गुरूपदेश

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
20 Sep 2011 - 1:18 pm

काही वर्षापूर्वीची गोष्ट... मी आयआयटीमध्ये माझ्या प्राध्यापकाना भेटण्यासाठी गेलो होतो. मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला आय आय टी परिसराची एक चक्कर पुरेशी असते. त्या खेपेला मी, मला दिलेला शब्द पाळणा-या आणि मी दूखावला गेलो तेव्हा माझी क्षमा मागण्याचा मोठे पणा दाखवणा-या प्रा. अरूणकुमारांना पण भेटलो. त्यांना लेक्चरला जायचे असल्याने आमच्यात संक्षिप्त अंवाद झाला. तो एखाद्या झेन गुरु शिष्यातील संवादासारखा होता. तो असा...

"Rajeev, what are you doing these days? "- प्रा. अरूणकुमार

"Sir, I am working in a private software company as Project Manager." -मी

"What is the team size?" - प्रा. अरूणकुमार

"8-10 developers"-मी

"How long you have been with them?" - प्रा. अरूणकुमार

"Now almost 3 years." -मी

"Who is on your top?" - प्रा. अरूणकुमार

"Vice President and CMD!" -मी

"How many IITians are there in your organization?" - प्रा. अरूणकुमार

"Only two, sir! Me and my boss. " -मी

"Rajeev, you should seriously think of changing your job" - प्रा. अरूणकुमार

मला झेन शिष्याप्रमाणे तत्काळ निर्वाण प्राप्त झाले!

नोकरीजीवनमान

प्रतिक्रिया

आदिजोशी's picture

20 Sep 2011 - 1:42 pm | आदिजोशी

का बाउंसर टाकताय?

आयआयटियन आहात हे कळून अत्यंत आदर वाटला..

कुंदन's picture

20 Sep 2011 - 1:49 pm | कुंदन

जॉब बदलला का की स्वतःची कंपनी चालु केली ?

इंटरनेटस्नेही's picture

20 Sep 2011 - 1:50 pm | इंटरनेटस्नेही

छान. असे तीन ते चार वाक्यात आपला मुद्दा समजावणारे गुरु आणि तो तसा समजणारे शिष्य आजकाल विरळाच.

युयुत्सु's picture

20 Sep 2011 - 1:57 pm | युयुत्सु

असे तीन ते चार वाक्यात आपला मुद्दा समजावणारे गुरु आणि तो तसा समजणारे शिष्य आजकाल विरळाच.

:)

छोटा डॉन's picture

20 Sep 2011 - 2:09 pm | छोटा डॉन

प्रा. अरुणकुमार बरोबर बोलले असे वाटते.
तुम्हाला निर्वाण प्राप्त झाल्यानंतर तुम्ही काय केले हे जाणण्यास उत्सुक.

- छोटा डॉन

युयुत्सु's picture

20 Sep 2011 - 2:15 pm | युयुत्सु

तुम्हाला निर्वाण प्राप्त झाल्यानंतर तुम्ही काय केले हे जाणण्यास उत्सुक.

रसेल आणि अभय बंग यांच्या विचारानी निवृत्त व्हायला प्रवृत्त केले.

वपाडाव's picture

20 Sep 2011 - 2:39 pm | वपाडाव

रसेल आणि अभय बंग यांच्या विचारानी निवृत्त व्हायला प्रवृत्त केले.

मिपावरुनही लौकरच निवॄत्त व्हाल ही ई. प्रा......

छोटा डॉन's picture

20 Sep 2011 - 2:42 pm | छोटा डॉन

>>मिपावरुनही लौकरच निवॄत्त व्हाल ही ई. प्रा......

ह्या इच्छे/सदिच्छे मागचे कारण कळु शकेल काय ?
आपल्याला सदर प्रार्थना करण्यामागे कसली इश्वरी प्रेरणा मिळाली ह्याचा आपण इथे उहापोह केलात तर त्याचा उपयोग अनेक मिपाकरांना भविष्यात होऊ शकतो अशी शक्यता वाटते.

- छोटा डॉन

वपाडाव's picture

20 Sep 2011 - 2:55 pm | वपाडाव

असंच मनाला वाटलं म्हणुन व्यक्त केले विचार.....
असे प्राध्यापक आम्हांस लाभले असता आम्हीही शतकी धागेकर्ते जाहलो असतो.....
बाकी आमचं अन देवाचं लहानपणापासुन क्रॉसिंग कधी झालंच नाही....
जास्तीत जास्त त्याच्या चरणी प्रार्थना करु शकतो एवढेच....

माझी ही मनोकामना कधी पुर्ण होइल हे युयुत्सुंनाच विचारावे काय?

Nile's picture

20 Sep 2011 - 6:59 pm | Nile

>>ह्या इच्छे/सदिच्छे मागचे कारण कळु शकेल काय ?

सदिच्छेला कारण का असावे बुवा? या आर्डिनरी लोकांच्या लाईफमध्ये (संस्थळं वगैरे) प्रमोशन होऊन ध्यान वगैरे करत बसाल अशी सदिच्छा असेल तर त्याला आक्षेप का म्हणे?

आम्ही तर "तुम्ही या मनुक्ष जन्मातुनच मुक्त व्हा" अशी सदिच्छा अनेकांना देऊ इच्छितो, पण डान्रावांच्या प्रतिसादांना घाबरून देत नाही. परवानगी द्या हो डान्राव!

वपाडाव's picture

21 Sep 2011 - 10:57 am | वपाडाव

आम्हांस पाठिंबा दिल्याबदाल हे स्वीकार करावे अशी विनंती मी नाइलला करत आहे.....

युयुत्सु's picture

21 Sep 2011 - 1:49 pm | युयुत्सु

मिपावरुनही लौकरच निवॄत्त व्हाल ही ई. प्रा.....

त्यासाठी प्रवृत्त करणारा रसेल इतका कुणितरी खंबीर हवा भेटायला :)

नगरीनिरंजन's picture

20 Sep 2011 - 2:13 pm | नगरीनिरंजन

IIT मध्ये शिकून प्रोजेक्ट मॅनेजमेंट करायचं म्हणजे......

मराठी_माणूस's picture

20 Sep 2011 - 2:18 pm | मराठी_माणूस

काहीच बोध झाला नाही, कोणी समजावेल का ?

आपण प्रा. अरुणकुमार यांच्याशी संपर्क साधावा अशी सुचना करतो.....

नितिन थत्ते's picture

20 Sep 2011 - 3:00 pm | नितिन थत्ते

बरं झालं जे ई ई ला बसलो नाही.

बा द वे. अभियांत्रिकी ते ज्योतिषयांत्रिकी हा प्रवास कसा झाला तेही युयुत्सुंनी लिहावे.

धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य!
संत रांचो ची काही वचने आठवली.
कंपनीत किती आयायटीयन्स आहेत ह्या पेक्षा नविन आणि क्रियेटीव काय केल आहेस अस विचारल असत गुरुंनी तर बर वाटल असत.

( तुमचे प्राध्यापकांच नाव विरु सहत्रबुद्धे असाव अस उगीचच वाटुन गेल.)

मदनबाण's picture

20 Sep 2011 - 4:16 pm | मदनबाण

( तुमचे प्राध्यापकांच नाव विरु सहत्रबुद्धे असाव अस उगीचच वाटुन गेल.)

ख्या ख्या ख्या... खी खी खी ! ;) आनंदराव लयं बेक्कार हसायला लावलयतं तुम्ही मला. ;)

कवितानागेश's picture

20 Sep 2011 - 3:56 pm | कवितानागेश

जसे एकाच जंगलात २ सिंह असू शकत नाहीत, तसेच एकाच कम्पनीत २ आयाअयटीयन्स राहू शकत नाहीत, असे काहीसे असावे ते. :)

चिरोटा's picture

20 Sep 2011 - 4:40 pm | चिरोटा

साबण बनवणारर्‍या दोन मोठ्या कंपन्यांत अनेक आयआयटीयन्स शेकड्याने असायचे. गुरुला असे सांगायचे असावे की-तूझा जो बॉस आहे तो तुझ्याएढाच कष्टाळू ,शिस्तप्रिय आहे. तेव्हा त्यात तुझा फार काही फायदा होणार नाही. आपल्याहून अधिक बुद्धिमान हार्वर्ड,एम आय टी,CMU,बर्कली,स्टॅनफर्डचा आता बॉस बघ.त्यातच तुझा फायदा आहे.

धन्या's picture

20 Sep 2011 - 4:14 pm | धन्या

आयायटीयनवर लोकांना आवसं-पुनवंची भीती दाखवण्याची वेळ आली आहे. काय होणार या देशाचं.

विनायक प्रभू's picture

20 Sep 2011 - 4:33 pm | विनायक प्रभू

प्रिय धवा साहेब,
चांगलेच धवुन टाकले की वो.
असो.
माझ्या मनातल्या प्रतिसादाबद्दल तुम्हाला एक कॉटर लागु.
बोला अमुशेला बसुया का पोरणिमेला?

धन्या's picture

20 Sep 2011 - 5:09 pm | धन्या

आम्हाला काही अजून गुरुपदेश झालेला नाही. ;)

सुहास झेले's picture

20 Sep 2011 - 4:40 pm | सुहास झेले

तुमच्या बॉसला खूप खूप शुभेच्छा ... :p :p

मी ऋचा's picture

20 Sep 2011 - 5:32 pm | मी ऋचा

हा लेख झेन गुरु वा शिष्यांच्या वाचनात येउ नये यासाठी काय उपाय्योजना करता येतील?

मी ऋचा's picture

20 Sep 2011 - 5:42 pm | मी ऋचा

दो आ प्र का टा आ

परिकथेतील राजकुमार's picture

20 Sep 2011 - 7:14 pm | परिकथेतील राजकुमार

सामंत काकांच्या आठवणीने उर भरुन आले.

अधिक प्रकाश भडकमकर मास्तर अथवा 'सां.प्र.मं.' चे कार्यकर्ते व सदस्य टाकतीलच.

सूड's picture

20 Sep 2011 - 7:17 pm | सूड

हे झेन शिष्य काय प्रकरण असतं ब्वॉ ??

झेन तर झेनच झेन !!
-एवढंच माहित असलेला, बाकी बाऊंसर.

युयुत्सु सर, तुमच्या मास्तरला बराच माज दिसतोय..अर्थात हे मत वरील संवादावरुन बनवले आहे..त्यांचे अजुन अनुभव सांगितल्यास मत बदलू शकते !

युयुत्सु's picture

21 Sep 2011 - 1:45 pm | युयुत्सु

तुमच्या मास्तरला बराच माज दिसतोय.

अहो असणारच. त्यांनी बर्कले विद्यापीठातून पीएचडी केली आणि ती पण मोजून १८ महिन्यात...

परिकथेतील राजकुमार's picture

21 Sep 2011 - 2:39 pm | परिकथेतील राजकुमार

अहो असणारच. त्यांनी बर्कले विद्यापीठातून पीएचडी केली आणि ती पण मोजून १८ महिन्यात...

बर्र मग ?

अहो आमच्या ज्ञानेश्वरांनी १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली..
रामदासांनी कोवळ्या वयात जगाची चिंता करायला सुरुवात केली..
छत्रपतींनी कुमार वयात स्वराज्याचे तोरण बांधले...
विवेकानंदांनी...

असो...

ह्यांनी कधी माज केलेला ऐकीवात नै बॉ !

येवढेच कशाला, आधुनीक ज्ञानेश्वर म्हणून ख्याती पावलेल्या आमच्या विनयक पाचलगने अवघ्या १८ व्या वर्षी सिंदबादला कोल्हापूरात आणले, चेतन भगतला अनावृत्त पत्र लिहीले, संघाच्या गुण दोषांचा आढावा घेतला, तंत्रज्ञानामूळे जगात काय क्रांती झाली आहे हे जगापुढे आणले.. पण त्याने देखील कधी माज दाखवला नाही हो.

च्यायला ! १०० वर्षे आयुष्य आहे हो ह्या आमच्या विनायकाला.
हा प्रतिसाद लिहून सुपूर्त केला आणि त्याचा समस आला. विनायकाची यंगेस्ट गेस्ट रेडियो जॉकी म्हणून निवड झाली आहे बघा टॉमॅटो FM वरती. तो 'नया जमाना' नावाचा शो सादर करणार आहे.

धन्या's picture

22 Sep 2011 - 9:12 am | धन्या

येवढेच कशाला, आधुनीक ज्ञानेश्वर म्हणून ख्याती पावलेल्या आमच्या विनयक पाचलगने अवघ्या १८ व्या वर्षी सिंदबादला कोल्हापूरात आणले, चेतन भगतला अनावृत्त पत्र लिहीले, संघाच्या गुण दोषांचा आढावा घेतला, तंत्रज्ञानामूळे जगात काय क्रांती झाली आहे हे जगापुढे आणले.. पण त्याने देखील कधी माज दाखवला नाही हो.

च्यायला ! १०० वर्षे आयुष्य आहे हो ह्या आमच्या विनायकाला.
हा प्रतिसाद लिहून सुपूर्त केला आणि त्याचा समस आला. विनायकाची यंगेस्ट गेस्ट रेडियो जॉकी म्हणून निवड झाली आहे बघा टॉमॅटो FM वरती. तो 'नया जमाना' नावाचा शो सादर करणार आहे.

एव्हढं सारं असलं तरीही तुमच्या आधुनिक ज्ञानेश्वरांना आयायटीची जे ई ई क्रॅक करता आली नाही हे वास्तव आहे ;)

नितिन थत्ते's picture

22 Sep 2011 - 10:12 am | नितिन थत्ते

>>तुमच्या आधुनिक ज्ञानेश्वरांना आयायटीची जे ई ई क्रॅक करता आली नाही हे वास्तव आहे

हे अगदी वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे विधान आहे. ज्ञानेश्वरांनी तिथे शिकावं अशी आयायटीची पात्रता नसल्याने आयायटीने नम्रपणे ज्ञानेश्वरांना नकार दिला.

प्यारे१'s picture

23 Sep 2011 - 11:35 am | प्यारे१

>>>येवढेच कशाला, आधुनीक ज्ञानेश्वर म्हणून ख्याती पावलेल्या आमच्या विनयक पाचलगने अवघ्या १८ व्या वर्षी सिंदबादला कोल्हापूरात आणले, चेतन भगतला अनावृत्त पत्र लिहीले, संघाच्या गुण दोषांचा आढावा घेतला, तंत्रज्ञानामूळे जगात काय क्रांती झाली आहे हे जगापुढे आणले.. पण त्याने देखील कधी माज दाखवला नाही हो.

प्रिय परा,
वयाच्या १५ व्या वर्षी लोकसत्तामध्ये लेख छापून आलेल्या मा. ना. चेतन सुभाष गुगळे (आमच्यासाठी चेसुगु) यांचे नाव आपण घेतलेले नाही हे आपणास विनम्रपणे सुचवू इच्छितो आणि त्यांचे असे नाव न घेतल्याबद्दल आणि त्यांचे खरे मूल्य न जाणल्याबद्द्ल 'आणि हो' त्यांना आद्य प्रतिज्ञानेश्वर न म्हटल्याबद्दल आपला जाहिर णिषेढ....!!!

बाळकराम's picture

22 Sep 2011 - 3:20 am | बाळकराम

युयुत्सु,
इथे इंग्लंडमध्ये मी जेमतेम पदवी घेतलेले किंवा पदवी सुद्धा नसलेले काही लोक वयाच्या २९व्या वर्षी मोठया संस्थांचे सीईओ झालेले आहेत, आणि ते ही अजिबात माज नसलेले!
च्यायला, हे आयआयटीयन्स नुसते अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले लोक दिसतात! आयआयटी तर सोडाच पण जगातल्या पहिल्या ५ विद्यापीठातून एमबीए/पीएचडी वगैरे केलेले अनेक हुशार लोकांचा मला सहवास मिळाला, पण असली माजोरडी भाषा कुणाच्याच तोंडी ऐकली नाही.
मी स्वतः लंडनच्या एका नामवंत विद्यापीठातून एमबीए केल आहे, पण स्वानुभावाने आणि इतरांच्याही अनुभवाने एक सांगू शकतो की ही सगळी नामवंत विद्यापीठे-मग ती आयव्ही लीग असोत वा रसेल ग्रुप विद्यापीठे असोत- ती केवळ एक ब्रँड आहेत. शेवटी तुमची गुणवत्ताच कामी येते आणि ती केवळ या नामवंत विद्यापीठात शिकलेल्या लोकांचीच मक्तेदारी नाही. मला वाटतं-२००४/०५ मध्ये एक सर्वे झाला होता की फोर्ब्स ५०० मधल्या कंपन्यांचे किती सीईओ या नामवंत विद्यापीठात शिकलेले आहेत- तर फक्त ४% सीईओ तसे निघाले! ( आयआयटी/आयआयएम वगैरे तर लांबच राहिले) "बर्कली, स्टॅनफर्ड इ मधून २ वर्षात पीएचडी केली" वगैरेची क्रेझ टीनएजर असताना ठीक असते, आता एवढं आयुष्य बघितल्यावर जर कुणाला त्याचं फाजील कौतुक असेल तर मग कठीण आहे बुवा! इथे कुणालाही कमी लेखण्याचा उद्देश नाही, आणि अशा शैक्षणिक कर्तृत्त्वाचा अपमान करण्याची इच्छा नाही, पण म्हणून केवळ त्या आधारावर जर कुणी दुसर्‍याला कमी लेखत असेल तर त्याला जागा दाखवलीच पाहिजे, एवढं मात्र खरं!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2011 - 9:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

"बर्कली, स्टॅनफर्ड इ मधून २ वर्षात पीएचडी केली" वगैरेची क्रेझ टीनएजर असताना ठीक असते, आता एवढं आयुष्य बघितल्यावर जर कुणाला त्याचं फाजील कौतुक असेल तर मग कठीण आहे बुवा!

बोर्डावर असलेली आपले "आयडल्स" ही चर्चा आठवली.

वपाडाव's picture

22 Sep 2011 - 10:31 am | वपाडाव

"बर्कली, स्टॅनफर्ड इ मधून २ वर्षात पीएचडी केली" वगैरेची क्रेझ टीनएजर असताना ठीक असते

आवेगात थोडं जास्त बोलुन गेलात काय बा.रा. ???
टीनेजर मध्ये जर ह्या क्रेझेस यायला लागल्या तर मैथुनाचे कांड दुसरीपासुन करावेत काय पोरांनी.....
ज्यांना आत्ता कुठे आपला पार्श्वभाग नीटपणे धुवायला जमतोय, अशी टीनेजर मंडळी जास्तीत जास्त ग्रॅज्युएशन बद्दल क्रेझी असतील.....
हे काहीही, जरा वाढीव प्रकरण होतंय.....

उदय's picture

23 Sep 2011 - 9:19 am | उदय

अहो असणारच. त्यांनी बर्कले विद्यापीठातून पीएचडी केली आणि ती पण मोजून १८ महिन्यात...

हे वाचून मला P.A.M. Dirac याची आठवण झाली ज्याने त्याचा Ph.D. thesis फक्त १७ पानांमध्ये लिहिला होता. याच P.A.M. Dirac ला १९३३ साली भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषक मिळाले.

तुमच्या प्राध्यापकांना नोबेल किंवा तत्सम प्रसिध्द पुरस्कार मिळाले असतील किंवा प्राध्यापकांकडे काही patents असतील किंवा त्यांनी लिहिलेली काही पुस्तके अभ्यासक्रमात असतील तर ते जाणून घ्यायला आवडेल.

तुमच्या मास्तरांना फक्त आयायटियनच खरे काम करु शकतात असे वाटते की काय? अहो असे असते तर जिथे जिथे आयायटियन आहेत तिथे तिथे फार वेगळे चित्र दिसले असते. आमच्या माहितीतले अनेक आयायटिअन हे कॉमनसेन्सला इतके कमी बघितले आहेत की आम्हाला शेवटी आयायटीचीच काळजी वाटायला लागली! ;)
आयायटीच्या बर्‍याच लोकांना एक सुप्त माज असतो असं आमचं अनेक वर्षांचं निरीक्षण आहे. भले तो माज दाखवण्याची त्यांची पात्रता असो वा नसो पण तो असतो आणि तो वेळी अवेळी दाखवायचा असा उद्दामपणाही असतो.
प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी सर्वसामान्य कॉलेजातून पदवीधर झालेले कित्येक अभियंते हे उच्च दर्जाचे काम करताना मी बघत आलो आहे. त्यामुळे तुमची काम करण्याची क्षमता आणि आयायटी किंवा कोणतेही उच्च दर्जाचे कॉलेज यांचा अर्थाअर्थी काही संबंध असतोच असे नाही!

-रंगा

छोटा डॉन's picture

21 Sep 2011 - 11:54 am | छोटा डॉन

रंगाशेठ जे म्हणत आहेत ते शक्य आहे.
तरीही आयआयटीयन्स किंवा तत्सम हायक्लास टेक. इन्स्टिट्युट आणि इतर कॉलेजेस इथले विद्यार्थी आणि आणि इतर बर्‍यापैकी सामान्य कॉलेजेसमधील विद्यार्थी ह्यांच्यात 'विचार करण्याच्या क्षमतेत' बराच फरक असतो असे वाटते.
जनरली अशा उच्च कॉलेजेसचा सिलॅबस किंवा वर्षातले कार्यक्रम ठरवताना त्यात विद्यार्थ्याच्या विचारक्षमतेस चालना मिळेल व तो सदैव काही ना काही करण्यात बिझी राहिल ह्या हेतुने डिझाईन केलेला असतो. बाकी बर्‍याच कॉलेजात आजही शाळेप्रमाणे लेक्चर्स, पाठांतर, लेखन आदी बाबींवरच भर दिलेला असतो. आजही अनेक कॉलेजेस केवळ मार्क पाडुन घेणे व इंजिनियर्स बनवणे ह्याचे कारखाने झाले आहेत.
मात्र आयआयटी किंवा इतर उच्च संस्थांमध्ये मार्क्स (किंवा ग्रेड) जरी महत्वाचे असले तरी विद्यार्थ्यांच्या इतर क्षमतांचा सुद्धा विकास होतो असे माझे स्पष्ट मत आहे.

सामान्य कॉलेजातले अभियंते उच्च दर्जाचे काम करतात हे सत्य असले तरी उच्च शैक्षणिक संस्थांमधुन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची 'क्षमता' सरासरीत जास्तच असते असे मला वाटते.
एकाच विद्यार्थ्याला उच्च संस्थेमधुन आणि इतर संस्थेमधुन असे शिक्षणाचे २ पर्याय ठेवले तर तो विद्यार्थी जेव्हा उच्च संस्थेमधुन शिक्षण घेऊन बाहेर पडेल तो पहिल्या केसपेक्षा नक्कीच जास्त कपॅबल असेल असे वाटते.

आयआयटीचा बागुलबुवा उभा करायचा नाही पण आत्तापर्यंत जे काही तांत्रिक क्षेत्र आणि त्यात काम करणारे लोक पाहिले तर मी उच्च शैक्षणिक संस्थांमधुन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जरा जास्तच क्षमता असते हे मान्य करतो.
असो.

- छोटा डॉन

नगरीनिरंजन's picture

21 Sep 2011 - 1:15 pm | नगरीनिरंजन

आत्तापर्यंत जे काही तांत्रिक क्षेत्र आणि त्यात काम करणारे लोक पाहिले तर मी उच्च शैक्षणिक संस्थांमधुन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जरा जास्तच क्षमता असते हे मान्य करतो

असे सरसकट असेलच असे नाही पण बहुतेकवेळा हे खरे असते ते मान्य आहे.
परंतु अशा उच्च तांत्रिक संस्थांमधून बाहेर पडून या जास्त क्षमता असलेल्या लोकांनी मूलभूत असे काही केलेले दिसत नाही. तंत्रविज्ञानात संशोधन वगैरे करणे, उत्पादनाच्या नव्या पद्धती विकसिक करणे किंवा गेलाबाजार पूर्णतः भारतीय बनावटीचे एखादे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट तयार करणे या लोकांना जमलेले दिसत नाही.
असे असताना ज्यात तांत्रिक शिक्षणाचा काहीही उपयोग नसतो अशा 'प्रकल्प व्यवस्थापनाचे' काम करणार्‍या आयआयटीयनने फुकाची टिमकी वाजवावी हे अत्यंत मनोरंजक आणि कूपमंडूक वृत्तीचे निदर्शक आहे हे सांगितलेच पाहिजे.

छोटा डॉन's picture

21 Sep 2011 - 1:56 pm | छोटा डॉन

परंतु अशा उच्च तांत्रिक संस्थांमधून बाहेर पडून या जास्त क्षमता असलेल्या लोकांनी मूलभूत असे काही केलेले दिसत नाही. तंत्रविज्ञानात संशोधन वगैरे करणे, उत्पादनाच्या नव्या पद्धती विकसिक करणे किंवा गेलाबाजार पूर्णतः भारतीय बनावटीचे एखादे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट तयार करणे या लोकांना जमलेले दिसत नाही.

?
असा काही ठोस विदा आहे का ?
उलट मी संशोधन विभागात भरमसाट उच्च संस्थामधले विद्यार्थी पाहतो.
अजुन रोचक गोष्ट सांगायची म्हणजे कंपन्या आजकाल त्यांच्या कर्मचारी वर्गाला अशा उच्च संस्थांमधुन उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहे, त्यासाठी स्पेशल कोलॅबोरेशन क्लासेस होत आहे, खास अभ्यासक्रम रचला जात आहे (ह्या सर्व बाबींचा माझ्याकडे व्यवस्थित विदा आहे).

असे असताना ज्यात तांत्रिक शिक्षणाचा काहीही उपयोग नसतो अशा 'प्रकल्प व्यवस्थापनाचे' काम करणार्‍या आयआयटीयनने फुकाची टिमकी वाजवावी हे अत्यंत मनोरंजक आणि कूपमंडूक वृत्तीचे निदर्शक आहे

तुम्ही म्हणता ते सत्य आहे, तरीही मला त्यात 'कूपमंडूक' वृत्ती दिसली नाही.
लेखकाने इतरांना बाजुला सारुन त्यांना आयआयटीयन असल्यामुळेच प्रकल्प व्यवस्थापकाचे काम मिळाले असा दावा केल्याचे दिसले नाही.
बाकी पुर्वार्धाशी सहमत आहे, आयआयटीयनने उच्च तांत्रिक शिक्षण घेऊन 'प्रकल्प व्यवस्थापका'चे काम करण्यात काय मजा नाही राव. :)

- छोटा डॉन

नगरीनिरंजन's picture

21 Sep 2011 - 2:06 pm | नगरीनिरंजन

असा काही ठोस विदा आहे का ?

एखादी गोष्ट नाही हे कसे सिद्ध करणार? अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, सन, ओरॅकल वगैरे कंपन्यांमध्ये ढिगानी आयआयटीयन्स असतील पण तितक्याच ढिगानी बाकीचे ही पामर आहेत.
तुमच्याकडचा विदा वापरून आयआयटीतल्या लोकांनी (भारतातल्या) इतर लोकांपेक्षा जास्त नवनिर्मिती केली आहे हे जरा समजावून सांगा. तसे सिद्ध करणे अवघड नसावे.
त्यानंतर ते धागाकर्त्याला कितपत लागू आहे त्याचा उहापोह करता येईल.
'कूपमंडूक' हा शब्द स्वतःचे विशेष असे कर्तृत्व नसताना आपल्या शिक्षणसंस्थेच्या पुण्याईवर मिपाच्या विहीरीत डराव डराव करण्याच्या प्रवृत्तीसाठी वापरला आहे.

Nile's picture

22 Sep 2011 - 3:04 am | Nile

>>परंतु अशा उच्च तांत्रिक संस्थांमधून बाहेर पडून या जास्त क्षमता असलेल्या लोकांनी मूलभूत असे काही केलेले दिसत नाही. तंत्रविज्ञानात संशोधन वगैरे करणे, उत्पादनाच्या नव्या पद्धती विकसिक करणे किंवा गेलाबाजार पूर्णतः भारतीय बनावटीचे एखादे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट तयार करणे या लोकांना जमलेले दिसत नाही.

आयआयटी मध्ये शिकणारी सरासरी "देशातील सरासरी अभियंत्यांपेक्षा" चांगली असतात या मताशी मी सहमत आहे. आयआयटीतील पुष्कळ मित्र वगैरे या अनुभवावरून. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे, बॅचलर इन इंजिनीअरींग आणि संशोधनाचा संबंध थेट लावणं चुकिचं आहे.

मुळात आयआयटींच्या स्थापनाचा उद्देश इंडंस्ट्रीअल विकासाचा होता. तेव्हाच्या प्रगत देशांकडून(जर्मनी, रशिया, अमेरीका इ.) असे तंत्रज्ञान घेऊन वेगवेगळ्या आयआयटी स्थापन केल्या गेल्या हे माहितच असेल.

आयआयटीतून बी.टेक होऊन संशोधनात जाणारे अनेक माझ्या वैयक्तिक ओळखीचे आहेत. पण त्यांचे संशोधनाचे करीअर इतर संशोधनात नाव कमावलेल्या विद्यापिठांत झाले. भारतात, खुद्द आयआयटीमध्येच काय म्हणतात हे सांगितल्यावर अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज पडू नये.
"In IIT Bachelors is product, Masters is byproduct and PhD is waste."

पाषाणभेद's picture

22 Sep 2011 - 3:21 am | पाषाणभेद

"In IIT Bachelors is product, Masters is byproduct and PhD is waste."

हां, म्हंजी मग त्ये वर्ले प्रा. IIT ह्या कारखान्यामंदी लेथमशीनवर कामं कर्नारे कामगार व्हते तर! लईच हार्ड काम हाय ब्वॉ या कारखान्यात.

पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(मेक्यॅनीक- ITI-डिझल इंजन)

नगरीनिरंजन's picture

22 Sep 2011 - 10:51 am | नगरीनिरंजन

तुझं बरोबर आहे.
IIT आणि संशोधनाचा संबंध लावणे चुकीचे आहे.
पण मग जेव्हा आपण म्हणतो की

आयआयटी मध्ये शिकणारी सरासरी "देशातील सरासरी अभियंत्यांपेक्षा" चांगली असतात

त्याचे कारण ते IIT मध्ये शिकतात हे आहे की IIT ची प्रवेशपरीक्षा पास होण्याएवढी बुद्धीमत्ता आधीच त्यांच्याकडे असते हे आहे?
अशा बुद्धीमत्तेचा माणूस कुठेही शिकला तरी तेवढाच चांगला होईल असे वाटते. यावर काय मत?

Nile's picture

22 Sep 2011 - 11:09 am | Nile

त्याचे कारण ते IIT मध्ये शिकतात हे आहे की IIT ची प्रवेशपरीक्षा पास होण्याएवढी बुद्धीमत्ता आधीच त्यांच्याकडे असते हे आहे?
अशा बुद्धीमत्तेचा माणूस कुठेही शिकला तरी तेवढाच चांगला होईल असे वाटते. यावर काय मत?

मला हे असं ब्लॅक आणि व्हाईट वाटत नाही. काही लोक इतके चांगले असतात की ते दुय्यम दर्जाच्या ठिकाणी जाऊनही पुढे येतात हे खरे आहे. मात्र सरासरी विद्यार्थ्याला आयआयटी (बॅचलर हे गृहित) कल्चरमध्ये घातल्यास त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा जास्त चांगला प्रवास होऊ शकतो असे माझे मत आहे. थोडे स्पेसिफिक सांगायचे तर, मी जर आयआयटीतून बॅचलर्स केलं असतं तर फार चांगलं झालं असतं असं माझं मत आहे. (अर्थात मूळ आयआयटींबद्दलच मला विशेष प्रेम आहे)

दुसरं म्हणजे, आयआयटीत प्रवेशासाठी खूप तयारी आणि बुद्धिमत्ता लागते हे खरे आहे. पण कोणत्याही विद्यापिठात एखादा एरवी सामान्य असणार अचानक प्रगती करतो तर एखादा मध्येच ढेपाळतो. त्यामुळे असे जनरलाईज्ड करणे फार अवघड आहे.

म्हणून, इतर सगळे फॅक्टर्स सारखे समजले तर तीच व्यक्ती आयआयटी कल्चर मधून बॅचलर झाली तर तीच तिच्या इतर रेग्युलर इंजिनीअरींग कॉलेजमधून बॅचलर झालेल्यापेक्षा सरस असेल असे माझे मत आहे. अर्थात हे मत पुराव्यानिशी सिद्ध करता येणे अवघड आहे.

छोटा डॉन's picture

22 Sep 2011 - 11:34 am | छोटा डॉन

इतर सगळे फॅक्टर्स सारखे समजले तर तीच व्यक्ती आयआयटी कल्चर मधून बॅचलर झाली तर तीच तिच्या इतर रेग्युलर इंजिनीअरींग कॉलेजमधून बॅचलर झालेल्यापेक्षा सरस असेल असे माझे मत आहे. अर्थात हे मत पुराव्यानिशी सिद्ध करता येणे अवघड आहे.

+१, अगदी हेच म्हणायचे आहे.

नाईल्या महान आहे हे जाताजाता कबुल करतो.

- छोटा डॉन

नगरीनिरंजन's picture

22 Sep 2011 - 12:02 pm | नगरीनिरंजन

माझ्या या उपप्रतिसादात बहुतेकवेळा हे खरे असते हे मी आधीच मान्य केले आहे. पण मुद्दा तरीही असा उरतो की IITच्या निर्मितीची कारणे, त्याला दिले गेलेले महत्व, तिथल्या मूलभूत सुविधा आणि इतर कॉलेजेसच्या सुविधा यातही फरक असतोच, मग त्यामानाने मार्जिनली चांगले असणार्‍या या लोकांनी इतरांप्रती असा दृष्टीकोन ठेवणे हे त्यांच्या चांगले असण्याच्या फरकाच्या मानाने अवाजवी आहे की नाही?
सुदैवाने मी ज्या ज्या कंपन्यांमध्ये काम केले तिथे असलेल्या आयआयटीयन्सकडे क्षमता किंवा वृथाभिमान या दोन्ही गोष्टी अतिरिक्त असल्याचे मला कधी जाणवले नाही.

वगैरे वेगळा मुद्दा आहे. वैयक्तिक अनुभवाच्या मुद्द्यांवर वादविवाद/चर्चा करण्यात काही हशील नाही. संशोधनाच्या मुद्द्यावर माझा आक्षेप होता.

मात्र, माझे अनुभव पॉसिटीव्हच जास्त आहेत. सगळ्याच मानसिकता विद्यापिठात बदलतात असे नाही किंवा विद्यापिठातल्या सगळ्या मानसिकता नंतर जपल्या जातातच असेही नाही, हे मात्र पटावे. आयआयटीच काय, बर्कली वाल्यांनी सुद्धा तुम्ही म्हणता तसे केले तर ते बरोबर आहे असे कोणी म्हणेल काय?

कवितानागेश's picture

22 Sep 2011 - 1:03 pm | कवितानागेश

"In IIT Bachelors is product, Masters is byproduct and PhD is waste."
हे खरोखरच अनुभवाचे बोल आहेत.
सहमत!
:(
काय दिवस आलेत माझ्यावर! :)

मूकवाचक's picture

21 Sep 2011 - 12:10 pm | मूकवाचक

काहीतरी ऐकून तत्काळ निर्वाण प्राप्त होणे आणि इन्स्टन्ट कॉफी घेऊन हाय फील करणे यातले साम्य स्पष्ट व्हावे यासाठी समर्पक उदाहरण आहे.

युयुत्सु's picture

21 Sep 2011 - 2:16 pm | युयुत्सु

:)

क्रमिक पुस्तकातला आतले आणि बाहेरचे हा लेख (लेखक ?)आठवला .
जे आतले आहेत ते आपल महत्व वाढवणारच.
आणि हा आतल्यांचा आणि बाहेरच्यांचा संघर्ष चालुच राहणार.

चित्रगुप्त's picture

21 Sep 2011 - 4:56 pm | चित्रगुप्त

हे वाचलंत, तर हेही वाचा:
http://misalpav.com/node/19209

बाळकराम's picture

22 Sep 2011 - 2:42 am | बाळकराम

थोडक्यात आयआयटी मध्ये कुठलाही सोम्यागोम्या जाऊ शकतो हे आज सिद्ध झाले म्हणायला हरकत नाही. चला आता आयआयटी चा डिंगोरा पिटणार्‍या लोकांच्या तोंडावर फेकून मारायला एक सबळ कारण उपलब्ध झाले! :D
थँक्यू युयुत्सु!

चिरोटा's picture

22 Sep 2011 - 12:20 pm | चिरोटा

आय आय टींची संख्या जेव्हा फक्त ५ होती आणी प्रवेश मिळवणारे ढोरासारखे कष्ट उपसत नव्हते तोपर्यंत आय आय टींची शान होती.

मराठी_माणूस's picture

22 Sep 2011 - 11:47 am | मराठी_माणूस

IIT मध्ये अन्य संस्था पेक्षा विशेष काय असते ? मास्तर लोक ? अभ्यासक्रम ? परीपुर्ण अभ्यासीका ? परीपुर्ण प्रयोगशाळा ? किंवा अजुन काही ?

चिरोटा's picture

22 Sep 2011 - 12:12 pm | चिरोटा

मास्तर लोक- भारतापुरता विचार केला तर बर्‍यापैकी कष्टाळू असतात. जागतिक विद्यापीठांची तुलना केली तर हे मास्तर लोक ordinary असतात्.(extra ordinary मास्तर म्हणजे- ज्याने त्याच्या क्षेत्रात एखादे पुस्तक लिहिले आहे आणि ते पुस्तक १ किंवा अनेक देशांत पाठ्यपुस्तक म्हणून किंवा संदर्भ ग्रंथ म्हणून वापरले जाते. ही माझी व्याख्या).
अभ्यासक्रम- अभ्यासक्रम बर्‍यापैकी असतो. विद्यार्थी पण चांगल्या ग्रेड्स मिळ्याव्यात म्हणून अहोरात्र झटत असतात.)
परीपुर्ण प्रयोगशाळा - ईतर भारतिय कॉलेजेसच्या तुलनेत प्रयोगशाळा बर्‍याच चांगल्या असतात.
बर्कलीमधून १८ महिन्यांत पी.एच.डी. ठीक पण त्या मास्तराचे त्याच्या क्षेत्रात योगदान काय, किती संदर्भ ग्रंथ लिहिले आहेत, त्याचे संशोधन ईतर कोठे वापरले जाते का? हे युयुत्सुंनी स्पष्ट करावे. अथवा GRE क्रॅक करण्यार्‍यांना आम्ही शेक्सपियर म्हणायचो त्यातलाच हा प्रकार झाला.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Sep 2011 - 12:23 pm | परिकथेतील राजकुमार

माकड म्हणते माझीच लाल...

हे आठवले.

क्लिंटन's picture

22 Sep 2011 - 2:06 pm | क्लिंटन

युयुत्सुसाहेब,

मी आपले लिखाण पूर्वीपासून वाचत आलो आहे पण प्रतिसाद पहिल्यांदाच लिहित आहे. मी भले तुमच्या "आय.आय.टी" चा नसेन पण त्याच आय.आय.टी मधील अनेक विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी जातात त्या "आय.आय.एम" चा माजी विद्यार्थी आहे. तुमची आय.आय.टी पदवीच्या शिक्षणात पुढे आहे तर आमचे "आय.आय.एम" पदव्युत्तर शिक्षणात भारतात नक्कीच पहिल्या क्रमांकावर आहे. त्या संस्थेतून बाहेर पडून मला काही फार दिवस झालेले नाहीत तरीही एक गोष्ट मला लगेचच जाणवली की प्रत्यक्ष नोकरीच्या ठिकाणी आपण जे काही शिकलो त्याचा वाटतो तितका उपयोग होत नाही.कारण अनेकदा अशा संस्थेत पुस्तकी माहिती मिळते आणि ती नोकरीच्या ठिकाणी फारशी उपयोगाची नसते.

दुसरे म्हणजे अशा संस्थेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनाच सगळे काही येते आणि इतर सगळे मूर्ख असतात हा एक प्रचंड मोठा गैरसमज आहे.गेल्या काही महिन्यातच मला अशी किमान ३ उदाहरणे दिसली आहेत. त्या तीनही उदाहरणांमधील मंडळी ही आय.आय.एम मधून नाही तर पहिल्या दहांमध्ये येणार नाहीत अशा संस्थांमधून बाहेर पडलेली आहेत.आणि त्यांच्याकडूनही शिकण्यासारखे खूप काही असते.तेव्हा आय.आय.टी/आय.आय.एम च्या नावाबरोबर येणारी किमान बुध्दीमत्ता सोडली तर अशा बड्या नावांमध्येच सगळे काही आहे हा मोठा गैरसमज तुम्ही गेले अनेक वर्षे कसा काय बाळगता तुम्ही? कमाल आहे तुमची.

तिसरे म्हणजे तुमच्या संस्थेचे प्राध्यापकच असा माज विद्यार्थ्यांच्या मनात भरवत असतील तर ते अत्यंत धक्कादायक आहे.इतके दिवस मला आय.आय.टी विषयी एक प्रकारचे कुतुहुल जरूर होते पण आता यापुढे असे कोणतेही कुतुहुल असायची गरज नाही.जो मनुष्य असा माज भरवितो त्यापासून चार हात दूर राहिलेलेच बरे. (अवांतरः आमच्या संस्थेला सुरवातीच्या काळात मार्गदर्शन लाभले विक्रम साराभाईंचे. नंतरच्या काळात सी.रंगराजन, सी.के.प्रल्हाद, मनमोहन सिंह ज्यांना गुरूस्थानी मानतात असे आय.जी.पटेल अशा दिग्गजांनी आमच्या संस्थेत प्राध्यापक म्हणून काम केले.त्यांच्या तालमीत तयार झालेल्या प्राध्यापकांनी कोणत्याही व्यासपीठावर कधीही विद्यार्थ्यांना असा माज शिकविलेला नाही.किंबहुना मी संस्थेच्या मुलाखतीची तयारी करत होतो तेव्हा आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शकांनी सांगितले होते की 'IIM Professors don't like students with an attitude'. आणि असा attitude असलेले माझ्या ओळखीतले काही अजूनही आय.आय.एम ची मुलाखत पार करू शकलेले नाहीत.आता आय.आय.टी मध्ये जर प्राध्यापकच असा attitude शिकवत असतील तर विद्यार्थ्यांकडून तरी वेगळी अपेक्षा कशी करणार?)

चौथे म्हणजे मी काही वर्षे अमेरिकेतही एक failed PhD student म्हणून काढलेली आहेत.तिथेही मला असे आय.आय.टी वाले काही नग भेटले होते.त्यांना माझा एकच प्रश्न असे-- तुम्ही आय.आय.टीचे म्हणून इतके प्रकांड पंडित असाल तर तुम्ही पण माझ्याच विद्यापीठात का? तुम्ही MIT किंवा Stanford मध्ये का नाही? तुम्ही तिथे न जाता माझ्या विद्यापीठात आलात याचाच अर्थ तुम्ही आय.आय.टी ची झूल जरी घातली असली तरी त्या विद्यापीठांनी नुसती झूल न बघता ती झूल परिधान करणारा हत्ती किती calibre चा आहे हे पण बघितले तेव्हा हुषारी करायचीच असेल तर पहिल्यांदा MIT किंवा Stanford सारख्या ठिकाणी जा आणि मग इतर संस्थांमधील भारतीय विद्यार्थ्यांपेक्षा आपण कोणीतरी वेगळे ही हुषारी करा. अर्थात ते या प्रश्नावर मौन पाळून असत हे वेगळे सांगायला नको.

(आय.आय.एम चा माजी विद्यार्थी-- पण असा कुठलाही अहंकार नसलेला) क्लिंटन

शाहिर's picture

22 Sep 2011 - 2:23 pm | शाहिर

क्लिंटन याम्च्याशी सहमत
आय आय टी सारख्या नामवंत कॉलेज मधुन एक अहंकारी मुलगी आमच्या कंपनी मधे जॉइन झाली...
आम्ही आपले साध्या कॉलेज मधे शिकलेले ..टीम इंट्रोडक्शन मधे मि नाव आणि कॉलेज सांगितल ..
तर ही म्हणे .. कुठल्या कोपर्या तल्या कॉलेज मधुन इंजिनीरींग केलास रे ..

सर्व जण टका मका बघु लागले ..

नंतर एक्दा तिला काही अडले होते , तीने मदती साठी बोलाविले तेव्हा, प्रॉब्लेम सॉल्व झल्यावर ति चित्कारली ..सहिच रे !! हे तुला कसा माहित होता ??

मि टीम सहीत , अर्ध्या फ्लोअर ल ऐकु जाइल एवढ्या हळु आवाजात सांगितले

"हे ना.. कोपर्‍या मधल्या कॉलेज मधे शिकवतात"
------------------------------------------------------------
तुम्ही कुठुन शिकलात ह्यल महत्व नाही..काय शिकलात याला आहे ..
माझ्या छोट्या गावतल्या मराठी शाळेमधे एक वाक्य लिहिले होते
" विद्या विनयेन शोभते"

आय आय टी मधे पण लिहावा असा विचार चालु आहे

चिरोटा's picture

22 Sep 2011 - 2:34 pm | चिरोटा

हा हा हा.
'कोपर्‍यातल्या' इंजिनियरिंगवाल्याने कोपच्यात दिला.

प्रियाली's picture

22 Sep 2011 - 2:45 pm | प्रियाली

तुमचा बॉसही आय आयटीयन होता हे तुमचं सुदैव. असं सुदैव प्रत्येक आयआयटीयनच्या वाट्याला येतं असं नाही. अशांना तुमचे प्राध्यापक भेटले असते तर त्यांनी कसला सल्ला दिला असता कोणजाणे. तुमचा बॉसही आय आय टीयन म्हणून तुम्हाला निर्वाण प्राप्त झाले तसे त्यांचे काय झाले असते या कल्पनेने अंगावर शहारा आला.

असो.

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Sep 2011 - 3:06 pm | बिपिन कार्यकर्ते

मला तर मूळात तुम्हाला काय म्हणायचे तेच कळले नाहीये. पण बर्‍याचशा प्रतिसादांमधून दिशा कळली. माझ्यासारख्या अभ्यासाबाबत अतिउदासीन माणसाला आयायटी आयायेम वगैरे मधले फारसे कळत नाही त्यामुळे मतप्रदर्शन करणे बरे नाही. पण एकंदर विषय चालला आहे त्यावरून एक गंमत आठवली. :)

माझ्या ओळखीची एक मुलगी. वय २५ वर्षे. रायपूर छत्तिसगढची राहणारी. त्याच राज्यात बर्‍याच ठिकाणी नातेवाईक असणारी, त्यानिमित्ताने त्या त्या भागात गेलेली. रायपूरच्याच REC मधून इंजिनियर झाली. मग आयायटी कानपूर मधून एमटेक केलं. आणि मुंबईत आली टीसीएस मधे. असे प्रोफाईल. तिने ज्याच्याशी लग्न ठरवले तो पण सेम प्रोफाईल. आयायटी मुंबई एवढाच फरक. शिवाय तो मुलगा युपीएससी साठी प्रचंड मेहनत करणारा. अशा या मुलीला नक्षलवादातला न देखिल माहित नव्हता. माझी तिची ओळख झाल्यावर आम्ही गप्पा मारायचो बर्‍याच. जेव्हा मी तिला पहिल्यांदा याबाबतीत प्रश्न विचारला तेव्हा तिला मी कशाबद्दल बोलतोय तेच कळले नाही. मग मी तिला बरेच काही समजवून सांगितले तेव्हा तिच्या डोक्यात प्रकाश पडला किंचित आणि ती एवढेच म्हणाली ... "अरे वो सब ना? वो तो सिर्फ एकदम डीप जंगलोमे होता है. हम तो शहरमे रहते है. ऐसा कुछ प्रॉब्लेम नही है." मी नाद सोडला. :)

अर्थात, आयायटीवाल्यांना सगळ्यातलं सगळं कळावं अशी माझी अपेक्षा अजिबात नाही. पण मग आयायटी / REC असे क्रीम शिक्षण घेताना या मुलांची वाढ होते (सामाजिक / शैक्षणिक इ.) याबद्दल मला खूपच शंका यायला लागली. तिचे (आणि तिच्या आयायटीमधल्या अजून काही सहाध्यायींचे, ज्यांना मी भेटलो) एकंदरीतच समाजज्ञान अगदीच शून्य होते असे म्हणायला हरकत नाही. इतक्या उच्च संस्थांमधे शिकणार्‍या लोकांकडून इतके टोकाचे अज्ञान मला तरी पूर्णपणे अनपेक्षित होते.

नितिन थत्ते's picture

22 Sep 2011 - 4:24 pm | नितिन थत्ते

सहमत आहे.

आय आय टी सदृश माज सीओईपी/व्हीजेटीआय अशा कॉलेजातले लोकही करतात असे निरीक्षण आहे.
.
.
.
.
.
.
(साधासुधा) नितिन थत्ते

मला अशी सूक्ष्म शंका आहे की ज्योतिष विषयक प्रचंड टीका होत असल्याने आपली पार्श्वभूमी आयआयटीसारख्या तांत्रिकदृष्ट्या सर्वोच्च संस्थेतली आहे असं सूचित केलं असावं. त्यामुळे ज्योतिष विषयक अभ्यासाला काही शास्त्रीय बळ किंवा एंडॉर्समेंट मिळू शकेल.

मला असा अनुभव पूर्वी एका ब्लॉगवर वाद घालताना आला आहे. विमानविषयक वाद चालू होता.. वाद प्रतिवाद एका लेव्हलपर्यंत तापल्यावर लेखक आयआयटियन आहे हे त्याने असेंच हळूSSSSSच जाताजाता सूचित केलं.

:)

यात क्वालिफिकेशन आणण्याची गरज नसतानाही..

मी आयआयटियन नसलो तरी पायलट लायसन्ससाठी लागणार्‍या परीक्षा एअरक्राफ्ट इंजिनमधलं स्पेशलायझेशन आणि प्रत्यक्ष उड्डाण एवढा अनुभव या विषयावर मत करायला पुरेसा होता. पण मी माझी अशी ओळख न देता माझे मुद्दे मांडत होतो.. त्यांनी मात्र आयआयटियन ही त्यांची ओळख वाद वाढायला लागताच सांगितली.

अर्धवट's picture

22 Sep 2011 - 4:00 pm | अर्धवट

>>आयआयटीसारख्या तांत्रिकदृष्ट्या सर्वोच्च संस्थेतली

'तथाकथीत' हा शब्द राहून गेल्याचं नम्रपणे निदर्शनास आणू इच्छीतो.

शाहिर's picture

22 Sep 2011 - 3:55 pm | शाहिर

साध्या भाषेत सांगा ना तुम्हाला काय कळाले ?
आम्हाला कळाले तर आम्हालापण निर्वाण प्राप्त होइल.

चेतन सुभाष गुगळे's picture

23 Sep 2011 - 11:40 am | चेतन सुभाष गुगळे

I born intelligent education ruined me.

चेसुगु, तुम्हाला असे म्हणायचे आहे का ?
I was born intelligent but education in IIT ruined me.

समीरसूर's picture

23 Sep 2011 - 11:56 am | समीरसूर

लेखाचा उद्देश लक्षात आला नाही.

म्हणजे ज्या कंपनीमध्ये आयआयटीमधून शिकलेली मंडळी नसेल अशा यःकश्चित ठिकाणी तू आपली बुद्धी, शिक्षण, योग्यता, इत्यादी का व्यर्थ दवडतो आहेस असे तर प्रा. अरुणकुमारांना सुचवायचे नव्हते ना? म्हणजे मला असाच अर्थ कळला. असं जर असेल तर मग प्रा. अरुणकुमारांनाच अजून शिकण्याची गरज आहे असे मला वाटून गेले.

माझा आणि आयआयटी, आयआयएम, सीओईपी, व्हिजेटीआय, वगैरे उच्च संस्थांचा कुठल्याच प्रकारचा संबंध कधीच आला नाही आणि माझी शैक्षणिक, बौद्धिक योग्यता बघता असा संबंध येणे पुढच्या ७-८ जन्मात तरी शक्य होणार नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. म्हणून आयआयटी, आयआयएम या संस्थांविषयी मला खूप आदर आहे. या संस्थांमधून उत्तीर्ण होणार्‍यांविषयी मला नेहमीच एक भीतीयुक्त आदर वाटत असतो. ही मंडळी बुद्धीमान असतातच यात शंकाच नाही; त्यांच्या फोकसचे देखील मला कौतुक वाटते.

इथे आयआयटी, आयआयएम मधून उत्तीर्ण झालेली मंडळी बघून मला त्यांच्याविषयी आदर वाटतो. पण सगळ्या जगाला आदर वाटतो म्हणून प्रा. अरुणकुमारांनी अशी टिप्पणी करावी हे अनाकलनीय आहे. कुणी कुठलेही काम करत असला तरी तो त्याच्या-त्याच्या परीने अर्थव्यवस्थेचे इंजिन पुढे नेण्यास हातभार लावत असतो हे अर्थशास्त्राचे सोपे गणित आहे. अगदी शिपाई असला काय किंवा सफाईकामगार असला काय, प्रत्येक व्यक्ती अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य घटक असते. ही अशी अर्थव्यवस्थाच नसेल तर मग कुणाच्या बुद्धीला किंमत राहील? सी. के. प्रल्हादसारखा द्रष्टा व्यवस्थापन गुरु जर 'बॉटम ऑफ पिरॅमिड' अशी लाखमोलाची थिअरी मांडून बड्या-बड्या कंपन्यांना यश मिळवून देऊ शकतो तर कुठल्याही स्तरावरच्या व्यक्तीचे किंवा ती व्यक्ती करत असलेल्या कामाचे एकूण अर्थव्यवस्थेतले महत्व प्रा. अरुणकुमारांसारख्या तज्ञ व्यक्तीला कळू नये याचे आश्चर्य वाटते.

मी आयआयटीमधून किंवा एनआईडीमधून डिझाईनचा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या काही लोकांना ओळखतो. त्यांची झेप इतरांच्या मानाने काही फार दिव्य नाहीये. एक मुलगी तिच्या कामात थोड्या-फार प्रमाणात वगळता बाकी खरच मठ्ठ आहे. कॉमन सेन्स, लॉजिक, जनरल नॉलेज, विचार करण्याची क्षमता, इत्यादी सगळ्याच बाबतीत ती जवळ-जवळ शून्य आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. माझ्या जुजबी ओळखीचा एक आयआयटी मधून शिकलेला प्रोजेक्ट मॅनेजर आहे. तो इतका बालिश आणि गर्विष्ठ आहे की कुठलाच प्रोजेक्ट त्याला घ्यायला तयार होत नाही. 'मी आयआयटीत शिकलेलो आहे' या तोर्‍यामुळे त्याने खूप शत्रू आणि खिल्ली उडवणारे मित्र जमवून ठेवलेले आहेत. कंपनी जॉईन केल्यावर ताबडतोब पीसी मिळाला नाही म्हणून संतापून त्याने एक सर्वर उचलून आणला होता. 'मी आयआयटीयन आहे' हे माहित असून मला लवकर पीसी, लॅपटॉप मिळत नाही याचा त्याला फार राग आला होता. आता तो काहीतरी फुटकळ कामे करत असतो आणि सगळे त्याला टाळण्याचा प्रयत्न करत असतात.

शेवटी माणूस घडतो ते अंतःप्रेरणेने. बाकी दिशा देण्याचे काम हे बाहेरील घटकांचे असते. या संस्था आणि त्यात शिकणारे खूप बुद्धीमान असतात यात शंकाच नाही पण फक्त तेवढ्यावरच यश अवलंबून नसते असे मला वाटते. कितीतरी कमी शिकलेले, न शिकलेले आयुष्यात काहीतरी भव्य-दिव्य करून जातात. इन फॅक्ट, सीईओ वगैरे मंडळी सोडली तर आभाळाला टेकलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या यादीमध्ये इतके महान शिक्षण घेतलेल्या लोकांचे प्रमाण फार काही जास्त नसावे.

--समीर

संपत's picture

24 Sep 2011 - 12:32 am | संपत

मला वाटते कि सर्व महत्वच मुद्दा विसरत आहेत. प्राध्यापकानी त्याना कम्पनी नव्हे तर job change करायला सान्गीतले आहे. त्यामुळे युयुत्सु आता त्याच कम्पनीमध्ये project management ऐवजी technical role करत असावेत. बरोबर ना, युयुत्सु ?

आत्मशून्य's picture

24 Sep 2011 - 7:02 am | आत्मशून्य

मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला आय आय टी परिसराची एक चक्कर पुरेशी असते

ह.ह.पू.वा..... का ? please don't ask... because its not my nature to be mysterious but I cant tell you and I cant tell you why ...... ;)

बाकी या धाग्याबद्दल काय बोलणार ? आता तूम्ही कीतीही कारणे पूढे करा, भलेही कारणे योग्य असतील वा नसतील मिपाकर तूमच्या चूकीच्या वागण्याचे/निर्णयाचे खापर तूमच्यावरच फोडतील तूमच्या गूरूंवर नाही.

गेल्या काही वर्षांत आयआयटीतून बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांचा दर्जा घसरत असून वरच्या २० टक्क्यांतील विद्यार्थी वगळता बाकीच्या ८० टक्क्यांचा दर्जा सुमार असतो, असे मत ‘ इन्फोसिस ’ चे संस्थापक नारायणमूर्ती यांनी व्यक्त केलं

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10228616.cms

यातच सर्व काही आले ..
बाकी चालु द्या

मैत्र's picture

4 Oct 2011 - 6:01 pm | मैत्र

दिसत नाही
लेख जितका एकांगी वाटला की जर दोनच आयआयटीयन्स असतील तर बाहेर पड तितकेच बरेच प्रतिसादही...
जर इतके सर्व इतर कॉलेजेस आणि सगळे कोपर्‍यावरच्या कॉलेज मधले बुद्धिमान आहेत तर ते काय मुद्दाम जेईई सोडून बारावी करून मुद्दाम कमी गुण घेऊन तिथे गेलेत आणि आता काही जनरल सॉफ्टवेअर कामात आपली असामान्य प्रतिभा दाखवतायत की जी बी टेक वाल्यांपेक्षा खूप महान आहे.

हे मान्य करायलाच हवं की तेवढा बुद्धिमत्तेत, कष्टात, गुणवत्तेत आणि इतर विद्यापीठातून जसे किलोच्या टनाच्या भावाने अभियंते सहज पास होऊन काही धडपड करून सॉफ्टवेअर मध्ये शिरतात त्यापेक्षा आय आय टिचा दर्जा शंभर टक्के वरचा आहे. (मी आय आय टी चा नाही कोपर्‍यावरच्या कॉलेजचा आहे... खुलासा केलेला बरा).

सध्या जागा राखून ठेवत आहे... पुढील प्रतिसादासाठी...