 नवीन
मात्र 'बॉडिशॉपवाल्याने असं म्हणावं ही आयरनी आहे' हे अनाठायी आहे. मला देखील हे खटकले. हा शब्द येथेच नाही तर एकंदरीतच खटकतो. कदाचीत १४० अक्षरांमधे ते बसत असावे म्हणून भगतसाहेबांनी घातले असावे. मूर्तींनी शॉपबॉडीज पलिकडे संशोधन वगैरे होण्यासाठी काय करावं याविषयीही काही विचार मांडले आहेत. ते विचार बरोबर असोत नसोत, त्यांचा हेतू निश्चित चांगला आहे. बोलण्यातला हेतू चांगला असावा यात शंका नाही पण जर तसे (संशोधनाचे वातावरण प्रत्यक्षात इन्फोसिसमधे नसेल तर त्यांचे बोलणे वरकरणी ठरते. तसे आहे का हे तेथे काम करणारे थोडेफार सांगू शकतील. पण असले तरी फक्त ते केवळ इन्फोसिससाठीच लागू नाही असे वाटते/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

काहीसा असहमत

राजेश घासकडवी
Wed, 10/05/2011 - 00:09 नवीन
पण जर तसे (संशोधनाचे वातावरण प्रत्यक्षात इन्फोसिसमधे नसेल तर त्यांचे बोलणे वरकरणी ठरते.
इन्फोसिस ही काही विशिष्ट ध्येयं साध्य करणारी संस्था आहे. आयायटींची ध्येयं वेगळी आहेत. आयायटीची ध्येयं गाठण्यासाठी आयायटीत अमुक तमुक हवं असं जर मूर्तींनी म्हटलं तर 'कायरे, तुमच्या इन्फोसिसमध्ये आहे का ते अमुक तमुक?' असा प्रश्न विचारणं योग्य नाही. प्रत्येक संस्थेत सुधारणेला जागा असते, मग ती कंपनी असो किंवा युनिवर्सिटी. पण दोन्हीत समान गोष्टी आवश्यक आहेत असं का म्हणावं? उद्या ते भारतीय आर्मीविषयी म्हणाले की आजकाल सैनिक कमकुवत असतात, त्यांना भरपूर व्यायाम दिला पाहिजे. तर तसाच व्यायाम इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी दिला पाहिजे म्हणणं बरोबर ठरणार नाही. सैनिक खरंच कमकुवत आहेत का, असल्यास व्यायामाची कमतरता हे कारण आहे का वगैरे प्रश्न चर्चिले जाऊ शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

सहमत

विकास
Wed, 10/05/2011 - 00:22 नवीन
या मुद्याशी सहमतच. इन्फोसिस आणि व्यायामाचे उदाहरण एकदम चपखल. माझ्या डोक्यात तो प्रतिसाद लिहीताना जे चालले होते त्याचे थोडे स्पष्टीकरणः चार वर्षांच्या शिक्षणानंतर जर मुलगा/मुलगी केवळ आपल्याला नोकरी कुठे लागणार इतकाच विचार करत असेल. आणि त्यातही मॅनेजमेंट कन्सल्टंट का सॉफ्टवेअर कन्सल्टंट तर मग संशोधनाच्या ट्रेनिंगचा फायदा काय? शेवटी तिथल्या प्राध्यापकांना देखील आपली मुले कशी यशस्वी झालीत हे दाखवायचे असते. आणि संशोधनाचे वेड असलेल्याला व्यावहारीक यशाच्या संध्या मिळून काय होणार. म्हणून संशोधनाच्या वातावरणावर बोलत होतो. हे केवळ आय आय टीतील विद्यार्थ्यांनाच लागू नाही तर इतर मान्यवर आणि व्यावहारीक संस्थांना देखील लागू होते. इंटरेस्टींगली, गेल्या शनीवारीच एका नवीन venture बद्दल ऐकत असताना समजले की एम आय टी आणि इतर आयव्हीलीग स्कूल्स मधे देखील ४७% विद्यार्थी हे गोल्डमन सॅक्स पासून मेकेन्झीसाठीच धडपडत असतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/05/2011 - 00:23 नवीन
राजेश आणि पिडाकाकांच्या प्रतिसादांशी सहमत. "समीक्षकांनी टीका करण्याआधी एवढंतरी लिहून दाखवावं", असा कांगावा करणार्‍या लेखकूंसारखं वाटतं हे! भगत, मूर्ती ही नावं आणि धागप्रवर्तक विकास अशा काँबिनेशनमुळे धागा उघडावा का न उघडावा असा प्रश्न पडला. पण धागाप्रवर्तकाची पूर्वपुण्याई चिक्कार असल्यामुळे धागा उघडलाच. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

संशोधनाचे वातावरण प्रत्यक्षात

धन्या
Wed, 10/05/2011 - 00:12 नवीन
संशोधनाचे वातावरण प्रत्यक्षात इन्फोसिसमधे नसेल तर त्यांचे बोलणे वरकरणी ठरते. तसे आहे का हे तेथे काम करणारे थोडेफार सांगू शकतील.
अगदी R & D गुणवत्तेचे नाही परंतू नविन काही करुन बघण्यासाठी स्वतंत्र टीम आहेत आणि त्यांना ग्राहकाची कामे दिली जात नाहीत हे माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

सहमत!

पिवळा डांबिस
Wed, 10/05/2011 - 00:03 नवीन
त्यांचा ऑडियन्स होता माजी आयायटीयनांचा, जे अमेरिकेत येऊन यशस्वी झालेले आहेत. त्यांना 'तुमच्या काळी आयायटीत शिरणं कठीण होतं, त्यावेळी हुशारच लोक आत जायचे आणि बाहेर पडणाऱ्यांना मान होता. आता काय कोणी सोम्यागोम्या जातो' असं ऐकायला बरं वाटतं. त्यामुळे असं विधान यावं यात काही विशेष नाही. याला यजमानांनी केलेल्या आतिथ्याला जागणं असं म्हणतात. आणि यात गैर काही नाही. फक्त "आता काय कोणी सोम्यागोम्या जातो'"अशा अर्थाचं विधान मूर्तींनी केलं नसतं तर (जर प्रत्यक्षात केलं असेल तर) भगतांना (आणि विकासला) वाईट वाटलं नसतं, इतकंच! ;) खरी गोष्ट अशी आहे की पंचवीस वर्षांपूर्वीही क्लासेस, करस्पॉंडन्स कोर्सेस वगैरे जोरात होते. खरं आहे. १९७५-८०च्या काळातही मुंबईत अग्रवाल क्लासेस वगैरे होतेच. आमच्या बरोबरची ज्यांना इंजिनियरिंगला जायचं आहे अशी मुलं तिथे जातच होती आणि त्या काळीही त्या क्लासची फी त्या काळच्यामानाने जबरदस्त होतीच!! बाकी युएस मध्ये उच्च शिक्षण/ जॉब वगैरेबद्दल म्हणाल तर माणसाने कुठल्या संस्थेतून शिक्षण घेतलं आहे याचा फायदा त्याच्या लगेच पुढच्या अ‍ॅडमिशनसाठी किंवा पहिल्या जॉबसाठी अवश्य होतो. पण त्यानंतर मग तुमचा करंट परफॉर्मन्स बघून तुमचं परीक्षण केलं जातं. विशेषतः जर इंजिनियरींगमधील जॉब असेल तर आयायटीच्या इंजिनियरला नक्कीच प्राधान्य मिळतं. परंतु जर इतर क्षेत्रातील जॉब असेल विशेषतः मॅनेजमेंट (जो बहुसंख्य आयायटियन्सना हवा असतो असं पाहण्यात आलं आहे) त्यात उमेदवार कधी काळी आयायटीत गेला होता याचा विशेष फायदा दिसून येत नाही. बाकी "आयायटी पूर्वी काय बुवा बुद्धिमंतांचं आगर होतं, आता काय राहिलं नाही", अशा अर्थाच्या बोलण्यात नॉस्टाल्जिया सोडला तर बाकी काही अर्थ नाही असं मला वाटतं.... उदा. "आमच्या काळी मुंबई काय झकास होती, आता साली नुसती वाट लागलीये!!" "पूर्वीचं पुणं राहिलं नाही राव, च्यायला, आमच्या काळी हे असं नव्हतं!!!" "पूर्वी मिपा काय छान होतं, आता नुसत्या येडपट कविता आणि बुद्रुक पाकक्रिया!!!" :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

<<<येडपट कविता आणि बुद्रुक

शिल्पा ब
Wed, 10/05/2011 - 00:16 नवीन
<<<येडपट कविता आणि बुद्रुक पाकक्रिया =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

वास्तवीक क्लासेसचे पेव आधी

रेवती
Tue, 10/04/2011 - 23:33 नवीन
वास्तवीक क्लासेसचे पेव आधी देखील होतेच आंध्रात असलेल्या क्लाससारखाच कुठला तरी क्लास कोटा, राजस्थानात आहे म्हणे! माझ्या मैत्रिणीच्या सासूसासर्‍यांचा व्यवसाय हाच की त्यांच्या घराला लागून त्यांनी आठ खोल्या बांधून घेतल्यात आणि तिथे ठिकठिकाणांहून आलेली मुलं राहतात आणि या क्लासला जातात. त्यांच्यामते या मुलांची तिथल्या थोडक्या वास्तव्यातही अनेक लफडी असतात. ती कधीकधी यांना निस्तरावी लागतात. लफडी म्हणजे मुलगी इन्व्हॉल्व असेलच असे नाही पण हुषार मुलाला परिक्षेला बसता येऊ नये म्हणून शक्यतेतली सगळी काळी कृत्ये करणे. कित्येकांचे आईवडील आपल्या मुला/मुलीच्या संरक्षणासाठी येऊन रहतात. असे कितीतरी प्रकार त्या बाई सांगत होत्या. महाराष्ट्रीयन मुले त्यातल्यात्यात बरी असतात. प्रकरणांपासून जरा तरी लांब असतात. बाकी मूर्ती म्हणताहेत ते मला तरी पटते.
  • Log in or register to post comments

प्र. का. टा. आ.

धन्या
Tue, 10/04/2011 - 23:39 नवीन
प्र. का. टा. आ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आता काय झालं?

रेवती
Tue, 10/04/2011 - 23:42 नवीन
आता काय झालं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तै, उप-प्रतिसाद गुर्जींच्या

धन्या
Tue, 10/04/2011 - 23:49 नवीन
तै, उप-प्रतिसाद गुर्जींच्या प्रतिसादाला पडण्याऐवजी तुमच्या प्रतिसादाला पडला. म्हणून काढून टाकला. बाकी काही नाही. तुम्ही अंमळ हळव्या दिसता. इतके हळवेपणा जालावर चालत नाही, हे आम्ही का तुम्हाला सांगायचं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हळवेपणाचा प्रश्न नाही. प्र.

रेवती
Wed, 10/05/2011 - 00:21 नवीन
हळवेपणाचा प्रश्न नाही. प्र. का. टा. आ. हे वेगळ्या अर्थानेही वापरले गेले असल्याचे उदाहरणे आहेत. तोच अर्थ असावा असे समजून विचारले. अतोनात हळवी असते तर एव्हाना पळून गेले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

कय ओ वाकडे, मी इतकी हळवी आहे

शिल्पा ब
Wed, 10/05/2011 - 00:52 नवीन
कय ओ वाकडे, मी इतकी हळवी आहे पण मला प्रतिसाद देताना करता का विचार? आँ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तुम्ही धाग्या-धाग्यांवर देत

धन्या
Wed, 10/05/2011 - 05:14 नवीन
तुम्ही धाग्या-धाग्यांवर देत असलेल्या प्रतिसादांवरुन मुळीच वाटत नाही की तुम्ही हळव्या आहात म्हणून. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

तुम्हाला वाटण्या न वाटण्यानी

शिल्पा ब
Wed, 10/05/2011 - 05:20 नवीन
तुम्हाला वाटण्या न वाटण्यानी काय होतंय? मी सांगतेय ना!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अगदी या उप-प्रतिसादानेसुद्धा

धन्या
Wed, 10/05/2011 - 05:23 नवीन
अगदी या उप-प्रतिसादानेसुद्धा सिद्ध केलं की तुम्ही हळव्या नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

काय तो चिवटपणा मेला!!

शिल्पा ब
Wed, 10/05/2011 - 05:38 नवीन
मेला किती तो चिवटपणा हो वागळे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

गुड...

मन१
Wed, 10/05/2011 - 07:37 नवीन
वाकड्यांचे नवीन आड नाव आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

शिल्पातै, तुमच्यासारख्या

धन्या
Wed, 10/05/2011 - 10:02 नवीन
शिल्पातै, तुमच्यासारख्या मिपाकरांच्या प्रतिक्रियांना पुरुन उरायचं म्हटलं की ईतका चिवटपणा लागतोच. बाकी तुम्ही आम्हाला दिलेलं नविन आडनाव आवडल्या गेल्या आहे. तसाही वाकडे आणि वागळे यामध्ये फारसा फरक नाही. (इथे वाकडे हा शब्द विशेषण म्हणून वापरला आहे ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

वागळे की दुनिया ही अंजन

प्रचेतस
Wed, 10/05/2011 - 10:06 नवीन
वागळे की दुनिया ही अंजन श्रीवास्तव-भारती आचरेकरची गाजलेली मालिका आठवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आम्हाला कुणा एका वागळेचा

धन्या
Wed, 10/05/2011 - 10:31 नवीन
आम्हाला कुणा एका वागळेचा उल्लेख अपेक्षित नव्हता. आम्ही सार्‍या महानगराचा आयबीएन लोकमतवाले करतील तसा विचार केला होता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तेच ते हो

प्रचेतस
Wed, 10/05/2011 - 10:42 नवीन
वागळे म्हणजे एक आपल्यासारखाच सर्वसामान्य पापभीरू माणूस. त्याची दुनिया ती आपलीच की. :) तेव्हा मी आख्या आपल्या दुनियेचा विचार करतोय आणि तुम्ही फक्त महानगराचाच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तेव्हा मी आख्या आपल्या

धन्या
Wed, 10/05/2011 - 10:48 नवीन
तेव्हा मी आख्या आपल्या दुनियेचा विचार करतोय...
गुड नो... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तसाही वाकडे आणि वागळे यामध्ये

मृत्युन्जय
Wed, 10/05/2011 - 10:25 नवीन
तसाही वाकडे आणि वागळे यामध्ये फारसा फरक नाही. त्यांना *"वेगळे'' म्हणायचे होते. चुकुन वागळे म्हणाल्या त्या ;) * संदर्भः चौकट राजा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

वाईड बॉल...

धन्या
Wed, 10/05/2011 - 10:40 नवीन
त्यांना *"वेगळे'' म्हणायचे होते. चुकुन वागळे म्हणाल्या त्या * संदर्भः चौकट राजा
चौकट राजा म्हणजे दिलिप प्रभावळकर आणि स्मिता तळवळकर यांनी काम केलेला सिनेमा का इथपासून सुरुवात झाली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

एज दिल्यावर वाईड बॉल धरत नाही

मृत्युन्जय
Wed, 10/05/2011 - 10:51 नवीन
एज दिल्यावर वाईड बॉल धरत नाही भौ. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आम्ही परवाच एका व्यनित म्हटलं

धन्या
Wed, 10/05/2011 - 10:56 नवीन
आम्ही परवाच एका व्यनित म्हटलं होतं की आम्हाला क्रिकेटमधलं काहीही कळत नाही. इथून पुढे क्रिकेटचे संदर्भ वापरणे नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

धागा

तिमा
Wed, 10/05/2011 - 19:16 नवीन
धागा भरकटायला लागला की प्रतिसाद उजवीकडे सरकतात अशी काही खास व्यवस्था आहे की काय मिपावर ? ---- तिरशिंग भरकटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

नक्की का?

चित्रा
Wed, 10/05/2011 - 05:00 नवीन
>लफडी म्हणजे ..इन्व्हॉल्व असेलच असे नाही पण हुषार मुलाला परिक्षेला बसता येऊ नये म्हणून >शक्यतेतली सगळी काळी कृत्ये करणे. कित्येकांचे आईवडील आपल्या मुला/मुलीच्या संरक्षणासाठी >येऊन रहतात. रेवती, आपल्या मुलाचे प्रेमात पडणे झाकण्यासाठी तर असे आईवडिल बोलत नसतील ना? खरे तर पंधरासोळाच्या मुलांनी खर्‍याखोट्या प्रेमात नाही पडले तरच मी आश्चर्य करेन. असो. पण आईवडिलांनी संरक्षण करायचे म्हणजे काय? तुझ्या सोळा वर्षाच्या मुलीपासून मी माझ्या सोळा वर्षाच्या मुलाचे रक्षण करतो असे? हा प्रतिसाद तुला उद्देशून नाही, पण नक्कीच अशा भ्रामक समजुती आईवडिल स्वत:च्याच करून घेत असावे असे वाटते. किंवा लोकांसमोर आपल्या मुलाचा 'पाय घसरला', तो कोणाच्या तरी 'जाळ्यात अडकला' इ. बर्‍याच लोकांकडून ऐकले आहे. ही किती फसवणूक असते आणि ती कोण, कोणाची आणि का करत असते हा जरा गोंधळच आहे. बाकी आयआयटीवरून वाचताना अचानक काही जुने आयडी आठवले. कहां गये वो लोग असे काही झाले आहे खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

बाकी आयआयटीवरून वाचताना अचानक

धन्या
Wed, 10/05/2011 - 05:19 नवीन
बाकी आयआयटीवरून वाचताना अचानक काही जुने आयडी आठवले. कहां गये वो लोग असे काही झाले आहे खरे.
छे, तुमचं आपलं काहीतरीच. आवसे पुनवेला जनसामान्यांना सावध करण्याचं महान कार्य केवळ आयायटीयनच करत आहेत. इतरही अद्वैतवादी आयायटीयन इथे आहेत असं ऐकून आहे. खरं खोटं प. पू. गुरुवर्य घासुरुद्ध जाणोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

नाही गं, तसं नाही. प्रेमात

रेवती
Wed, 10/05/2011 - 07:27 नवीन
नाही गं, तसं नाही. प्रेमात पडतच असतील (किंवा नसतीलही).;) मुलांच्या मारामार्‍या असतात. जायबंदी करण्याइतपत. आता जर मी दिल्ली, पंजाबकरांबद्दल बोलले तर त्यावर वेगळा धागा निघेल असे वाद होतील.;) आयायटीवरून तर मला असा आयडी नेहमी आठवतो.........ती ष्टोरी फोन होईल तेंव्हा सांगीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

अशा मुलांना आयायटीमध्ये

धन्या
Wed, 10/05/2011 - 10:05 नवीन
अशा मुलांना आयायटीमध्ये प्रवेश नाहीच मिळाला तर पुढे जाऊन ती एखादी नवनिर्माण सेना काढतील आणि दुसर्‍या राज्यांमधील लोक आपल्या राज्यात एखादया सरकारी नोकरीच्या परीक्षेला आले की त्यांना रेल्वे स्टेशनवरच ठोकतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

दोन पैसे

क्रेमर
Tue, 10/04/2011 - 23:36 नवीन
आयआयटी हाच एक मोठा कोचिंग क्लास असल्याने मुर्ती व भगत यांची विधाने अनावश्यक आहेत.
  • Log in or register to post comments

हा हा हा हा

मुक्तसुनीत
Tue, 10/04/2011 - 23:40 नवीन
उत्तम प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर

+१०० टु क्रेमर आणि

५० फक्त
Wed, 10/05/2011 - 08:58 नवीन
+१०० टु क्रेमर आणि मुसुकाका. आयआय्टित न गेलेला पण एका अतिशय उत्तम आयआयटियनच्या हाताखाली नोकरीतल्या धंद्याच्या राजकारणाची गणितं शिकलेला, सध्या त्या गणितांचा वापर करुन माझ्या बॅचच्या आयआय्टियनपेक्षा जास्त यशस्वि असलेला,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

'भगत'च

चतुरंग
Tue, 10/04/2011 - 23:38 नवीन
'भगत'च 'मूर्तीं'विरुद्ध जायला लागले तर अवघड आहे! :) (मूर्तिपूजकभगत) रंगास्वामी
  • Log in or register to post comments

आय आय टीला डोक्यावर बसवल्याचे

शिल्पा ब
Tue, 10/04/2011 - 23:49 नवीन
आय आय टीला डोक्यावर बसवल्याचे परीणाम आहेत. इतर मुलं काय यशस्वी होत नैत काय?
  • Log in or register to post comments

मुर्ती आय आय टी

कोदरकर
Wed, 10/05/2011 - 00:15 नवीन
साठी महत्वाकांक्षी उद्दीष्ट ठेवत आहेत हे चांगलेच आहे.. १०-२० वर्ष काय काय काम करायचे हे दिशा दर्शन महत्वाचे ठरते.. त्यांचा दुरदर्शी पणा कलामांच्या पठडीतला आहे... बाकी चेतन भगत उंची वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत असे वाटते...
  • Log in or register to post comments

>> जगात इनोवेशन हा शब्द सध्या

शुचि
Wed, 10/05/2011 - 00:37 नवीन
>> जगात इनोवेशन हा शब्द सध्या जास्तच वापरला जात असताना आपण अजूनही बॉडीशॉपमधेच अडकलेले आहोत का? >> जोपर्यंत बेसिक गरजा - प्रदूषणमुक्त हवा, सार्वजनिक स्वच्छतागृहे , कमी गर्दी अर्थात पुरेशी पर्सनल स्पेस दुसर्‍या देशात मिळते तोपर्यंत (काही!!!!) लोकांचा ओढा अन्य देशांकडे रहाणारच. दुसर्‍या देशात जाऊन फारसा तीरही मारता येत नाही. खूपशी उर्जा स्वतःला, कुटुंबाला स्थिरस्थावर करण्यात, परिस्थितीशी जुळवून घेण्यातच जाते. त्यामुळे बॉडीशॉप, क्लेरीकल वर्क यापलीकडे जाता येत नाही बहुतेक.
  • Log in or register to post comments

भगत यांच्याशी सहमत आहे. राजेश

नितिन थत्ते
Wed, 10/05/2011 - 08:48 नवीन
भगत यांच्याशी सहमत आहे. राजेश घासकडवी यांनी मूर्ती यांच्या बोलण्याचा जो उद्देश सांगितला आहे (जुन्या आयआयटीयन्सना सुखावणारे बोलणे) तोच बरोबर वाटतो. वेळोवेळी आपल्या देशात होली काऊज निर्माण होतात. मग त्यांनी बोललेले काहीतरी खूप महत्त्वाचे आहे असा आभास निर्माण होतो. नारायणमूर्ती ही अशीच एक होली काऊ आहे. बाकी क्रेमर यांच्याही प्रतिसादाशी पूर्ण सहमत आहे. . . . . . (शरीरविक्रयात* एकदा भाड्याने गेलेला सायबर कुली) नितिन थत्ते *शरीरविक्रय = Body Shopping :)
  • Log in or register to post comments

+१

नगरीनिरंजन
Wed, 10/05/2011 - 08:55 नवीन
वेळोवेळी आपल्या देशात होली काऊज निर्माण होतात
सहमत. आयआयटी हीसुद्धा एक 'होली काऊ'च आहे आणि या होली काऊवाल्यांचं 'होलीयर दॅन दाऊ' हे आवडतं घोषवाक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

आयआयटी हीसुद्धा एक 'होली

धन्या
Wed, 10/05/2011 - 10:11 नवीन
आयआयटी हीसुद्धा एक 'होली काऊ'च आहे आणि या होली काऊवाल्यांचं 'होलीयर दॅन दाऊ' हे आवडतं घोषवाक्य आहे.
प्रचंड सहमत आहे. सुंदर मुर्ती घडवण्यासाठी भगताला कदाचित पुढचे सात जन्मही कमी पडतील. त्याने लोकांना हरिदासाच्या कथा सांगूनच आपली शेखी मिरवावी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

आयआयटी हीसुद्धा एक 'होली

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 10/06/2011 - 16:38 नवीन
आयआयटी हीसुद्धा एक 'होली काऊ'च आहे असेच म्हणतो. किंबहुना सगळीच नावाजलेली कॉलेजेस जसे - आय आयटी, व्हीजेटीआय, सिओईपी इत्यादी ही होली( काउ आहेत. अन्यथा या ठिकाणीच कँपस सिलेक्शन व्हावीत आणि लोकल कॉलेजमधले विद्यार्थी स्वस्तात काम करण्यासाठी तयार असताना कंपन्यांनी (यात इन्फोसिस सुद्धा आहेच) त्यांच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहू नये असं झालं नसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा