एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा (०३)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
27 Jul 2010 - 10:34 am

मागील दुवा http://www.misalpav.com/node/7835
रात्री जेवणात सामीश असल्यास तळलेली अंडी , खीमा , तंदूरी चिकन , हे पदार्थ असावेत. सोबत तोंडी लावायला बोटीकबाब खीमा कबाब असे कबाब असावेत.
भात वर्गीय पदार्थात बिर्याणी/ पुलाव असे रुचकर पदार्थ असावेत. सोबत मिर्चीचे सालन असावे.
निरामीश असल्यास
लग्नात हमखास करतात ती बटाट्याची लगदा भाजी. पावट्याची उसळ.
भरल्या वांग्याची भाजी , बिरड्यावालाची रस्शाची उसळ. पुरी सारखे हलके पदार्थ
गोडाच्या पदार्थामध्ये आमरस सोबत तळलेले पापड कुरडया व तत्सम हलके पदार्थ.
भात वर्गीय पदार्थात काश्मिरी पुलाव.
जेवण झाल्यावर मुखशुद्धी म्हणून ३.१४२ कप बटरस्कॉच आइसक्रीम खावे
..............................................................................
ही झाली आपल्या "एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा" या निश्चयाची पूर्व तयारी.
पुढच्या भागात प्रत्यक्ष कोर्स बद्दल .......
(क्रमशः)

आता तुमचे वजन करा.
झोपताना झोपायच्या अगोदर साधारणतः ३ ते ४ चमचे कायमचूर्ण अर्ध्या ग्लासात टाकून प्या.
सकाळचे सर्व कार्यक्रम उरकल्यानन्तर तुमचे वजन करा. वजन हमखास रात्री केलेल्या वजना पेक्षा दोन ते अडीच किलोनी कमी झालेले असेल.
दिवसभरानन्तर पुन्हा वजन करुन पहा ते आणखी अर्ध्या किलोने कमी झालेले असेल
डिस्क्लेमर
***** टीपः वरील लेखात सांगितलेले उपाय ज्याने त्याने आपपल्या जबाबदारी वर करावयाचा आहे. लेखकाची कोणतिही जबाबदारी रहाणार नाही .
***** वरील लेख गम्मत म्हणून लिहिला आहे.तो वैद्यकीय सल्ला समजू नये

जीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

निशिगंध's picture

27 Jul 2010 - 11:45 am | निशिगंध

आम्ही फार आशेने आलो होतो..
असो,

वरील लेख गम्मत म्हणून लिहिला आहे.तो वैद्यकीय सल्ला समजू नये
;)

विषय वाचूनच माझ वजन एक किलो वाढल......

च्या मारी लय भारी पोपट झाला आहे आता माझा........

शानबा५१२'s picture

27 Jul 2010 - 12:42 pm | शानबा५१२

हे सर्व पदार्थ आपण एका भांड्यात ठेवले व वजन केल तर त्यांच वजन दोन ते अडीच कीलो भरेल का?

अवलिया's picture

27 Jul 2010 - 3:03 pm | अवलिया

अवघड आहे ब्वा...

मी-सौरभ's picture

27 Jul 2010 - 11:52 pm | मी-सौरभ

'कायमचूर्ण' ची गरज पडेल असं वाटत नाही :)

विजुभाऊ's picture

26 Sep 2011 - 6:03 pm | विजुभाऊ

घ्या उत्तर