प्रियालीताई,
एकदम डेंजर कलाटणी! :O कथा आवडली.
पण गबाळ्याला मारायला नको होते. :( . अपघाता पर्यंत ठीक आहे.. #:S
(अहिंसक)केशवसुमार
स्वगतः ही जर सत्य कथा असली तर ह्या ताईं पासून सांभाळून रहायला हवे.. :B तरी बघितलस ना त्या जालसर्वज्ञाचे काय हाल केले ते :T
सर्किटशेठ,
वाचनमात्र चे लेखनमात्र हे उत्तम.. अभिनंदन!!
(वाचकमात्र)केशवसुमार
स्वगत१: इतिहासाचा फड आता पुन्हा सुरू होणार 'केश्या' टिंग टिंग टिंग..
(तमाशाप्रेमी)केशवसुमार
स्वगत२ व्यवस्थापनच्या डोकेदुखी काय हे सर्किटशेठ, कुठल्याही व्यवस्थापनाला कधी डोके असते का? मग डोकेदुखी कशी होणार?
(बुचकळ्यात)केशवसुमार
बिच्चार्या बाळ्या-गबाळ्याला "फुल्लस्टॉप" नसता दिला तर बरं झालं असंत... त्याला फार फार तर "कॉमा" त टाकल असतं.
बाकी तुमच्या कथेत मोड(ट्विस्ट) आणन्याच्या कौशल्याबद्दल दाद घेऊन गेलात .. (केकता कपूर को हरा दिया)..
कथा संपल्याची हुरहुर...
अवांतर (खरी घटना) : आमच्या शाळेतल्या एका अशाच मूलाची आठवण झाली (कोणी म्हणे तो लवकर जन्मला होता.) सर्व मुले त्याच दप्तर रोज न चुकता कचर्याच्या बादलीत टाकत असत. त्याला मागून पोर टपल्या मारत.शाळेतून घरी जायच्या रोडवरून मुले कधी त्याला सरळ चालू देत नसत.त्याल खाली ढकलत. त्यामूळे तो कधी सहलीला पण याचा नाही. त्याच शर्ट रोज शाईने भरवलं जायचं... तो रोजचं गिर्हाईक असायचा. त्याची आई नेहमी बिचारी मुख्याध्यापकांच्या केबिन बाहेर तक्रारी साठी बसलेली असायची. त्यात तो ऑलरेडी २ शाळांत असाच त्रास झाला म्हणून आमच्या शाळेत आला होता. या सगळ्यामूळे त्याचा आत्मविश्वासच हरवला होता.
आपलाच कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
दोन भागांत विभागली हे बरे केले. कलाटणी आणखीन जोरदार झाली.
अवांतर : लहान मुलांकडून थोड्याशाच बालसुलभ क्रूरतेमुळे भयंकर हानी होऊ शकते. त्याविषयी काही महिन्यांपूर्वी "अटोनमेंट" नावाचा चित्रपट बघितला. यात एक १२-१४ वर्षांच्या मुलीला आपल्या मोठ्या बहिणीच्या प्रियकराबद्दल हेवा/असूया/राग असे काही वाटते. "हा मुलींना त्रास देतो" असा काही आपल्या मनाचा ग्रह ती मुद्दामून करून घेते. एका परिस्थितीत त्या तरुणावर दुसर्या एका मुलीवर बलात्कार केल्याचा खोटा वहीम येतो - पण पुरावा नसल्यामुळे तो सुटणार असतो (वहीम खोटाच असतो.) ही छोटी मुलगी आपण त्या घटनेची साक्षीदार असल्याचे स्वतःला पटवून घेते, आणि पोलिसांना साक्ष देऊन त्याला गोत्यात आणते. तिच्या मोठ्या बहिणीच्या, आणि त्या तरुणाच्या आयुष्याचे वाटोळे होते - त्या क्षणी मात्र "आपण ताईला वाचवले" असे छोटीला वाटते. पण आयुष्यभर ती ते गुपीत मनात धरून अस्वस्थ होते. "ती त्याची काही भरपाई करू शकते का?" असा चित्रपटातला मुख्य संघर्ष आहे. हा चित्रपट २००८ सालच्या ऑस्करसाठी उमेदवार होता.
कथेच्या पहिल्या भागात कथा कोणत्या अंगाने जाणार हे कळू द्यायचं नव्हतं.
लहान मुलांच्या बालसुलभ क्रूरतेबद्दल तुम्ही म्हणाला ते अगदी खरं. बर्याचदा त्यांना होणार्या परिणामांची कल्पना नसते हे सर्वच मान्य करतील पण बरेचदा लहान मुले एखादा अपघात घडला किंवा वाईट घटना घडली तर योग्यप्रकारे रेसिप्रोकेट करतात असे नाही. त्यांना त्यातील गांभीर्य जाणवत नाही किंवा दु:ख, पश्चात्ताप यांची चटकन टोचणी लागत नाही असे पाहिले आहे.
कथा जबरदस्त झालीये.
आपण कथेला जी अनपेक्षित कलाटणि दिलीत ती खासच.
आणी जाताजाता भिंतीच्या छताला गबाळ्या पालीसारखा चिकटला होता. त्याचे ते बटबटीत डोळे माझ्यावर रोखलेले होते आणि जीभ मध्येच लपकन माझ्या दिशेने बाहेर येत होती.
हे वाक्य तर प्रचंड अंगावर येते.(हि दुसरी कलाटणी म्हणता येइल....)
अभिज्ञ
सुंदर कथा 12 Jul 2008 - 9:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गबाळ्या असह्य तान देऊन गेला. पहिल्या भाग हसरा झाल्यानंतर दुसरा भाग धक्का देणारच, पण तो धक्का कसा असेल याची इतकी अनपेक्षीत कल्पना नव्हती.
भिंतीच्या छताला गबाळ्या पालीसारखा चिकटला होता. त्याचे ते बटबटीत डोळे माझ्यावर रोखलेले होते आणि जीभ मध्येच लपकन माझ्या दिशेने बाहेर येत होती.
मतकरींच्या कथेची आठवण झाली. रत्नाकर मतकरींच्या भयकथा मी मन लावून वाचत असे. भीतीतर वाटायचीच पण त्याचीच एक अनामिक ओढही वाटायची.
तितक्याच ताकदीची शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा खूप दिवसांनी वाचली.
उत्तम कथेबद्दल अभिनंदन!
रत्नाकर मतकरींच्या भयकथा मी मन लावून वाचत असे. भीतीतर वाटायचीच पण त्याचीच एक अनामिक ओढही वाटायची.
मलाही, कधीतरी ऑर्कुटवर कोणीतरी टाकली तर एखादी वाचली असावी परंतु गेल्या अनेक वर्षांत मतकरींच्या कथा वाचायला मिळाल्या नाहीत याची रूखरूख वाटते. माझ्या अतिशय आवडीचा प्रकार किंवा त्यांच्या कथांमुळेच गूढकथा हा प्रकार मला लिहायला आवडतो असे म्हटले तर चालेल.
मतकरींच्या कथेची आठवण झाली. तितक्याच ताकदीची शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा खूप दिवसांनी वाचली.
नाही हो, तेवढा सराईतपणा यायला अद्याप अवकाश आहे परंतु तुमचा प्रतिसाद सुखद वाटला. :)
कल्पनेतले असले तरी स्वभावाचे चपखल प्रतिबिंब आले आहे कथेत.
वात्रट॑पणामुळे आणि अगोचरपणामुळे झालेल्या गुन्ह्याची टोचणी निर्मळ असो वा नसो मनाला नेहमीच डाचत असते.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
प्रियाली च्या कथा वाचायच्या नाहीत असे ठरवले होते. पण रहावले नाही आणि वाचली. 'वास्तविक' हा 'योगायोग' आहे. मला पालीची भीती वाटत नाही पण आता...प्रियालीची वाटु लागली आहे.
(भयभीत!)
प्रकाश घाटपांडे
मध्यंतरी बराचकाळ इतर कामांत गुंतलेली असल्याने ही कथा अर्धवट लिहून बासनात बांधून ठेवली होती. ;) ती कालपरवा पूर्ण केली तेव्हा ती वाचकांना आवडेल का नाही याबाबत शंका होती.
कथा आवडली असे प्रतिसादातून आणि इतरत्र कळवणार्या सर्वांचे आभार.
कथा आवडली.. योग्य जागी दोन भाग केले आहेत..)
पहिल्या भागात अजिबातच अंदाज आला नाही.. .
( आता तो गबाळ्या डॅशिंग काम करणार , हीरॉईनला संकटातून सोडवायचं वगैरे आणि "दिसतं तसं नसतं " टायपातला प्रेमाईस प्रूव्ह करणार असल्या भ्रमात असल्याने अधिकच मजा आली कथेला...)
प्रियाली कथा आवडली. कलाटणी तर जबरदस्तच, काहीतरी वेगळे घडणार असे वाटते होते, पण अंदाज लावता आला नाही. शाळेतले वातावरण, बाई, दंगा करणारी मुले हे सर्व खूप वर्षे मागे घेऊन गेले; तरीही गबाळ्याला सर्वांनी अगदी टोकाला नेऊन, घुसमट होइस्तोवर चिडवले असे वाटते. कुठेतरी वाचल्याचे आठवते की असेच एका मुलाला बाकीची मुले रोज चिडवत असतात, शेवटी तो ताण असह्य होऊन तो एकदिवस सगळ्यांवर बेछूट गोळीबार करतो. गबाळ्या अस्वस्थ करुन गेला, हे मात्र खरे.
'भयाली' नाव तुला अगदी समर्पक आहे :)
१) रत्नाकर मतकरींची एक जुनी कथा आहे. मला अगदी बरोब्बर नाव आठवत नाही पण "मला विक्रम दिसतो" अशा काहीशा नावाची आहे. ती वेगळ्या अंगाने जाते परंतु कथेच्या नावावरून ही कथा सुचली.
२) अशा प्रकारचा थोडासा भित्रा मुलगा आमच्या वर्गात होता आणि १ली ते १०वी आमच्या वर्गातच होता. कधीतरी २री तिसरीत आम्ही त्याला "ही बघ पाल दिसत्ये भिंतीवर" म्हणून घाबरवत असू, बाकी काही नाही. ;) महाशय सध्या एका मल्टीनॅशनल कंपनीत भारी मोठ्या पोस्टवर असल्याचे ऐकून आहे.
बाकी चतुरंगशेठ म्हणतात तसे "रत्नाकर मतकरींची" खरेच आठवण झाली.
हा कथेचा साज परिचयाचा आहे, असे लिहणे म्हणजे खरेच ताकतीचे काम आहे.
आपण ते समर्थपणे पेलले ...
मी जर जास्त चुकत नसेन तर "नारायण धारपांच्या" काही कथांचा साज असाच आहे. फक्त आपल्यात व त्यांच्यात फरक असा की तिथे अंदाज असतो की "शेवट" कसा असणार आहे व इथे अगदी "अनपेक्षीत".
>>महाशय सध्या एका मल्टीनॅशनल कंपनीत भारी मोठ्या पोस्टवर असल्याचे ऐकून आहे.
हे पण "अनपेक्षीत" च ...
कथेत साधुपुरूष, समर्थ इ. आणून त्यातील वास्तव टाळतात त्यामुळे त्यांच्या कथांचा शेवट अपेक्षित होऊन जातो. रत्नाकर मतकरींच्या कथांत जे वैविध्य आहे किंवा वेगळ्या मितीतून जग दाखवण्याची कला आहे तिथे धारप कमी पडतात.
असे काहीतरी होईल ह्याचा थोडा अंदाज आलाच होता. शैली आणि मांडणी चांगली झाली आहे.
अर्थात सातवीतला मुलगा 'पालीला' एवढा का घाबरत होता (तपशिलातील वर्णनामुळे तर अजूनच) ह्याची काही पार्श्वभूमी सांगितली गेली असती तर अजून थोडा 'उठाव' आला असता कथेला असे आपले माझे मत.
अवांतर (आणि फुकटचा सल्ला): कथालेखिकेचा एकंदर आवाका लक्षात घेता 'मुद्दाम धक्कातंत्राचा' वापर टाळावा अशी एक अनाहूत सूचना
अर्थात सातवीतला मुलगा 'पालीला' एवढा का घाबरत होता (तपशिलातील वर्णनामुळे तर अजूनच) ह्याची काही पार्श्वभूमी सांगितली गेली असती तर अजून थोडा 'उठाव' आला असता कथेला असे आपले माझे मत
पालीला घाबरण्यासाठी वयाची अट नसते. अनेक प्रौढ माणसेही पाली, उंदीर, झुरळ यांना घाबरतात. त्यापाठी काही सबळ इतिहास किंवा घटना असतेच असे नाही. किळस ही एकच भावना पुरेशी आहे. तसेच, संपूर्ण गोष्ट ही एका सातवीतल्या मुलीच्या नजरेतून मांडलेली आहे. त्यामुळे वर्गात नवीन आलेल्या मुलाची पार्श्वभूमी अनावश्यक आहे असे माझे मत.
कथालेखिकेचा एकंदर आवाका लक्षात घेता 'मुद्दाम धक्कातंत्राचा' वापर टाळावा अशी एक अनाहूत सूचना
याबद्दल विस्ताराने सांगावे, विशेषतः कथालेखिकेचा एकंदर आवाका लक्षात घेता या वाक्याबद्दल. कथेशी संबंधीत नसल्यास खरडही चालेल.
"त...तिचे डोळे बघ. लाल लाल..बाहेर आलेले...आणि ती जीभ बघ कशी लपकन बाहेर येते. मला खूप भीती वाटते."
ह्या वाक्यातून माझा असा समज (का कोण जाणे) झाला होता की ह्यामागे काही तरी पार्श्वभूमी आहे (असावी) कारण तुमचे म्हणणे बरोबर आहे की पालीची बर्याच मोठ्या माणसांनाही भिती वाटते पण ती ३भिती - पालीला हाकलणे अथवा मारणे, हात लावणे इत्यादी 'कृतीं' बद्दल प्रामुख्याने असते आणि त्यातही 'किळस' ह्या संकल्पनचेचा भाग जास्त असतो. सर्व सामान्य मोठ्या माणसांना 'पाल माझ्याकडे बघते आहे' किंवा 'मला खायला/चावायला/गिळायला येईल' अशा स्वरुपातली ती भिती नसते (नसावी). ह्या वरील गृहितकावर मला वाटले की 'गबाळ्याच्या भूतकाळात पालीशी किंवा तत्सम प्राकाराशी निगडित काही भीषण आठवण आहे'.
"कथालेखिकेचा एकंदर आवाका..."
तुमचे ह्याआधीचे बरेच लिखाण मी वाचले आहे. 'कथा' विभागात सर्वात प्रथम स्मरते ती 'एका रिकाम्या पडलेल्या गावाची गोष्ट (नेमके नाव आत्ता आठवत नाही)'. त्या कथेत सुरेख वातावरण निर्मिती आणि पूर्णपणे अनपेक्षित अशी कलाटणी होती - इतकी की कलाटणी वाटूही नये. त्या सफाईचा वरील कथेत थोडासा अभाव जाणवला - कारण अंदाज बांधता येत होता (अगदी अचूक तपशिलात नव्हे...). अर्थात हे माझे वैयक्तिक मत (आणि माझे स्वताचे साहित्यिक कतृत्व (? कसा लिहायचा) काहीच नसल्यामुळे त्या मताला फारशी किंमत देण्याचेही काहीच कारण नाही).
वरील गृहितकावर मला वाटले की 'गबाळ्याच्या भूतकाळात पालीशी किंवा तत्सम प्राकाराशी निगडित काही भीषण आठवण आहे'
तुमचे म्हणणे बरोबर आहे. गबाळ्याची भीतीही इतर सामान्य माणसांप्रमाणे नाही. ती तशी असती तर तो जीव घेऊन पळाला नसता. त्याच्या भीतीमागे काही मनोविकार, भूतकाळातील घटना घडलेल्या असाव्यात (किंवा नसाव्यात). माझ्या माहितीतील एक बाई होत्या (बाई म्हणजे त्यांना चांगली दोन मोठी मुले होती) त्यांना मांजर पाहिले की थरथर कापायला होई. दातखिळी बसल्यासारखे होई पण असे का व्हावे याचे कारण त्यांना माहित नव्हते. खोदून विचारले तरी सांगता येत नव्हते. एखाद्या माणसाचे असे का होत असावे हे सांगता येत नाही परंतु त्याच्या किळसेची तीव्रता ही इतरांपेक्षा अतिशय जास्त असू शकते. या लघुकथेत हा भाग आलेला नाही कारण गबाळ्या शाळेत नवा आहे, नायिकेला त्याच्याबद्दल माहिती नाही.
अर्थात हे माझे वैयक्तिक मत (आणि माझे स्वताचे साहित्यिक कतृत्व (? कसा लिहायचा) काहीच नसल्यामुळे त्या मताला फारशी किंमत देण्याचेही काहीच कारण नाही).
तुम्ही भूलनगरी वाचली असावी. तिचा बाज वेगळा. त्यामानाने ही कथा एकांगी आहे कारण अगदी शेवटचा परिच्छेद सोडला तर ती १२-१३ वर्षांच्या कथानायिकेच्या अनुभवात आणि शब्दांत बांधलेली आहे.
बाकी, मत देण्यासाठी साहित्यिक कर्तृत्व असायला पाहिजे असे काही नाही. वाचक या नात्याने तुम्हाला खटकलेली गोष्ट सांगायची मुभा असायलाच हवी आणि आहेच आणि त्याबद्दल मी आभारी आहे.
कथा आवडली 13 Jul 2008 - 3:54 am | बिपिन कार्यकर्ते
प्रियाली, कथा मस्त आहे. शेवटचा धक्का पर्फेक्ट. तुझ्या कथांमधून धारपांपेक्षा मतकरींची जास्त आठवण येते. ते कुठल्याही तथाकथित आणि नेहमीच्या गूढकथांमधे वापरण्यात येण्यार्या संज्ञा आणि कल्पना न वापरता मस्त इफेक्ट आणतात. तुला जमली आहे ती स्टाईल. गबाळ्याचा मृत्यू झाल्यावर मी विचार करत होतो की खरंच असं झालं होतं का? पण शेवट वाचल्यावर कळले...
कथा आवडली ..
कथानायिकेला जसा गबाळ्या पालीच्या ठिकाणी दिसतो तसेच गबाळ्याला पण कुणी दिसत असावे का ? असा प्रश्न पडला. असे प्रश्न पडणे, नंतर पण कथेचा विचार करणे, हाच भयकथेच्या यशाचा मापदंड.
अभिनंदन.
मागे वपुंचा "वलय" असाच काहिसा कथा संग्रह वाचनात आला होता.
सरळ वाटणा-या कथेचा शेवट काहिसा अनपेक्षीत धक्कयाने होतो असाच एकंदरीत सर्व कथांचा
बाज होता.प्रियाली ताइंची गबाळ्या हि कथा सुध्दा त्याच धाटणीची वाटली.
ह्या लेखनप्रकाराला "भयकथा" असे नक्कि म्हणता येइल का? (चु.भु.दे.घे.)
हा कथासंग्रह वाचूनहि आता दहाएक वर्षे झाली असतिल,तरीहि जाणकारांनी ह्यावर अधिक प्रकाश टाकावा.
अभिज्ञ, अनपेक्षित वळणाच्या सर्वच कथा भयकथा असू शकतील असे नाही. परंतु एखादी कथा वाचून भयनिर्मिती (कथेत किंवा वाचकाच्या मनात) होत असेल तर तिला भयकथा म्हणता यावे.
मनस्वी, गबाळ्याचा अंत झाला नसता तर तो छतावर कसा लटकला असता? :) भयकथेसाठी प्रसंगनिर्मिती आहे इतकेच.
गोष्ट आवडली! :)
गबाळ्याप्रमाणेच कथानायिकेचाही चिरडून मृत्यू झाला असता तर 'करावे तसे भरावे' सारखा प्रिमाईस सिद्ध झाला असत असे उगाचच वाटले. :)
- (अघोरी) मनिष
प्रतिक्रिया
12 Jul 2008 - 2:55 am | नंदन
एकदम डेंजर कलाटणी! #:S. कथा आवडली.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
12 Jul 2008 - 3:22 am | बेसनलाडू
कथालेखिकेच्या पूर्वलौकिकाला जागणारी कथा बरेच दिवसांनी वाचायला मिळाली. फार आवडली.
(वाचक)बेसनलाडू
12 Jul 2008 - 7:07 pm | केशवसुमार
प्रियालीताई,
एकदम डेंजर कलाटणी! :O कथा आवडली.
पण गबाळ्याला मारायला नको होते. :( . अपघाता पर्यंत ठीक आहे.. #:S
(अहिंसक)केशवसुमार
स्वगतः ही जर सत्य कथा असली तर ह्या ताईं पासून सांभाळून रहायला हवे.. :B तरी बघितलस ना त्या जालसर्वज्ञाचे काय हाल केले ते :T
12 Jul 2008 - 7:26 pm | प्रियाली
अहो त्याला मारलं नसतं तर डेंजर कलाटणी कशी मिळाली असती? ;) भयकथेत एखाद्याला न मारणे = विडंबनात बाई-बाटली न आणणे. ;)
कोण हो नेमके?
नाही, ही सत्यकथा नाही. :) असती तर मात्र शेवट कथानायिकेसारखा नसता झाला. :D
(शाब्दिक हिंसातज्ज्ञ)प्रियाली
12 Jul 2008 - 7:46 pm | केशवसुमार
भयकथेत एखाद्याला न मारणे = विडंबनात बाई-बाटली न आणणे. ;)
हा हा हा .. ह बाकी एकदम खर!!
(सहमत)केशवसुमार
हे घ्या आमचं बाई बाटली शिवायचे एक विडंबन ;)
(निर्लेप)केशवसुमार
12 Jul 2008 - 7:58 pm | प्रियाली
असं अपघाताने एखादं विडंबन किंवा भयकथा पडू शकते खरी. ;)
तुम्हाला प्रतिसाद तिथेच दिला आहे. :)
13 Jul 2008 - 8:42 am | सर्किट (not verified)
अरे (माझ्या प्रिय मित्रांनो),
असे नका रे छळू ! येथील व्यवस्थापनाविषयी आमची निराशा व्यक्त करून आम्ही वाचन मात्र झालो, तेव्हा लगेच प्रियाली ची भयकथा आली. असे नका रे छळू !
चालेल. अम्ही वाचनमात्र नाही आता. पण व्यवस्थापनाशी लढतच राहणार. व्यवस्थापनच्या डोकेदुखीचे कारण बनण्यची जबाबदारी आता तुमची.
प्रियाली, कथा छानच आहे. विशेषतः पहिला भाग अत्यंत छान आहे. अर्थात कथा प्रियालीची असल्याने दुसरा भाग काहीतरी गोच करणार ही खात्री होतीच.
पण ती गोचही विशेष वाटली नाही यावेळी.
जरा विचार करून सांगतो. आणखी मस्त होऊ शकली असती, असे वाटते.
- (लेखनमात्र) सर्किट
13 Jul 2008 - 1:07 pm | केशवसुमार
सर्किटशेठ,
वाचनमात्र चे लेखनमात्र हे उत्तम.. अभिनंदन!!
(वाचकमात्र)केशवसुमार
स्वगत१: इतिहासाचा फड आता पुन्हा सुरू होणार 'केश्या' टिंग टिंग टिंग..
(तमाशाप्रेमी)केशवसुमार
स्वगत२ व्यवस्थापनच्या डोकेदुखी काय हे सर्किटशेठ, कुठल्याही व्यवस्थापनाला कधी डोके असते का? मग डोकेदुखी कशी होणार?
(बुचकळ्यात)केशवसुमार
13 Jul 2008 - 4:20 pm | प्रियाली
धन्यवाद सर्केश्वर. कथा आणि पुनरागमानाबद्दल. :)
बाकी, गोचीचं काय घेऊन बसलात? आपण आलात आता सर्वांची पुन्हा गोची. तिच सर्वांत भारी नाही का? ;)
13 Jul 2008 - 12:58 pm | केशवसुमार
प्रियालीताई,
(विषयांतर वाटलेला मजकूर वगळला. : प्रशासक)
तिथे अस काही तरी दिसते आहे
नक्की काय लिहिले होते? :?
(बुचकळ्यात)केशवसुमार
13 Jul 2008 - 4:18 pm | प्रियाली
अहो इतकेच लिहिले होते की मृत्युशिवाय असणारी भयकथा इथे वाचावी. आणि वर भूलनगरीचा दुवा दिला होता. बस्स एवढेच!
प्रशासक महाराजांना ते विषयांतर वाटावे याचे नवल वाटते.
ती गोष्ट मनोगतावर देऊन वर पूर्वप्रसिद्धी: मिसळपाव असे लिहिण्याची खुमखुमी आली आहे. तसे केले तर आख्खी गोष्टच उडवून टाकतील. ;)
13 Jul 2008 - 3:30 am | टारझन
बिच्चार्या बाळ्या-गबाळ्याला "फुल्लस्टॉप" नसता दिला तर बरं झालं असंत... त्याला फार फार तर "कॉमा" त टाकल असतं.
बाकी तुमच्या कथेत मोड(ट्विस्ट) आणन्याच्या कौशल्याबद्दल दाद घेऊन गेलात .. (केकता कपूर को हरा दिया)..
कथा संपल्याची हुरहुर...
अवांतर (खरी घटना) : आमच्या शाळेतल्या एका अशाच मूलाची आठवण झाली (कोणी म्हणे तो लवकर जन्मला होता.) सर्व मुले त्याच दप्तर रोज न चुकता कचर्याच्या बादलीत टाकत असत. त्याला मागून पोर टपल्या मारत.शाळेतून घरी जायच्या रोडवरून मुले कधी त्याला सरळ चालू देत नसत.त्याल खाली ढकलत. त्यामूळे तो कधी सहलीला पण याचा नाही. त्याच शर्ट रोज शाईने भरवलं जायचं... तो रोजचं गिर्हाईक असायचा. त्याची आई नेहमी बिचारी मुख्याध्यापकांच्या केबिन बाहेर तक्रारी साठी बसलेली असायची. त्यात तो ऑलरेडी २ शाळांत असाच त्रास झाला म्हणून आमच्या शाळेत आला होता. या सगळ्यामूळे त्याचा आत्मविश्वासच हरवला होता.
आपलाच कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
12 Jul 2008 - 3:04 am | llपुण्याचे पेशवेll
पण येवढा डेंजर शेवट का बरे केला?
(व्यथित डॅनी)
पुण्याचे पेशवे
12 Jul 2008 - 3:05 am | प्राजु
सॉलिड कथा.... एकदम अशी कलाटणी मिळेल असं वाटलं नव्हतं.. सुन्न झालं डोकं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Jul 2008 - 3:27 am | धनंजय
दोन भागांत विभागली हे बरे केले. कलाटणी आणखीन जोरदार झाली.
अवांतर : लहान मुलांकडून थोड्याशाच बालसुलभ क्रूरतेमुळे भयंकर हानी होऊ शकते. त्याविषयी काही महिन्यांपूर्वी "अटोनमेंट" नावाचा चित्रपट बघितला. यात एक १२-१४ वर्षांच्या मुलीला आपल्या मोठ्या बहिणीच्या प्रियकराबद्दल हेवा/असूया/राग असे काही वाटते. "हा मुलींना त्रास देतो" असा काही आपल्या मनाचा ग्रह ती मुद्दामून करून घेते. एका परिस्थितीत त्या तरुणावर दुसर्या एका मुलीवर बलात्कार केल्याचा खोटा वहीम येतो - पण पुरावा नसल्यामुळे तो सुटणार असतो (वहीम खोटाच असतो.) ही छोटी मुलगी आपण त्या घटनेची साक्षीदार असल्याचे स्वतःला पटवून घेते, आणि पोलिसांना साक्ष देऊन त्याला गोत्यात आणते. तिच्या मोठ्या बहिणीच्या, आणि त्या तरुणाच्या आयुष्याचे वाटोळे होते - त्या क्षणी मात्र "आपण ताईला वाचवले" असे छोटीला वाटते. पण आयुष्यभर ती ते गुपीत मनात धरून अस्वस्थ होते. "ती त्याची काही भरपाई करू शकते का?" असा चित्रपटातला मुख्य संघर्ष आहे. हा चित्रपट २००८ सालच्या ऑस्करसाठी उमेदवार होता.
12 Jul 2008 - 3:33 am | प्रियाली
कथेच्या पहिल्या भागात कथा कोणत्या अंगाने जाणार हे कळू द्यायचं नव्हतं.
लहान मुलांच्या बालसुलभ क्रूरतेबद्दल तुम्ही म्हणाला ते अगदी खरं. बर्याचदा त्यांना होणार्या परिणामांची कल्पना नसते हे सर्वच मान्य करतील पण बरेचदा लहान मुले एखादा अपघात घडला किंवा वाईट घटना घडली तर योग्यप्रकारे रेसिप्रोकेट करतात असे नाही. त्यांना त्यातील गांभीर्य जाणवत नाही किंवा दु:ख, पश्चात्ताप यांची चटकन टोचणी लागत नाही असे पाहिले आहे.
12 Jul 2008 - 6:10 am | स्वप्निल..
प्रियाली,
प्रमोद देव यांचा लेख वाचल्यानंतर तुमचे लिखाण वाचन्याची इच्छा होतीच्.. त्यातच ही सुंदर कथा..शेवट कलाटणी पन एकदम खासच....
आवडली....
स्वप्निल..
12 Jul 2008 - 6:22 am | मदनबाण
हा गबाळ्या तर भलताच शॉक देऊन गेला !!!
(हे सर्व वाचुन सुन्न झालेला)
मदनबाण.....
12 Jul 2008 - 7:15 am | सहज
प्रियाली इज बॅक!!
तो विषय, ती हातळणी एकदम प्रियाली ब्रँड
जरी फारसा आवडत नसला तरी क्रमशः हा शब्द वाचायला मिळाव असं वाटत होत.
12 Jul 2008 - 8:46 am | भाग्यश्री
वा.. बर्याच दिवसांनी प्रियाली तुमची कथा वाचायला मिळाली! मेजर धक्का बसला!! आवडली गोष्ट...
12 Jul 2008 - 9:01 am | अनिल हटेला
एकदम सही कथा !!!
अजुन कथा वाचायला आवडेल......
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
12 Jul 2008 - 9:06 am | अभिज्ञ
कथा जबरदस्त झालीये.
आपण कथेला जी अनपेक्षित कलाटणि दिलीत ती खासच.
आणी जाताजाता
भिंतीच्या छताला गबाळ्या पालीसारखा चिकटला होता. त्याचे ते बटबटीत डोळे माझ्यावर रोखलेले होते आणि जीभ मध्येच लपकन माझ्या दिशेने बाहेर येत होती.
हे वाक्य तर प्रचंड अंगावर येते.(हि दुसरी कलाटणी म्हणता येइल....)
अभिज्ञ
12 Jul 2008 - 9:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गबाळ्या असह्य तान देऊन गेला. पहिल्या भाग हसरा झाल्यानंतर दुसरा भाग धक्का देणारच, पण तो धक्का कसा असेल याची इतकी अनपेक्षीत कल्पना नव्हती.
भिंतीच्या छताला गबाळ्या पालीसारखा चिकटला होता. त्याचे ते बटबटीत डोळे माझ्यावर रोखलेले होते आणि जीभ मध्येच लपकन माझ्या दिशेने बाहेर येत होती.
झपाटणारी लेखन शैली, आणि सुंदर कथा !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
12 Jul 2008 - 9:27 am | ऋषिकेश
असेच म्हणतो!!
धक्का अतिशय अनपेक्षित होता.
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
12 Jul 2008 - 9:26 am | चतुरंग
मतकरींच्या कथेची आठवण झाली. रत्नाकर मतकरींच्या भयकथा मी मन लावून वाचत असे. भीतीतर वाटायचीच पण त्याचीच एक अनामिक ओढही वाटायची.
तितक्याच ताकदीची शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा खूप दिवसांनी वाचली.
उत्तम कथेबद्दल अभिनंदन!
चतुरंग
12 Jul 2008 - 3:04 pm | प्रियाली
मलाही, कधीतरी ऑर्कुटवर कोणीतरी टाकली तर एखादी वाचली असावी परंतु गेल्या अनेक वर्षांत मतकरींच्या कथा वाचायला मिळाल्या नाहीत याची रूखरूख वाटते. माझ्या अतिशय आवडीचा प्रकार किंवा त्यांच्या कथांमुळेच गूढकथा हा प्रकार मला लिहायला आवडतो असे म्हटले तर चालेल.
नाही हो, तेवढा सराईतपणा यायला अद्याप अवकाश आहे परंतु तुमचा प्रतिसाद सुखद वाटला. :)
12 Jul 2008 - 9:26 am | विसोबा खेचर
गबाळ्याचं ऐकून धक्काच बसला!
कलाटणी लै भारी....
कथामांडणी अतिशय सुरेख अन् ओघवती...
आपला,
(प्रियालीचा फ्यॅन आणि मित्र) तात्या.
12 Jul 2008 - 9:28 am | चित्रा
हॅलोवीन तर अजून लांब आहे..!!
अंदाज चुकले! पण शेवट जबरदस्त..
12 Jul 2008 - 10:33 am | विजुभाऊ
कल्पनेतले असले तरी स्वभावाचे चपखल प्रतिबिंब आले आहे कथेत.
वात्रट॑पणामुळे आणि अगोचरपणामुळे झालेल्या गुन्ह्याची टोचणी निर्मळ असो वा नसो मनाला नेहमीच डाचत असते.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
12 Jul 2008 - 10:38 am | झकासराव
कथा आहे.
आधीचा भाग वाचल्यावर ह्या भागात असलेली कलाटणी जास्तच जबरा होती.
:)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
12 Jul 2008 - 11:24 am | प्रकाश घाटपांडे
प्रियाली च्या कथा वाचायच्या नाहीत असे ठरवले होते. पण रहावले नाही आणि वाचली. 'वास्तविक' हा 'योगायोग' आहे. मला पालीची भीती वाटत नाही पण आता...प्रियालीची वाटु लागली आहे.
(भयभीत!)
प्रकाश घाटपांडे
12 Jul 2008 - 11:26 am | विजुभाऊ
(भयभीत!)
प्रकाश घाटपांडे
=)) =)) =))
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
12 Jul 2008 - 2:16 pm | साती
कथा आवडली.
साती
12 Jul 2008 - 2:29 pm | स्नेहश्री
बापरे घाबरलेच मी.
खिळवुन ठेवणारी कथा आहे..
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
12 Jul 2008 - 2:44 pm | श्रीयुत संतोष जोशी
नमस्कार,
खूपच छान्. एकदम गिरकी घेउन वळते ही गोष्ट.
आवडली.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
12 Jul 2008 - 3:07 pm | प्रियाली
मध्यंतरी बराचकाळ इतर कामांत गुंतलेली असल्याने ही कथा अर्धवट लिहून बासनात बांधून ठेवली होती. ;) ती कालपरवा पूर्ण केली तेव्हा ती वाचकांना आवडेल का नाही याबाबत शंका होती.
कथा आवडली असे प्रतिसादातून आणि इतरत्र कळवणार्या सर्वांचे आभार.
12 Jul 2008 - 5:11 pm | विसुनाना
या आपल्या 'त्या' जगातल्या नावाला साजेशी कथा! आता कुठे पाल दिसली की ही कथा आठवणार हमखास!
12 Jul 2008 - 5:25 pm | प्रियाली
माझं "त्या" जगात बारसं करण्याबद्दल धन्यवाद. ;)
ये हुई ना बात!
13 Jul 2008 - 8:30 am | प्रकाश घाटपांडे
अरे "भयाली" हे तर एकदम समर्पक नाव. आता हेच नाव फिट्ट डोक्यात बसले.
प्रकाश घाटपांडे
12 Jul 2008 - 5:49 pm | भडकमकर मास्तर
कथा आवडली.. योग्य जागी दोन भाग केले आहेत..)
पहिल्या भागात अजिबातच अंदाज आला नाही.. .
( आता तो गबाळ्या डॅशिंग काम करणार , हीरॉईनला संकटातून सोडवायचं वगैरे आणि "दिसतं तसं नसतं " टायपातला प्रेमाईस प्रूव्ह करणार असल्या भ्रमात असल्याने अधिकच मजा आली कथेला...)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
12 Jul 2008 - 7:38 pm | llपुण्याचे पेशवेll
आता तो गबाळ्या डॅशिंग काम करणार , हीरॉईनला संकटातून सोडवायचं वगैरे आणि "दिसतं तसं नसतं "
मला पण असेच वाटले होते.
पुण्याचे पेशवे
12 Jul 2008 - 6:11 pm | एकलव्य
जबरदस्त!
12 Jul 2008 - 7:39 pm | सखी
प्रियाली कथा आवडली. कलाटणी तर जबरदस्तच, काहीतरी वेगळे घडणार असे वाटते होते, पण अंदाज लावता आला नाही. शाळेतले वातावरण, बाई, दंगा करणारी मुले हे सर्व खूप वर्षे मागे घेऊन गेले; तरीही गबाळ्याला सर्वांनी अगदी टोकाला नेऊन, घुसमट होइस्तोवर चिडवले असे वाटते. कुठेतरी वाचल्याचे आठवते की असेच एका मुलाला बाकीची मुले रोज चिडवत असतात, शेवटी तो ताण असह्य होऊन तो एकदिवस सगळ्यांवर बेछूट गोळीबार करतो. गबाळ्या अस्वस्थ करुन गेला, हे मात्र खरे.
'भयाली' नाव तुला अगदी समर्पक आहे :)
12 Jul 2008 - 7:42 pm | छोटा डॉन
आधी जेव्हा पहिला भाग वाचला तेव्हा कथा विनोदी अंगाकडे जाणारी वाटली.
त्याव्र प्रतिक्रीया देण्याच्या आधीच दुसरा भाग.
दुसरा भाग एकदम सुन्न करणारा, अगदी अनपेक्षीत. कदाचित हेच आपल्या "कथालेखनाचे यश" ...
खरोखर दुसरा भाग धक्का देऊन गेला ...
बाकी चतुरंगशेठ म्हणतात तसे "रत्नाकर मतकरींची" खरेच आठवण झाली.
असो. अगदी छान ....
अवांतर : आधीच कल्पना दिली असली तरी विचारतो "असा प्रसंग आपल्या पहाण्यात आहे का ?". नाही म्हणजे, प्रेरणा कशी मिळाली ?
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
12 Jul 2008 - 7:57 pm | प्रियाली
१) रत्नाकर मतकरींची एक जुनी कथा आहे. मला अगदी बरोब्बर नाव आठवत नाही पण "मला विक्रम दिसतो" अशा काहीशा नावाची आहे. ती वेगळ्या अंगाने जाते परंतु कथेच्या नावावरून ही कथा सुचली.
२) अशा प्रकारचा थोडासा भित्रा मुलगा आमच्या वर्गात होता आणि १ली ते १०वी आमच्या वर्गातच होता. कधीतरी २री तिसरीत आम्ही त्याला "ही बघ पाल दिसत्ये भिंतीवर" म्हणून घाबरवत असू, बाकी काही नाही. ;) महाशय सध्या एका मल्टीनॅशनल कंपनीत भारी मोठ्या पोस्टवर असल्याचे ऐकून आहे.
याबद्दल खरंच धन्यवाद.
12 Jul 2008 - 8:03 pm | छोटा डॉन
हा कथेचा साज परिचयाचा आहे, असे लिहणे म्हणजे खरेच ताकतीचे काम आहे.
आपण ते समर्थपणे पेलले ...
मी जर जास्त चुकत नसेन तर "नारायण धारपांच्या" काही कथांचा साज असाच आहे. फक्त आपल्यात व त्यांच्यात फरक असा की तिथे अंदाज असतो की "शेवट" कसा असणार आहे व इथे अगदी "अनपेक्षीत".
>>महाशय सध्या एका मल्टीनॅशनल कंपनीत भारी मोठ्या पोस्टवर असल्याचे ऐकून आहे.
हे पण "अनपेक्षीत" च ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
12 Jul 2008 - 8:09 pm | प्रियाली
कथेत साधुपुरूष, समर्थ इ. आणून त्यातील वास्तव टाळतात त्यामुळे त्यांच्या कथांचा शेवट अपेक्षित होऊन जातो. रत्नाकर मतकरींच्या कथांत जे वैविध्य आहे किंवा वेगळ्या मितीतून जग दाखवण्याची कला आहे तिथे धारप कमी पडतात.
मला धारप कथा ही आवडतात पण मतकरींच्या अधिक आवडतात.
12 Jul 2008 - 9:23 pm | वाचक
असे काहीतरी होईल ह्याचा थोडा अंदाज आलाच होता. शैली आणि मांडणी चांगली झाली आहे.
अर्थात सातवीतला मुलगा 'पालीला' एवढा का घाबरत होता (तपशिलातील वर्णनामुळे तर अजूनच) ह्याची काही पार्श्वभूमी सांगितली गेली असती तर अजून थोडा 'उठाव' आला असता कथेला असे आपले माझे मत.
अवांतर (आणि फुकटचा सल्ला): कथालेखिकेचा एकंदर आवाका लक्षात घेता 'मुद्दाम धक्कातंत्राचा' वापर टाळावा अशी एक अनाहूत सूचना
12 Jul 2008 - 10:25 pm | प्रियाली
सर्वप्रथम प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पालीला घाबरण्यासाठी वयाची अट नसते. अनेक प्रौढ माणसेही पाली, उंदीर, झुरळ यांना घाबरतात. त्यापाठी काही सबळ इतिहास किंवा घटना असतेच असे नाही. किळस ही एकच भावना पुरेशी आहे. तसेच, संपूर्ण गोष्ट ही एका सातवीतल्या मुलीच्या नजरेतून मांडलेली आहे. त्यामुळे वर्गात नवीन आलेल्या मुलाची पार्श्वभूमी अनावश्यक आहे असे माझे मत.
याबद्दल विस्ताराने सांगावे, विशेषतः कथालेखिकेचा एकंदर आवाका लक्षात घेता या वाक्याबद्दल. कथेशी संबंधीत नसल्यास खरडही चालेल.
12 Jul 2008 - 9:53 pm | चकली
खूप दिवसांनी भयकथा वाचली. मला रत्नाकर मतकरींच्या कथा आवडतात.
चकली
http://chakali.blogspot.com
13 Jul 2008 - 1:54 am | वाचक
आपल्या कथेतील वाक्य पहा
"त...तिचे डोळे बघ. लाल लाल..बाहेर आलेले...आणि ती जीभ बघ कशी लपकन बाहेर येते. मला खूप भीती वाटते."
ह्या वाक्यातून माझा असा समज (का कोण जाणे) झाला होता की ह्यामागे काही तरी पार्श्वभूमी आहे (असावी) कारण तुमचे म्हणणे बरोबर आहे की पालीची बर्याच मोठ्या माणसांनाही भिती वाटते पण ती ३भिती - पालीला हाकलणे अथवा मारणे, हात लावणे इत्यादी 'कृतीं' बद्दल प्रामुख्याने असते आणि त्यातही 'किळस' ह्या संकल्पनचेचा भाग जास्त असतो. सर्व सामान्य मोठ्या माणसांना 'पाल माझ्याकडे बघते आहे' किंवा 'मला खायला/चावायला/गिळायला येईल' अशा स्वरुपातली ती भिती नसते (नसावी). ह्या वरील गृहितकावर मला वाटले की 'गबाळ्याच्या भूतकाळात पालीशी किंवा तत्सम प्राकाराशी निगडित काही भीषण आठवण आहे'.
"कथालेखिकेचा एकंदर आवाका..."
तुमचे ह्याआधीचे बरेच लिखाण मी वाचले आहे. 'कथा' विभागात सर्वात प्रथम स्मरते ती 'एका रिकाम्या पडलेल्या गावाची गोष्ट (नेमके नाव आत्ता आठवत नाही)'. त्या कथेत सुरेख वातावरण निर्मिती आणि पूर्णपणे अनपेक्षित अशी कलाटणी होती - इतकी की कलाटणी वाटूही नये. त्या सफाईचा वरील कथेत थोडासा अभाव जाणवला - कारण अंदाज बांधता येत होता (अगदी अचूक तपशिलात नव्हे...). अर्थात हे माझे वैयक्तिक मत (आणि माझे स्वताचे साहित्यिक कतृत्व (? कसा लिहायचा) काहीच नसल्यामुळे त्या मताला फारशी किंमत देण्याचेही काहीच कारण नाही).
13 Jul 2008 - 2:20 am | प्रियाली
तुमचे म्हणणे बरोबर आहे. गबाळ्याची भीतीही इतर सामान्य माणसांप्रमाणे नाही. ती तशी असती तर तो जीव घेऊन पळाला नसता. त्याच्या भीतीमागे काही मनोविकार, भूतकाळातील घटना घडलेल्या असाव्यात (किंवा नसाव्यात). माझ्या माहितीतील एक बाई होत्या (बाई म्हणजे त्यांना चांगली दोन मोठी मुले होती) त्यांना मांजर पाहिले की थरथर कापायला होई. दातखिळी बसल्यासारखे होई पण असे का व्हावे याचे कारण त्यांना माहित नव्हते. खोदून विचारले तरी सांगता येत नव्हते. एखाद्या माणसाचे असे का होत असावे हे सांगता येत नाही परंतु त्याच्या किळसेची तीव्रता ही इतरांपेक्षा अतिशय जास्त असू शकते. या लघुकथेत हा भाग आलेला नाही कारण गबाळ्या शाळेत नवा आहे, नायिकेला त्याच्याबद्दल माहिती नाही.
तुम्ही भूलनगरी वाचली असावी. तिचा बाज वेगळा. त्यामानाने ही कथा एकांगी आहे कारण अगदी शेवटचा परिच्छेद सोडला तर ती १२-१३ वर्षांच्या कथानायिकेच्या अनुभवात आणि शब्दांत बांधलेली आहे.
बाकी, मत देण्यासाठी साहित्यिक कर्तृत्व असायला पाहिजे असे काही नाही. वाचक या नात्याने तुम्हाला खटकलेली गोष्ट सांगायची मुभा असायलाच हवी आणि आहेच आणि त्याबद्दल मी आभारी आहे.
13 Jul 2008 - 3:54 am | बिपिन कार्यकर्ते
प्रियाली, कथा मस्त आहे. शेवटचा धक्का पर्फेक्ट. तुझ्या कथांमधून धारपांपेक्षा मतकरींची जास्त आठवण येते. ते कुठल्याही तथाकथित आणि नेहमीच्या गूढकथांमधे वापरण्यात येण्यार्या संज्ञा आणि कल्पना न वापरता मस्त इफेक्ट आणतात. तुला जमली आहे ती स्टाईल. गबाळ्याचा मृत्यू झाल्यावर मी विचार करत होतो की खरंच असं झालं होतं का? पण शेवट वाचल्यावर कळले...
बाकी, तुला भयाली हे नाव पण शोभून दिसेल.
बिपिन.
14 Jul 2008 - 11:24 am | चाणक्य
प्रियाली, जबरदस्त कलाटणी दिलीत दुसर्या भागात. अचानक अंगावरच आली कथा. हे असं खरच घडूही शकतं.
14 Jul 2008 - 12:03 pm | आनंदयात्री
कथा आवडली ..
कथानायिकेला जसा गबाळ्या पालीच्या ठिकाणी दिसतो तसेच गबाळ्याला पण कुणी दिसत असावे का ? असा प्रश्न पडला. असे प्रश्न पडणे, नंतर पण कथेचा विचार करणे, हाच भयकथेच्या यशाचा मापदंड.
अभिनंदन.
14 Jul 2008 - 12:25 pm | अभिज्ञ
मागे वपुंचा "वलय" असाच काहिसा कथा संग्रह वाचनात आला होता.
सरळ वाटणा-या कथेचा शेवट काहिसा अनपेक्षीत धक्कयाने होतो असाच एकंदरीत सर्व कथांचा
बाज होता.प्रियाली ताइंची गबाळ्या हि कथा सुध्दा त्याच धाटणीची वाटली.
ह्या लेखनप्रकाराला "भयकथा" असे नक्कि म्हणता येइल का? (चु.भु.दे.घे.)
हा कथासंग्रह वाचूनहि आता दहाएक वर्षे झाली असतिल,तरीहि जाणकारांनी ह्यावर अधिक प्रकाश टाकावा.
अभिज्ञ.
14 Jul 2008 - 12:47 pm | मनस्वी
मस्त कथा. शेवट अन्-एक्स्पेक्टेड. एकदम गबाळ्याचा अंत का? अपघात वगैरे चाललं असतं.
मनस्वी
"केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा."
14 Jul 2008 - 2:53 pm | प्रियाली
नव्याने प्रतिसाद देणार्या सर्वांचे धन्यवाद.
अभिज्ञ, अनपेक्षित वळणाच्या सर्वच कथा भयकथा असू शकतील असे नाही. परंतु एखादी कथा वाचून भयनिर्मिती (कथेत किंवा वाचकाच्या मनात) होत असेल तर तिला भयकथा म्हणता यावे.
मनस्वी, गबाळ्याचा अंत झाला नसता तर तो छतावर कसा लटकला असता? :) भयकथेसाठी प्रसंगनिर्मिती आहे इतकेच.
14 Jul 2008 - 2:59 pm | मनस्वी
बरोबर आहे गं. सही एकदम!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
14 Jul 2008 - 2:58 pm | मनिष