घासू गुरुजींनी सुरु केलेल्या कविता रसग्रहणाच्या उपक्रमाने प्रभावीत होवून आपणही तिथे एखाद फुल सोडाव असं बरेच दिवस वाटत होत, पण योग्य फुल गवसत नव्हत, इतक्यात मिपाचे ताज्या दमाचे, नव्या रक्ताचे तरुण ताठर कवी श्री धनाजीराव वाकडे यांची माझं हे सारं सामान गं सखू... ही कविता वाचनात आली आणी योग्य फुलं गवसल्याचा आनंद झाला.
खरतर ही कविता इतकी रसरशीत आहे, की मधमाशीच्या मकरंद गोळा करण्याच्या कौशल्याऐवजी लहान व्रात्य मुलाच्या बर्फगोल्यातून रस ओढायच्या कौशल्याचीच येथे गरज पडावी.. कवितेतील रस कुठे अर्थाच्या आड, आत लपलेला नसून थेट वाचकाच्या चेहरयावर स्मित उसळवतो व योग्य ठिकाणी गुदगुल्या करत वाचकाला काव्यानुभावाच्या एका वेगळ्याच उंचीवर नेतो. मुख्य म्हणजे या कवितेत वेगळं काहीतरी सांगण्याचा, वेगळ्या प्रकारचा प्रयत्न अजिबात नाही.. जे आहे ते असं आहे.. जसं घडल तसं सांगितलं.. तिच्यात एक उत्तम कविता होण्याची उघड क्षमता आहे. ही कविता निश्चितच छान असली तरी मला उत्तम किंवा उत्कृष्ट वाटली नाही. पण माझी उत्कृष्ट कवितांचा मानदंड म्हणजे "दादांची गाणी" व "तुकयाची वाणी" वगैरे असल्यामुळे त्यात काही विशेष नाही.
कवितेच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे ही कविता कवीचे सामान व सखुची पिशवी यांच्याविषयी आहे. व सामानाच्या असलेल्या पिशवीच्या संबंधाविषयी आहे. आता सामान कस आणी पिशवी कोणती? असा प्रश्न उपस्थित होणं सहाजिकच आहे. कवीने फक्त मोघम उल्लेख करून नक्की काय याचा निर्णय वाचकावर सोडलेला आहे. त्यामुळे रूपकांना एक लवचिकता येते. हे या कवितेचं एक मोठं शक्तीस्थान आहे.
"बाजाराला निघालो मी घाई घाई, पिशवीची आठवण राहीलीच नाही
सामान माझं सारं आहे थोडं खाली, तू जराशी वाकशील का?
माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का?"
इथे बाजार या शब्दाला व्यापक अर्थ आहे हे जाणवल्यावाचून रहात नाही. इथल सामान म्हणजे काही फक्त वस्तू नव्हे तर मानवी भावनांच्या असोशिशी, तरुण मनाच्या भावनांशी एकरूप होणारे काहीतरी आहे हे वाचकाला पहिल्या झटक्यातच कळते, बर सामान खूप सारं आहे, आणी ते खूप असल्याने हातातून खाली सरकलंय, त्याला सामावून घ्यायला पिशवी हवी पण पिशवी मात्र कवी घरीच विसरलाय.. आता घरी विसरलाय हा झाला बहाणा.. खरतर कवीकडे पिशवीच नाही, बर हक्काची पिशवी विकत घ्यावी तर ती अंगावर पडते, व काही दिवसात तिचे गोणपाट होते. त्यामुळे कवीने एक शक्कल काढलीय, कवी बाजाराला जातो, आणी एखादी सखू हेरून तिची पिशवी वापरू पाहतो. त्यातही झालय असं की सामान खाली असल्याने व कवीची उंची बहुदा कमी पडत असल्याने सखुला खाली वाकायची गळ कवी घालतोय.... जड झालेले सामान, कवीची व सखुची उंची, बाजाराचा परिसर.. सगळा प्रसंग अवघ्या एका ओळीत डोळ्यासमोर उभे करायचे कवीचे कसब येथे जाणवते. त्यापुढे कवी वेळ वाया न घालवता सरळ मागणी करतो, कि सामान पिशवीत टाकशील काय?
पुढच्या कडव्यात कवी म्हणतो..
"तालुक्याच्या बाजाराला लागलाय सेल, केली खरेदी मी बराच वेळ
माझं सामान झालंय बरंच मोठं, पिशवी जराशी फाकशील का?
माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का?"
इथे कवीची "हाव" ही मानवी भावना दिसते.. कवीकडे बहुदा अनलिमिटेड नेट अक्सेस असावा. त्यावर कवीने बराच वेळ शोधाशोध करून बाजारातल्या वस्तू पाहिल्या असाव्यात. काही विकत घेतल्याही असाव्यात. हे सगळ करताना आपल्याकडे पिशवी नाही हे खरतर कवीला ठावूक होत , पण कवी हा मोह टाळू शकला नाही. त्यामुळे या बाजारू गोष्टींनी कवीचे सामान मोठेच होत गेले. खरतर हे सामान हाताने मेनेज करता येते, पण कवीच्या कोणा धनाजी नावाच्या मित्राने कवीला काही आयुर्वेदिक सल्ला दिला असावा.. त्यामुळे कवी आपले सामान फक्त पिशवीतच ठेवू इच्छितो. आता सामान मोठ झाल्याने पिशवी फाकावी लागणार हे आलंच, अन तीच विनंती कवी सखुला करतोय.. खरतर या विनंतीवर सखुची प्रतिक्रिया काय असेल त्याचा अंदाज येत नाही कारण सामान मोठ आहे हे कवीने आपल्या दृष्टीने केलेले मूल्यमापन आहे. पण सखुला कदाचित त्यात फार काही वाटणार नाही.. खासकरून जर सखुला बाजाराची सवय असेल तर ती कवीच्या मागणीवर मनातूनच हसेल पण तरीही कवीच्या मानसिक सामाधानासाठी सखू कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. कवितेत थोडक्या शब्दात बराच काही सांगायचा गुण इथे जाणवतो.
"वाण सामान आणि ताजा भाजीपाला, मासोळीचाही मी बाजारहाट केला
ताजा, कडक बोंबील माझा, तुझ्या पापलेटनी झाकशील का?
माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का?"
इथे कवी विश्लेशानिक झालाय.. त्याच्या प्रतिभेला खरा बहार येतो तो इथे.. आपल्याकडे बोंबील आहे हे सांगण्यासाठी कवी बाकी चार गोष्टींचा फाफटपसारा मांडतोय. कवीने घेतलेले थोडेसे काव्यात्म स्वातंत्र्याही येथे जाणवते, म्हणजे, ताजा बोंबील कडक नसतो हे काय कवीला माहीत नाही काय, पण कवीने स्वातंत्र्य घेत बोम्बलाला एकाच वेळी रसरशीत आणी कडक केलंय, त्याच कारणही लगेचच्या ओळीत कळते, पापलेट .. होय पापलेट.. सखूच्या पिशवीतल्या पापालेताचा मोह कवीला पडलाय.. कमीतकमी आपल्याला नाहीतर आपल्या बोम्बलाला तरी सखूने पापालेटाने झाकावे अशी इच्छा कवी व्यक्त करतोय. कदाचित ताज्या बोम्बलाचा रसरशीतपणा बाहेरच्या काहिलीत कमी होवू नये अशीही कवीची इच्छा असावी.
"सांगत असतो धन्या तो मला, पिशवी नेत जा रे नेहमी बाजाराला
वापरू नये कधी हात सामानाला, आतापुरतं तू झाकशील का?
माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का?"
वरती उल्लेख केलेला कवीचा आयुर्वेदिक मित्र धन्या याचा कवीने इथे उल्लेख केलाय.. आता हा धन्या खरच आहे की हाताला त्रास न देता पिशवी वापरण्याचा हा बहाणा आहे यावर कवितेत काही माहिती नाही.. वाचकांनी स्वता:च काय तो अंदाज बांधावा. पण कवीचा आर्जवी स्वभाव इथे परत दिसतो, कवी पिशवी नसल्याबद्दल हळ्हळ व्यक्त करून सखुची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करतो , तसंच, ही तात्पुरती सोय असून सखूने ते सामान आपलंच समजू नये हेही आडून आडून सुचवू पाहतो. त्यासाठी नसलेल्या पिशवीची ग्वाही देतो.. कवीचा बेरकेपणा इथे अधोरेखित होतो..
येथे या रूपकाचं उघड वर्णन न करण्याचा फायदा जाणवतो. (मात्र म्हणूनच मधल्या ओळीतला हात हा शब्द सामानाला जोडून येत असल्यामुळे ही लवचिकता कमी होते असं मला वाटलं)
मला वाटलं ते मी लिहिलं. वाचकांनी आपल्याला वेगळा अर्थ जाणवला असला तर सांगावं. काही सौंदर्यस्थळं निसटून गेली असतील तर त्यांचा उल्लेख करावा. कवितेत किंवा रसग्रहणात काही त्रुटी असतील तर त्यावर टिप्पणी करावी. कवीने आपली भूमिका मांडावी. आपण सगळेच यातून काही शिकू..
प्रतिक्रिया
22 Sep 2011 - 5:28 pm | स्पा
क ह र
=))
=))
=))
=))
=))
साफ खपलो
23 Sep 2011 - 1:46 pm | गणेशा
रसग्रहन जबरी झालेल आहे... अगदी कवीच्या तोंडावर पण पुन्हा पुन्हा हास्य येत असेन..
22 Sep 2011 - 6:29 pm | मी-सौरभ
_/\_
खपल्या गेले आहे
22 Sep 2011 - 6:46 pm | अत्रुप्त आत्मा
:-D :-D जबराट परिक्षण...काल कविता वाचुन मेलो,,,आज पचवून ;-) (हसून/हसून) :bigsmile: मरायची पाळी आलीये... साष्टांग नमस्कार. एक मात्र नक्की की शैलेंद्र यांनी एका बाजुचं खरंखुरं रसंग्रहण केलय...ही बाजू वाचताना पडद्याआड असते.ती कित्तीही कळली तरी सामान्यतः आपण दुसय्रा....म्हणजे कवितेच्या मुळ बाजूवरच ;-) आडवे तिडवे पडून लोळून हसत असतो..तेंव्हा दुसरी बाजू कळायचा अवसर कुठे? तो शैलेंद्र यांनी मिळवुन दिला...त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन ... :-)
अवांतर- धनाजीराव आगे (की तरफ ;-) ) बढो,बोहोत सारे तुम्हारे साथ है।....
22 Sep 2011 - 7:56 pm | प्रभो
=)) =)) =)) =)) कडक!!!
22 Sep 2011 - 8:07 pm | नगरीनिरंजन
कवितेपेक्षा तिचे रसग्रहण जंक्शन ही परंपरा शैलेंद्र यांनी पाळली आहे. तुर्तास एवढेच. सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखीव.
22 Sep 2011 - 8:19 pm | धन्या
माझ्याच कवितेचं इतकं जबरदस्त रसग्रहण होऊ शकेल असं मलाही वाटलं नव्हतं. मानलं राव तुम्हाला. :)
असो. जागा राखून ठेवतो. सविस्तर प्रतिसाद नंतर देईनच.
22 Sep 2011 - 8:47 pm | अत्रुप्त आत्मा
प्र.का.टा.आ.
22 Sep 2011 - 8:46 pm | अत्रुप्त आत्मा
@--- फुटलो... --- क्काय धनाजीराव..बसला की नाय धक्का ;-) ?
अवांतर-आपल्या मनात काय असत,ते अपल्याला तरी कुठे माहीत असत ;-) ? अशी नवी म्हण प्रचलीत कारावी का आज आंम्ही ;-) ?
अतीअवांतर---लिहीणाय्राच्या हतात फक्त,पेन अणी कागद असतो ही म्हण मात्र आंम्हाला आज प्रत्ययाला ;-) आली हो... :-D
22 Sep 2011 - 9:14 pm | धन्या
शॉल्लेट धक्का बसला राव. :)
लिहिताना कुठे थांबायचं हे तुम्हाला कळतं तर. ;)
23 Sep 2011 - 12:04 am | अत्रुप्त आत्मा
@-लिहिताना कुठे थांबायचं हे तुम्हाला कळतं तर. --- ह्हा ह्हा ह्हा ह्हा :-D
आम्ही लिहिताना कुठे थांबतो ?
आंम्हीतर मोकळे रिते होउन संपतो ;-)
23 Sep 2011 - 9:51 am | धन्या
भटजीबुवा, आहाला माहिती आहे हो हे. आम्हाला असं म्हणायचं होतं की तुम्ही हातात फक्त कागद आणि पेन देऊन थांबलात ;)
23 Sep 2011 - 8:33 pm | अत्रुप्त आत्मा
@-भटजीबुवा, आहाला माहिती आहे हो हे. आम्हाला असं म्हणायचं होतं की तुम्ही हातात फक्त कागद आणि पेन देऊन थांबलात---अस व्हय...ब्वार..;-) ब्वार.. ;-)
22 Sep 2011 - 8:58 pm | राजेश घासकडवी
रसग्रहणाची परंपरा चालू ठेवली आहे हे पाहून मनाला संतोष झाला.
वगैरे वाक्यांनी बहार आली.
मात्र या कवितेचं माझं इंटरप्रिटेशन पूर्णपणे वेगळं आहे. त्याबद्दल सवडीने सविस्तर.
22 Sep 2011 - 9:05 pm | Nile
काही काही वाक्यं लै आवडली. रसग्रहण आवडले.
>>मात्र या कवितेचं माझं इंटरप्रिटेशन पूर्णपणे वेगळं आहे.
आमचंही इंटरप्रिटेशन बरंच वेगळं आहे, त्याबद्दल माहीत नाही कधी.
22 Sep 2011 - 9:11 pm | धन्या
नाईलराव, तुम्हीही कधीतरी तुकारामांचे तळ्याकाठचे (की नदीकाठचे?) अभंग इथे देऊन जनसामान्यांचा उद्धार करा ;)
22 Sep 2011 - 9:07 pm | धन्या
गुर्जी, लवकरच सवड काढा. तुमचं पुर्णपणे वेगळं इंटरप्रिटेशन वाचण्यास उत्सुक आहे. :)
23 Sep 2011 - 6:01 am | नगरीनिरंजन
बरं बरं.
गुर्जी आपल्या सामानातून यावेळी कोणता 'ज्वलंत' विषय बाहेर काढताहेत याची वाट पाहतो.
26 Sep 2011 - 1:58 pm | वपाडाव
ह्याला, गुर्जी आपल्या पिवशीतुन कोण्तं सामान बाहेर काढतील, असं वाचुन साफ खपलो आहे...........
22 Sep 2011 - 10:13 pm | सुहास झेले
त्रिवार मुजरा _/\_ _/\_ _/\_ :) :) :)
22 Sep 2011 - 10:14 pm | शैलेन्द्र
गुर्जी व ध वा यांचा कच्चा माल परवाणगीशिवाय चोरल्याबद्दल, क्षमस्व.. ;)
22 Sep 2011 - 11:13 pm | धनंजय
मीसुद्धा या नामोनिर्देशापाशी क्षणभर थबकलो होतो. याचा सल्ला भलताच लहरी आहे, असे वाटते. म्हणजे कवीच्या पथ्यावरच पडला.
23 Sep 2011 - 8:47 am | शैलेन्द्र
या आयुर्वेदीक धन्याला, आधुनीक विज्ञान व सामान सुरक्षीतपणे हाताळायच्या नविन पद्धती शिकवाव्या लागणार बहुदा..नेहमीच पिशवीचा आग्रह योग्य नव्हे..
23 Sep 2011 - 4:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
सुरूवात अतिदवणीय झाली असल्यामुळे पुढचं वाचवलं नाही. हसण्यातच जीव गेला.
23 Sep 2011 - 6:12 am | शिल्पा ब
अशा द्विअर्थी संवाद असणार्या गावठी धाग्यांमुळे मिपाची प्रतिमा खराब होत आहे हे नम्रपणे नमूद करू इच्छिते.
23 Sep 2011 - 8:56 am | शैलेन्द्र
"द्विअर्थी " व "गावठी" या दोन शब्दांना आक्षेप घेतल्या गेला आहे हे नम्रपणे नमुद करु इच्छितो.
कवितेचा अर्थ शोधु नये असे म्हणतात, कारण तो अर्थ शब्दांत नसुन आपल्या मनात असतो, त्या अर्थी प्रत्येक कविता ही अनेकार्थी असते. आम्ही आमच्या परीने रसग्रहन केलय, पण तुम्हांस योग्य वाटेल तो अर्थ घेवुन कवीता एन्जॉय करण्याचे पुर्ण स्वातंत्र्य आहे. धन्यवाद
23 Sep 2011 - 10:04 am | धन्या
सहमत आहे. घासुगुर्जींनी केलेलं रसग्रहण हे उत्तम उदाहरण आहे. :)
23 Sep 2011 - 10:01 am | धन्या
शिल्पातै, फक्त "अशा द्विअर्थी संवाद असणार्या गावठी धाग्यांमुळे मिपाची प्रतिमा खराब होत आहे हे नम्रपणे नमूद करू इच्छिते." एव्हढंच लिहून थांबू नका. द्विअर्थी संवाद कुठे आहेत ते ही दाखवून दया.
हे साधं सरळ काव्य आहे. एक माणूस बाजाराला जातो, परंतू सामानाची पिशवी घरी विसरतो. तेव्हा आपलं सामान हातात पकडायच्या ऐवजी त्याच्या ओळखीच्या सखूला तिच्या पिशवीत ठेवायला सांगतो. ही आहे कवितेची मध्यवर्ती कल्पना. आता यात द्विअर्थी काय आहे बरं?
कवीने अगदी साधा प्रसंग लिहिला आहे. काही दुसरा अर्थ असलाच तर तो तुमच्या नजरेत, तुमच्या मनात आहे. या गीताचा घासूगुर्जींनीही अर्थ लावला. इथे वाचा. इतक्या सरळ साध्या काव्याचा गुर्जींनी इतका सुंदर अर्थ काढला. मीरेची कृष्णभेटीची उत्कटता, संसाराला विटलेल्या भक्ताची मुक्तीची आस त्या जाणवली. आणि तुम्ही म्हणताय प्रतिमा खराब होतेय.
असो. अंदाज अपना अपना. एकाच सभेत युधिष्ठीराला सारेच सज्जन तर दुर्योधना सारेच दुर्जन दिसले होते. तेव्हा तुमचे संस्कृतीगान चालू दया. :)
23 Sep 2011 - 11:36 am | शिल्पा ब
गुर्जींनी काही शब्द तेच वापरुन वेगळी कविता, ओव्या इ. लिहिलंय हे माझं मत. याच कवितेचं रसग्रहण नाही.
असो.
युधिष्ठीर वगैरेचा विषय काढलात म्हणुन..त्याला वाटत होते सगळे सज्जन आहेत याचा अर्थ ते फार सज्जन होते असा होत नै.
हे सुद्धा असोच. वेगळ्या धाग्याचा विषय होईल.
राहता राहीलं आमचं संस्कृतीगान...ते कोणीतरी केलंच पाहीजे नैतर ही महान संस्कृती टीकणार कशी?
23 Sep 2011 - 11:40 am | स्पा
शिल्पा काकूला वेगवेगळ्या फ्रंट वर लढताना पाहून डोळे पाणावले ;)
पाशवी शक्तींचाSSSSS
विजय असो !!!!!
23 Sep 2011 - 11:52 am | शैलेन्द्र
"गुर्जींनी काही शब्द तेच वापरुन वेगळी कविता, ओव्या इ. लिहिलंय हे माझं मत. याच कवितेचं रसग्रहण नाही. "
आम्हाला गुरुजींच्या कवितेबद्दल काही म्हणायचे नाही. गुरुजी थोर आहेत. तेच शब्द वापरुन वेगळी कवीता झाली कि नाही? म्हणजे गुरुजींनी शब्द वापरले तर ओवी आणी आमच्या धनाजीने वापरले तर गावठी शीवी?
खरतर हे रसग्रहण करुन तथाकथीत असंस्क्रुत लोकांनी मोकाट सोडलेल्या स्वतःच्या विचारांना एका परिघात आणायचा माझा प्रयत्न होता, पण तुम्ही त्याकडे तुमच्याच मनस्वी विचारांनी पाहिल्याने माझा प्रयत्न फसला हे मी खेदाने नमुद करतो.
"राहता राहीलं आमचं संस्कृतीगान...ते कोणीतरी केलंच पाहीजे नैतर ही महान संस्कृती टीकणार कशी?"
संस्कॄती ही प्रवाही असते हो.. नदीचं कालच पाणी आज नसत.. साचल की डबक होतं, वास येतो..
बाकी तुमच्या मताचा आदर आहेच्...
23 Sep 2011 - 12:09 pm | शिल्पा ब
प्रत्येक भाषेत तेच ते शब्द वापरतात पण कसे वापरतात, योजतात याला महत्व आहे आणि त्यानेच वाक्य तयार होउन अर्थ लागतो असं मला वाटतं.
बाकी तुमचं चालु द्या.
23 Sep 2011 - 12:25 pm | शैलेन्द्र
माझ मत असं आहे की कवितेला शब्दांच्या रचनेनेही अर्थ येत नाही. आपण आपल्या मनातला अर्थ त्या शब्दांना किंवा रचनेला चिकटवतो. कवितेतील शब्दरचना कधीच पारंपारीक नसते, आणी तयार झालेली ओळ ही लौकीकार्थाने "वाक्य" असेलच असे नाही, कारण बर्याचदा, क्रियापद/कर्ता/कर्म यांचा पत्ता नसतो..
तरीही आपणांस त्रास्स झाला असल्यास मंडळ माफी मागतयं..
23 Sep 2011 - 12:33 pm | धन्या
या मुद्दयाला शिल्पातैनी पद्धतशीर बगल दिलीय. शिल्पातै मुळ मुद्दयाचं उत्तर दया की.
23 Sep 2011 - 12:39 pm | शिल्पा ब
मी कवितेत ज्या प्रकारे शब्द योजलेत अन त्याने जो अर्थ लावला जातो याविषयी म्हणाले. बगल द्यायचा प्रश्नच कुठे येतो?
तुम्ही वर लिहिलेल्या परीच्छेदावरुनही वेगळ्या प्रकारचे काव्य लिहिणारा/री लिहु शकते. मला येत नाही नैतर मीच लिहिलं असतं. अजुन कै?
23 Sep 2011 - 12:51 pm | शैलेन्द्र
"मला येत नाही नैतर मीच लिहिलं असतं. अजुन कै?"
मलाही येत नाही.. म्हणुन तर मी रसग्रहन पाडत बसतो.. तुम्हीही बघा
23 Sep 2011 - 1:08 pm | धन्या
अहो मग तो अर्थ लावणार्याचा प्रॉब्लेम आहे ना.
उगाच कविता द्विअर्थी आहे म्हणून बोंब कशाला मारताय? :)
23 Sep 2011 - 1:14 pm | नगरीनिरंजन
घ्या मिटवून.
सगळ्यांनी एकेक देवाचं लिहून टाका पाभेंसारखं. हाकानाका.
23 Sep 2011 - 1:14 pm | शिल्पा ब
आम्हाला जे अर्थ लागले त्याने आम्ही द्विअर्थी आहे असं म्हणालो...
आणि लोकांनी अर्थ लाउन वाचावं म्हणुनच इथं ज्ञान पाजळलंय ना? तरं नसेल तर इथुन पुढे "याचा अर्थ असा घ्यावा" असं स्पष्टीकरण देउन लिहित चला. काय?
23 Sep 2011 - 2:17 pm | धन्या
आता तुम्ही काय अर्थ लावाल याचं आम्हाला थोडंच ना स्वप्न पडलं होतं. आम्ही सरळ साधी कविता लिहिली. तुम्ही त्याचा नको तो अर्थ लावलात हा तुमचा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी लिहिणार्याला दोष का देत आहात?
हो. लोकांनी अर्थ लाऊन वाचावं म्हनूनच इथं ज्ञान पाजळलंय. परंतू तुमच्यासारख्या महाज्ञानी व्यक्ती त्यांच्या मनातला नको तो अर्थ कवितेला चिकटवून वरुन कवीलाच दोष देत असतील तर त्याला काय करणार?
अहो आम्ही एक सरळ साधी बाजार या विषयावर कविता लिहिली. आता इतक्या सरळ साध्या कवितेतून तुम्ही दुसरे अर्थ काढाल याचं थोडंच ना लिहिताना स्वप्न पडणार आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीला लगाम लावून शब्दांना जो आहे तोच अर्थे घेत चला. काय?
23 Sep 2011 - 2:36 pm | शैलेन्द्र
छे छे छे.. कवीने असे चिडणे बरे नाही.. अशाने त्याचे मन कठोर होते आनी पुढच्या कविता प्रसवत नाही.. लोकांना नीट अर्थ लागत नसेल तर समजावुन सांगणे हे आपले काम आहे..
23 Sep 2011 - 8:27 pm | धन्या
अहो त्याचं काय आहे, शिल्पातै आमच्या कवितेचा नको तो अर्थ लावत आहेत आणि वरुन आम्हालाच म्हणत आहेत की तुम्ही अशा अशा अर्थाच्या कविता लिहून मिपाची प्रतिमा खालावत आहात.
कवितेचा अर्थ तुम्ही समजावलात, घासुगुर्जींनी समजावला. अगदी ननिंनीही समजावला. ईतके असूनही त्या आपला हेका सोडायला तयार नाहीत. आता अर्थ कवीने सांगितला काय किंवा तुम्ही, घासुगुर्जी किंवा ननिंसारख्या दर्दी रसिकाने रसग्रहण करुन समजावला काय, एकच ना?
24 Sep 2011 - 10:41 am | मृत्युन्जय
अशाने त्याचे मन कठोर होते आनी पुढच्या कविता प्रसवत नाही..
हॅ हॅ हॅ. कठोर होउन वेगळेच काहीतरी प्रसवायचा त्यांचा विचार आहे असे नाही का वाटत तुम्हाला? ;)
24 Sep 2011 - 11:27 am | शैलेन्द्र
बुडा$$$ली, बुडा$$$ली, संस्कॄती बुडा$$$ली,
24 Sep 2011 - 3:04 pm | धन्या
मन कठोर झालं की मुल्यांची जपणूक होऊन उलट संस्कृती पुढे चालवली जाते. ;)
23 Sep 2011 - 12:04 pm | जगड्या
तुम्ही म्हनताय, हे साधं सरळ काव्य आहे, द्विअर्थी नाही. मग येथिल लोक्स, गडबडा का लोळत आहेत ?
द्विअर्थी आहे तर आहे. स्वीकारा ना राव ! घाबरता कशाला !
23 Sep 2011 - 12:42 pm | शैलेन्द्र
"द्विअर्थी आहे तर आहे. स्वीकारा ना राव ! घाबरता कशाला !"
द्विअर्थी? अहो मी तर म्हणतो अनेकार्थी आहे.. बघा तुम्ही, अजुनही बरेच अर्थ लावता येतील.. अगदी "प्ल्यास्टीक वापरु नये" या पर्यावरन्वादी संदेशापासुन ते "पिशवी पुल- हे कार पुल या संकल्पनेचे रुपक" इथपर्यंत काहीही खपवता येइल्ल..
24 Sep 2011 - 10:45 am | तिमा
अनेक वर्षांपूर्वीची आठवण आहे. मुंबईजवळच्या एका उपनगरात एक प्रसिध्द कीर्तनकार रहात होते. त्यांचा तिथे आश्रम होता. ते नेहमीच द्विअर्थी/अनेकार्थी बोलायचे. पण एकदा त्यांचे कीर्तन चालू असताना एका माऊलीचे बाळ रडू लागले. कीर्तनात व्यत्यय आला. तेंव्हा ते बुवा एकदम बोलून गेले, 'द्या एक तोंडात' . त्यानंतर बिथरलेल्या श्रोत्यांच्या उद्रेकाने, त्या बुवांना रातोरात त्या गांवाहून पळ काढावा लागला.
आता काळ बदलला आहे, कदाचित त्या माऊलीसच पळ काढावा लागेल.
24 Sep 2011 - 11:21 am | शैलेन्द्र
कसं आहे, की, काळ वेळ बघुन बोलाव..
बाळ रडत असताना असे विनोद चारचौघात करणारा किर्तनकार, मला तरी मानसीकदॄष्ट्या आजारी वाटतो.
पण नावच मिसळपाव असलेल्या संस्थळावर उगा जिलेब्या काढण्यात काही मजा नाही. इथे येणारे सगळे आपल्या जबाब्दारीवर तर्री चापायला येतात.. त्यांन्ना उगाच गोग्ग्गोड जिलेब्या देण्यात काय मजा नाही.
24 Sep 2011 - 11:34 am | मृत्युन्जय
बाळ रडत असताना असे विनोद चारचौघात करणारा किर्तनकार, मला तरी मानसीकदॄष्ट्या आजारी वाटतो.
घ्या आता इथे काय विनोद केला कीर्तनकार बुवांनी? सरळ सरळ म्हटले आहे तोडात द्या. म्हणजे थोबाडीत मारा. लोकांच्या मनात पाप असल्याने त्यांनी चुकीचा अर्थ काढला असावा.
24 Sep 2011 - 11:41 am | शैलेन्द्र
"घ्या आता इथे काय विनोद केला कीर्तनकार बुवांनी? सरळ सरळ म्हटले आहे तोडात द्या. म्हणजे थोबाडीत मारा."
म्हणुन तर म्हटल ना की मानसीक रोग आहे.. बाळ रडत असताना, केवळ आपल्या कीर्तनाला अडथळा येतो म्हणुन त्याला मारायला सांगायचे? लोकांनी हाकलला ते बरेच झाले.
तुम्हीही आता तुमच्या मनातले अर्थ माझ्या विधानाला लावताय बघा.. :)
24 Sep 2011 - 3:08 pm | धन्या
हा... चला.... आले का अमेरिकेचे सारे नातेवाईक... उचला मला आता. ;)
26 Sep 2011 - 2:57 pm | मृत्युन्जय
बाळ रडत असताना असे विनोद चारचौघात करणारा किर्तनकार, मला तरी मानसीकदॄष्ट्या आजारी वाटतो.
गाडी चुकली मालक. वरचा "विनोद" शब्द वाचला होता आम्ही ;)
आम्ही तुमच्या मनतालेच अर्थ लावले होते वरच्या विधानाला :)
26 Sep 2011 - 11:32 pm | शैलेन्द्र
"गाडी चुकली मालक. वरचा "विनोद" शब्द वाचला होता आम्ही Wink"
अहो, गाडी नाही चुकली.. रडत्या मुलास अजुन मारुन रडावणे हा मला तरी क्रुर आणी निर्बुद्ध विनोद वाटतो..
* समजुन नाहीच घ्यायच अस आम्ही ठरवल्यावर तुम्ही ** समजवु शकत नाही आम्हाला..
28 Sep 2011 - 8:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अश्लील अश्लील अश्लील!
28 Sep 2011 - 3:32 pm | शैलेन्द्र
छे हो ... ** च्या जागी मला ** अस म्हणायच नव्हत तर " काही " अस म्हणायच होतं, तुमच आपल उगीच काहीतरी हो..
23 Sep 2011 - 8:06 am | सूड
आवडलं पक्षिनिरीक्षण...आपलं ते हे ...परिक्षण, परिक्षण !!
23 Sep 2011 - 9:35 am | किसन शिंदे
:D :D
... धन्याच्या कवितेचं रसग्रहण अतिशय जबरा पध्दतीने झालयं.
शैलेंद्र राव, मानलं बुवा तुम्हाला..
23 Sep 2011 - 11:12 am | ५० फक्त
पुढचा एक कट्टा, मिपावरच्या कविता आणि त्यांचं रसग्रहणं असाच करावा असं मनात घोळतंय. कार्यशील सदस्यांनी सहमती द्यावी ही विनंती,.
23 Sep 2011 - 7:36 pm | शैलेन्द्र
शमती आहे.. फक्त कच्चा माल आणी उत्तेजनार्थ यांची व्यवस्था करण्यात यावी अशी विनंती आहे.
23 Sep 2011 - 1:31 pm | दिपक
दण्ण्कन् हसलो !!!
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
23 Sep 2011 - 7:20 pm | शैलेन्द्र
बघा.. याला म्हणतात निरीक्षण..
23 Sep 2011 - 8:36 pm | धन्या
कवीचा बाजार उठवलात की राव तुम्ही :)
28 Sep 2011 - 6:28 am | ५० फक्त
बाजारच ना फक्त
28 Sep 2011 - 8:52 am | धन्या
वळूला पाहून मनात मधमाशांचं मोहोळ उठायला आम्ही काय गाय नाही ;)
25 Sep 2011 - 5:23 pm | मितभाषी
=)) =)) =))